२०३ डिस्को, बुधवार पेठ, पुणे २ - क्रमशः - भाग ४

Submitted by बेफ़िकीर on 4 June, 2010 - 04:54

साहूच्या मनावर विलक्षणच संस्कार होत होते. नग्नता त्याला त्याच वयापासून सभोवताली दिसत होती. स्त्रीला लाज वाटते किंवा वाटू शकते किंवा वाटायला हवी हे माहीतच नव्हते त्याला.

शरीफाबीकडे टी.व्ही होता. हे साहूसाठी एक जबरदस्त आकर्षण होते. शरीफाबीची खोली म्हणजे मुख्य खोली जी प्रवेशद्वारातून आत गेल्या गेल्या असायची. कुणीही वेलकमच्या त्या मजल्यावर आले आणि आत आले की पहिल्यांदा पलंगावर लोळत पडलेली अवाढव्य शरीफाबी दिसायची. तिने आलेल्या माणसाकडे नजर टाकली की तिला कळायचे. याच्याकडे कितपत पैसा असू शकेल. मग ती दुर्लक्ष करायची. अगदीच कुणी व्हाईट कॉलर आला किंवा माहीत असलेल्या बर्‍यापैकी धनाढ्य आला तर ती उठून बसायची अन 'या शेठ.. बसा' म्हणायची. बाकी लोक तिच्यामते तुच्छ लेखण्याच्याही लायकीचे नव्हते.

बहुतेक पोरी टी.व्ही.च्या आकर्षणामुळे शरीफाबीच्याच अवतीभवती बसून राहायच्या.

वेलकमला चक्क एक किचन होते. जिथे झुबेदा रोज स्वयंपाक करायची. स्वयंपाक म्हणजे भात अन आमटी! चमचमीत पदार्थांचा नॉशिया आलेल्या पोरी बहुतेकदा रोज भातच खायच्या.

वेलकमला आल्यापासूनच्या तीन दिवसात ललिताकडे एकही गिर्‍हाईक आले नव्हते. लोक यायचे, पण स्वस्तात काय मजा मारता येईल तेवढी मजा करून जायचे.

आज मात्र संध्याकाळी सात वाजताच एक व्हाईट कॉलर, साधारण पस्तीशीचा माणूस आला. तो एक दोनदाच येऊन गेला असावा. कारण शरीफाबी, डिम्पल अन सुनंदा यांनी त्याला ओळख दाखवली, पण ती ओळख काही अगदीच जवळीक वाटावी अशी नव्हती.

ललिता खुर्चीवर बसली होती. त्या माणसाची नजर तितकीशी अनुभवी नव्हती. सरळ एखाद्या पोरीच्या शरीराकडे निरखून पाहावे इतका तो सरावलेला नव्हता. पण तरीही पाहात मात्र होता. त्याचे नाव रमाकांत वगैरे असावे. कारण आल्याआल्या शरीफाबी 'आईये रमासेठ' एवढे म्हणाल्याचे ललिताने ऐकले. ललिताकडे तीन दिवसात गिर्‍हाईकच आलेले नसल्याने डिम्पल अन सुनंदा त्या तीन दिवसांत मधून मधून ललिताचे दुर्लक्ष असताना एकमेकींकडे बघून डोळे मिचकावत होत्या. बहुधा शरीफाबीचा अन मुंगूसचा निर्णय चुकला असणार हा त्या दोघींचा अंदाज होता. आणि शरीफाबीच्या मनातही संशय येऊ लागला होता. डिस्कोमधे असताना अख्खा बुधवार गाजवलेल्या ललिताकडे दोन, तीन दिवसात कुणीच कसे आले नाही हा विचार राहून राहून शरीफाबीच्या मनात येत होता.

ललिताला मात्र चिंता लागून राहिली होती. एकतर आलेल्या लोकांपैकी कुणाला एका वेळचे सहाशे देणे परवडत नव्हते. ते यायचे शंभर, दोनशे रुपये घेऊन! डेस्परेट होऊन एकदा रेट कमी केला की पुन्हा सहाशेवर येणे शक्य नाही हे ललिताला माहीत होते. एकंदरीत.. वेलकम हे डिस्कोच्या खालच्या दर्जाचे असावे हे तिच्या लक्षात येऊ लागले होते.

