ज्ञानेश्वर

Submitted by sahitya_rasik on 8 July, 2008 - 04:51

विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले
अवघेची झाले देह ब्रह्म
आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले
नवल देखिले नभाकार गे माये
बापरखुमादेविवरु सहज निटू झाला
ह्रदयी न दाविला ब्रह्माकारे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पैल तो गे काउ कोकताहे
शकुन गे माये सांगताहे
उड उड रे काउ तुझे सोनेने मढवीन पाउ
पाहुणे पंढरीराऊ घराकै येती
दहीभाताची उंडी लावीन तुझे तोंडी
सत्य सांगे गोठी, विठू येइल कायी?

माझी सर्वात आवडती विराणी

घनु वाजे घुण घुणा, वारा वाहे रुणझुणा
भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा का?
चान्दु वो चान्द्णे चापे वो चन्दने
देवकीनंदनेवीण नावडे वो
चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी
कान्हो वनमाळी वेगी भेटवा का
दर्पणी पहात रूप न दिसे वो आपले
बापरखुमादेवीवरे मज ऐसे केले

आजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु
हरि पाहिला रे हरि पाहिला रे
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी
दृढविटेवनमुळी, विराजीत वनमाळी
बरवा सन्तसमागमु, प्रगटला आत्मारामु
कृपासिंधू करुणाकरू, बाप्रखुमादेवीवरु

मोगरा फुलला मोगरा फुलला
फुले वेचिता बहरु कळियासी आल
इवलेसे रोप लावियले द्वारी
तयाचा वेलु गेल गगनावेरी
मनाचीये गुंफी गुंफियला शेला
बापरखुमादेवीवरे विट्ठले अर्पिला

किती शांत, सोज्ज्वळ काव्य आहे हे... आद्यकवि ही उपाधी चपखल बसते..

रंगा येई वो ये, रंगा येई वो ये
विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई

वैकुंठवासिनी, विठाई जगत जननी
तुझा वेधू माझे मनी, रंगा येई वो ये

कटी कर विराजित, मुगूट रत्न जडित
पीतांबरु कासिला, तैसा येई का धांवत

विश्र्वरुप विश्र्वंभरे, कमळ नयनें कमळाकरे वो
तुझे ध्यान लागो, बाप रखुमादेवीवरे वो

आणि हा अजुन एक माझा अतिशय आवडता

अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू
मी म्हणे गोपाळू, आला गे माये

चांचरती चांचरती बाहेरी निघाले
ठकचि मी ठेलें काय करु

तो सावळा सुंदरु कासे पितांबरु
लावण्य मनोहरु देखियेला

बोधुनी ठेलें मन तव जालें आन
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये

बाप रखुमादेवी वरु विठ्ठल सुखाचा
तेणें काया मने वाचा वेधियेलें

ही एक वेगळी रचना, एक गाणं म्हणून ऐकलेलं. पण मला काही प्रश्न आहेत.

मी माझे मोहीत राहिले निवांत
एकरूपतत्व देखिले गे माये

छाया माया काया हरीरूपी ठायी
चिंतिता विलया एक तेजी

ज्ञानदेवा पाहा, ओहं-सोहं भावा
हरीरूपी दुहा सर्व काळ

१. ह्यात बापरखुमादेवीवरू सारखी त्यांचा 'तखल्लूस' का नाही?
२. ही रचना इतकीच आहे की अजून काही ओळी बाकी आहेत?
३. छाया माया काया हा शब्द क्रम बरोबर आहे का? मूळ रचनेत वेगळा आहे का?

ऍडमिन, ह्या बीबी वर चर्चा केलेली चालते की नुस्त्या कविता द्यायच्या आहेत?

दाद,
ईथे चर्चा, माहितीची देवाण घेवाण अपेक्षीत आहे.

