मायबोलीच्या/नेटवरच्या ओळखीतून उभे केलेले पैसे आणि त्याचा योग्य तो उपयोग

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

नुकताच एका मराठी वेबसाईटवर अनेक सभासदांना वाईट अनुभव आल्याचे कळाले. एका व्यक्तीने विश्वास संपादून अनेक जणांकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे घेतले आणि ते परत करण्याबद्दल गोंधळ झाला. हे कितपत खरे खोटे होते ते माहीती नाही. पण हे कसे घडले, का घडले हे नक्कीच लक्षात घेण्यासारखे आहे आणि हे कुठल्याही वेबसाईटवर घडू शकते. पण इथे मायबोलीवर होऊ नये म्हणून आपण त्यातून काही शिकण्यासारखे नक्कीच आहे. आमची तुम्हाला विनंती आहे की व्यक्ती कोण आहे याबद्दल चर्चा न करता असे काही इथे झाले तर आपल्याला काय करता येईल याबद्दल बोलूया.

आमच्या माहितीप्रमाणे हा प्रकार काही महिने चालू होता. वेगवेगळ्या कारणासाठी पैसे मागितले गेले, काहीजणांना गुंतवणूक म्हणून मागितले गेले. पण मराठी माणसाची भीड म्हणा, त्या व्यक्तिबद्दल असलेला आदर म्हणा ज्यांचे पैसे अडकले होते ते कुणीच एकमेकांशी किंवा जाहिर बोलले नाही आणि त्यामुळे प्रकार उघडकीला यायला बराच वेळ लागला.

सर्व मायबोलीकरांनी पैशाचे कुठलेही व्यवहार करतांना पूर्ण ती काळजी घ्यावी. मायबोलीकर पटकन एकमेकांवर विश्वास टाकतात असे वातावरण आपण सगळ्यानी निर्माण केले आहे. पण एखादी व्यक्ती त्याचा गैरफायदा घेऊ शकते. त्यामुळे पैशाच्या बाबतीत मायबोलीकर व्यक्ती असली तरी तिर्‍हाईत व्यक्तीबद्दल जी काळजी घेऊ ती इथेही घेणे चांगले.

मायबोली ही एक वेगळी संस्था आहे आणि तिला वेगळे कायदेशीर अस्तित्व आहे. "नफा मिळवणारी संस्था" ( For profit) म्हणून तिची नोंदणी झाली आहे. त्यामुळे मायबोलीच्या मदतीसाठी म्हणून आपण कधीच पैसे गोळा करत नाही. खरेदी विभाग, जाहिराती , रंगिबेरंगी जागा यातून मिळणार्‍या उत्पन्नावर मायबोलीचे कामकाज चालते. त्यामुळे मायबोलीच्या मदतीसाठी म्हणून परस्पर कधी कुणि पैसे उभे करत असेल तर काहीतरी योग्य नाही हे कळायला मदत व्हावी.

काही उपक्रमापुरते आपण पैसे गोळा करतो. उदा. T-Shirt विक्री. यात मायबोली प्रशासन कुठेही मुद्दाम नसते. आणि तो उपक्रम पूर्ण झाल्यावर जाहीरपणे आपण हिशेब जाहिर करतो. आणि त्याचा लगेच उपयोग केला जातो. एखाद्या उपक्रमापुरते आपण दुसर्‍या सेवाभावी संस्थेला पैसे उभे करून देतो तेंव्हाही सभासदांकडून थेट संस्थेला कसे दिले जातील हे पाहिले जाते.

गेल्या काही महिन्यांपासून आपण मराठी उद्योजक या ग्रूपमधे, कुणाला उद्योगासाठी भांडवल उभे करायचे असेल तर करता यावे म्हणून प्रोत्साहन दिले होते. हे सगळे "व्यवहार" आहेत हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. इथे कृपया भावनेच्या आहारी जाऊ नका. योग्य तो तपास करूनच पैसे गुंतवा. हा गुंतवणूकदार आणि उद्योजक यांच्यातला व्यवहार असेल मायबोलीचा, किंवा मायबोली प्रशासनाचा याच्याशी काही संबंध नसेल.

थोडक्यात मायबोलीकर असो वा मायबोली असो, पैशाचा व्यवहार करताना जपून करा.

प्रकार: 

धन्यवाद अ‍ॅडमिन. इतकी आपुलकीने काळजी घेणारे अ‍ॅडमिन, इतर माबोकर आहेत म्हणूनच मायबोलीवर विश्वासाचं वातावरण आहे. इथे कुठल्याच बाबतीत असुरक्षित, संशयास्पद आजवर तरी वाटलं नाही आणि पुढेही वाटू नये. आमेन! Happy

खूप वेळेवर आलेले उत्तम पोस्ट!
आशूसही अनुमोदन!
मायबोली ही वेगळी व जास्त जवळची राहीली कायमच ती याच कारणांनी!

