महाराष्ट्राची महागायिका: वैशाली भैसने माडे

Submitted by दीपांजली on 26 September, 2008 - 16:25

वैशाली चा संपर्क होण्या साठी झी मराठी ने केलेल्या सहकार्या बद्दल धन्यवाद !

वैशाली ने तिच्या अतिशय व्यस्त दिनक्रमात वेळ काढून दिलेल्या मुलखती साठी तिचे ही आभार आणि शुभेच्छा !
..........................................................................................
वैशाली भैसने माडे:
vaishali3.jpg
तमाम मराठी जनतेचे मन जिंकून घेणारी आपल्या महाराष्ट्राची महागायिका !!
अत्ता पर्यंत संचिता-अनामिका किंवा ऐश्वर्या या लहान मुली जिंकल्या आहेत पण सर्वात लोकप्रिय अशा प्रौढ गायकांच्या स्पर्धा या फक्त गायकांनी जिंकल्या आहेत, गायिकांचे स्वप्न जिथे फार तर टॉप ४ पर्यंत पोचू शकते अशा रिऍलिटी शो च्या दुनियेतली पहिलीच ' वुमन विनर' !
अनेक रिऍलिटी शो मधे जनता आणि परीक्षकांच्या निवडी मधे जमिन आसमानाचा फरक असतो, पण पहिलीच अशी विजेती जिथे परीक्षक आणि जनतेची निर्विवाद एकच निवड होती , ती म्हणाजे 'वैशाली भैसने माडे'!
कुठल्याही प्रकारची काँट्रोव्हर्सी न करता, शो ऑफ न करता साधे पणानी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी , आपल्या महाराष्ट्राची महा गायिका अता 'सारेगमप चॅलेंज २००९, संगीत का विश्वयुध्द' मधे विश्वविजेती होण्याची स्वप्नं घेउन उतरली आहे!

