एअर इंडियाचे विमान मँगलोरला कोसळले.

Submitted by भरत. on 21 May, 2010 - 22:41

मंगलोर इथे विमान अपघात्..उतरताना विमान कोसळले

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१६० पॅसेंजर व ६ क्रू पैकी ७ वाचले ४ मुले व ३ माणसे. ६.३० सकाळी पहाटे अपघात झाला.
मनापासून वाईट वाट्त आहे.

आजच्या लोकसत्तात बातमी नाही, पण याहू वर वाचले. फार वाईट. लोक घराजवळ जाणारे फ्लाईट म्हणून हरखून गेलेले असतात.
कारणे वगैरे कळतील अशी अपेक्षा.

खुप वाइट वाटले. १० दिवसांपुर्वीच ट्रिपोलीलाही असाच विमान अपघात झाला व त्यात फक्त एकच प्रवासी (९ वर्षाचा मुलगा) वाचला होता. आजही या अपघातात ७-८ जण मिरॅक्युलसली वाचले आहेत असे वाचण्यात आले.

अपघाताचे कारण पावसात विमान रनवेवर लँड होताना ओव्हरशुट झाले असे म्हणत आहेत. पण माझ्या वाचनात असेही आले की मँगलोरचा हा विमानतळ पाचगणीसारख्या एका डोंगरावरच्या पठारावर बांधण्यात आला आहे. त्यामुळे जर का काही कारणाने विमान लँड होताना ओव्हरशुट झाले तर त्या चुकीची दुरुस्ती करायला वैमानिकाकडे एक्स्ट्रा रनवे लेंग्थ या विमानतळाच्या रनवेवर उपलब्ध नाही. सरळ विमान मग ३०० फुट खाली दरीत कोसळते व नेमके तेच आज झाले. अश्या डोंगरावरच्या पठारावर विमानतळ बांधायला परवानगी मिळत नव्हती पण कर्नाटकाच्या तत्कालीन कोणा एका मंत्र्याने खटपटी करुन परवानगी मिळवुनच घेतली कारण त्या विमानतळाच्या आसपास त्या मंत्र्याची खुप जागा होती. तिथे विमानतळ झाला तर त्याच्या त्या जागेची किंमत वाढावी म्हणुन त्याने त्या विमानतळाची संमती येन केन प्रकाराने मिळवलीच असे माझ्या वाचण्यात आले. ते जर खरे असेल तर काय म्हणावे या गोष्टीला तेच समजत नाही.

बापरे Sad खरचं खूप धक्कादायक बातमी आहे ही.. आज दुपारी सहज बीबीसी लावल्यावर एकदम दिसली..सकाळपासून काही ऐकलं ही नव्हतं ..खूप विषण्णं झालय मन..

हरिकेन लैला मुळे इथे विजयवाडा, राज्मंड्री, बँगलोर च्या फ्लाइट्स रद्द केलेल्या, कोस्ट्ल आंध्रा मधील ट्रेन्स पण रद्द आहेत. हवामान अतिशय अनप्रेडिक्टेबल आहे. घट्केत ऊन पाउस असे. तिथे पण पाउस होता. माझ्या मनातही तेच आले हे लोकेशन का चूज केले असावे. रनवे संपला की दरीच आहे लगेच व त्यात गच्च झाडी आहे. विमान प्रवास ही खरे तर पूर्ण मानवी पर्फोर्मन्स वर आधारित सिस्टिम आहे हे लक्षात आले कि त्यात किती ठिकाणी चुका होउ शकतात हे ध्यानात येते. एरवी ही सिस्टीम अतिशय परफेक्ट चालते तेव्हा आपल्याला कळत ही नाही.

वैयक्तिक मत एडिट केले आहे. खरेच अस्थानी आहे. जीवित हानिपुढे.

>>तिथे विमानतळ झाला तर त्याच्या त्या जागेची किंमत वाढावी म्हणुन त्याने त्या विमानतळाची संमती येन केन प्रकाराने मिळवलीच >> काय म्हणावे? Sad खूपच वाईट अपघात... कोणाच्या फायद्यासाठी कोणी जीव गमावले..

मृतात्म्याना शांति मिळो.

मंगलोरचा एअरपोर्ट बघूनच सतिश मला म्हणला होता की "डेंजर ठिकाणी बांधलाय" तेव्हा कल्पना आली नव्हती की इतकं भयानक काही घडू शकेल!!! फार वाईट झाले. कुणाच्या क्षुल्लक आर्थिक फायद्यासाठी जर इतके जीव गमावले असतील तर यापुढे तरी किमान अशी परवानगी मिळू नये म्हणून काळजी घ्यायला हवी.

