अनुभूती रंगांची

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

हिरवट रंगाभोवती छोटासा पिवळसर पटटा, त्याला तपकिरी रंगाची किनार. मधे लाल चुटुक, त्यावर जांभळे टिपके, आणि वरच्या बाजुला हिरवा गार.

हे वर्णन माझ्या एखाद्या रंगीबेरंगी ओढणीचे किंवा साडीचे नसुन माझ्या घरी कुंडीत वाढलेल्या एका अननसाचे आहे.

आवडत्या फळांपैकी एक असलेला अननस आमच्या भागातही मिळत असल्याने दिसतो कसा, लागतो कसा हे जरी माहीती असले तरी, पैदास त्या भागात होत नसल्याने, त्याचे 'झाड' कसे असते, तो येतो कसा, एकुण प्रक्रिया काय असते, हे बघण्याचा कधीच योग आला नव्हता, किंवा तशी उत्सुकता पण कधी वाटली नाही.

कोकणातुन येताना एका मित्राने माझ्यासाठी अननस आणला आणि योगायोगाने त्याच्या आसपासच वाचण्यात आले होते की अननसाचा शेंडा परत मातीत रोवला तर, छान फुटतो. अजुन एक योगायोग असा की, त्याच दिवशी मी घरी नसताना, घरात असलेल्या २ व्यक्तींपैकी एकाने माझा माठ फोडला.

तोडलेला अननसाचा देठ मी फुटलेल्या माठात कचरा + माती भरुन रोउन दिला. गोल माठात हिरवा देठ 'शो' साठी चांगला दिसेल, इतकीच अपेक्षा. पुढच्या प्रवासात मात्र रोजची सकाळ माझ्यासाठी एक सुंदर रंगीबेरंगी आश्चर्य घेउन येत होती. अत्यंत देखणी अशी ही प्रक्रिया शब्दात सांगणे खरच अवघड आहे.

[फोटो मी माझ्या सेल फोन कॅमेर्‍याने काढले आहेत, त्यामुळे जे दिसले, ते तसेच्या तसे तुमच्या पर्यंत पोहोचेलच असे नाही, पण एक प्रयत्न :)]

छोटासा शेंडा रुजला, आणि मोठ्या-मोठ्या नविन पानांनी छान बहरला.
1.JPG

पण तरीसुध्दा याला एखादे फळ / फुल येईल असे माझ्या ध्यानी-मनी पण आले नाही. अचानक एके दिवशी सकाळच्या टेहळणीच्या वेळी दिसले की एक लाल लुसलुशीत असे फुलासारखे काही झाडाच्या मध्यभागात दिसते आहे. अननसाला फुल येते ?, या आधी कधीच ऐकले नव्हते, अनेकांना विचारले, फळवाल्याला सुध्दा, पण कोणीच निट उत्तर देउ शकले नाही.
2.JPG

दोन दिवसांनी फुल थोडे वर सरकले, आणि खाली एक दांडा दिसु लागला.
3.JPG

फुल थोडसं मोठ झाल्यावर, पाकळ्या एकदम दाट आणि जाड झाल्या. तेंव्हा या फुलाचेच फळ होणार, म्हणजे हे फुल नसुन फळाची पहीली अवस्था आहे हे लक्षात आले.
4.JPG5.JPG

आठच दिवसात छान गोलाकार आला. आणि तो लालचुटुक गोळा अत्यंत देखणा दिसु लागला.
6.JPG

या लाल गोळ्या भोवतीची लांब-लांब पाने पण मस्त लालबुंद, आणि टोकाकडे हिरवी अशी होती.
7.JPG

अजुन ८ दिवसांनी, मधला भाग थोडा हिरवट दिसायला लागला. मधे हिरवा, त्या भोवती लाल, पुन्हा त्या भोवती हिरवा. इतके देखणे दिसत होते ते फुल / फळ.
8.JPG

आणि अचानक या रंगांमधे भर पडली अजुन एका रंगाची. जांभळ्या रंगाचा एक टिपका लाल पाकळ्यांमधे दिसायला लागला.
9.JPG

दुसर्‍या दिवशी अजुन काही टिपके दिसले.
10.JPG

आणि आदल्या दिवसाच्या टिपक्याचे आज फुल उमलले होते.
11.JPG12.JPG13.JPG14.JPG15.JPG

अननसाला जे खवले असतात, निट बघितले तर लक्षात येते की त्या खवल्यांना छोटेसे काटेरी टोक असते. ते टोक म्हणजेच हे जांभळे फुल. प्रत्येक खवल्यात असे एक जांभळे फुल येत होते.
16.JPG

जांभळी फुले सुकुन, खवले स्पष्ट दिसायला लागले.
17.JPG

आणि अननसाने आता मस्त आकार घेतला.
18.JPG

हळुहळु तो मोठा होऊ लागला.
19.JPG20.JPG21.JPG22.JPG

अननसा बरोबरच तुराही मोठा झाला, पण जुनी पाने आणि नविन तुरा, दोघांच्या रंगात खुपच फरक होता.
23.JPG

आणि हा मोठा झालेला अननस.
24.JPG

अनेकांनी म्हंटले आहे की एखादी वेल वाढताना बघणे हे आपल्या लहान मुलाला वाढताना बघण्याइतकेच आनंददायी असते. पण मी म्हणेन की असे एखाद्या अननसाला वाढताना बघणेही तसेच काहीसे मन भरुन आनंद देणारे असते.