हा आलेला रमासेठ मात्र जरा आशा ठेवावी असा वाटत होता.

ललिताने खुर्चीवर बसल्याबसल्याच स्वतःचा पदर किंचित सरकवला अन रमासेठची भिरभिरती नजर तिच्यावर स्थिरावली.

शरीफा - रेश्मा है ये! वेलकमकी धडकन! रेश्मा.. साहबको अंदर लेजा.. मेहमाननवाझीमे कसर मत छोड..रमासेठ.. बारासौ...

बारासौ??????

अख्खं वेलकम दचकलं! स्वतः ललिताचाच विश्वास बसेना! आणि उभा राहिलेला रमा पाकीटातून नोटा काढत होता. नो बार्गेनिंग! आपल्या कोठीवर एका मुलीला एक दिड तासाचे बाराशे रुपये मिळू शकतात ही बातमी पाचच मिनिटात अगदी डिस्कोपर्यंत पोचणार होती. मुली अवाक होऊन ललिताकडे पाहात होत्या. मुंगूस अभिमानाने शरीफाबीकडे पाहात होता. आणि कबीर एकाच डोळ्यातून सगळे आश्चर्य व्यक्त करत होता. सरावाने ललिताला अशावेळेस चेहरा कसा करायचा हे ज्ञात झालेले होते. 'बाराशे म्हणजे अगदीच स्वस्तात मजा मारणार हा माणूस' असा चेहरा तिने केलेला होता. वास्तविक पाहता डिस्कोचे पहिले काही दिवस सोडले तर चार आकडी फिगर ललिताने डिस्कोतही पाहिलेली नव्हती.

आणि शरीफाबीने आणखी एक बॉम्ब फोडला.

शरीफा - सेठ.. पैतालीस मिनिटमे छोडदेना लाडलीको.. नाईटवाला आ रहा है सव्वा आठ बजे..

कोणीही येणार नसताना ही अशी का बोलते ललितालाही समजत नव्हते. पण रमा बोलला.

रमा - नाईटका कितना होता है?
शरीफा - किसकेसाथ?
रमा - इसीके..
शरीफा - अंहं! आज और कल एंगेज्ड है ये.. दिल करे तो परसो तशरीफ लाईये...
रमा - फिर भी.. होता कितना है..
शरीफा - जाहीर है सेठ.. चार हजारसे तो क्या कम होगा?? जाईये.. मझे लुटिये..

आपण कुणाला खोली दिल्यावरून शरीफाशी भांडलो हे सुनंदा अन डिम्पलच्या आता लक्षात येत होते. त्यांचे डोळे मिचकावणे थांबून विस्फारणे सुरू झाले होते.

रेश्मा .. पैतालीस मिनिटके बारासौ लेती है रेश्मा... !

वेलकमने गेल्या तीन दिवसात जेवढे कमावले होते त्याच्या वीस टक्के तर रेश्माने आज पाऊण तासातच कमावून दाखवले होते.

एक टी.व्ही.चा आवाज सोडला तर कसलाही आवाज येत नव्हता खोलीत!

ललिता रमाचा हात धरून त्याला तिच्या खोलीत घेऊन आली. नाही म्हंटले तरी बरेच महिन्यांनी मिळालेल्या चार आकडी आकड्याची झिंग होतीच मनावर! त्याच्या गळ्यात हातांची मिठी अलगद टाकत त्याच्या डोळ्यात डोळे मिसळत म्हणाली..

रेश्मा - बताईये.. क्या होना सेठ...??

दुसरे काय हवे असणार आहे?

पाऊण तासाचा किमान सव्वा तास होणार आहे हे शरीफालाही माहीत होते.

पण रमाकांतने अर्ध्याच तासात धसमुसळेपणाने सगळे संपवले. पण त्याला अजब मजा आली होती. खुळावल्यासारखा म्हणाला..