>एअर इंडिया मध्ये कॉस्ट कटिन्ग चालू आहे. त्यांच्या फ्लाइट्स शक्यतो अवॉइड कराव्यात. ( हे अगदी वैयक्तिक मत)>
वैयक्तीक मत असलं तरी या घटनेच्या अनुशंघाने अस्थानी आहे. एरवी ईतर हजार कारणांसाठी AI ने जावू नये हे माझे मत. तेव्हा कृपया या दोन गोष्टींचा संबंध जोडू नये. या अपघातात बर्‍याच गोष्टी आहेतः

१. रनवे ची लांबी अन td, to zone नंतर ऊपलब्ध emergency space ची कमतरता... तिथला टेरेन "डेंजर" वगैरे नाही पण margin of error कमी आहे. जगात (भारतात देखिल) यापेक्षा अत्यंत कठीण विमानतळ/धावपट्ट्यांवर विमानांची सर्रास वाहतूक होते. (काठमांडू, शिमला, हाँगकॉग,व ईतर) २. atc landing clearance देते तेव्हा हवामान व जमिनीवरील परिस्थिती अजीबातच धोकादायक नसते. मँगलोर हवाईअड्डा कुठल्या कक्षेत आहे ते पहावे लागेल (AILS 3/4).many of airports in india are equipped with zero visibility landing equipment system as well.
3. विमान ऊतरताना (क्वचित ऊडताना देखिल) टायर फुटणे ही घटना uncommon नाही.. अर्थात तसे होवू नये ही अपेक्षा असतेच. तसेच विदेशी पायलट कमांडर वगैरे हे निव्वळ युनियन ने माजवलेला गोंधळ आहे. अतीशय कडक तपासणी, योग्यता, चाचण्या, अनुभव असल्याशिवाय recruitment होत नाही.
४. विमान ऊतरल्यावर बाजूला भरकटणे या घटना ही अनेक वेळा घडतात.. अगदी अमेरीकेपासून दुबईतील सर्वोत्क्रुष्ट विमानतळे-धावपट्ट्यांवर देखिल अशा घटना घडतात.. कारणे विविध असू शकतात.

(दोनदा कलकत्ता व एकदा औरंगाबाद ला आम्चे जेट चे विमान असेच धावपट्टीच्या फार पुढे जावून चक्क पूर्ण थांबायच्या आधी वळण घेवून पुन्हा परत आलेले आहे.... तेव्हा पोटात आलेला गोळा अजूनही आठवतो)

वरील दुर्दैवी घटनेत विमान ऊतरवताना touch down zone च्या फार पुढे ऊतरवले गेले, धावपट्टी अपूरी आहे हे कळेपर्यंत ऊशीर झाला त्यामूळे अतीशय जोरात ब्रेक्स दाबल्याने विमान भरकटले जावून आधी म्हटले तसे बाजूला safe zone कमी असल्याने दुर्दैवाने विमान नेमके दरीत कोसळले. अर्थात, विमानतळ दुसरीकडे वाढवता आला असता पण तसे न करण्यामागे आर्थिक्/राजकीय फायदे बघितले गेले हे सत्त्य आहे (http://timesofindia.indiatimes.com/City/Bangalore/Environment-group-blam...)

बाकी ईतर गोष्टी पूर्ण चौकशी नंतर बाहेर येतीलच्पण तत्पूर्वी नेहेमीप्रमाणेच पायलट चे recruitment पासून धावपट्ट्यांवर भटकणारे कुत्रे, मांजरे, पक्षी ई. पर्यंत सर्व गोष्टि सर्व विमानतळावरील पुन्हा एकदा मिडीयाच्या कृपेने चव्हाट्यावर येतील.. भारतात अजूनही अनेक ठीकाणी अनेक विमानतळांवर सुधारणा होणे (infrastructure improvements) गरजेचे आहे पण परीणाम शून्य!

त.टी: AIRPORT OPERATIONS मध्ये मी मुळीच तज्ञ वगैरे नाही.. फक्त अमेरीकेतील २, दुबईतील २, बहारीन मधिल १ अशा विमानतळांच्या master planning/desigन/construction मध्ये अनुभव असल्याने
ईतर काय गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात एव्हडेच लिहीले.. चू.भू.दे.घे.