मी हि रचना पहिल्यांदाच वाचत आहे....अप्रतिम आहे.
प्रश्नांची उत्तरे जाणकारांनी द्यावीत

ह्यात अजून एक चरण आहे

द्वैताच्या गोष्टी हारपल्या
शेवटी विश्वरूपे मिठी देत हरी
किशोरी आमोणकरांनी स्वरबद्ध केलेल्या रचनांमधली एक (अल्बम - रंगी रंगल श्रीरंग). जवळ असावा असा एक!
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया

कानडाउ विठ्ठलु करनाटकु तेणे मज लावियेला वेधु
खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी आळविल्या नेदी सादु

पाया पडू गेले तव पाउलची न दिसे
उभा की स्वयंभू असे
समोर की पाठीमोरा न कळे
ठकचि पडिले कैसे

शब्देविण संवादु दुजेविण अनुवादु
हे तव कैसे निगमे
पर ही परते बोलणे खुंटले
वैखरी कैसे मी सांगू

बाप रखुमादेवीवरू हृदयीचा जाणुनी
अनुभव तैसे मी केला
दृष्टीचा डोळा पाहो गेलीए
तव हृदयी पालटू आला

पहिल्या कडव्यात बहुधा चूक झाली असावी. 'खेम देउ गेले तव मीची मी एकली' ही ओळ कुठेतरी आहे. नीट आठवत नाही.

अनुमानेना अनुमानेना
श्रुती नेति नेति म्हणती गोविंदू रे
तुज सगुण म्हणू की निर्गुण रे
सगुण निर्गुण एकू गोविंदू रे
तुज दृश्य म्हणू की अदृश्य रे
दृश्य अदृश्य एकू गोविंदू रे

हे कुणी कृपया पूर्ण करेल का?
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

दाद हे घे.

तुज सगुण म्हणू की निर्गुण रे
सगुण निर्गुण एकू गोविंदू रे
अनुमानेना अनुमानेना
श्रुती नेति नेति म्हणती गोविंदू रे
तुज स्थूळ म्हणू की सुक्ष्म रे
स्थूळ सुक्ष्म एकू गोविंदू रे
तुज दृश्य म्हणू की अदृश्य रे
दृश्य अदृश्य एकू गोविंदू रे
निवृत्तीप्रसादे ज्ञानदेव बोले
बाप रखुमादेवीवरू विठ्ठलू रे
तुज सगुण म्हणू की निर्गुण रे

मीना काकु पुर्णच देतो, तुम्ही लिहीलेल्यात थोडा बदल करुन

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती
रत्नकिळफाकती प्रभा
अगणित लावण्य तेज पुंजाळिले
न वर्णवे तेथीची शोभा

कानडाउ विठ्ठलु करनाटकु तेणे मज लावियेला वेधु
खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी आळविल्या नेदी सादु

शब्देविण संवादू दुजेविण अनुवादू
हे तव कैसे निगमे
पर ही परते बोलणे खुंटले
वैखरी कैसे मी सांगू

पाया पडू गेले तव पाउलची न दिसे
उभाची स्वयंभू असे
समोरकी पाठीमोरा न कळे
ठकचि पडिले कैसे

क्षेमालागी जिव उताविळ माझा
म्हणवूनी स्फूरताती बाहू
क्षेम देऊ गेले तव मी ची मी ऐकली
आसावला जिव राहो
कानडाउ विठ्ठलु

बाप रखुमादेवीवरू हृदयीचा जाणुनी
अनुभव सौरसू केला
दृष्टीचा डोळा पाहो गेलीए
तव भितरी पालटू झाला

पांचा दामाचा घोंगडा नेसेन
उरली मोट ते मी सेवीन गे बाईये
कामाडी, कामाडी कामाडी होईन

या गोपाळाचे घर रिघेन गे बाईये
कामाडी, कामाडी कामाडी होईन

त्याचा उंबरा उशीसा करीन
वरी एरझार मी सारीन गे बाईये
कामाडी, कामाडी कामाडी होईन

निवृत्ती ज्ञानदेवा पुसतील वर्म
त्यांसी कामी न मी पुरेन गे बाईये
कामाडी, कामाडी कामाडी होईन

या गोपाळाचे घर रिघेन गे बाईये
कामाडी, कामाडी कामाडी होईन

योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी
पाहता पाहता मना नच पुरे धणी

देखिला देखिला माये देवांचा तो देव
फिटला संदेहो निमाले दुजेपण

अनंत रुपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी
बाप रखुमादेवीवरू खुण बाणली कैसी

<<पैल तो गे काउ कोकताहे
शकुन गे माये सांगताहे
उड उड रे काउ तुझे सोनेने मढवीन पाउ
पाहुणे पंढरीराऊ घराकै येती
दहीभाताची उंडी लावीन तुझे तोंडी
सत्य सांगे गोठी, विठू येइल कायी?>>

"आंबेया डहाळी फळे चुंबी रसाळी ..." अशीही एक ओळ आहे. यानंतरची ओळ काही केल्या कळत नाही.
सहित्य-रसिक, माहित असल्यास पोस्ट करा कृपया!!!

