होम-लोनचा कालावधी किती असावा?

Submitted by विमुक्त on 2 March, 2010 - 02:40

मला होम-लोन घ्यायचय...
जर १५ वर्षासाठी घेतलं तर मला X रुपयांचा हप्ता बसतो आणि जर २० वर्षासाठी घेतलं तर मला Y रुपयांचा हप्ता बसतो... मी X आणि Y हे दोन्ही हप्ते भरु शकतो... तर होमलोनचा कालावधी १५ की २० वर्ष घेऊ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शक्यतो होम लोन कमीत कमी कालावधीत फेडणं ईष्ट. जर तुम्हाला १५ वर्षासाठी येणारा EMI भरणं शक्य आहे तर १५ वर्ष हाच कालावधी घ्या. २० वर्षाच्या कालावधीसाठी EMI कमी येइल हे मान्य पण लोन फेडताना तुमच्या EMI मधून principal आणि interest componenet किती जातोय हे बघितलं तर कळेल की loan आणि interest values जवळ्जवळ सारख्याच आहेत.
शिवाय तुमची आताचा पगार हा दर वर्षी वाढेलच.म्हणजेच तुमची repayment capacity वाढणार.
कोणतीही संस्था कर्ज देताना तुमचा नाही तर त्यांचा फायदा बघत असते. जितका लोनचा कालावधी जास्त तितका त्यांना फायदा जास्त,पर्यायाने नुकसान ग्राहकाचचं अधिक.

कमीत कमी असावा. त्याची अनेक कारणे आहेत:-

१. कमी कालावधी साठी जास्त हप्ता असतो. जास्त वजावट मिळते.
२. लवकर मोकळे होतो.
३. प्राप्तिकर कायदा बदलत आहे. नवीन कायद्यानुसार घर भाड्याने दिले नाही तर कर्जाच्या व्याजाची वजावट मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर व्याज संपवलेले बरे. Light 1

माझ्या मते २० वर्षाचा हप्ता घ्यावा... त्यामुळे होणारे काही फायदे...
१. EMI कमी असणार त्यामुळे खेळते भांडवल जास्त राहिल.. गरज पडल्यास ते पैसे वापरता येतील..
२. १५ वर्षाचा हप्ता आणि २० वर्षाचा हप्ता ह्या मधील जो फरक आहे तो दुसरीकडे कुठेतरी गुंतवून योग्य तो परतावा मिळून नंतर एक रकमी मुद्दल कमी केल्यास तेव्हा सुद्धा हप्त्याचा काळ कमी करून घेता येईल.

अर्थात दोन्ही मध्ये एकूण किती व्याज तुम्ही भरणार आहात हेही विचारात घ्यावे लागेल..

माझ्या एका मित्राच्या मते:

मी २० वर्षाचा कालावधी घ्यावा...
दर महिन्याला (Y - X) येवढे रुपये वाचतील... ते थोड्या कालावधी साठी गुंतवायचे आणि वर्षाच्या अखेर ((Y - X) * १२) येवढी रक्कम pre-payment करायची... कारण ती रक्कम principle (म्हणजे घेतलेलं होमलोन) मधून deduct होते... आणि कालावधी आपोआपच कमी होतो...

तर हे वरच logic बरोबर आहे का?...

माझ्या एका मित्राच्या मते:

मी २० वर्षाचा कालावधी घ्यावा...
दर महिन्याला (Y - X) येवढे रुपये वाचतील... ते थोड्या कालावधी साठी गुंतवायचे आणि वर्षाच्या अखेर ((Y - X) * १२) येवढी रक्कम pre-payment करायची... कारण ती रक्कम principle (म्हणजे घेतलेलं होमलोन) मधून deduct होते... आणि कालावधी आपोआपच कमी होतो... आणि तुम्ही मोठ्ठा हप्ता द्यायला बांधील पण राहात नाही...

तर हे वरच logic बरोबर आहे का?...