सारेगमप मराठी मधे तिला विजेती बनवणार्‍या जनतेला 'विश्वयुध्द' मधेही तिला भरघोस मतांनी विजयी करा हिच विनंती !
त्या निमित्तानी तिच्याशी केलेला संवाद !
वैशाली ने रात्री अकराची वेळ दिली होती फोन वर गप्पा मारायला, त्यामुळे मुलाखत मी थोडी छोटी केली, बारा साडे बारा झाल्या वर मी च थोडं आवरतं घेतलं, बरेच प्रश्न विचारायचे राहून गेले, विशेषतः मराठी सारेगमप बद्दल चे प्रश्न बरेच राहून गेले वेळे अभावी.
तरी देखील वैशालीची अतिशय नम्र, प्रामाणिक उत्तरं रसिक वाचकांना आवडतील अशी आशा करते !
दीपाली:
वैशाली, सर्व प्रथम महाराष्ट्राची महा गायिका झाल्या बद्दल आणि सारेगमप चॅलेंज २००९ मधे प्रवेश मिळवल्या बद्दल अभिनंदन !
वैशाली:
धन्यवाद , माझ्या यशाचे संपूर्ण श्रेय मी रसिक प्रेक्षकांना देते , ज्यांच्या मुळे मी महा गायिका झाले !
दीपाली:
योगायोगानी सारेगमप मराठी चालु असताना मला भारतात रहायला मिळाले, आणि तू सादर केलेली एक से एक गाणी ऐकायला मिळाली, तुला मी सांगू इच्छीते कि मी तुझी सर्वात मोठी फॅन आहे !
नुकतीच ऑरकुट वर तुझ्या फॅन क्लब ची कम्युनिटी पण सुरु केली आहे जिथे निरनिराळ्या देशातल्या अमराठी लोकांना मी खास तुझी मराठी गाणी ऐकायला लावली.
शिवाय सारेगमप चॅलेंज २००९ च्या कम्युनिटीज वर सुध्दा लोकांना तुझी मराठी गाणी अतिशय आवडली आणि हिंदी मधे अता सगळे तुझ्या आगमनानी अतिशय खुष आहेत !
वैशाली:
(हसत)अरे, खरच का ?
माझे शतशः धन्यवाद सर्वांना !
दीपाली:
वैशाली , तुझ्या या संगीताच्या प्रवासाची सुरवात कुठ पासून झाली ?
तुझ्या घरात इतरही कोणी गाणारे आहेत का?
वैशाली:
नाही ग, लहान असताना अगदी 'अठरा विश्वे दारिद्र्य' म्हणतात अशा कुटुंबात मी वाढले.
मी अमरावती जिल्ह्यातल्या 'खारतळे' या छोट्या गावी जन्मले जिथे पाणी, चांगल्या शाळा, हॉस्पिटल अशा जगण्याच्या मूलभूत गरजा सहज मिळत नाहीत अशा ठिकाणी संगीताची तालीम मिळणे तर अशक्यच होते.
जर शिकायच असेल तर अमरावतीला जाउन शिकणे ह एकमेव मार्ग होता , पण घरच्या अर्थिक परीस्थीती मुळे 'संगीत शिकणे' हे स्वप्नं देखील पहायची माझी ताकद नव्हती.
गाण्याची आवड लहानपणापासून होती पण कधी संगीत या क्षेत्रात करीअर करीन किंव अकराव्म असं कधीच वाटल नव्हत !
दीपाली;
मग तुझी गाण्याची सुरवात कशी झाली ?
वैशाली:
माझी गाण्याची आवड बाबांनी ओळखली होती म्हणून मग छोट्या घरगुती कार्यक्रमां पासून ते अगदी लग्नां मधे वगैरे गाणे एवढच शक्य होतं त्या वेळी !
बाबांनी मला संगीताचा मार्ग तर दाखवला पण त्या मार्गा वर चालणे हे सुध्दा खूप कठिण होतं.
संगीत हा विषय खरच गंभीर पणे घ्यायला किंवा संगीतात करीअर करायचं हे ठरवायला मला वयाची विशी गाठे पर्यंत वाट पहावी लागली.
तोपर्यंत मला गुरु, मर्गदर्शक कोणीही नव्हते, माझी आवडती गाणी ऐकणे आणि प्रॅक्टिस करणे एवढेच मी करु शकत होते .
२००५ साली मात्र थोडे ग्रह बदलु लागले !
दीपाली:
२००५ साली असं काय झालं कि तुला तुझी स्वप्नं खरी होण्याची आशा दिसू लागली?
वैशाली:
माझं लग्न झालं आणि श्री.माडे आणि मी मुंबईला आलो.