विषय: 
प्रकार: 

खूप मस्त. सहीच. मजा आली सगळे फोटो बघायला. ईशान म्हणतोय "यम्मी पायनॅपल" Happy

कार्ट्यांनी माठ फोडला काय ? त्यांच्या आईकडून दुसरा घे.

आरती, अननसाचा तुरा मातीत खोचल्यापासून किती दिवस लागले फळ यायला? मी पण हा प्रयोग करुन पाहिन म्हणते.

छान Happy

फारच छान वर्णिला आहेस अननसाचा पेरल्यापासुन वाढेपर्यंतचा प्रवास!!!
अधुन मधुन आम्हालाही घरी बोलावुन तू अननसाची प्रगती बघण्याची जी संधी दिली होतीस त्याबद्दल मनापासुन धन्यवाद. असेच एकदा अननस बघायला आले असताना तुझ्या नकळत अननसाचा एक फोटो काढला होता (त्याबद्दल माफी असावी :-() तो इथे देते आहे.....
Image0100_0_0.jpg

छानच !!
असे झाड वाढताना त्यांचे निरिक्षण करणे फार मजेशीर असते.
त्यातला रोजच्या बदलातला वेगळेपणा दाखवल्या बद्दल धन्यवाद.

सुंदर! घरातल्या लहान बाळाच्या प्रगतीचे टप्पेवार फोटोज काढावेत त्या निगुतीने टिपले आहेस अननसाचे सौंदर्य! Happy

अप्रतिम !!!
फोटो चा sequence एकदम मस्त घेतला आहे.
पण एक सांगावेसे वाटते.
माझ्या माहिती प्रमाणे फुलाशिवाय फळ येत नाही.
मी केरळ मध्ये अननस चा फार्म बघितला आहे!
खुप सही होता!!

आरती सहीच. मी पण आता अननसाचा शेंडा आणून लावेन. इतक सुंदर असतो शेंड्यावर येणारे अननस हे मला माहीतच नव्हत.

सिंड्रेला, नंद्या, बस्के, भग्यश्री, रमा, सायो, फचिन, अशुतोष,चंद्रकांता,वर्षु,सचिन, रैना, पोर्णीमा,अरुंधती,
jiraiya,जागू,नानबा,कविता,मंजिरी,manmayu आणि सतिश

सगळ्यांचे मनापासुन आभार. Happy

सिंड्रेला,
कारटी थोडी मोठी असल्याने, दुसरा माठ एक तर माझ्या आई कडून किंवा स्वातीच्या सासुबाईंकडुन घ्यावा लागेल. Happy

भाग्यश्री,
नक्की किती वेळ लागतो नाही सांगता येणार. मी मागच्या एप्रिल-मे मधे लावला होता. आणि या मर्च मधे फळ धरले. पण उन्हाळा हाच त्याचा सिझन असल्यने मार्च मधे आले की तोपर्यंत झाड पुरेसे मोठे झाल्याने आले हे नाही लक्षात आले.

अरे वा, मस्तच प्रवास टिपला आहेस. शिवाय अननसाच्या झाडाला चक्क अननसच आल्याचे आश्चर्य आणि आनंद काही वेगळाच असेल ना Happy

वर्षभर एक एक करून फोटो काढत होतीस, एकत्र ठेवत होतीस याला खरच चिकाटी आणि या सगळ्या फुल-फळ येण्याच्या प्रक्रियेवरच खर प्रेमच लागतं. मलाही बागकामाची फार आवड आहे, विशेषतः दुसर्‍यांनी केलेल्या... Happy

आता तुझ्याक्डे येणार्‍या पक्ष्यांवर असे काही जमवता आणि लिहिता येईल..

अननसाचा पेरल्यापासुन वाढेपर्यंतचा प्रवास!!!>> मनपूर्वक धन्यवाद आरती मला अगदी डिस्कव्हरी चॅनेल बघितल्यासारखं वाटतंय.... Happy

शिवाय अननसाच्या झाडाला चक्क अननसच आल्याचे आश्चर्य आणि आनंद काही वेगळाच असेल ना
>> Lol
आरती, खरच खूप सह्ही वाटलं फोटो पाहून.

जीएस आणि कंपनी,
का अशी चेष्टा करता रे माझ्या झाडांची Happy

चिन्नु, ड्रिम्गर्ल, दीप्स
धन्यवाद.

सही आरती... सगळेच फोटो पाहताना इतकं मस्त वाटलं....

घरच्या अननसाची चवही वेगळीच असते.. मधूर आणि स्वादीष्ट!!

Pages