वाळवंट

Submitted by दाद on 2 January, 2008 - 17:28

का असच असावं आयुष्य?
दिसलच तर, दूरवर. जणू मृगजळ लवलवतं...
रोखलच पापणीआड तर स्वप्नासारखं खुपतं...
ओंजळीत धरण्याइतकं गालावरून ओघळावं तरी...

नि:शब्दाची ओल ओठांवर लेपून
इतरांच्या सावल्यांचा गाव शोधत हिंडावं झालं....
उन्हाच्या याऽऽऽऽऽ टोकापासून त्याऽऽऽऽऽऽ टोकापर्यंत!
-- शलाका

गुलमोहर: 

शल्काताये,
उन्हाची टोकं कशी काय निमुटपणे पकडीत येतात गं तुझ्या?
सावलीचा गाव सुखद आहे. इथेच राहून जावं म्हणतेय! Happy

ते गालावरून ओघळावं 'तर' ऐवजी 'तरी' हवं होतं का?
happy new year बर्का!

सुंदर!!!!

मी ही तुम्हा दोघीत सामील.. Happy
( चौथ्या ओळीत काहीतरी खुपतेय...)

thanks गं, दोघींनाही!
चिन्नू, बरोब्बर पकडलस. सुधारलीये चूक.

'उन्हाच्या याऽऽऽऽऽ टोकापासून त्याऽऽऽऽऽऽ टोकापर्यंत!' कविता आवडली!

रोखलच पापणीआड तर स्वप्नासारखं खुपतं...
ओंजळीत धरण्याइतकं गालावरून ओघळावं तरी...

एक्दम मस्त, जरा लवकर लवकर लिहा कि, दोन कवितांमधे एवढी गॅप? Sad

नि:शब्दाची ओल ... वा क्या बात हे.
पहिली ओळ नसती तरी चालले असते, असं आपलं माझं मत.
-बापू

रोखलच पापणीआड तर स्वपनासारखं खुपतं.. व्वा!
सुंदरच.

अत्यंत सॅच्युरेटेड आणि मॅच्युअर्ड. उत्तुंग आशयघन.
....................अज्ञात

सुंदर!
ओंजळ आणि नि:शब्द या ओळी तर अप्रतिम आहेत...

छान!!

नि:शब्दाची ओल ओठांवर लेपून
इतरांच्या सावल्यांचा गाव शोधत हिंडावं झालं....
उन्हाच्या याऽऽऽऽऽ टोकापासून त्याऽऽऽऽऽऽ टोकापर्यंत!

आवडले.