श्री . माडेंनी मला वेळो वेळी प्रचंड पाठिंबा दिला, त्यांच्या पाठिंब्या मुळेच मी झी मराठी ला २००६ मधे पहिल्यांदा ऑडिशन दिली!
त्या वेळी मी रिजेक्ट झाले पण श्री.माडेंनी माझं मनोबल वाढवलं, खचून न जाता पुन्हा नव्या दमानी तयारी करायला सांगितली.
मी पण मग शास्त्रोक्त शिक्षण घ्यायचं ठरवलं आणि पं.अजय पोहनकर यांच्या कडे संगीत शिकायला सुरवात केली.
२००७ मधे पुन्हा एकदा मराठी सारेगमप मधे गेले आणि या वेळी मात्रं निवड झाली !
त्या नंतर च झी मराठीच्या प्रवासात रसिकांनी मला पहिल्यांदा ऐकले.
मराठी सारेगमप जिंकले तो क्षण अविस्मरणीय होता, ज्याचे श्रेय मी रसिक प्रेक्षकांना देते.
अता हिंदी मधेही मला असच प्रेम, प्रतिसाद द्या, ही विनंती !
दीपाली:
वैशाली, झी बांगला चा विजेता शौमेन याची ओळख एकलव्य घराण्याच्या गायकां बरोबर करून दिली गेली.
त्या वेळी तू का दिसली नाहीस ?
सारेगमप च्या एका कम्युनिटी अव्र वाचह्ल्म होतं कि तुझा काही मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळे तू येउ शकणार नाहीस!
आम्ही तुझे चाहते खूप निराश झालो होतो !
वैशाली:
(हसत) छे ग, मेडिकल प्रॉब्लेम वगैरे काही नव्हता, मला अत्ता २ महिन्यां पूर्वी मुलगी झाली.
आणि मूळात झी ने मला एकलव्य मधून ओळख करून दिली जाणार अस कधी सांगितलच नव्हतं, त्यांनी मला आधीच सांगितलं होत कि ब्रम्हास्त्र नंतर मी स्पर्धे मधे उतरीन म्हणून , त्या प्रमाणे मी आलेही!
दीपाली:
अरे वा, छोट्या परीच्या आगमना बद्दल तुझे आणि श्री.माड्याचे अभिनंदन !
काय नाव ठेवल छकुलीचं?
तिचं आगमन तुझ्या साठी खूप शुभ ठरलय, सारेगमप च्या निमित्तानी जग भरातल्या प्रेक्षकां समोर तुला गायला मिळणार आहे !
वैशाली:
धन्यवाद, आमच्या छोकरीच नाव आम्ही 'आस्था' ठेवलय आणि तिचे आगमन मला खरच खूप शुभ ठरले आहे !
दीपाली:
वैशाली,अता तू सारेगमप चॅलेंज २००९ मधे उतरली आहेस.
तुला घराण्यांच्या चॉइस विचारल्यावर तू 'शंकर महादेवन आणि प्रीतम दा' यांची नावं दिली होतीस, पण हिमेश रेशमियाच्या रॉक घराण्या मधे आल्यावर तुला कसं वाटतय ?
वैशाली:
हो, मी शंकरदा आणि प्रीतमदां ची नावं घेतली कारण शंकरजींची मी खूप आधी पासून जबरदस्तं फॅन आहे, शिवाय झी मराठी मधे परीक्षक असताना त्यांनी मला खूप चांगल्या कॉमेंट्स दिल्या होत्या !
प्रीतमदांचं संगीत मी अत्ता अत्ता ऐकायला लागले आणि त्यांची गाणी मला खूप आवडतात.
पण काही हरकत नाही, हिमेश जींच्या 'रॉक' घराण्यात आल्या बद्दल ही मला आनंद च आहे !
हिमेशजीं शी माझी ओळख अगदी नवीन आहे म्हणून त्यांच्या बद्दल मी अत्ताच खूप काही सांगू शकणार नाही पण मला असं वाटत कि त्यांना माझ्या बद्दल खरच खूप आशा आहेत !
शिवाय शंकर महादेवन् जी सुध्दा मला वेळो वेळी मार्गदर्शन करतच असतात, अता मला दोन मेंटॉर्स च मार्गदर्शन मिळणार असल्या मुळे मी स्वतः ला खूप भाग्यवान समजते !
दीपाली:
खरं सांगू का वैशाली, शंकरदां कडे आणि प्रीतमदां कडे आधीच ४ स्पर्धक आहेत.
त्यामुळे कदाचित हिमेशजीं कडे येण च तुला जास्त फयद्याचं आहे, त्यांच्या घराण्याची तू सर्वात चांगली गायिका आहेस, स्वतः च्या गायकांना प्रमोट करण्यात हिमेशजींचा हात कोणीच धरू शकत नाही .
