अतुल्य! भारत - भाग ४ : महाराष्ट्र

Submitted by मार्को पोलो on 1 May, 2010 - 03:06

मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आपल्यापैकी काही जणांनी केलेल्या विनंतीचा मान ठेऊन, १ मे महाराष्ट्र दिन व महाराष्ट्र राज्य स्थापनेला ५० वर्षे पुर्ण झाल्याचे औचित्य साधून मी "अतुल्य ! भारत" ह्या मालिकेत पंजाब ऐवजी, "महाराष्ट्र" हा भाग सादर करत आहे. तसे "महाराष्ट्र" हे खरोखरच महा राष्ट्र असल्यामूळे मला हे राज्य ३-४ भागात प्रकाशित करायचे होते. पण हा खास भाग असल्यामूळे मी येथे महाराष्ट्रात काढलेली माझी सर्वोत्तम (माझ्या दॄष्टिने) प्रकाशचित्रे प्रदर्शित करत आहे. "महाराष्ट्र" हे राज्य मी पुन्हा सविस्तर पणे अनुक्रमणीकेनुसार प्रदर्शित करेनच.

आपल्यापैकी कुणालाही "महाराष्ट्र"अनोळखी नाहिये. योगेश, विमुक्त, Yo.Rocks, असुदे, शैलजा, किरू, प्रकाश ह्या सारख्यां मातब्बर मंडळींनी बरीच मुशाफिरी करून बरेच लिखाण आणि प्रकाशचित्रे प्रदर्शित केलेली आहेत. त्या मध्ये हा माझा खारीचा वाटा. आशा आहे आपल्याला कंटाळा नाही येणार.

-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------

ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर -
ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प हा नागपुर पासुन ५ तासांवर तर चंद्रपुर पासुन अर्ध्या तासवर आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन चंद्रपुर आहे. रहाण्यासाठी तुम्हाला ताडोबा अभयारण्याच्या जवळ MTDC च्या छान आणि निटनेटक्या कोटेजेस् मिळू शकतात पण त्यांचे booking आधी करावे लागते. कोटेजेस् च्या शेजारीच एक मोठा तलाव आहे. ईथे काही खाजगी रीसॉर्टस् ही आहेत पण त्यांचे व्यवस्थापन अतिशय गचाळ आणि गलीच्छ आहे. खाजगी रीसॉर्टस् वाले फक्त तुमच्या पैशाच्या मागे असतात. आम्ही दोन्ही ठीकाणी वास्तव्य केल्यामूळे काही ठळक फरक लक्षात आले.

ताडोबा अभयारण्यात वन्य पशू पहाण्यास जाण्याचा सर्वात ऊत्तम काळ म्हणजे ऊन्हाळा. ह्या काळात अभयारण्याच्या आत असलेले छोटे छोटे पाणवठे कोरडे पडतात म्हणून वन कर्मचारी वाटे शेजारी खास बांधलेल्या पाणवठयावर जनावरांसाठी टँकरने पाणी सोडतात आणि ते प्यायला जनावरे हमखास पाणवठयावर येतात.
उन्हाळ्यात गेलात तर शक्यतो वातानूकुलित कोटेजेस् घेण्याचा प्रयत्न करा कारण ईथला उन्हाळा फार कडक असतो.
ताडोबा अभयारण्यात जाण्यासाठी दोन सेशन्स असतात. एक सकाळी ६ ते ११ आणि एक दूपारी ३ ते ६. दोन्ही वेळेला वाटाड्या बरोबर असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय तुम्हाला आत मध्ये प्रवेश दिला जात नाही. हे वाटाडे सरकारी कर्मचारी असून ते तुम्हाला ताडोबा अभयारण्यात प्रवेशद्वाराजवळ मिळतात. हे वाटाडे तज्ञ आणी चांगले माहितगार असतात. तुम्ही तुमची गाडी आत नेऊ शकता किंवा तुम्हाला वन खात्याची Open Gypsy भाडे भरुन मिळू शकते.
(एव्हढे करुन, दोन वेगवेगळ्या सिझन मध्ये जंगलाला एकूण ५ वेळा भेट देउनही वाघ दिसला नाही हा भाग वेगळा. दुर्दैव दुसरे काय. पण ईतर प्राणी पाहून मजा आली)

-
-
-
-

-
-
-
-

रान जागे झाले सारे...