रमा - सचमुच कोई आनेवाला है क्या अभी? या.. कंटिन्यु करसकते है..
रेश्मा - शरीफाबीसे पुछिये.. मै क्या बोलुंगी?
रमा - पौन घंटा तो होनेको आया है
रेश्मा - पंधरा मिनीट और है सेठ.. आप चाहे तो...
रमा - क्या?

आपले दोन्ही हात आपल्या उशाखाली घेत रेश्मा रमाच्या नजरेत नजर मिसळवत म्हणाली..

रेश्मा - और लूट सकते है जवानी..

रेश्माला बेडर भाषा केव्हाच जमायला लागली होती. पण आज तिचा विचार अर्थातच वेगळा होता. कबीरच्या सल्ल्याला अनुसरून होता. या माणसाचे मन गुंतले तर विचारता येईल साहूबद्दल! पण हा दोन तीनदा तरी यायला हवा. पहिल्याच भेटीत कसे विचारणार? मात्र.. याला कधी मिळाला नाही असा आनंद मात्र मिळायलाच हवा.

रमा - तुम पुछके आओ उसे.. मै ज्यादा बात नही करता उससे..
रेश्मा - क्युं सर?
रमा - अंहं!
रेश्मा - अच्छा! मैही पुछके आती हूं!

इतर वेश्यांसारखे वाटेल त्या अवस्थेत रेश्माला बाहेर येणे शक्य नव्हते. साहू कुठेही खेळायचा. त्याने पाहिले तर?

व्यवस्थित कपडे परिधान करून ती बाहेर गेली अन दोनच मिनिटांनी आत आली..

रेश्मा - सॉरी सर.. वो आगया है.. लेकिन..
रमा - लेकिन क्या?
रेश्मा - कल जो आनेवाला था.. वो शायद नही आयेगा.. आप..
रमा - कल पॉसिबल नही है मेरे लिये..
रेश्मा - फिर कब आयेंगे नाचीजके पास?
रमा - देखता हूं! बीवी मयके गयी है.. लौटनेसे पहले आके जाउंगा..
रेश्मा - मॅडम मायके गयी है?? तो.. आईये ना परसो सर..
रमा - हं! ठीक है.. आठ बजे आउंगा ..
रेश्मा - फुल्ल नाईट बुकिंग?
रमा - हं!

रमाने खिशातून दोनशे काढून तिला टीप म्हणून दिले.

रेश्मा पुन्हा त्याच्या गळ्यात पडली. त्याच्यावर चुंबनांची बरसात करून मग तिने दार उघडले. रमाचा हात काही तिच्या कंबरेतून निघेना! जणू नवरा ऑफीसला चालला आहे अन बायकोला सोडून त्याला जाववत नाही आहे अशा वेळी बायको जशी सुखाने फुलून येईल अन लाडिकपणे नवर्‍याला कर्तव्याची जाणीव करून देईल तशा आविर्भावात रेश्मा म्हणाली..

रेश्मा - आपकीही हूं ना.. इंतेझार है परसोका.. छोडिये अब..

रमाने बाहेर जाताना पाहिले! दोन, तीन पुरुष होते जरूर! पण त्यातला एकही रेश्मासाठी रात्रभर येण्याच्या लायकीचा नाही एवढे त्याला जाणवले. शरीफाशी एक शब्दही न बोलता तो घाईघाईत निघून गेला.

आणि त्याला सोडायला दारात गेलेल्या रेश्माला मागून शरीफाने जवळ घेतले अन म्हणाली..

शरीफा - मेरी लाडली रेश्मा.. तुझपर वेलकम कुर्बान है.. उसकी तो सुरतसेही अंदाजा हो रहा था.. वापस जरूर आयेगा.. ये ले.. तेरी कमाई.. बारासौमेसे .. चारसो तेरे..

ललिता शंभराच्या चार नोटा हातात घेताना हरखून गेलेली असली तरीही..

शरीफाचा एक हात आपल्या पाठीवरून खाली खाली चाललेला आहे हे तिला जाणवत होते.. पण.. झटकणे योग्य होणार नव्हते..