शिवाय हिमेश रेशमिया चे चाहते प्रचंड आहेत, त्यांच्या ऑरकुट कम्युनिटीज मधे ३०,००० हून अधिक मेंबर्स आहेत जिथे मी तुझी 'रॉक घराण्यची सर्वात स्ट्रॉग गायिका' अशी नुकतीच ओळख करुन दिली आहे !
अता पर्यंतच्या स्पर्धां मधे त्यांचे अनीक आणि विनित हे फायनल पर्यंत गेले अहेस, तुला पण ते असाच सपोर्ट देउन ते फायनल प्रयंत नक्की घेउन जातील अशी आम्हा सर्वांना आशा आहे !
तेंव्हा
'जय माता दि लेट्स रॉक' Happy !
वैशाली:
(हसत), अगदी बरोबर, पुन्हा एकदा ऑरकुट आणि इतर सपोर्टर्स ना माझे धन्यवाद.
दीपाली:
वैशाली, पब्लिक व्होटिंग बद्दल तुझं काय मत आहे ?
त्यामुळे बरेचदा चुकीचे निर्णय दिले जातात किंवा चांगल्या गायकां वर अन्याय होतो असं नाही वाटत ?
तुझ्याच घराणात पाहिलं तर ओमान ची आस्मा लोकांच्या पसंतीनी ब्रह्मास्त्र मधून परत आली, त्यामुळे शशि, शायन, सन्विन्दर, मनिशा अशा गायकांवर अन्याय झाला असं तुला वाटतं का?
वैशाली:
सर्व प्रथम हा एक रेऍलिटी शो आहे.
रेऍलीटी शो चे बेसिक प्रिन्सिपल आहे कि जे सर्व सामान्य जनतेला भावतय ते लोकांना देणे !
भाग घेणार्या प्रत्येक स्पर्धकाला याची कल्पना पाहिजे, पब्लिक जो निर्णय देइल तो स्वीकारायची तयारी पाहिजे.
मी चॅनल किंवा पब्लिक कोणालाच दोष देणार नाही.
आपल्या आवडी प्रमाणे मतदान करणे हा पब्लिक ला हक्क आहे आणि जनतेची मागणी पुरवणे हेच चॅनल चं काम आहे.
पब्लिक ला काय आवडावं हे आपण सांगू शकत नाही !
काहींना कोणाची गायकी आवडते, काहींना कोणाचं बोलणं किंवा दिसण ही आवडत, ज्यांना जे आवडतं त्या प्रमाणे लोक मतदान करतात.
जर आस्मा परत आली आहे, तर याचाच अर्थ बहुसंख्य लोकांना ती आवडली आहे म्हणून ती आली आहे !
मला स्वतः ला एक स्पर्धक म्हणून जनतेचे सर्व निर्णय मान्य आहेत, माझी चॅनल किंवा लोकांच्या आवडी बद्दल काही एक तक्रार नाही !
दीपाली:
वैशाली,
मला तुझं बोलणं ऐकून पब्लिक वर कधीही नाराज न होणारे तुझे मेंटॉर हिमेशजीं नेहेमी जे म्हणतात ते वाक्य आठवलं ' पब्लिक का डिसिजन सर आंखो पर' Happy
मला सांग वैशाली, सारेगमप हिंदी मधे टोप १४ पैकी तुझा आवडता गायक्/गायिका कोण आहे ?
या स्पर्धे मधला जवळचा मित्र किंवा मैत्रीण कोण आहे?
वैशाली:
दोन्हीला माझ् एकच उत्तर आहे, 'झी बांगला चा विजेता, शौमेन नन्दी'!
तो आणि मी प्रादेशिक विजेतो झालो किंवा एकाच वेळी हिंदी सारेगमप मधे आलो म्हणून म्हणत नाही पण खरच शौमेन अतिशय साधा, आपुलकीने वागणारा आणि सुरेल गायक आहे.
तसे सगळे स्पर्धक चांगले आहेत पण शौमेन खरोखरच खूप चांगला मित्र झाला आहे.
दीपाली:
मराठी सारेगमप मधे तुझे कोण मित्रं मैत्रीणी होते ?
वैशाली:
मधुरा कुंभार आणि जयश्री !
सध्या बिझी झाल्याने कोणाच्या भेटी होत नाहीत तशा, पण मला मुलगी झाली तेंव्हा जयश्री शी भेट झाली .
दीपाली:
वैशाली, तुला स्वतःला कुठल्या प्रकारची गाणी आवडतात ?
तुला आवडलेला तुझा सर्वात आवडता पर्फॉर्मन्स कुठला?
वैशाली:
मला आवडलें स्वतः च गाणं , 'सख्या रे'
[video:http://www.youtube.com/watch?v=9sva-JdLR48]
मला स्वतःला सर्वात जास्त गझल अतिsssशय आवडतात.