-
-
-
-

पायवाटा जाग्या झाल्या...

-
-
-
-

-
-
-
-

-
-
-
-
किंगफिशर

-
-
-
-

घुबड. ह्याची ऊंची २ फूट होती.

-
-
-
-

-
-
-
-

इंडियन रोलर. ह्याचे पंख ऊघडले की फार छान दिसतात.

-
-
-
-

-
-
-
-

सांबर, मादी.

-
-
-
-

सांबराचे पिल्लू

-
-
-
-

गवा.

-
-
-
-

किंगफिशर

-
-
-
-

सांबर, नर.

-
-
-
-

-
-
-
-

-
-
-
-

-
-
-
-

-
-
-
-

-
-
-
-

-
-
-
-

-
-
-
-

-
-
-
-

-
-
-
-

-
-
-
-


-
-
-
-

-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------

माझे गाव, मु. पो. पिंपळनेर, ता. साक्रि, जि. धुळे.
माझे गाव, पिंपळनेर हे पुण्यापासुन साधारणः पणे ३८० km वर आहे. हे गाव महाराष्ट्र - गुजरात च्या सिमेवर येते. ईथुन २४ किमी वर गुजरात राज्य सुरू होते. ईथे पश्चिमेला पश्चिम घाटाची सुरुवात होते आणि घनदाट जंगल लागते. हा पश्चिम घाट येथे सुरु होऊन केरळ पर्यंत पसरलेला आहे. ह्या जंगलात कोकणा, मावची, भिल्ल असे अनेक जमातींचे आदिवासी राहतात.

गावामध्ये भाद्रपदाच्या शुद्ध प्रतिपदा ते नवमी पर्यंत नामसप्ताह हा कार्यक्रम चालतो. ह्यात किर्तन, प्रवचन, भजन असे कार्यक्रम चालतात. अष्टमी व नवमी ला यात्रा भरते. अष्टमीच्या रात्री वेगवेगळ्या पौराणिक घटनांवर सोंगे काढतात. भजन, किर्तन व नाचगाण्यात रात्र जागवितात. नवमीला कुस्त्यांचे आखाडे भरतात.

गावाजवळच ४५ किमी वर पश्चिम घाटाच्या पर्वतरांगेत, शबरी धाम म्हणून जागा आहे . ईथे शबरी ने रामाला बोरे दिली असे सांगतात. गावामधुन पांझरा नदी वाहते. गावाच्या अलिकडे नदीवर धरण आहे. ह्या गावाच्या जवळच सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण आहे.
गावाच्या दक्षिणेला १५ किमी वर मांगी - तुंगी हे दोन डोंगरांचे सुळके आहेत. हे जैनांचे मोठे तिर्थक्षेत्र आहे. ईथे जैनांची भव्य मंदिरे व लेण्या आहेत.

गावाचे शिवार

-
-
-
-

गावाबाहेरील एकवीरा मातेचे मंदिर

-
-
-
-

गावातुन दिसणारे मांगी - तुंगी चे सुळके. तुंगी चा सुळका ढगांमुळे झाकला गेला आहे.

-
-
-
-

सोंगे. सुर्य व चंद्र

-
-
-
-

गावातील विठ्ठलाचे मंदिर

-
-
-
-

रावणाचे सोंग

-
-
-
-

विठ्ठलाची पालखी

-
-
-
-

शंकर - सती चे लग्न

-
-
-
-

लग्नाला जमलेले देव

-
-
-
-
दक्षाच्या "बृहस्पतीराव" यज्ञात सती चा प्रवेश

-
-
-
-

शंकराचे तांडव

-
-
-
-

जल्लोष

-
-
-
-

गावाबाहेरील रस्ता...

