Submitted by जया एम on 23 June, 2010 - 03:15
डोळ्यात दाटले प्रगल्भ पाणी
बासरी शोधते कृष्णाची गाणी
कुंवार रात्रीत चांदणे झरे
निळाई शोधत राधिका फिरे
वृन्दावनात सावळे सुख
एकदा प्राणात रुजून गेले
फुलत्या शपथा मिटून गेल्या
कातरवेळेने कपट केले
रुसले पैंजण, घुंगुर बोले
नाचऱ्या मनाला बांधून टाक
उसन्या श्वासात कृष्णाचे नाव
कंठात रुतली अस्फुट हाक
तरीही सोशिक चंद्राच्या संगे
झिजून विझून जाऊ दे काया
अखेर दाटेल जीवाच्या डोही
सख्याची जादुई काजळमाया
रात्रीचा गाभारा दु:खाने भरे
भांगामधले कुंकुम खिरे
कृष्णाची निर्मोही चाहूल यावी
म्हणून राधिका निष्फळ झुरे
गुलमोहर:
शेअर करा
छान आहे. पण ही कविता कथेत का
छान आहे.
पण ही कविता कथेत का टाकलीय ?
कवितेच्या वरच्या बाजूला
कवितेच्या वरच्या बाजूला "संपादन" आहे तिथे जाऊन हा बदल करता येईल
मस्त कविता जया.. मला माझी २
मस्त कविता जया.. मला माझी २ वर्षापुर्वी .. कुष्णसखा यावर चाललेली जुगलबंदी आठवली.
>>>>डोळ्यात दाटले प्रगल्भ
>>>>डोळ्यात दाटले प्रगल्भ पाणी
बासरी शोधते कृष्णाची गाणी
कुंवार रात्रीत चांदणे झरे
निळाई शोधत राधिका फिरे
जया ....मस्त गं...
जया, फा---र संदर उपमा आहेत
जया, फा---र संदर उपमा आहेत कवितेत!
खु---प आवडली!
छान कविता ! पण.. कॄष्णाची
छान कविता ! पण.. कॄष्णाची निर्मोही चाहूल यावी ..
याचा अर्थ फारसा कळला नाही !
आभारी आहे, आरती, के. अन्जली,
आभारी आहे, आरती, के. अन्जली, सुधीर, सूर्यकिरण,सुभाशचन्द्र. कॄष्ण हरवला आहे. चाहूल निर्मोही आहे म्हणजे दोघानीही बाकी कसलाही मोह न बाळगता फक्त त्याचे अस्तित्व जाणवून देणारी चाहूल त्याने द्यायला हवी आहे.
सुंदर!
सुंदर!
आर्त.. करुण.
आर्त.. करुण.
ग्रेट...
ग्रेट...:)
मनापासून धन्यवाद, मयुरेश,
मनापासून धन्यवाद, मयुरेश, अमित जी.
आर्त, करुण. अगदी बरोबर. तसेच काहीसे घडले आहे. सावरेन. कविता सोबत आहे.
....सावरेन. कविता सोबत
....सावरेन. कविता सोबत आहे
अगदी बरोबर बोललीस........
मस्त ... ब्राव्हो
मस्त ... ब्राव्हो !!!
कृष्णाची निर्मोही चाहूल यावी
म्हणून राधिका निष्फळ झुरे------ क्या एक्सप्रेशन है.. !!! वॉव !!!
( पण मोहमयी असणं हे कृष्णाच मेन युएसपी न ... ... )
तरीही सोशिक चंद्राच्या
तरीही सोशिक चंद्राच्या संगे
झिजून विझून जाऊ दे काया
अखेर दाटेल जीवाच्या डोही
सख्याची जादुई काजळमाया
वा!
वा, सुरेखच ... पण आर्त सूर
वा, सुरेखच ... पण आर्त सूर आहे एकंदरीतच ...