गुलाम अली जी माझी आवडते गझल गायक आहेत , त्यांनी म्हम्टलेली 'करो ना याद मगर' ही माझी आवडते गझल आहे.
मला आशा ताईंची , सुरेश वाडकरांची गाणीही खूप आवडतात.
लताजी-मदन मोहन जी हे माझं आवडतं कॉम्बिनेशन आहे !
लताजींनी मदन मोहन साठी गायलेली ४०० पेक्षा जास्त गाणी माझी अगदी छान तयार आहेत, मला कधी तरी ही स्टेज वर गायला मिळाली तर खूप आवडेल !
दीपाली;
वैशाली, तुझी आवडी पण फार छान आहेत, तुझ्या आवाजात 'लताजी-मदन मोहन' गाणी किंवा गझल ऐकायला खूप आवडतील.
मला सांग, जेंव्हा तुम्ही स्पर्धेत जी गाणी गाता, तेंव्हा तुम्ही स्वतः निवडता कि मेंटॉर्रस किंवा झी टी.व्ही. तुमच्या साठी निवडते?
वैशाली:
आम्हाला दर आठवड्याला एक थीम दिली जाते, ज्या प्रमाणे आम्ही आमच्या आवडीच्या गाण्यांचे चॉइसेस देतो.
त्यातून मग चॅनल एक गाणं आमच्या साठी निवडते.
तुम्हा सर्वांना माझ्या कडून जी गाणी ऐकायला आवडतील ते झी टी .व्ही. ला नक्की इमेल करा.
response@zeenetwork.com
Or
zeetv-response@zeenetwork.com
तुमच्या सारख्या फॅन्स च्या इमेल्स नी अम्हाला खूप फायदा होतो.
रिऍलिटी शो हे पब्लिक साठी आहेत आणि पब्लिक च्या आवडी प्रमाणे मला गायला मिळलं तर मला खरच खूप आनंद होईल, तेंव्हा झी टी.व्ही. ला नक्की भरपूर इमेल्स करा.
दीपाली:
जरुर वैशाली, मी तुझ्या फॅन क्लब ला, हिमेशजींच्या फॅन्स ना , मायबोली च्या वाचकांना आणि सारेगमप च्या फॅन्स ना नक्कीच तुझ्या तर्फे हे अवाहन करीन.
वैशाली: धन्यवाद !
दीपाली:
वैशाली,
तुझ्म चॅलेंज २००९ मधलं निमोडा गाणं पाहून तुझ्या फॅन्स च्या संख्येत भर पडली आहे !
[video:http://www.youtube.com/watch?v=epNL1zH7ZTQ ]
तुझ्या फॅन क्लब मधल्या लोकांच्या तुझ्या साठी काही रिक्वेस्ट्स आहेत, ऐकवु का?
वैशाली: जरुर !
दीपाली;
१. वासि खान ( पाकिस्तान्-कॅनडा-न्युझिलंड मधे वास्तव्य असणारा नवोदयित गायक्-कंपोझर्-गीतकार्-गिटारीस्ट):
याला तुझ्या आवाजात सेमि क्लासिकल किंवा सुफी टाईप ची गाणी ऐकायला आवडतील कारण त्याच्या मते तुझा वरच्या पट्टीत ला आवाज खूप सहज सुंदर आहे, जो तुझा मोठा प्लस पॉइंट आहे.
२. विक्रान्त :(झुरिच).
याला तुझ्या आवाजात श्रेया घोशाल ची ' मेरे ढोलना , पियु बोले, चलो तुमको लेकर चले' किंवा साधना सरगम चं 'छलका छलका रे, चुपकेसे', सुनिधी चं 'भागे रे मन कही' ऐकायला आवडतील.
३. फराज (कराची):
याला तुझ्या आवाजात नूर जहां च 'चान्दनी राते' ऐयकायला आवडेल.
४. विनि (हैदराबाद): जी सारेगमप च्या ऑर्कुट च्या मोठ्या कम्युनिटी ची ओनर आहे तिला हिमेशजी तुझ्या साठी काय निवडतात यात सर्वात जास्त इंटरेस्ट आहे आणि ते तुझ्या मधले बेस्ट गायन जनते समोर आणतील याची तिला खात्री आहे.
५. मला स्वतः ला विक्रान्त म्हंटला ती गाणी आणि लताजी-मदन मोहन काँबिनेशन ची गाणी ऐकायला आवडतील.
३. राहुल (यु.एस्.ए):हा स्वतः गुजराथी असून तू गायलेल्या सर्व मराठी गाण्यांचा फॅन आहे, त्याच्या दृष्टिने तू ऑलरेडी सारेगमप ची विश्वविजेती च आहेस !
राहुल च्या मदतीने आम्ही फॅन्स नी तुझ्या साठी ब्लॉग लेखन सुरु केलं आहे.