हिम्सकूल सुद्धा तेच सांगतोय. (X-Y) इतके पैसे वाचतील. २० वर्षाच्या कर्जाला कमी EMI असेल. Y हा X पेक्षा लहान असणार आहे. (Y - X) ही रक्कम किती मोठी आहे त्यावरुन ठरवावे लागेल. याशिवाय काही मुद्दे म्हणजे:
प्रिपेमेंटला काही चार्जेस आहेत का
पहील्या काही वर्षात मुळ कर्ज रकमेच्या २५% पेक्षा जास्त प्रिपे करता येत नाही काही बँकांच्या नियमाप्रमाणे.

मला वाटतं की १५ वर्षाचा कालावधी घ्यावा आणि शिवाय प्रिपेमेंट करुन त्याच्या आत कर्ज संपवावे. प्रिपेमेंट पहीली काही वर्षे कमी आणि नंतर जास्त असेल.

प्रिपेमेंट मध्ये वेगवेगळे प्रकार असतात... आणि ते प्रत्येक बँकेनुसार बदलत असतात..
त्यात एक महत्त्वाची गोष्ट जी सगळ्याच प्रायव्हेट बँकांकडे असते ती म्हणजे... सगळे पैसे एकदम परत केल्यास त्यावर उर्वरीत मुद्दलाच्या ०.५% ते ३%(बँक स्पेसिफिक) एवढी फी आकारली जाते. अर्थात हे पैसे तुम्ही दुसर्‍या बँकेतून लोन घेऊन परत करणार असाल तर... स्वतःकडे असलेल्या पैशातून जर लोन फेडले जाणार असेल तर बहुतेक त्यावर काहीच फी नाही आहे..
काही बँकांमध्ये प्रिपेमेंट करताना एका EMI एवढे पैसे भरावे लागतात..
तसेच काही ठिकाणी ठराविक मुदतीनंतरच प्रिपेमेंट करता येते..

प्रीपेमेन्ट करणे इतके सोपे नाही. काही बँकांमध्ये शेवटचे ६ हप्ते प्रीपेमेन्ट करता येत नाही. त्यामुळे प्रीपेमेन्टची नीट चौकशी करणे. वर म्हटले तसे, बॅंका ह्या नेहेमी स्वतःचाच फायदा बघतात. त्यामुळे अतीदीर्घकाळासाठी लोन घेणे इष्ट नाही.

येवढी रक्कम pre-payment करायची... कारण ती रक्कम principle (म्हणजे घेतलेलं होमलोन) मधून deduct होते... >>>> प्रीपेन्टच्या रक्कमेतून बँन्क आधी व्याजाचीच वसुली करते... नंतर मुद्दलाला हात घालते...

अन्य मुद्देही आहेत...
१. अस्थिर व्याज दर घेतला असेल तर पंधरा वर्षासाठी घेऊ नये... कारण व्याजदर वाढल्यास EMIमधील वाढही भरमसाठ होते.
२. १५ वर्ष मुदत असेल तर सुरवातीच्या वर्षातील व्याजावर मिळणार्‍या प्रात्पिकराच्या सवलतीचा जास्त फायदा घेता येतो...
३. साधारण ८-९ वर्षांनी व्याजाची रक्कम कमी झाली की प्रीपेन्ट करून कर्ज लवकर संपवावे...

नवीन कायद्यानुसार घर भाड्याने दिले नाही तर कर्जाच्या व्याजाची वजावट मिळणार नाही
>> म्हणजे काय नक्की? . सांगाल का प्लीज?

प्रीपेन्टच्या रक्कमेतून बँन्क आधी व्याजाचीच वसुली करते... नंतर मुद्दलाला हात घालते... >> प्रीपेमेंट हे नेहमी मुद्दलाचेच असते. बँक त्यातून व्याज कापून नाही घेउ शकत. EMI मध्ये सुरुवातीला व्याज जास्त असते.