अमेरिकेत ऐतिहासिक आरोग्य विधेयक संमत

Submitted by चंपक on 22 March, 2010 - 01:05

http://epaper.esakal.com/esakal/20100322/5509504158478656796.htm

न्यूयॉर्क - आरोग्य विम्याचे संरक्षण नसलेल्या लाखो अमेरिकी नागरिकांना आरोग्यसेवेच्या छत्राखाली आणत विमा कंपन्यांच्या पिळवणुकीला चाप लावणारे ऐतिहासिक आरोग्यसेवा सुधारणा विधेयक "हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हज' ने आज (ता.२२) सकाळी संमत केले. त्यासाठी अध्यक्ष बराक ओबामांनी आपले अध्यक्षपद पणाला लावले होते. तसेच ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियाचा दौरा रद्द करत देशांतच थांबणे पसंत केले होते. त्यामुळे हा त्यांच्या राजकीय विजय मानला जात आहे. ओबामांच्या डेमोक्रॅटिक पक्षाने दशकभर उराशी बाळगलेले ध्येय हे विधेयक संमत झाल्याने पूर्ण झाले आहे.

हे विधेयक संमत व्हावे यासाठी अध्यक्ष ओबामा गेल्या वर्षभरापासून प्रयत्नशील होते. विरोधी रिपब्लिकन पक्षाने या विधेयकाला कडाडून विरोध केला होता. आज सभागृहात मतदानाच्यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या सर्वच्या सर्व म्हणजे १७६ सदस्यांनी त्याविरोधात मतदान केले. एवढेच नाही तर हे विधेयक संमत होण्यासाठी २१६ मतांची गरज असताना ओबामांच्याच डेमोक्रॅटिक पक्षाच्या ३४ सदस्यांनीही विरोधात मतदान केले. मात्र, विधेयकाच्या बाजूने २१९ मते मिळाल्याने ओबामांचा राजकीय विजय झाला.

अमेरिकेच्या सिनेटने गेल्या नाताळच्या वेळेसच या विधेयकाला हिरवा कंदील दाखवला आहे. आता अध्यक्ष बराक ओबामांची स्वाक्षरी होताच त्याचे कायद्यात रूपांतर होईल.
हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर विम्याचे संरक्षण नसलेल्या नागरिकांना ते प्राप्त होईल. सामाजिक सुरक्षेइतकेच महत्त्व त्याला देण्यात आले असून आरोग्यसेवेच्या वाढत्या किंमतींना आळा बसेल आणि अर्थसंकल्पीय तूट कमी होईल असे डेमॉक्रॅटिक सदस्यांचे म्हणणे आहे. रिपब्लिकन पक्षाने मात्र, नव्या कायद्यामुळे अमेरिकेवर कर्जाचा असह्य बोजा पडेल आणि आरोग्य यंत्रणा अधिक दुबळी होईल अशी टिका केली आहे.

********************
अमेरिकन नागरिक अन भारतीय व अमेरिकन जाणकार ह्यांच्याकडुन याबद्दल सविस्तर माहिती अन चर्चा अपेक्षित आहे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला गेल्या १० वर्षापासुन अ‍ॅलर्जीचा (म्हण्जे अंगाला खाज येणे) त्रास आहे. खूप उपचार केले - त्यामध्ये अ‍ॅलोपॅथी, होमीओपॅथी, आयुर्वेदीक, युनानी इत्यादी उपचार केले पण काहिच फरक पडला नाही.

नव्या कायद्यामुळे अमेरिकेवर कर्जाचा असह्य बोजा पडेल आणि आरोग्य यंत्रणा अधिक दुबळी होईल अशी टिका केली आहे.

ही टीका अनाठायी आहे, असे मी वाचले होते.. विरोधामागची खरी पोटदुखी खाजगी इन्शुरन्स कंपन्यांचा बिझनेस कमी होईल, ही आहे, म्हणे..

या विधेयकाचा खोलवर अभ्यास केलेला नाही, परंतु खालील मुद्धा वादग्रस्तः

१. सरसकट सगळ्यांना हेल्थ इन्शुरंस बंधनकारक. त्यामुळे हेल्थ इन्शुरंस कॉस्ट सगळ्यांमध्ये विभागली जाणार. याचा फायदा ज्यांच्याकडे ऑलरेडी हेल्थ इन्शुरंस आहे (प्रिमियम कमी होणार) आणि तोटा ज्यांना हेल्थ इन्शुरंसची आवश्यकता नाही (उदा. तरुण वय गट) त्यांना झक् मारुन प्रिमियम भरावा लागणार.

आत्तापर्यंत जिथे जिथे सरकारने आरोग्य विमा हाती घेतलाय (मुख्यतः युरोपात) तिथे कुठल्याही शस्त्रक्रियेसाठी रांग लावावी लागतेय. (आता तर ब्रिटन मधून भारतात रोगी पाठवत असल्याचीही बातमी आहे).. पण 'तुम्हाला अमुक आजार आहे, तो इतका भीषण (Serious) नाही तेव्हा तुमचा नंबर पाच महिन्यानी' या प्रकाराला बर्‍याच लोकांचा विरोध आहे आणि तो अनाठाई नाही.
कुठलीही गोष्ट सरकारने ताब्यात घेतली की ती लाल फितीत कशी अडकते ते सगळ्यांनाच माहीत आहे.
यातून Primium कमी होतील याचीही लोकांना खात्री नाही. उलट, तुम्हाला नोकरी आहे तेव्हा तुम्ही Primium भरा (ज्यांना नाही त्यांच्यासाठी पण) असं होण्याची शक्यता आहे म्हणतात. काही कंपन्या अजून वेगळा विमा देऊन पगारदारांची बिलं भरतात. त्यावर सरकार टॅक्स लाऊन तेही बंद करणार आहे.
अमेरिकेत आरोग्य विमा, डॉक्टर, रुग्णालयं आणि न्यायालय हे मोठ्ठं Racket आहे, त्यातून आतातरी जनतेची सुटका होईल अशी आशा ओबामा दाखवतात. बघू.