http://www.vaishalimhade.com

राहुल ला 'रस्म्-ए-उल्फत, वो भुली दास्तान, आप कि नजरो ने समझा, नैना बरसे, लग जा गले,रुके रुके से कदम, इतनी मुद्दत बाद मिले हो, हमेशा तुमको चाहा' ही गाणी ऐकायला आवडतील.
वैशाली:
सर्व प्रथम माझ्या साठी इतकी सुरेख गाणी इतक्या आपुलकीने निवडणार्‍या जग भरच्या चाहत्यांना माझे खूप खूप धन्यवाद.
मला ही सगळी गाणी तुम्हा रसिकां साठी गायला नक्की आवडतील.
झी.टी. व्ही. पर्यंत तुमची आवड नक्की कळवा , पुन्हा एकदा इमेल आहे,
response@zeenetwork.com
Or
zeetv-response@zeenetwork.com
हिंदी सारेगमप मधे केवळ एक गाणं झालं असताना इतके सारे चाहते माझ्या गाण्या वर प्रेम करतात हे ऐकून मी भाराऊन गेली आहे, मला असच सहकार्य करत रहा ही विनंती !
दीपाली:
वैशाली,मराठी सारेगमप ची 'महा गायिका' तर तू झालीस, पण आता 'विश्वविजेती' गायिका पण तूच व्हावीस अशी माझी आणि तुझ्या सर्व चाहत्यांची मना पासून प्रर्थना !
प्रेक्षकांना तुला अजुन काही संदेश द्यायचा आहे?
वैशाली:
२६ सप्टेंबर चा भाग नक्की पहा, त्यात माझा छोटासा इंटर्व्ह्यु आहे आणि मी 'ताल' मधलं 'इष्क बिना क्या जीना' हे गाणं गायले आहे !
जर तुम्हाला माझी गाणी आवडत असतील तर मला भरघोस व्होट्स द्या आणि वेळो वेळी माझ्या गाण्यां बद्दल तुमच मत, तुमच्या रिक्वेस्ट्स झी टी व्ही ला नक्की कळवा.
दीपाली:
तू आयुष्यात अशीच यशस्वी होत रहा ,सर्व मायबोलीकर जनते कडून आणि तुझ्या सर्वात मोठ्या फॅन कडून, अर्थात माझ्या कडून शुभेच्छा!

....................................................................................................................
~ दीपाली देशपांडे
Join Vaishali's Fan club:
http://www.orkut.co.in/Community.aspx?cmm=55202670
For any questions to Vaishali,
Email me @ dipumo@gmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा. वैशालीची मुलाखात सहीच. मलाही ती फार आवडते. आता हिंदीत जाम कॉम्पीटीशन आहे तिला. मराठी मुलगा देशपांडे पण मस्त गातो, बांग्लाचा विनर पण मस्तच. मजा येईल.

तिच्या नवर्‍याचे खरच कौतुक.

वैशाली आज बॉटम ३ मधे होती , प्लिज तिला व्होट करा !
जय माता दि, लेट्स रॉक !!!

वा वा DJ छान! हे संवाद मालिकेत घ्यायला हवे! Happy

>>>>माझी गाण्याची आवड बाबांनी ओळखली होती म्हणून मग छोट्या घरगुती कार्यक्रमां पासून ते अगदी लग्नां मधे वगैरे गाणे एवढच शक्य होतं त्या वेळी !

आज सारेगमप मध्ये बोलताना तिने सांगितलं की बाबांनी तिच्याकडे आणि भावांकडे दुर्लक्ष केलं म्हणून... सगळं क्रेडिट तिने तिच्या आईला दिलं.

वॉव!
मस्त मुलाखत घेतली आहेस.
ही बरीच जाड झाली आहे की खरच. Happy

मस्तच मुलाखत डीजे!! Happy

तिचे मराठी सारेगमप बघीतले होते थोडे, आता सारेगमप चॅलेंज हि बघीतले पाहीजे.
वर सायो ने दिलेले गाणे माझेही आवडते आहे. Happy

ह्या स्पधेसाठी आणि पुढिल वाटचालीसाठी वैशालीला मनापासुन शुभेच्छा!! Happy

हा संवाद आहे की वैशालीची मायबोलीवरील जाहिरात...??

sorry या bb वरील आधीच्या सर्व संवादांचा दर्जा बघता, ही मुलाखत निव्वळ सारेगमप चा BLOG वाटते.. only fuss no content!!