अंबिया डहाळीया फळे चुंबी रसाळ
आजिचे रे काळी शकुन सांग वेगी ||

ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे
भेटती पंढरीराणे शकुन सांगे ||

अप्रतिम धागा! अनेक तुटक्या ओळी मनात जुळवून मिळाल्या. धन्यवाद सर्वांना.

ग्रेट धागा. आज दिवसभर हाच वाचते आहे.
जर शक्य असेल तर ,अर्थ सांगीतला तर वाचायला खूप आवडेल.

सर्वाना मनःपूर्वक धन्यवाद! खरतर खूप चाचरत हा धागा सुरु केला होता, कारण ज्ञानेश्वरांना आपण "संत" म्हणतो "कवी" नव्हे! असो, खुप छान प्रतिसाद मिळत आहे! असाच मिळत राहो! अजून "ज्ञानेश्वर-काव्य" ह्या धाग्यात गुंफत जाणे!

नमस्कार,

परमपुज्य कलावती आई यांच्या श्रीहरीमंदीरात उत्सवाच्या कार्यक्रमात असलेली
हे संत ज्ञानेश्वर महाराजांची दोन भजने..

----१---------

खचित तुम्ही सांगा | कोण्या रंगाची आहे ती मुरली |धृ|

किती लांबीची, किती रुंदीची, किती उंचीची आहे ती मुरली |१|
किती रंगाची, किती भिंगाची, किती युगाची आहे ती मुरली |२|
किती घराची, किती सुराची, किती फेर्‍याची आहे ती मुरली|३|
ज्ञानदेव म्हणे, गुरुकृपेने ओळखुनी घ्यावी ती मुरली |४|

----२-------
कान्हा तुझी घोंगडी चांगली चांगली
आम्हासी का दिली वांगली रे |धृ|

स्वगत सच्चिदानंद मिळोनी, शुद्ध सत्वगुणे विणली रे
षड्गुण गोंडे रत्नजडीत तुज, श्यामसुंदरा शोभली रे |१|

कम्य कर्म अविद्या त्रिगुण, पंचभुतानी विणली रे
रक्त रेत दुर्गंधी जंतु, मलमुत्रानी भरली रे |२|

षड्विकार, षड्वैरी मिळोनी, तापत्रयाने विणली रे
नवा ठायी फाटुन गेली, ती आम्हासी का दिधली रे |३|

ऋषीमुनी ध्याता, मुखी नाम गाता, संदेहवृत्ती विरली रे
बापरखमादेवीवर विठठले, तत्पदी वृती मुरली रे |४|

------------------------------------------
श्री सद्गुरुनाथ महाराज की जय!

उड्डाण
विश्वासाचे

ग्या न बा मय वातावरण,
अतीसून्दर,
चालू ठेवा,
हरी नामाचा गजर.

धन्यवाद हो! पूर्ण ओळी दिल्याबद्दल!
अंबिया डहाळीया फळे चुंबी रसाळ
आजिचे रे काळी शकुन सांग वेगी ||

ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे
भेटती पंढरीराणे शकुन सांगे ||

>स्वगत सच्चिदानंद मिळोनी, शुद्ध सत्वगुणे विणली रे
स्वगत सच्चिदानंद भरोनी, शुद्ध सत्वगुणे विणली

>>ऋषीमुनी ध्याता, मुखी नाम गाता, संदेहवृत्ती विरली रे
रुप मनी ध्याता,मुखी नाम गाता, संदेहवृत्ती विरली

माजा मर्‍हाटाचि बोलू कवतिके, परी अमृतातेहि पैजा जिंके

ही कविता संपूर्ण कुणी लिहील का?

तसेच, ही कविता ज्ञानेश्वरांनी लिहीली की स्तेफान नावाच्या ख्रिस्ती धर्मगुरुने लिहीली?

माझ्या मराठीचा बोलु कवतिके। परि अमृतातेही पैजा जिंके।
ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन॥
ही संत ज्ञानेश्वरांची ओवी आहे

फ़ादर स्टीफ़न्स यांची रचना :
जैसी हरळांमाजी चंद्रकळा। की रत्नांमाजी हिरा निळा।
तैसी भाषांमजी चोखळा। भाषा मराठी॥१||
एकूण चार चरण आहेत.

Pages