-
-
-
-

-
-
-
-

पश्चिम घाटातले जंगल

-
-
-
-

-
-
-
-

-
-
-
-

-
-
-
-

-
-
-
-

पश्चिम घाटाच्या पर्वतरांगा व घनदाट जंगल

-
-
-
-

-
-
-

-
-
-

आदिवासींचा गणेशोत्सव

-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
सप्तश्नॄंग गड - वणी

वणी नाशिक पासुन ८० किमी वर आहे.श्री जगदंबेची ५१ पिठे भुतलावर असुन या शक्तीपिठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक साक्षात ब्रम्ह स्वरुपीणी धर्मपीठ ओंकार स्वरुप आधिष्ठीत आहे. आणि तेच म्हणज़े सप्तश्रृंग गडावरील श्री. सप्तश्रृंगी देवी होय. दुष्ट शक्तींच्या नाशानंतर विसावा घेण्यासाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. गडावर देवीची स्वयंभु अशी मुर्ती आहे.
पुर्ण पिठ सप्तश्रृंगी गड
पुर्वी दक्षाने बृहस्पतीराव या नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञात शंकराला न बोलवता सर्व देवांना बोलवले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंत्रण नसतांना गेली. यज्ञात शिवाला हबीरभाग दिला गेला नाही. त्यामूळे सतीने रागाने यज्ञात उडी घेतली. शंकराला हे कळाल्यानंतर त्याने यज्ञात विध्वंस केला. सतीचे कलेवर हातावर घेउन श्री. शंकर त्रेलोक्यात हिंडु लागले. ही स्थिती पाहून विष्णुने सुदर्शन चक्र सोडले व सतिच्या शरीराचे ५१ तुकडे ठिकठिकाणी पडले. हिच ५१ शक्तीपीठे म्हणुन गणली जाउ लागली.
महाराष्ट्रात शक्तीची साडेतीन पीठे आहेत. कोल्हापुरची महालक्ष्मी, तुळजापुरची महासरस्वती, माहुरची महाकाली आणि वणी ची सप्तश्रृंगी देवी आहे. परंतु आदी शक्तीचे मुळ स्थान सप्तश्रृंग गड हेच होय. ओकारातील मकार पुर्ण रुप होऊन सप्तश्रृंग गडावर स्थिरावला म्हणुन हेच मुळ रुप आणि हिच आदिमाया.

ईथे अशी आख्यायिका सांगितली जाते की जेव्हा सप्तश्नॄंगी देवीचे आणी महिषासुराचे युद्ध झाले तेव्हा महिषासुर रेड्याच्या शरीरात लपून बसला होता. जेव्हा देवीला ही गोष्ट समजली तेव्हा तिने रेड्याचा शिरच्छेद केला. त्यातून महिषासुर अतिशय जोराने बाहेर पडला आणि त्याने ह्या डोंगराला धडक दिली आणी त्यामुळे हे खिंडार पडले.

-
-
-
-

-
-
-
-

-
-
-
-

सप्तश्नॄंगी देवीचे मंदिर

सप्तश्नॄंग गडावर फुललेली रानटी फुले

-
-
-
-

-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------


कोळवण, पवना धरण :
कोळवण पुण्यापासून ४० km अंतरावर आहे. कोळवण ला पिरंगुट वरून फाटा जातो. हा परिसर पावसाळ्यात हिरवागार आणि नितांत सुंदर असतो. कोळवण, पवना धरणाला एक रस्ता लोणावळ्यावरूनही गेला आहे. मी स्वतः मात्र कधी त्या रस्त्याने गेलेलो नाहिये.

