तू आणि पाऊस

Submitted by मीन्वा on 12 September, 2008 - 00:33

मनातल्या मनात, रात्री अपरात्री,
तुला वाचताना...सोबत असतो..
.. पाऊस
अशावेळी तुझं काही, ऐकावसं वाटतं,
रात्र रात्र मग वेडा.. बोलत बसतो..
.. पाऊस
तू आणि पाऊस, पाऊस आणि तू
कितीवेळ खेळ चालतो.. उरतो फक्त..
.. पाऊस

गुलमोहर: 

ए !!!!!!!!!!!असं काय??? सगळे एकदमच काय वेडावले परत????
एवढे दिवस काहिच नाही आणि आता एकदम सगळेच........क्या बात है! मजाय राव Happy
आवडेश मीनु Happy

अशावेळी तुझं काही, ऐकावसं वाटतं,
रात्र रात्र मग वेडा.. बोलत बसतो..
.. पाऊस

पाऊस बोलतो ही सही कल्पना आहे.

मस्त

व्वा!! मिनू एकदम फॉर्मात आली आहेस.. एकावर एक कवितांचा पाऊस मस्तच

    ================
    गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया !!

      खुप खुप आवडली...

      आयला काय ऐकत नाही बाबा.. झक्कास... कवितेने कुस बदलली .. आणि गुलमोहर फुलला...

      मीनूजी,

      "मनातल्या मनात, रात्री अपरात्री,
      तुला वाचताना...सोबत असतो..
      .. पाऊस"

      खरचं पाऊस किती वेगळा असतो...
      तो पडला की धरतीवर सोहळा असतो!!!

      खुप आवडली कवीता!!!

      व्वा मीनू.... आवडेश Happy

      धन्यवाद सर्वांना.. !

      ~~~~~~~~~
      ~~~~~~~~~
      Happy

      तुला वाचताना सोबत असतो..... पाऊस!
      उरतो फक्त..... पाऊस!
      क्या बात है, मिनू! बहोत खूब.