हमिंगबर्डच्या करामती

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

६ मेला ऑफिसमध्ये शिरलो आणि खिडकीबाहेर एक हमिंगबर्ड हवेत ईंग्रजी यु आकाराचे सूर मारतांना दिसला. माद्यांना आकर्षित करण्याचे त्यांचे हे तंत्र आहे. ५-६ वेळा त्याने हे केले. तोपर्यंत माझा कॅमेरा सुरु होऊन विडिओ घेणे मी सुरु केले होते. एकदा उच्चतम बिंदुपर्यंत पोचणे आणि खाली मारलेला सुर पकडता आला आणि तो गायब झाला. मी कॅमेरा काही क्षण सुरु ठेवला, नंतरही अधुन-मधुन बाहेर पहात होतो, पण तो काही परत आलेला दिसला नाही.

विडिओच्या पहिल्या दोन सेकंदांमध्येच हमिंगबर्ड दिसतो. येथे मी दोन दुवे देतो आहे पहिल्यात मुळ विडिओचे ४ सेकंद आहेत (२५ फ्रेम्स प्रति सेकंद) तर दूसर्यात पहिले दोन सेकंद संथगतिने दाखवले आहेत (पहिल्या ४९ फ्रेम्स मध्ये ०.२ सेकंद्सचा अवधी ठेऊन - हे खरेतर 48*0.2+29*0.04=10.76 सेकंद व्हायला हवे होते, पण जवळपास १४ सेकंद झाले आहेत, पण महत्वाचे म्हणजे खरी लांबी २ सेकंद आहे).

ईंटरनेटवरून न पाहता दोन्ही विडिओ डाऊनलोड करून पहावेत म्हणजे फ्रेम ड्रॉपींगचा प्रश्न उद्भवणार नाही.

मुळ विडिओ वेगवेगळ्‌या फ्रेम्समध्ये विभागण्याकरता, आणि मग अवधी वाढवण्याकरता खालील आदेश वापरले:
mplayer -vo png hummingbird1.mpg
convert -delay 20 *[0-4]?.png hummingbird2.mpg

येथे दिसणार्या हमिंगबर्ड्सची वारंवारीता लक्षात घेता हा अॅनाज हमिंगबर्ड असावा, पण सिबलीच्या पुस्तकातील आकृत्या पाहता सुरांची आकृती कॅलिओपेच्या हमिंगबर्ड प्रमाणे होती. पण तो समुद्रसपाटीपासुन जास्त उंचीवर आढळतो आणि गेले २४ वर्षे सुरु असलेल्या कॅलटेकच्या साप्ताहीक बर्डवॉक्समध्ये तो दिसल्याची नोंद नाही.

आणि हो, हे हमिंगबर्ड अतिशय वैशिष्ट्यपुर्ण असतात. त्यांचे वजन ५ ग्रॅम पेक्षा कमी असते आणि रोज ते आपल्या वजनाच्या अनेकपट खाद्य (मुख्यत: रस) हजम करतात. उपासमार टाळण्याकरता त्यांना सतत खाद्यपदार्थांच्या शोधात असावे लागते. मेटॅबॉलिजमचा वेग कमी करण्याकरता (याला torpor म्हणतात - हे हायबरनेशन सारखे असते) ते त्यांच्या हृदयाचे ठोके मिनिटाला १०० पेक्षा कमी करु शकतात - खातापितांना ही संख्या १२०० च्या घरात असते. काही हमिंगबर्ड मायग्रेशनच्या वेळी न थांबता ५०० मैल उडु शकतात.

आणि त्यांच्या सुरांचे म्हणाल तर त्यात ते 9G पर्यंतचे अॅक्सलरेशन साधु शकतात. जेटचालक केंव्हाच शुद्ध हरवुन बसले असते. सुर मारतांना हमिंगबर्ड स्वत:च्या शरीरलांबीपेक्षा ४०० पट अंतर एका सेकंदात कापु शकतात - हे फाल्कन्स व जेट्सच्या दुप्पट आहे.

दोन्ही फितींमध्ये पक्षि उजव्या बाजुला दिसेल.
हमिंगबर्ड - पहिले ४ सेकंद (०.५ MB)
हमिंगबर्ड - २ सेकंद - संथगतीने (२ MB)
कॅलटेक साप्ताहीक बर्डवॉक्स
The Sibley Guide to Birds

विषय: 
प्रकार: 

Interesting !