रायगडावरुन परतताना............

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

चला रे! लवकर उठा, निघायचय लवकर नाहीतर गडवर पोचायला उशीर होइल !!!! भल्या पहाटे आप्पांचा फोन-समस आला. आम्ही २१ मावळे २ सुमोतुन गडकडे निघलो. हां हां तुम्हाला या मावळ्यांची थोडी माहीती देतो .
आप्पा(सावंत) वय केवळ ७३ भेल मधुन निव्रुत्त ( रायगड स्वारीची मुळ कल्पना यांचीच)
मामा ( कडु) वय ६८ खाजगी कम्पनीतुन निव्रुत्त ( मोहीमेच्या तयारीत सर्व खान पान विभागाची जबाबदारी )
पीडी (देसाइ) एच सी सी मधे नोकरी वय ५५ दोन्ही सुमोंचे सर्व आजार जाणणारे दलातले एकमेव जाणते वाहन चालक
सुर्वे काका वय ४५ मोहीमेची बीनीची तुकडी घेउन( म्हंजे मी आणि ते ) गडावर निवास , शिवथर ला निवासासाठी मा. आमदार साहेबांकडे खेटे मारणे ही जबाबदारी
मग बरोबर भावजी,वाजेकाका, दादा रानडे अशी मध्यमवयीन मंडळी.......
खरतर ग्रुप जमावा असा एकही किमान दुवा सहज न दिसावा पण आमाप उत्साह,पुरेपुर अनुभवलेल जग केवळ महाराजांवर असलेले प्रेम या शिदोरीवर ही मोहीम फत्ते केली.
आम्ही पहाटे ६:०० ला कळव्यातुन नीघालो , पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घेउन रायगड पायथ्याशी देशमुखवाडी ला पोहोचेतोवर १२.३० वाजले
वाडीवर चहा झाला आणि वरुण देवानी हजेरी दिली जोरदार वारा धुक्याची चादर आणि चर्चा २६ जुलैचे कारण तोच दिवस फक्त वर्ष वेगळ होत .......
रोपवे जवळ पोहोचलो
कोण रोपवेनी जाणार आणि कोण चालत या घोळात चुकुन जास्त तिकिट काढली गेली शेवट एकदाचे सगळे निघाले.सगळे सिनियर सीटीझन चक्क पायी गडावर पोहोचले आणि तरुण मात्र रोपवेनी ........
गडावर पोहोचल्यावर मात्र नजर दुरवर केवळ धुक्याची चादर आणि माणसांचे येणारे आवाज .
सर्व जण एमटीडीसी च्या रुमवर पोहोचलो. मामानीं जेवणाची खुपचा छान तयरी पाठवली होती. पोळी , बटाट्याची भाजी, उकदलेली अंडी,चटणी, आहा त्या पावसाळी हवेत जेवणाची न्यारीच मजा होती.
४.०० च्या सुमारास आम्ही गड बघायला निघालो अर्थात या वेळी सुर्वे काका गाइड. समाधी, जगदीश्वर मंदीर , बाजार पेठ, राणी वसा, बघुन सदरेवर आलो.
संपुर्ण सदरेवर बोललेलं सिंहासनापाशी आणि सिंहासनापाशी बोललेल फक्त अष्ट- प्रधानांना कळतं. आणि या आवाजाच्या चमत्काराचे गुपित सदरेवरच्या भल्या मोठ्या शीळेत आहे हे एकुन खरच हेरोजी इन्दुलकरांचा अभिमान वाटला
गडावरच्या प्रत्येक देवळात , समाधीवर पुजा केलेली , फूल वाहीलेली दिसली सहज विचारला, तर अतीशय आभिमान वाटावा आणि नव्या पीढीच्या देशाभिमानाला बेगडी समजणर्‍यांना चपराक बसावी अशी माहीती समजली " गेले १० वर्ष सांगवीच्या( भिडे गुरुजींचे संभाजी प्रतिष्ठान)तरुणांचा एक गट नेमाने गडावर येतो पुजेची तयारी घेउन आणि