अमेरिकेत आरोग्य विमा, डॉक्टर, रुग्णालयं आणि न्यायालय हे मोठ्ठं Racket आहे>>> हे सर्वच देशात आहे असे लक्षात येतेय!

विम्याचा हप्ता वेळीच कापला जातो पण परतावा घ्यायला दोन फोन करावेच लागतात! Happy

शेती, शिक्षण, आरोग्य अश्या मुलभुत गोष्टींमध्ये सर्व जग कसे गंडवले जाते ते ' ऑल फॉर सेल' ह्या पुस्तकात खुप सुंदर पद्धतीने माडले आहे.

<अमेरिकेत आरोग्य विमा, डॉक्टर, रुग्णालयं आणि न्यायालय हे मोठ्ठं Racket आहे>
अनुमोदन!

ओबामाची सुटका केंव्हाच झाली! प्रश्न आपला आहे. कव्हरेज कमी, डिडक्टिबल जास्त! हे प्रकार आत्ताच सुरु झाले आहेत. शिवाय सक्तीने विमा घ्या ठीक आहे, पण तरी जो प्रिमियम भरावा लागेल त्यात नेमके आपल्याला हवे असलेले कव्हर होत नाही, असेहि आढळून येईल.

मुळात आरोग्य विमा कंपन्यांचा किंवा रुग्णालयाचा किंवा डॉक्टरांचा नफा वाढणार नसेल तर कायदा होणारच नाही! कारण तेच राजकारण्यांना निवडून यायला पैसे देतात!

झक्की, अ नु मो द न.

लोकांऐवजी त्या कंपन्यांनाच ठेवा डिडक्टिबल. वर्षात अमूक इतक्या रकमेच्या वर एखाद्या व्यक्तीचे मेडिकल बिल नसेल तर ते सगळे मुकाट्याने भरा. मग ते कशासाठी का असेना. ज्यांची प्रकृती चांगली आहे ते कधीतरी काही कारणासाठी औषध मागणार आणि ते म्हणे कव्हर्ड नाही!
आणि आता सर्वांना विमा मिळणार, प्रि कंडिशन असली तरी हे ठीक पण ती रिस्क बाकींच्याचे प्रिमियम वाढवून ठेवणार.

>>आरोग्यसेवेच्या वाढत्या किंमतींना आळा बसेल
वा! वा!! हे कसे म्हणे?

- इंश्युरन्स चा कमी वापर करणार्‍या तरुण गटा कडुन प्रिमियम घेवुन प्रिमियम न परवडणार्‍या पण गरज असलेल्या गटाला रास्त दरात कवरेज देता येइल अशी कल्पना आहे. प्रत्यक्षात इंश्युरन्स कंपन्या काय करतात हे कळेलच.
- तसेच इंश्युरन्स नसलेल्या बेकायदा स्थलांतरीतांना (इललीगल इमीग्रंट्स) ना देखील कवरेज द्यावं असाही मुद्द होता (अर्थात त्यांच्या कडुन दर महीना प्रिमियम घेवुनच). कारण अशा स्थलांतरीतांना अपघात बगैरे झाल्यास त्या साठी यंत्रणे वरती बोजा पडतोच ( अपघात झाल्यावर रुग्ण कायदेशीर/बेकायदा आहे हे बघीतले जात नाही...), आणि त्याचा खर्च अप्रत्यक्षरीत्या प्रिमियम भरणार्‍यांवरच पडतो....त्यापेक्षा त्यांच्या कडुन (बेकायदा स्थलांतरीत) वेळचे वेळीच प्रिमियम घेतल्यास तो खर्च कमी करता येइल.....
ह्या विधेयका मधे बरेच चांगले बदल आहेत तसेच बरेच शंकास्पद (अर्थी ज्यांची उपयोग्यता आणि व्यवहार्यता फक्त भविष्यकाळच ठरवु शकेल) बदलही आहेत. मात्र इतर कुठ्ल्याही देशा प्रंआणे इथेही रिपब्लीकन्स आणि त्यांची री ओढणारे कंझर्वेटीव ग्रुप्स त्यातील फक्त शंकास्पद मुद्देच उचलुन ओबामांविरुद्ध रान पेटवतायेत....(आता हे सुद्धा कमी झालय कारण सगळे जणं सद्ध्या बिपीला (ब्रिटीश पेट्रोलियम) नावं ठेवण्यात व्यस्त झालेत)

>> आरोग्यसेवेच्या वाढत्या किंमतींना आळा बसेल
कसा काय?

मुळात आरोग्यसेवेच्या किंमती हा रोग आहे. इलाज भलतीकडे होतो आहे असं एक सामान्य नागरिक म्हणून माझं (अनएज्युकेटेड) मत.

इंश्युरन्स चा कमी वापर करणार्‍या तरुण गटा कडुन प्रिमियम घेवुन प्रिमियम न परवडणार्‍या पण गरज असलेल्या गटाला रास्त दरात कवरेज देता येइल अशी कल्पना आहे.>>मला वाटले कि coverage नसलेल्या मोठ्या गटाला insurance मधे आणल्यामूळे market share वाढतोय म्हणून insurance premium फारसे वाढणार नाही अशी मूळ कल्पना होती