आलेल्यातील एक पुरुष शरीफाकडे रेश्माची चौकशी करत होता. दहाच मिनिटात रेश्मा पुन्हा त्या पुरुषाबरोबर त्याच खोलीत गेलेली होती. मात्र, हा माणूस विश्वासास पात्र अजिबात वाटत नव्हता. याने पैसेही घासाघीस करून नऊशेच दिले होते.

आणि त्याचवेळेस साहू...

मुंगूसचे अतिशय जवळून निरीक्षण करत होता. कारण साहूच्या आईला मिळालेल्या कमाईतील किमान शंभर रुपये मुंगूसला बक्षीस म्हणून मिळणार हे मुंगूसला माहीत असल्याने साहूबद्दल अचानक जास्तच प्रेम निर्माण झालेला मंगूस साहूला घेऊन बेकरीतील एक केक खाऊन परत येत होता..

आणि रेश्मा आता त्या रमासेठबरोबर आहे म्हणजे साहूला वर सोडता कामा नये हे जाणून मुंगूसने त्याला स्वतःच्याच बरोबर ठेवले होते..

आणि त्याचवेळेस रस्त्यावर त्याच्या बिझिनेसचा प्राईंम टाईम झालेला होता...

मुंगूस येणार्‍या जाणार्‍या लोकांच्या जवळ जाऊन त्याच लोकांकडे दुर्लक्ष असल्याप्रमाणे दाखवत अत्यंत दबक्या अन कुजबुजत्या आवाजात बोलत होता..

बोलिये साब.. कैसा माल होना.. केरल.. नेपाल... गुजराथी.. बंगाली.. सब है.. अलग कमरा है.. क्या होना साब.. एकसे एक बढिया माल है.. सस्तेमेभी है.. बहुत महंगभी है.. जैसा आपको चाहिये..

त्याची बडबड कुणीच ऐकत नव्हते.... फक्त.. एक साहू सोडून..

कारण मुंगूसला ओळखणारे त्या गर्दीत कित्येक होते. तो काय बोलणार हेही लोकांना माहीत होते.

त्या गर्दीत बरेच वैविध्य असते.

ठरलेल्या बाईकडे जाणारी माणसे .. यांना दलालाची आवश्यकताच नसते..
वेगवेगळ्या बाईकडे जाणारी माणसे.. यांनाही फारशी आवश्यकता नसते.. कधीतरी लागू शकते..
दलालानेच सुचवलेल्या बाईकडे जाणारे लोक
आयुष्यात पहिल्यांदाच आलेले लोक..
तारुण्यात पदार्पण केलेली मुले..
खरे तर मला इथे यायचेच नव्हते.. असे भासवणारे लोक..
नुसतेच नेत्रसुख घेऊन जाणारे लोक..
रेड लाईट एरिया म्हणजे जणू तीर्थस्थळ आहे असे भाव घेऊन वावरणारे लोक..
इतर शहरांचा अनुभव असलेले पण पुण्यातील एरियाचा अनुभव नसलेले लोक..

जितकी माणसे तितके प्रकार! त्यामुळे रोज मुंगूसला किमान चार तरी ग्राहक मिळायचेच! आणि त्यापासून आणि शरीफाबीच्या मधे अधे खुष होण्यापासून डेली दोनशे अन महिन्याला सात एक हजार अशी कमाई असायचीच..

साहू मात्र मुंगूसच्या अगदी जवळ उभा राहून त्याचे बोलणे लक्षपुर्वक ऐकत होता.. तेच तेच सतत बोलत असल्यामुळे साहूला ते शब्दच काय तर वाक्यच्या वाक्य तिथेच पाठ झाल्यासारखी तोंडात यायला लागली..

साहू - किससे बोल रहे हो?

प्रथमच मुंगूसच्या लक्षात आले. साहू हा प्राणी आपण आत्तापर्यंत दुर्लक्षितच ठेवलेला होता हे! साहूला आपले हे बोलणे माहीत झाल्याचे जर रेश्माला समजले तर आपली धडगत नाही हे त्याला कळत होते.