बावधन चा घाट ऊतरून पौड रस्त्यावर दिसलेली रानटि फुले

-
-
-
-

तिकोना किल्ला

-
-
-
-

पवना धरणाचा जलाशय

-
-
-
-

तुंग किल्ला व पवना जलाशय

-
-
-
-

पवना धरणाचा जलाशय

-
-
-
-

कोळवण

-
-
-
-

तिकोना

-
-
-
-

-
-
-
-

कोळवण

-
-
-
-

-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------

ताम्हिणी घाट :
ताम्हिणी घाट पुण्यापासून ६० km अंतरावर आहे. हाही घाट पावसाळ्यात हिरवागार असतो. अगदी दूपारी २ वाजता देखिल सर्व ढग खाली रस्त्यावर आलेले असतात. तुम्हाला अगदी सावकाश आणि दिवे प्रखर लाउन गाडी चालवावी लागते. ह्या घाटात पावसाळ्यात नेहमी दरडी कोसळतात. ह्या घाटात जाण्याचा रस्ता मुळशी धरणाच्या कडेने गेला आहे. हा घाट ऊतरून पुढे हा रस्ता मुंबई - गोवा ह्या हाय वे ला मानगांव येथे मिळतो.

-
-
-
-

-
-
-
-

-
-
-
-

-
-
-
-

मुळशी धरण

-
-
-
-

धुक्यात वेढलेली प्लस व्हॅली

-
-
-
-

आता कुठे वळायचे?

-
-
-
-

ताम्हिणी घाट सोडुन कोकणात उतरणारा रस्ता

-
-
-
-

हे फोटो दुपारी २ वाजता काढलेले आहेत.

-
-
-
-

-
-
-
-

-
-
-
-

-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------

महाबळेश्वर :
महाबळेश्वर पुण्याहून १२५ km वर आहे. पुणे सातारा रस्त्यावर सुरूर वरून एक फाटा वाई कडे गेला आहे. तिथुन तुम्ही पाचगणी वरुन महाबळेश्वरला जाऊ शकता. महाबळेश्वरपासून पुढे एक रस्ता पोलादपूर वरून कोकणात उतरतो.

कात्रज चा घाट ऊतरून सातारा रस्त्यावर दिसलेली रानटि फुले

-
-
-
-

पॅरॅग्लायडिंग, पाचगणी

-
-
-
-

-
-
-
-

-
-
-
-

वेण्णा तलाव

-
-
-
-

रीसॉर्ट मधुन दिसणारा देखावा.

-
-
-
-

तापोळ्याचा रस्ता

-
-
-
-

-
-
-
-

शिवसागर तलाव. (कोयना धरणाचा जलाशय)

-
-
-
-

-
-
-
-

-
-
-
-

एलिफंट हेड पॉईंट

-
-
-
-

-
-
-
-

दिनाज् रीसॉर्ट

-
-
-
-

-
-
-

-
-
-
-

-
-
-
-

प्रतापगड

-
-
-
-

-
-
-
-

जंगल

-
-
-
-

लाल खेकडा

-
-
-
-

-
-
-
-

-
-
-
-

-
-
-
-

पाचगणीच्या टेबल लँड वर फुललेली रानटी फुले.

-
-
-
-


-
-
-
-

-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------

केळवा बीच:
कोळवा बीच मुंबई च्या उत्तरेला आहे. मुंबई - अहमदाबाद ह्या हाय वे वर सफाळ्यासाठी एक फाटा गेलेला आहे. सफाळ्यावरुन केळवा बीच ला जाता येते. हा बीच मुंबई जवळच असून सुध्धा अतिशय शांत व सुंदर आहे. कोळवा बीच ला जाताना मध्ये मोठी मोठी मिठागरे लागतात. ईथे जवळच एडवण हे छोटे बंदर आहे. ईथे मच्छिमारी चा व मासे सुकविण्याचा मोठा उद्योग चालतो.

-
-
-
-

एडवण च्या मच्छिमार नौका

-
-
-
-

मिठागरे

-
-
-
-

केळव्याचा समुद्र

-
-
-
-


-
-
-
-

-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------

हरीहरेश्वर

-
-
-
-

दिवेआगर चा समुद्रकिनारा

-
-
-
-

अतुल्य! भारत - क्रमशः
आगामी आकर्षण - पंजाब.

