मेणबत्त्यांच्या दुनियेत

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मी नुकत्याच केलेल्या जेल मेणबत्त्यांना सर्वांनी भरभरुन प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. Happy
त्या पाहून खूपजणांनी त्या कश्या बनवितात याविषयी उत्सुकता दाखविली यासाठी जेल मेणबत्ती बनविण्याची घरच्या घरी करता येण्यासारखी सोपी पध्दत खालीलप्रमाणे.

प्रथम जेल मेणाविषयी
जेल हे एकप्रकारचे पारदर्शी मेण असून ते खनिज तेलापासून बनलेले असते. बाजारात मिळणारे जेल मेण जेली (घन) स्वरुपात असते.

साहित्यः जेल, आवडीनुसार काचेचं ग्लास, दोरा, स्टील अथवा अ‍ॅल्युमिनियमचे एक छोटं उभट भांडे तसचं एक पसरट भांडे, चमचा, जेल मेणाचे रंग.

पध्दतः प्रथम तुम्हाला हव्या त्या प्रकारचा छोटा काचेचा ग्लास घ्या. बाजारात जेल मेणबत्यासाठी खास मेणाचा थर दिलेला दोरा मिळातो तो हवा तेव्हढा कापून त्याचे एक टोक ग्लासाच्या बुडाशी फेव्हिकॉलने चिकटवा किंवा दोरा अडकविण्यासाठी विक होल्डर म्हणून मध्ये भोक असलेली चकती मिळते त्यात दोरा अडकवावा. दुसरे टोक एखाद्या छोट्या काठीला असे अडकवून ठेवावे की दोरा हलणार नाही.
मेणबत्त्यांच्या दोर्‍याला विक (wick) म्हणतात.
तुमच्या आवडीनुसार ग्लासमध्ये मणी, मासे, शिंपले ई. ने सजावट करावी.

मेण हे अत्यंत ज्वालाग्राही असल्याने ते वितळवताना खूप काळजी घ्यावी लागते. म्हणून जास्तकरुन यासाठी डबल बॉईलर वापरला जातो. जेणेकरुन मेण ज्या भांड्यात आहे त्या भांड्याचा डायरेक्ट विस्तवाशी संपर्क येणार नाही. डबल बॉईलर नसल्यास एका पसरट भांड्यात छोटं उभट भांडे ठेवूनही काम करता येईल. पसरट भांड्यात पाणी घ्यावे आणि उभट भांड्यात जेलचे तुकडे टाकावेत. विस्तव चालू करुन पाण्याला एक उकळी येउ द्यावी. पाणी गरम होईल तस तसे जेल वितळू लागेल. ते पूर्ण वितळल्यावर त्यात मेणाचा रंग टाकून एकत्र होईपर्यंत चमच्याने ढवळावा. ( जेल मेणाचे रंग साध्या मेणाच्या रंगापेक्षा वेगळे असतात.)
विस्तव बंद करुन मेण ग्लास मध्ये ओतावे.
मेण पूर्ण थंड व्हायला एक तास तरी लागतो.

पूर्ण थंड झाल्यावर वात पेटवून जेल मेणबत्ती प्रज्वलित करा. Happy

विषय: 
प्रकार: 

कविता हे साहित्य क्रॉफर्ड मार्केट मध्ये मिळते. किंवा थोड्या प्रमाणावर हवे असेल तर अगदी जवळपासच्या क्राफ्टस च्या दुकानातही मिळू शकेल.

या मेणबत्त्या शेवटपर्यंत जळतात का ? ग्लासाला तडा जात नाही का ? मला वाटते नाहीच पेटवू !!
याच मेणापासून फुले , फळे वगैरे पण बनवतात का, गरम असताना आकार देणे सोपे जात असेल.