मुंगूस - कुछ नही.. जा उपर... टी.व्ही. देख...

साहू वर गेला असे मुंगूसने गृहीत धरले. मात्र साहू निघाला एका बोळकांडातून पलीकडे! हा चौकोन दोन इमारतींमधला होता. त्याने वर पाहिले. लक्षात आले. ही आपली इमारत! वेलकम! ती दुसर्‍या मजल्यावरची खिडकी आपली! आणि ही..

बापरे! काय गर्दी आहे इथे बायकांची! नुसत्या लटकल्या आहेत कठड्याला.. शी! किती कचरा आहे..

आणि ही म्हातारी? शी! बापरे! काय झालंय हिच्या नाकाला? केवढी जखम! इतकी घाणेरडी कशी काय ही?

लहान मुलांना जखमांबाबत उत्सुकता असते. साहू किंचित जवळ जाऊन तिच्याकडे पाहायला लागला. म्हातारी बेशुद्ध नसली तरी धड शुद्धीत नव्हती. तिने नशा केलेली असावी. झिंगलेल्या डोळ्यांनी तिने साहूकडे पाहिले. साहू शहारला! काय घाणेरडे डोळे होते!

म्हातारी - दो रुपये है क्या?

म्हातारीला त्या अवस्थेत हे लक्षात आले नाही की हा लहान मुलगा आहे. कुणीतरी समोर उभे आहे एवढेच समजले असावे.

वर कुणीतरी कुणाला तरी हाक मारली.. बुढ्ढीको ग्राहक मिला री.. मजा देखनेको आ...

साहूने नकारार्थी मान हलवली.

म्हातारी - बोलता क्युं नही? जीभ नाही का थोबाडात? दोन रुपये हायेत?
साहू - नही है.. पैसा..
म्हातारी - अरे? छोटा बच्चा है क्या? इधर क्युं आया? मां कहा है?
साहू - उपर है.. कमरेमे..
म्हातारी - निशाका लडका है??
साहू - नही.. ललिताका..
म्हातारी - कौन ललिता..
साहू - रेश्मा..
म्हातारी - ललिता.. रेश्मा.. निशा.. शरीफा.. सुनंदा.. नाम अलग अलग..

साहू कंटाळून निघाला तेवढ्यात म्हातारी म्हणाली..

म्हातारी - जानता है मां क्या करती है??

गचकन थांबला साहू.. हेच तर केव्हापासून विचारायचे मनात होते.. पण कुणाला विचारणार??

साहू - क्या करती है..
म्हातारी - सोती है.. जो आयेगा उसके बगलमे...
साहू - क्युं?
म्हातारी - नही तो भुखी मरेगी.. वो भी.. तू भी..
साहू - सोके क्या करते है दोनो?

म्हातारी पच्चकन बाजूला थुंकली.

म्हातारी - देखना है??

साहूने नकळत मान होकारार्थी हलवली. म्हातारीला शुद्ध नव्हती. कारण नसताना ती साहूला एज्युकेट करत होती. तिच्या मनात होती चीड! एकंदरच जगाबद्दलची चीड! आणि साहूला ते आत्ताच समजले की तो पळून जाईल, पुन्हा इथे येणार नाही अशी एक वेडी आशा होती तिला..

म्हातारी - उपर जा.. निशा को मिल.. वो समझादेंगी..

क्षण दोन क्षणात बराच विचार केला साहूने! नाहीतरी वेलकमच्या आपल्या मजल्यावर गेलो तर पुन्हा खालीच पाठवतील! आई कामात असताना थांबू देत नाहीत. आता एकदम रात्री एक दिड वाजता जायचंय वर! मग.. निदान या बिल्डिंगमधे काय असतं ते तरी बघू..

नकळत साहूचे पाय त्या बिल्डिंगकडे वळले.

सगळ्याच्या सगळ्या मुली खदाखदा हसू लागल्या. एका मुलीने साहूचा हात धरला. त्याला जवळ ओढत ती त्याच्या उंचीइतके होता यावे म्हणून स्वतःच्या गुडघ्यांवर बसली. ओठांचा चंबू करून नाटकीपणाने म्हणाली..