मायबोलीचे कोड ऑफ एथिक्स अतिशय चांगले आहे निर्विवाद. काही चुका झाल्यास आपण सुधारायची संधी देता हे ही अतिशय चांगले आहे. सध्याच्या जगात जिथे कुटुंब संस्थेचा आधार प्रत्येक वेळी मिळतोच असे नाही तिथे अश्या संकेत स्थळाचा आधार वाट्तो. सभासद प्रेमाने ऑफलाईन भेटतात हीच मला एक कौतुकाची गोष्ट वाट्ते. वरील घट्ना वाचून धक्का जरूर बसला होता. मौलिक माहिती बद्दल धन्यवाद व आपल्याला बेस्ट ऑफ लक.

महत्त्वाची माहिती अ‍ॅडमिन टीम.

वरील मजकुरात कृपया सुपंथ आणि संयुक्ताचाही समावेश करण्यात यावा. देणगी कोणाला देण्यात यावी यात मायबोली प्रशासनाचा काहीही संबंध नाही, तसेच तिचा योग्य तो विनीयोग होतो आहे की नाही यातही.
देणगी देणार्‍याने सजग असणे महत्त्वाचे आहे.

आशु आणि रैनाला पूर्ण अनुमोदन... आणि हा मुद्दा इथे मांडल्याबद्दल तुमचे आभार...

धन्यवाद अ‍ॅडमिन. अतिशय माहितीपूर्ण पोस्ट.

इथल्या विश्वासाच्या वातावरणामुळेच इथे कायम यावंसं वाटत राहतं. इथे पैसे देताना अथवा उपक्रमामधे सहभागी होताना हे आपले घरचेच कार्य वाटत राहते. हे वातावरण असेच राहो ही अपेक्षा.

माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मायबोली चे व्यवहार नेहमीच पारदर्शक राहिले आहेत, याची मला पुरेपूर खात्री आहे.
एकमेकांत आर्थिक व्यवहार होतच असतत, पण त्यावेळी प्र्त्येकाने, वैयक्तीक खबरदारी घेणे योग्य आहे.

मला काल एका ई-मेल द्वारे हे प्रकरण कळले. अन म्हणुन मी 'त्या' वेबसाईटला पहिल्यांदाच शेवटची भेट दिली. Happy

असे प्रकार आपल्या आस-पास नेहमीच होतात. आम्ही कॉलेजला असताना, अगदी चांगल्या घरची पोरे काही कारणे सांगुण पैसे नेत असत, किंवा एखाद्या गरिबश्या दिसणार्‍या पोराला/माणसाला कॉलेजच्या गेटवर उभे करुन किंवा होस्टेलवर फिरवुन त्याला मदत म्हणुन पैसे गोळा करित असत....!

नियत बदलायला पैसा लै भारी कॅटॅलिस्ट! मी आता एक प्रकरण लिहितो ह्यावर! Happy

मायबोलीचं हे रूप नेहमीच असं स्वच्छ, सुंदर, पारदर्शक ठेवल्याबद्दल आणि समस्त मायबोलीकरांना आपुलकी, जिव्हाळा वाटेल, मायबोली 'आपली' वाटेल असे वातावरण ठेवल्या बद्दल, वेबमास्तर, अ‍ॅडमीन, मदत समिती यांचे मनापासून आभार.

अतिशय योग्य पोस्ट अ‍ॅडमीन! धन्यवाद.

कुणावरही टिका नाही, झाल्या प्रकरणात स्वतःचे हात धुवून घेतले नाहीत, आमचीच साईट कशी उत्तम हा डंडोरा नाही..फक्त आणि फक्त मायबोलीकरांना आपलेपणाने केलेली सावधगिरीची सुचना!! 'मायबोली' ही अत्यंत आवडती साईट आहे ते ह्याच कारणासाठी Happy

रैना आणि आशूडीसही अनुमोदन.

रुनीमुळे आधीच माहीत झालं होत , धन्यवाद रुनी . स्वतंत्र धागा काढुन सगळ्या मायबोलीकरांना सजग केल्याबद्दल धन्यवाद अ‍ॅडमीन टीम .

वरील सगळ्याच पोस्ट्सना अनुमोदन. विशेषतः पन्ना आणि अंजली. Happy
मायबोली 'आपली' वाटते ती यामुळेच.
धन्यवाद, अ‍ॅडमिन टीम.

पन्नाच्या प्रत्येक शब्दास अनुमोदन.
मायबोली 'आपली' वाटते ती याच पारदर्शी धोरणामुळे.
धन्यवाद अ‍ॅडमिन टीम.

सर्वांना अनुमोदन!
सध्या इंटरनेटवर जितकी म्हणून 'मराठी' संकेतस्थळे आहेत त्यात मायबोलीच नं. वन आहे!

कुणावरही टिका नाही, झाल्या प्रकरणात स्वतःचे हात धुवून घेतले नाहीत, आमचीच साईट कशी उत्तम हा डंडोरा नाही..फक्त आणि फक्त मायबोलीकरांना आपलेपणाने केलेली सावधगिरीची सुचना!! >>>>>>>> खूप छान !! अनुमोदन Happy धन्यवाद अ‍ॅडमिन !!

Pages