दै.सकाळ मध्ये त्या धावपट्टीचे रेखाचित्र आले आहे. पुढे व दोन्हीबाजुला दरी असलेल्या धावपट्या नाईलाज म्हणुन स्विकारल्या असतील का? जर नसतील तर ही ऑपरेशन्स अतिशय सावधानपुर्वकच केली जात असतील ना ?

मध्यंतरी एक सत्यकथा वाचनात आली होती. एका विंग कमांडरने लिहीलेली. दोन विमाने ज्यात फक्त एकेक पायलट होते काही अंतराने जात होती. अचानक एका विमानाला एका पक्षाची धडक बसली. समोरची काच फुटुन त्या पायलट्च्या डोळ्यात काचा गेल्या. रक्त ओघळुन दिसण बंद झाल. अश्या वेळी कान शाबुत होते या जोरावर दुसर्‍या पायलटने याचे विमान सेफ लॅडींगच्या सुचना दिल्या. कंट्रोल टॉवरवरुनही सुचना घेत त्या पायलटने सेफ लँडींग केल. खाली वैद्यकीय सेवा होतीच. त्या पायलट्चा फक्त एक डोळा निकामी झाला पण एक विमान, एका पायलटचा जीव व वर्तमान पत्रातील बातम्यांपासुन सुटका झाली

एअर इंडियाच्या विमानात पायलट जिथे बसतो तेथील खिडक्यांतून उन्ह येवून सीट गरम होउ नये म्हणून खिड्कीला आतून वर्तमानपत्रे लावलेली असतात. कार मध्ये लावायला जे मिळते ते ह्यांना परवड्त नाही काय? रिक्रुट्मेंट थांबविलेली आहे त्यामुळे स्टाफ व पायलट शॉर्टेज आहे. पायलट्स व स्टाफ अतिकामाच्या भाराने दबलेले आहेत.

सुरवसे व कामुलकर ह्या मुंबै स्थित दोन होस्टेस गेल्या. वाइट वाट्ले.

अश्विनी मामी.. तुम्ही भारतात आहात असे गृहीत धरतो. तुम्ही जे वर म्हणालात की एअर इंडियाने रिक्रुटमेंट थांबवली आहे त्यामुळे स्टाफ व पायलट शॉर्टेज आहे ती गोष्ट इथे अमेरिकेतल्या एअर लाइन्सनांही लागु पडते व माझा अंदाज आहे की भारतातल्या इतर प्रायव्हेट एअर लाइन्सबाबतही ती गोष्ट लागु होत असावी. गेल्या २-३ वर्षातल्या आर्थिक मंदीचा फटका एअर इंडियाच काय पण जगभरच्या भल्याभल्या कंपनींना बसला आहे. अमेरिकेतली प्रसिद्ध डेल्टा एअर लाइन २-३ वर्षापुर्वी दिवाळखोरीत गेली होती. इंग्लंडची ब्रिटिश एअरवेजही त्याच मार्गावर चालली आहे. जपानच्या जाल एअरवेजची आर्थिक स्थितीही तोळामासाच आहे.

एअर इंडियाचे पायलट्स व स्टाफ अतिकामाने दमले आहेत असे म्हणाल तर इथे अमेरिकेत ज्या व्हॅल्यु ऐअर लाइन्स (म्हणजे अमेरिकन इगल कनेक्शन, कॉम्युट ऐअरलाइन वगैरे)आहेत की ज्या अमेरिकन एअरलाइनचाच किंवा काँटिनेंटल एअरलाइनचाच लोगो वापरतात पण प्रत्यक्षात त्या अमेरिकन किंवा काँटिनेंटल एअरलाइनच्या मालकीच्या नसतात.. त्यांची गोष्ट बघाल तर चाटच व्हाल! मोठ्या एअरलाइन्स त्यांचा सोयीसाठी व आपला ऑपरेटिव्ह एक्पेन्स कमी व्हावा म्हणुन अश्या रिजिनल ऐअरलाइन्सचा सर्रास उपयोग करतात. तश्या छोट्या रिजिनल ऐअरलाइन्समुळे मग मोठ्या ऐअरलाइन्सना स्वस्त तिकिटे देणे परवडते. पण या छोट्या ऐअरलाइन्स त्यांच्या पायलट्स व स्टाफकडुन मरेसपर्यंत काम करुन घेतात.. २०-२० तास त्यांचे पायलट्स झोप न घेता लागोपाठ २-३ फ्लाइट्सवर ड्युटीवर असतात. अश्याच काँटिनेंटल ऐअरलाइनचे कॉम्युटर एअरलाइनचे एक विमान गेल्या वर्षी बफेलो, न्यु यॉर्कला पडुन ४५ जण त्या अपघातात मरण पावले. त्या विमानाचे पायलट्स नॉन्स्टॉप २० तास ड्युटीवर होते. त्यातली पायलट तर फक्त २४ वर्षाची होती व तिला उणापुरा वर्षाचा अनुभव होता. तश्या ऐअरलाइन्स अगदी कमी पगारात (म्हणजे फक्त ३०-३५ हजार डॉलर्स वर्षाला) अश्या नवशिक्या पायलट्सना भरती करतात व त्यांच्याकडुन मर मर काम करुन घेतात. नविन पायलट्स अशी कमी पगारातली कामे करतात कारण त्यांना वाटते की यातुनच त्यांचा अनुभव वाढेल व पुढे त्यांना मोठ्या ऐअरलाइनमधे चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. असे पायलट्स मग ज्या शहरात त्यांना ७-८ तासाचा हॉल्ट घ्यायला मिळतो त्या शहरात एखाद्या ठराविक अपार्ट्मेंटमधे ८-८ किंवा ९-९ जण १ बेडरुम अपार्ट्मेंटमधे.. बंक बेड्सवर ३-४ तासाची झोप काढुन पुढच्या फ्लाइटवर काम करायला निघुन जातात. ही वस्तुस्थिति आहे.