"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407

गुलमोहर: 

केवळ महान !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अगदी समर्पक दिवस निवडला आहे आणि पोस्टिंगसाठी.

चंदन,
खूप छान फोटो!
मला "गावाबाहेरील रस्ता.." हा फोटो खूप खूप आवडला!
निवडक दहात नोंद!! Happy

कित्ती ती निळाई आणि हिरवाई...!!! डोळ्यांना एकदम गारवा !!
सगळेच फोटो जबरी! Happy
पिंपळनेर सुद्धा हिरवेच..मला ते गावातील विठ्ठलाचे मंदीरही फार आवडले!

देवनागरी लिहीतांना काहीतरी गडबड होतेय. म्हणून आता दुसरी पोस्ट
तर चंदन तुझे फोटो उत्तम असतात पण पोस्ट करतांना "कात्री" लावलीस, तर केवळ उत्तम फोटोच मायबोलीकरांसमोर येतील आणि एकूण फोटो फिचरचा दर्जा वाढेल. उदा : वरती लाल खेकड्याचे तीन तीन फोटो असण्यातले महत्व मला समजले नाही.

तूझी ही पुर्ण सिरिज मायबोलीच्या मुखपृष्ठावर दिसणार आहे म्हणून मुद्दाम हा पण फीडबॅक द्यावासा वाटला.

खेकड्याबाबत सहमत .. तिसर्‍यांदा तो आल्यावर मी मनात हेच म्हटलं होतं, आता परत कशाला आला हा? Proud

HH व बस्के,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
एका फोटोत लाल खेकड्याची काळी त्रिकोणी व लाल पाठ दिसते आहे. एक फोटो पुढुन आहे त्याचे expressions घ्यायला व शेवटच्या फोटो मधला खेकडा हा नारंगी आहे. मला वाटले हा फरक लोकांना आवडेल.
आणि मी सर्वच फोटो कधीच टाकत नाही. तसे ह्या भागाचे माझ्याकडे ४०० ते ४५० फोटोज् आहेत पण तुम्हाला ईथे निवडक १०० दिसतील.
असो. पुढच्या वेळेला आणखीन काळजी घेईन.
पुन्हा एकदा सुचनेबद्दल धन्यवाद.

परत एकदा, प्रतिक्रिया द्यायचे भान विसरलो.
एक व्यक्ती, इतक्या ठिकाणी जाते, याचेच मला कौतूक वाटते ( हो, हेवा वाटतो. )
किंगफिशर उडतानाचा फोटो खूप छान येतो. पण काढता येत नाही सहसा. मला एक मिळाला होता, मग पोस्टतो.

जबरदस्त फोटो रे चंदन.
हे सग़ळे फोटो पाहिल्यावर किती महाराष्ट्र(ही) बघायचा राहिलाय हे तीव्रतेने जाणवलं !

सुंदर फोटो.. मस्त वाटलं..
'पायवाटा जाग्या झाल्या..' आणि असेच रस्त्यांचे सर्वच फोटो फार छान आलेत..
मोर, मगर, खेकडा सही आहेत.. तुमच्या गावातले विठ्ठल मंदिर कसले लाईव्हली आहे! Happy

ही सीरीज खूप आवडत आहे. शुभेच्छा.

हिरव्या रंगाची ही शेड फक्त भारतातच बघायला मिळते... असं आपलं माझं मत.... स्मित>>> अगदी अगदी.. ..
ताडोबा जंगल चे फोटो बघून . हुरहूर लागून गेली.. सगळेच फोटो अप्रतिम. अप्रतिम.. अप्रतिम
कोणाकडे सोमनाथ जे गडचिरोली जवळ आहे त्याचे फोटो असेल तर कधी इथे टाकल का...

बेफाम उधळण आहे निसर्गाची..... अप्रतिम फोटोज, अफलातून निसर्गदृश्ये आणि सहज सादरीकरण! अतिशय आवडले.... डोळे तृप्त झाले! Happy

Pages