सुंदर.... हा प्रयोग नक्की करून बघणार आणि कशा झाल्या जेलबत्त्या ते तुला कळवणार! Happy

दिनेशदा ह्या मेणबत्त्या शक्यतो शेवट्पर्यंत जळू देऊ नये. तुम्ही म्हणता तसे नाहीतर ग्लास तडकण्याची शक्यता असते. जेल पासून फुले, फळे नाही बनवत. कारण मुळात हे मेण पारदर्शी असते. तसे काही फळे जसे चेरी वगैरे ज्याला हाय ग्लॉस असतात ती बनवता येऊ शकतात. तो प्रयोग करण्याचा प्रयत्न मी त्या दुसर्‍या मेणबत्ती मध्ये केला आहे. पण नेहमीचे मेण असते त्यापासून बनवतात. मात्र जेल मेणापासून फ्लोटिंग फुले बनवतात पण ती साच्यातून

अरुंधती नक्की आणि फोटो पण टाक.
श्यामले Happy

ठांकु नीलु, तुझे किती आभार मानु? एक तर इत्क्या छान छान मेणबत्या दाखवल्यास आणि त्या कशा करतात हेही सांगितलसं. मला पण दिनेशदांसारखाच प्रश्न पडला होता , कारण ते ग्लास अगदी नाजुक दिसतात.

नीलग्या आमका कित्याक त्रास मेणबत्त्या बनवूचा, Proud
तू च एक बनव आन दि धाडून माका हंयसर पुण्याक...
बाकी जेल मेणबत्तीचो एकादो फोटो डकवला असतास तर लोकांक
वायच कल्पना इली असती, ता दिसता कशी तां. Happy

मंजु,ग्लासात बियर ओतली की फेस आणि बुडबुडे येतातच Proud
नीलु, तिरंगी मेणबत्ती करायला किती वेळ थाबायला लागतं मध्ये? पहिल्या थरानंतर दुसरा थर ओतताना पहिला थर जरा तरी वितळेलच ना?

>>मंजु,ग्लासात बियर ओतली की फेस आणि बुडबुडे येतातच >> मंजे तुला न काही कळतच नई Proud
हो आशुतोष एक थर पूर्ण थंड झाल्याशिवाय दुसरा ओतता येत नाही. निदान १५-२० मि. तरी थांबाव लागतं.

नीलग्या पाहिलि गो चित्रा.. Happy
तोषा वायच नें वितळला तरी एकमेकात मिसळान, तुका येक येगळोच रंग गावतलो.

नीलू...
एक शंका...
बहुतेक ग्लासेस तळाजवळ बर्‍यापैकी 'जाड' असतात. गरम वितळलेलं मेण त्यात ओतलं तर हे ग्लास हमखास तळाकडुन फुटण्याचा/ तडकण्याचा संभव असतो. त्यावर काही उपाय आहे का?...

आदित्यच्या शाळेतल्या प्रॉजेक्टांतर्गत आमचे हे उद्योग करून झालेले आहेत घरी. (२ वर्षांपूर्वी परराज्यातून इथे शिफ्टींगच्या वेळी ते सगळं टाकून दिलं.)
आम्ही मेण गार होण्यापूर्वी त्यात ग्लिटरही मिसळलं होतं .खूप छान दिसतं ते...
पण आम्ही केलेल्या मेणबत्त्या कधी पेटवून बघायची हिंमत झाली नाही Proud नुसत्याच शोभेच्या वस्तू म्हणून मांडून ठेवल्या होत्या बरेच दिवस शो केसमधे. (काचेचा ग्लास तडकेल अशी भीती वाटायची सारखी)

भारीच की..
एकदा गिफ्ट मिळालेली अशी मेणबत्ती काही वर्षांपुर्वी. अजुनही पेटवायची हिंमत नाही झाली. Happy

नीलू मस्तच!

लले.. आम्ही पण ग्लिटर टाकलेलं - हिरवटरंगावर लालसर ग्लिटर (रांगोळीचे ग्लिटर पण चालतात) आणि त्यात दोन्ही रंगांच्या बांगडीचे तुकडे - असलं काही तरी.

नीलग्या, अगो रंगित मणी घातले आणि त्यावर जेल मेण घातलय तेवक्ता मण्याचो रंग गेलो... हेका काय करूक शकतोव?

अरे वा ललिता Happy मेणबत्त्या अजून असतील तर पेटवून ना त्या.
>>लले.. आम्ही पण ग्लिटर टाकलेलं - हिरवटरंगावर लालसर ग्लिटर (रांगोळीचे ग्लिटर पण चालतात) आणि त्यात दोन्ही रंगांच्या बांगडीचे तुकडे - असलं काही तरी>> भले तू तर माझी गुरु आहेस मग Happy
>>रंगित मणी घातले आणि त्यावर जेल मेण घातलय तेवक्ता मण्याचो रंग गेलो>> यावर उपाय म्हणजे एकदम गरम जेल घालायच नाही.