याला जबाबदार कोण? माझ्या मते आपणच! कारण प्रत्येक वेळेला सगळे जण फ्लाइट बुक करताना चांगल्या "डिल" च्या शोधात असतात व मग कमीतकमी किंमतीतलेच तिकिट घेतले जाते.असे कमी किंमतीत तिकिट देण्यासाठी मग मोठ्या एअरलाइन्समधे कट थ्रोट काँपिटीशन असते व मग ते आपल्याला त्यांचाच लोगो वापरत असलेल्या रिजिनल एअरलाइन्सच्या विमानाची तिकिटे देतात. वर वर आपल्याला वाटते की आपण अमेरिकन एअरलाइन किंवा काँटिनेंटलसारख्या मोठ्या ऐअरलाइनने प्रवास करणार आहोत पण बर्‍याच वेळेला आपण प्रत्यक्षात तश्या छोट्या रिजिनल एअरलाइनच्या विमानात बसलेलो असतो.

असो. एअर इंडिया जर असेच मार्ग अवलंबुन ऑपरेटिव्ह एक्पेन्स कमी करत असेल तर त्याचे समर्थन करण्याचा माझा उद्देश नाही पण फक्त हे दाखवुन द्यायचे आहे की जगभरच्या एअरलाइन इंडस्ट्री मधे काय चालले आहे ते.

दक्षिण अमेरिकेत जसे चिली सारख्या देशात बरेच विमानतळ अशाच टेरेन मधे आहेत असे वाचल्याचे स्मरते. अपघात हा बर्‍याच्दा अपघातच असतो. या अपघातात गेलेल्यांबद्द्ल वाईट वाटते, पण पुन्हा एकदा...एका वर्षात विमान अपघातात जितके लोक मरतात त्याच्या कित्येक पट रस्ते अपघातात मरतात...