चू.भू.दे.घे.

हो, खर तर फक्त सारेगमप च्या कम्युनिटिज साठी आणि वैशालीच्या फॅन क्लब साठीच घेतली होती तिची मुलाखत.
त्यामुळे सारेगमप रिलेटेड च झाले प्रश्न , आणि थोडी तिचे जाहिरात वाटेल असे ही झाले खरे :).

दीपांजली मुलाखत छान घेतलीस, तीही फोनवर. (तू आता ऐवजी अता हा शब्द का वापरतेस? कवितेत वगैरे वापरतात आता ऐवजी अता.)

दिपांजली,
छान संवाद साधलात वैशालीशी. Happy मला ही ती आवडते. मुख्य म्हणजे तळागाळातून आल्याने तिच्यात ऍटिट्यूडचा लवलेश नाहीए. खूप डाऊन टू अर्थ आहे. सारेगमप मध्ये तर ती अंतिम फेरीपर्यंत कधीच जराही ओव्हर कॉन्फिडन्ट वाटली नाही.

छानच झाली मुलाखात. मी सुद्धा जबरदस्त फॅन आहे वैशालीचा.
मराठी सारेगमपच्या दोन शुटिंगच्या वेळी उपस्थीत राहुन तीचे लाइव्ह गाणे ऐकायला मिळाले.
झी सारेगमप चॅलेंज २००८ ला जेंव्हा बॉटम ३ मध्ये वैशालील पाहिले तेंव्हा वाईट वाटले.
वैशालीस पुढील वाटचालीकरीता हार्दिक शुभेच्छा!
जय माता दि, लेट्स रॉक !!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पारीजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल पण लयलुट करायची ती सुगंधाचीच!

दिपांजली,
वैशालीचा आयडी वगैरे काही मिळू शकेल का? आयमिन थेट तिच्याशी संवाद साधायचा असेल तर?

दिपाली,
आधी तुला खुप धन्यवाद-- इतकी छान मुलाखात आमच्य पर्यंत पोहचवल्या बद्दल.
मस्तच मुलाखात आहे.
वैशाली माझी अतिशय आवडती गायीका आहे... आणि मला तिच्यामुळे प्रेरणा मिळाली --
धन्यवाद

-----------------------
If there is a way, I will find one.
If there is none, I will make one.

दक्षिणा,
नाही , अग ती इमेल वगैरे बघत नसावी, विचारल मी तिला!
काही प्रश्न असतील तर मला इमेल कर, पुन्हा कधी फोन करीन तेंव्हा सगळ्यांचे प्रश्न जमवून च करीन.

दक्षिणा आणि इतर वैशालीच्या फॅन्स नी,
प्लिज झी टी.व्ही. ला पण तिच्या गाण्यांचा फीडबॅक द्या इमेल करून, बघु काही फायदा होतो का तिला !

दिपांजली,

का नाही? अगदी जरूर. डोन्ट वरी. वैशालीला विजयी करण्यासाठी भरपूर प्रयत्न करू आपण Happy
I think she deserves the victory, because she is a hardworker.

फीड बॅक कसा करायचा?
तिला शुभेच्छा द्यायच्या आहेत.
अनघा
---------------------------------
If there is a way, I will find one.
If there is none, I will make one.

माझा मित्र, राहुल (वैशालीच्या जबरदस्त फॅन ) याच्या सौजन्याने सादर करीत आहोत,

http://www.vaishalimhade.com/

वेळे मिळाली कि जरुर चक्कर टाका Happy

छानच ग, Deeps. आज पहिल्यांदा पाहिलं. मलाही वैशाली आवडते. उत्तरपणं छान दिली आहेत. पोलिटिकली करेक्ट.

आणि तूपण छान प्रमोट करते आहेस ग तिला. त्याबद्दल तुझही कौतुक.

अरेच्चा! माझं पोस्ट दोनदा झालं का?

कमी वेळेत भरपूर प्रश्न विचारलेत कि. एकदम प्रोफेशनल मुलाखत आहे.

( तिच्या नव-याला काही तरी प्रॉब्लेम झाला होता ना ?).

वैशालीचं खूप खूप कौतुक.. वैशाली, अभिलाषा यांनी खूप मोठं व्हावं असं वाटतं.