एअर इंडियाचे विमान मँगलोरला कोसळले.

Submitted by भरत. on 21 May, 2010 - 22:41

मंगलोर इथे विमान अपघात्..उतरताना विमान कोसळले

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

AI मधे Cost Cutting चालू आहे.. त्यामुळे Service अशी... असं वाचलं.

काही वर्षांपुर्वी एक रिपोर्ट वाचला होता. Airline मधे विमान आणि माणसं यांचं प्रमाण....

AI - १ विमानामागे ७००
हा जगातला उच्चांक....

UNITED AIRLINES - १ विमानामागे १०८ .. (यांचा दुसरा नंबर)..
बाकी जगातल्या इतर Airlines मघे सरासरी एका विमानामागे ७० ते ८० कर्मचारी असतात म्हणे...
यावरून लक्षात यावे Cost Cutting का ते.

याठिकाणी असाच एक रिपोर्ट आहे...
http://www.tribuneindia.com/2002/20020724/biz.htm#6

पण या सर्वाला स्वस्त तिकिटे घेणारे प्रवासी कारणीभूत आहेत, हे मात्र पटले नाही. <<< पूर्ण अनुमोदन. Airline चालावी म्हणून महागातले तिकीट घेतलं तरी ते जे काही करणार ते करणारच. उद्या वाण्याकडे महागातले सामान, भरपूर पैसे घेऊन केस कापणारा असं करत राहीलात तर तुम्ही जगू शकणार नाही. घेतलेले पैसे आणि त्यासाठी मिळालेली Service याचे प्रमाण सारखे असते हा गैरसमज आहे..

बाकी अपघात कुणाच्याही चुकीमुळे झाला असला तरी ते दुर्दैवी जीव हकनाक गेले.. Sad

पक्षाने विमानाला धडक दिली म्हणून विमानाची समोरची काच फुटली.. मला यावर खरचं विश्वास बसत नाही. विमानाच्या काचा खिडकीच्या काचेसारख्या असतात की आला चेंडू धावत फुटली काच? Happy

आपण सर्वांना हैद्राबाद विमानतळाला भेट देण्यास हार्दिक आमंत्रण. अभिमान वाटावा अशी आमच्या इथे एकतरी गोश्ट आहे.

पक्षाने विमानाला धडक दिली म्हणून विमानाची समोरची काच फुटली.. मला यावर खरचं विश्वास बसत नाही. विमानाच्या काचा खिडकीच्या काचेसारख्या असतात की आला चेंडू धावत फुटली काच?>> elementary Physics dear! Speed, momentum, mass?

पक्षाने विमानाला धडक दिली म्हणून विमानाची समोरची काच फुटली.. मला यावर खरचं विश्वास बसत नाही.
--- बी विमान जमीनीवर स्थीर असेल तर पक्षाच्या धडकेने काहीच होणार नाही. पण आकाशात असतांना बसलेली धडक विमानाला जमीनीवर आणू शकते. तुम्ही खालील साईट पहा.
http://en.wikipedia.org/wiki/Bird_strike

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हवेत धुळीचे कण पसरतात, आता त्या कणांचे वजन ते किती असणार? पण इंजिनावर धडकले तर खुप जोरात फिरणारे टर्बो फॅन ला हानी पोहोचु शकते. याच कारणासाठी युरोप मधी कित्येक विमाने काही दिवसांपुर्वी रद्द झाली होती.

>आपण सर्वांना हैद्राबाद विमानतळाला भेट देण्यास हार्दिक आमंत्रण. अभिमान वाटावा अशी आमच्या इथे एकतरी गोश्ट आहे.
बरोबर आहे... Thanks to GMR Group.

.

Pages