मुकुंद असे वेट लीज भारतातही केले जाते. कधी कधी तर विमानावर कंपनीचा लोगोही नसतो ( मी स्वतः असे काही डिल्स केले आहेत. ) एखाद्या सेक्टरवर जास्त लोड असला, तर असे केले जाते. पण एअर इंडियाचे दुखणे वेगळे आहे. खरे तर इथे ते लिहायला नको, पण विषय निघालाच आहे म्हणून.
प्रत्येक विमानामागे किती कर्मचारी असावेत, याचे काही गणित असते आणि ते एअर इंडियाच्या बाबतीत पूर्णपणे फसलेले होते.
अत्यंत गचाळ सेवा, अजिबात विनयशील नसलेले कर्मचारी, योग्य ती घोषणा न करणे वा माहिती न देणे हा खाक्या, यामूळे अगदी गल्फ सेक्टर मधेही त्याना प्रवासी मिळत नाहीत. मुख्य शहरांशी अनेक विमानकंपन्या जोडलेल्या असल्यामूळे, त्यांनाच पसंती दिली जाते.
पण दुबई मॅगलोर सेक्टर मधे असे होते, कि ज्यांचे घर तिथे वा जवळपास आहे, तेच हि सेवा घेतात. म्हणजे मुंबईहून परत प्रवास करायचा त्रास वाचतो. आणि या दुर्दैवी विमानातले बहुतेक प्रवासी तसेच असणार.
एअर इंडिया चा सर्कारी खाक्या लपत नाही. एखाद्या विमानाला उशीर झाला तर त्या प्रवाश्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे बंधनकारक असते. एअर इंडिया ला पण अशी कूपन्स द्यावी लागतात, पण ती सर्व कूपन्स, विमानतळावरचे कर्मचारीच लंपास करतात. प्रत्यक्ष प्रवाश्यांच्या तोडी मात्र काहि पडत नाही.
लंडन मुंबई, या सेक्टर ची तिकिटे विकली जावीत म्हणून, मी जिथे काम करत होतो ती कंपनी, प्रवाश्याना ५ पाऊंड प्रत्येकी, कॅश देत असे !!!
असो, पण तूम्ही सगळे जी माहिती देता आहात, ती अजून वर्तमानपत्रात दिसत नाही. आणि विमानतळ तर फार जूना आहे. नेहरुंनी उदघाटन केलेला आहे.
पण या सर्वाला स्वस्त तिकिटे घेणारे प्रवासी कारणीभूत आहेत, हे मात्र पटले नाही. योग्य व्यवस्थापन करुन, उत्तम सेवा देऊनही, एमिरेट्स, कातार, कोरियन अश्या कंपन्या स्वस्त तिकिटे देतच असतात.

>पण या सर्वाला स्वस्त तिकिटे घेणारे प्रवासी कारणीभूत आहेत, हे मात्र पटले नाही. योग्य व्यवस्थापन करुन, उत्तम सेवा देऊनही, एमिरेट्स, कातार, कोरियन अश्या कंपन्या स्वस्त तिकिटे देतच असतात.
१००% अनुमोदन!!!!!

खरंच अशक्य एअर क्रॅश Sad आता उतरायचं अशा मन:स्थितीत सीटबेल्ट लावलेल्या अवस्थेतच काही जण जळून खाक झाले..... सिम्पली हॉरीबल!

मुकुंद्ला अनुमोदन , इथे लिहिणे योग्य नाही , पण तरीही राहावत नाही म्हणुन लिहितोय. भारतातल्या डोमेस्टीक एअर लाईनस अमेरिकन एअर लाईन्सच्या मानाने कैकपटीने चांगल्या आहेत .बर्‍याचशा अमेरिकन डोमेस्टिक एअरलाईन्सच्या विमानांची स्थिती , लेगरुम , सर्विस अतिशय गचाळ आहे , लँडींग आणि टेकऑफ घेताना विमानाचे दोन तुकडे होतात की काय असं वाटतं.

भारतातल्या डोमेस्टीक एअर लाईनस अमेरिकन एअर लाईन्सच्या मानाने कैकपटीने चांगल्या आहेत >> अनुमोदन. जेट एअर वेज उत्तम सर्विस व ऑन टाइम पर्फोर्मन्स. मी कधीही महाग पड्ले तरी जेटच प्रेफर करते. डील च्या भानगडीत पड्त नाही.

मी त्यारात्रीच कोइमतूर हून आले. दिवसभर कोचिन पालघाट च्या जवळ च्या भागात काम केले होते.
हवा तशीच ढ्गाळ व वाइट होती( विमानप्रवासाच्या द्रुष्टिकोनातून - नाहीतर बरीच. एरवी कड्क उन्हे असतात. ) माझी फ्लाइट अडीच तास लेट होती व बारा वाजता हैद्राबादला आली. थकून झोपले व उठल्यावर आज घरीच बसायचे आरामात म्हणून टीवी लावला तर ही बातमी. एकदम धक्का बसला. यमदेवाचा हात कुठे ही पडू शकला असता. बर्‍याच फ्लाइट्स डीलेड/ ट्रेन्स क्यान्सल होत्या. लैलाने आंध्रात ५०० कोटी नुकसान केले आहे. वर जीवित हानी. उगीच अपघाताशी संबंध जोडून घ्यायचा असे नाही पण कोणालाच असा म्रुत्यू येऊ नये. मला अंधश्रद्ध म्हणा हवे तर पण प्रत्येक लँडिन्ग नंतर मी देवाचे आभार मानते. माझ्यासाठीच नव्हे तर सर्वांसाठी. या पार्श्वभूमीवर माझी पहिली प्रतिक्रीया होती.
एअर इंडियाच नव्हे तर इतर एअर्लाइन्स च्या कारभारा बद्दल इथे नियमित लिहून येत असते.