ती - आईये सेठजी... लडकी होना?

पुन्हा सगळ्या हसू लागल्या. आता मात्र साहूला भीती वाटली. आपल्याला धरलेले आहे याची जाणीव झाली. तो सुटायचा निष्फळ प्रयत्न करू लागला. हा रेश्माचा मुलगा आहे हे त्या मुलींना व्यवस्थित माहीत होते. त्यामुळे त्याची टिंगल करायची संधी त्या सोडणारच नव्हत्या. कारण एकच! वेलकमच्या राहणीमानाबाबत त्या सगळ्यांच्या मनात एक द्वेष साठलेला होता. आपल्याला सौंदर्य नाही त्यामुळे या इमारतीत राहावे लागत आहे याचे वैफल्य होते.

ती - चलिये उपर..

असं म्हणत जवळपास त्याला ओढतच ती जिने चढू लागली. जिना अत्यंत अरुंद अन अंधारा होता.

जिन्यात मुली अत्यंत दटीवाटीने उभ्या होत्या. तसे उभे राहण्याचा उद्देश वेगळाच असायचा! अंतर्गत स्पर्धा! वरच्या बाल्कनीतल्या एखाद्या मुलीवर भाळून जर एखादा माणूस जिना चढायला लागला तर त्याला मधेच ओढ्न आपल्या खोलीत न्यायचा प्रयत्न करायचा अन त्याला लुटायचे! काही माणसे लुटली जायची! काही माणसे हात झटकून शिव्या द्यायची. मग त्यांची टिंगल व्हायची. पण त्यापेक्षा जास्त काही करण्याची मात्र पद्धत नव्हती. म्हणजे जबरदस्तीने खिशातले पैसे वगैरे काढण्याची! कारण नाहीतर बदनामच झाली असती बिल्डिंग! आणि मग प्रॉब्लेम झाला असता.

दोन तीन मुलींनी 'किसका बच्चा है' करत त्याच्या गालावरून हात वगैरे फिरवला. एका मुलीने मात्र त्याची पँट तपासत 'बचपनमेही आया.. कुछ लगता तो नही है हातको' असे उद्गार काढले. पुन्हा सगळ्या हसल्या.

त्याला ओढणार्‍या मुलीने त्याला तिच्या, म्हणजे दुसर्‍या मजल्यावरच्या खोलीत नेले.

सर्वत्र एक अत्यंत उग्र दर्प भरलेला होता. बिड्या, सिगारेट्स, दारू अन कसले कसले वास!

भयानक घाबरलेला साहू 'छोडो.. छोडो' म्हणत ओढला जात होता. काही गिर्‍हाईके त्याच्याकडे पाहून हसत होती. काहींना आश्चर्यच वाटत होते.

त्या मुलीने तिच्या मजल्यावरील मेन खोलीत त्याला नेले तेव्हा तिथली मौसी साहूला पाहून हसूच लागली.

मौसी - ये कैसे आया?
ती - मै लायी..
मौसी - जा.. इसको छोडके आ...
ती - नही.. .. ए.. प्यार करेगा?

साहू हादरलेला होता. मुली हसत होत्या.

कुणीतरी त्याला पेरू खायला दिला. साहू नको नको म्हणत असताना त्याच्या हातात कोंबला. आता साहूच्या डोळ्यात पाणी आले.

ती - रोता कायको है? मर्द होके? .... सोयेगा मेरे पास?

असे म्हणून त्या मुलीने साहूच्या गालाच किस घेतला आणि त्याच्या पोटाखाली हात घालून विचारले..

ती - क्या है इधर? बता ना..

त्या गडबडीत तिचा हात सुटला अन साहू सर्रकन चार पावले मागे पळाला. आपली आता सुटका झाली या आनंदात असतानाच त्याने पाठ वळवली आणि.....

....मगाशी आलेल्या गिर्‍हाईकाला ओपन सेक्स आवडायचा... त्याचे दिडशे वेगळे दिले होते त्याने..