गडाचा फेरफटका संपेपर्यन्त ७ वाजले होते . घड्याळ वेळ दा़खवत होत म्हणुन नाहीतर वातावरण मात्र भल्या पहाटेसारखं कुन्द थंड .......
रात्री उशीरापर्यन्त पत्ते , गाणी , जुन्या आठवणी , गडावरचा १५ ऑगस्ट तो मोठा झेंडा,रात्र कशी उलटली कळली नाही.
रविवार सकाळ पहाटे ५ वाजता मी निघालो एकटाच परत कारण मायबोलीकरांची जत्रा होती ना !!!
केवळ २ फूटावरच दिसेल असा उजेड, प्रचंड पाउस आणि अंधारातला अनोळखी रस्ता.
गडावरुन उतरायला सुरवात केली आणि निसर्गापुढे माणुस कीती छोटा वाटतो याच च जणु प्रत्यंतर यायला लागल . . महादरवाज्यापाशी मी मिनिटभर थांबलो. दोन्हीबुरुजांकडुन छोटे झरे अवखळ पणे वहात होते. समोर अथांग धुक्याच्या चादरीत लपेटुन निवांत पहुड्लेल रायगडच खोरं ....
मी अनेकदा रायगडच ट्रेक केलाय,अगदी राज्याभिषेकाच्यावेळी परीक्रमाही पण आजचा हा रायगड वेगळाच भासत होता.
"जयभवानी " मनात स्मरण करुन पायरी उतरायला सुरवात केली ... पाय-या सम्पत होत्या रस्ता निसरडा.ठिकठिकाणी पाउस अवखळ झ-याच्या रुपात कोसळत होता
अर्ध्या रस्त्यात पोचलो. एका आडवाटेवर थोड निसरडं झालंहोत म्हणुन मी थांबलो ............केवळ २फुटाची चिंचोळी वाट एका बाजुला कड्यावरुन वहाणारा पाण्याचा जोरदार प्रवाह.त्या कडक थंडीतही मला दर्दरुन घाम फुटला.पाय लटपटत होते. मी दोन मिनीट शांत उभा राहीलो.कदाचित येणा-या जाणा-यापैकी कोणी दिसेल आणि त्यांच्या मदतीने पुढे सरकता येइल . पण छे: कोणी दिसत नव्हत मागे पुढे सगळीकडे नुसत निसर्गाच संगर तांडव.
आता मात्र माझा धीर थोडा खचला १ वाजता वविला पोहोचण भाग होत.शेवटी मनाचा हिय्या केला चक्क गुड्घ्यावर रांगत ते वळ्ण कसंबसं पार केल.थोडापुढे आलो आणि मगाच वळण पाहीलं बापरे मगाच पेक्शा मला ते जास्त कठीण वाटल सरळ पुढे पहात पर्त पाय-या उत्रायला सुरवात केली. अगदी पाय्थ्याशी पोहोचत होतो तर सांगवीचा ग्रुप भेटला शाखेची ऒळख निघाली.मग चहाची आठवण तिव्रतेने झाली. त्यांना वरच्या वाटेतला अनुभव सांगितला तर त्यांच्यातल्याअ एका जुन्या जाणत्या ट्रेकरने चक्क खांद्यावर हात ठेवत म्हाणाला आरे इतक्या पहाटे तर आम्ही ही निघलोनसतो. मला खरच इतक बरं वाट्लं. आणि मग काय त्या उत्साहत मी रायगड पायथा गाठला. तिव्र इच्छाशक्ती असावी की १ ला वविला पोहोचायचं, महाड ची बस तिथुन खालापुर पर्यंत दुसरी बस आणी शेवट चौक फाटा, कर्जत रिक्शा करत बरोब १ च्या ठोक्याला मी हेगडेला पोहोचलो.
रायगडला जाताना जितका उत्साह होता त्याहुन आधिक वविला होता. पण आजही रायगडची ती अरुंद वाट आठवते आणि.....

विषय: 
प्रकार: 

जल्ला!!!!!!!!!!!
चार ओळी लिहिल्या की क्रमश: ???
प्रवास असा थांबत असतो का?
लिहि पटपट.