लँडींग आणि टेकऑफ घेताना विमानाचे दोन तुकडे होतात की काय असं वाटतं.
>> अगदी अगदी... आणि जी २*२ वाली छोटी विमानं असतात, त्यांच्यात बसल्यावर तर कधी कधी पॅरासेलिंग केल्यासारखं वाटतं .. Sad

मध्यंतरी तर एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशनचे एपिसोडस बघून बघून डोक्याचं भजं झालेलं!

>>> अगदी अगदी... आणि जी २*२ वाली छोटी विमानं असतात, त्यांच्यात बसल्यावर तर कधी कधी पॅरासेलिंग केल्यासारखं वाटतं
तुम्ही बहुदा twin cam/turbo prop engines (पंखेवाली) विमानांबद्दल बोलत असाल.. साधारण १००-१५० मैल अंतरावर असणार्‍या शहरांदरम्यान (short hops) ती वापरतात. त्यात पॅरासेलिंग सारखे वाटते. मला तर त्यात जास्त मजा आली.. Happy
बाकी अमेरीकेत जवळ जवळ एक दशक डोमेस्टिक विमान प्रवास केला आहे.. बर्फाचा सिझन सोडता एरवी लँडींग च्या वेळी भयप्रद अनुभव क्वचितच आले. अमेरिका अन भारत यातील डोमेस्टीक विमान वाहतूक ची तुलनाच मुळात चुकीची आहे.. passenger traffic/aircraft traffic/airport operations/baggage handling volume/connections per leg/distance travelled/air fare for short hops and long hops.. ईत्यादी गोष्टींची आकडेवारी पाहिलीत तर लक्षात येईल की दोन्हीकडील business/economic parameters बरेच वेगळे आहेत. परिणामी aircraft types/size/cabin layout हे दोन्हीकडे वेगळे आहेत.
अर्थातच प्रवासी म्हणून आपला संबंध front end/travel experience शी अधिक येतो अन त्या बाबतीत भारतातील विमाने अधिक ऐसपैस वाटतात. पण back end load/operations चा बोजा पाहिलात तर अमेरीकेत तो अनेक पटीने अधिक आहे अन त्याचा परिणाम front end experience (जसे विमान खुर्च्या आकार, लेग रूम, वगैरे..) वर होणारच.
सर्वात मोठी तफावत म्हणजे दोन्हीकडे pfc (passenger facilitieis charges), airport fees, taxes, आकारले जातात पण आपल्याकडे प्रवासी सुविधा, विमानतळावरील सेवा-सुविधा, या नावाने प्रचंड बोंब आहे (काही अपवाद वगळता).. बरेच वेळा त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
असो. तरिही वैयक्तीक मला भारतात विमान सेवेने केलेल्या प्रगतीचे प्रचंड कौतूक वाटते.. अगदी तुटपुंज्या/जुनाट infrastructure वर देखिल ज्या पध्धतीने हा व्यवसाय वाढतच आहे ते पाहता अधिक नवल वाटते. so to say its truly vertical growth. पण प्रवासी म्हणून जर आपण योग्य सेवा सुविधा, सुरक्षा याची मागणी करू लागलो (more of ground experience) आणि विमान वाहतूक वाढतच राहिली तर front end experience नेमका कसा असेल हे सांगणे अवघड आहे. that is horizintal growth is still lagging..
तूर्तास मुंबईहून दोन तासात औरंगाबाद, नागपूर, वगैरे ला जाता येते यातच आपण प्रचंड समाधानी आहोत..अन एखाद दुसरे अपघात होतात तेव्हा(च) विमान सेवेशी निगडीत ईतर सेवा, सुविधा, वगैरे बद्दल अचानक आपल्याला चिंता वाटू लागते. खरे तर अशा अपघातात मृत वा जखमी झालेले लोक वा त्यांचे आप्तही सरकारने दिलेला मोबदला घेवून आपल्या कामाला लागतात. त्या विमानात आपण/आपले जीवलग नव्हते म्हणून आपण देवाचे आभार मानतो अन पुन्हा सर्व ये रे माझ्या मागल्या......
नवी मुंबई, नागपूर, नाशीक, पुणे, या सारख्या ठिकाणी विमान वाहतूकीचे, विमानतळ बांधणी/सुधारणांचे मोठे प्रकल्प होवू घातले आहेत. त्यात वरील सर्व बाबींचा कितपत विचार केला जाईल हे येणारा काळच सांगेल.

Pages