उघडेच जग होते हे.. मग खिडकी उघडी ठेवायला लाज कसली वाटणार?? तरीही.. अगदीच उघडी ठेवली नव्हती.. लोकलज्जेस्तव किंचित फट ठेवली होती खिडकीला..

या बिल्डिंगमधून साहूला वेलकमची आपली खिडकी दिसत होती.. आणि त्या फटीतून.. आतले सगळेच..

आई पालथी होती.. तिचे तोंड खिडकीकडेच होते.. तो माणूस तिच्यावर आरुढ झालेला होता..

दोघांच्याही अंगावर.. एकही कपडा नव्हता.. आणि..

ललिता नेमकी तेव्हाच पांढर्‍या फटफटीत चेहर्‍याने .. साहूकडे बघत होती...

लोक आतमधे जाऊन काय करतात.. ते साहूला आज समजले होते...

गुलमोहर: 

खरंच धन्यवाद पुढच्या भागासाठी!!! अगदी भयाण वास्तवाचे तितकेच एकाहुन एक भयाण पैलु प्रत्येक भागात दिसत आहेत...पुढच्या भागाची उत्कंठा आहेच!! येऊद्या लवकर!!

सुन्न करुन टाकलय, लिखाण अप्रतिम यात वाद्च नाहि, पण हाफ राइससारखि हलकि फुलकि नसल्यामुळे डोक्याला मुन्ग्या आल्यात.

अरेच्चा.... ३ रा भाग वाचता वाचताच ४था पोस्ट्लास....... बाकी... लईईईईई झ्याक.......... अल्याड उभारुन पलिकडे बघताना परिस्थितीचा खरा अंदाजच येत नाही.....

बापरे भयंकर आहे हे .....

खूप सुरक्षित जीवन जगतो आपण ह्याची पदोपदी जाणीव होत राहते ......

तुमच्या लेखनाबद्दल काय म्हणणर? अप्रतीमाही कमी वाटतोय

'तसल्या' जगाची फारशी ओळख नसलेले वाचक, 'असल्या' जगाचा चेहराही न पाहिलेल्या साहूच्या डोळ्यांनी त्याचं जग पाहात आहेत... आणि ते दाखवत आहेत बेफिकीर... व्वा! छान कॉम्बिनेशन आहे.

बाकी सर्वांच्या विनंतीला मान देऊन कादंबरी लिहिणे सुरु ठेवल्याबद्दल आभारी आहे.

<<खूप सुरक्षित जीवन जगतो आपण ह्याची पदोपदी जाणीव होत राहते >>

लाख मोलाच वाक्य! पण म्हणून आपण डोळ्यावर झापड ओढून घेतो. आपण सुरक्षित आहोत ना मग बकिच्यांची काय पडलिय्..या भावनेन.

चालू ध्या बेफिकीर! मन ढवळून काढणार्‍या विषयाला हात घातलाय तुम्ही. छान लिह्ता आहात!

लाख मोलाच वाक्य! पण म्हणून आपण डोळ्यावर झापड ओढून घेतो. आपण सुरक्षित आहोत ना मग बकिच्यांची काय पडलिय्..या भावनेन.

अगदी बरोब्बर बोललीस कल्पु! १०० मोदक तुला ह्यासाठी

मनाला विषण्णता येते. हाफ राइससारखी खुप लूकीन्ग फोरवरर्ड नसते (कथेच्या विषयामुळे) पण वाचल्यावर ती एक वास्तवता असु शकते ह्या विचारनी खुप डिप्रेस व्हायला होते.

माननीय बेफिकीर साहेब मी आपले भरपूर लेख वाचले आहेत आपले खूपच मस्त आणि वाचनाची आवड निर्माण करणारे आहेत आपल्या लेखांपैकी
हाफ राइस दाल मारके हा लेख खूपच अप्रतिम वाटला आपले केखन हे वाचनात जिवंत पण टिकवून ठेवणारे आहे आणि आपल्याकडून असेच नवनवीन
लेख वाचायला मिळावे हि विनंती .