मुळांची तक्रार....!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

शाळेत असताना (२ री ते ४ थी!), 'मुळांची तक्रार' नावाचा एक धडा होता. एका बागेत माळीबाबा काम करित असताना अचानक एका झाडाची मुळे वर येउन बोलायला लागतातः कि आम्हाला नेहमीच जमिनीखाली रहावे लागते. आम्ही एवढी कामे करतो, अन कुणीच आम्हाला मान देत नाही, सगळे पानाअ-फुलांना, फांद्यांनाच छान, सुंदर म्हणत असतात. आजपासुन आम्ही पण जमिनीवर येणार अन मोकळ्या हवेचा आनंद घेणार........! मग माळीबुवा त्यांना समजावतात कि, बाबांनो प्रत्येकाला एक काम नेमुन दिलेले असते, अन त्याने त्यानुसारच वागायचे असते! जर मुळे जमिनीच्या वर आली, तर झाडाचे अस्तित्वच संपेल, मग तुम्हाला ही कुणी विचारणार नाही..... हे ऐकुण मुळे पुन्हा जमिनीखाली जातात अन जगरहाटी सुरु होते.

नुकतेच 'रायगडाला जेंव्हा जाग येते' हे ऐतिहासिक नाटक पाहिले. त्यात राजांच्या तोंडी असेच काहीसे एक वाक्य आहे," मुरारबाजी, अन बाजी प्रभुंना देखील छत्रपती व्हावेसे वाटले असते, तर कदाचित स्वराज्य निर्माण झाले नसते! त्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावुन पराक्रम गाजवला, अन आम्ही पुढे वाटचाल करित राहिलो अन छत्रपती झालो!'

फेसबुकावर एकाने लिहिले होते,' यु हेल्प समवन टु अचिव्ह समथिंग अन देन ही थिंक्स यु आर नथिंग!

इमारतीचा कळस सगळेच बघतात, पण पाया कुणी बघत नाही. पण पायाच्या दगडाने जर स्वतःला जमीनित गाडुन घेतले नाही, तर ती भव्य इमारत उभी तरी राहिल का?... 'नीव कि ईट' असा एक ८वी-९वी ला हिंदी पाठ होता बहुदा!

विषय: 
प्रकार: 

स्वतः मातीत गाडून घेवून वृक्ष आणि फुलांना फुलवणारा मुळांचा सदगुण.
पण जगरूढीत हेच उदाहरण रूपक म्हणुन घेतले तर "मुळांचा हा सदगुण त्यांच्याच जिवावर उलटला की काय" असे वाटून जाते. Happy