प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे सेम नसतं ....३

Submitted by मेधा on 11 September, 2008 - 03:01

शाळेच्या, कॉलेजच्या आयुष्यात जितक्या प्रेमी जणांच्या जोड्या जुळतात ना त्यात सगळ्यात जास्त अकरावीच्या वर्षात जुळत असाव्यात. अन अकरावीत जुळलेल्या अशा जोड्या पैकी सगळ्यात जास्त बारावीच्या सहामाही परिक्षे पर्यंत काही ना काही कारणाने मोडत पण असाव्यात. कधी कधी ज्याच्यावर /जिच्यावर प्रेम आहे ती व्यक्ती सोडून कॉलेजमधल्या सर्वांना एकतर्फी प्रेमाची माहिती असते. आपल्या प्रेमाचा 'इजहार' करायला न धजावणारी मंडळी इतरांना मात्र आपल्या अवस्थेचं अगदी तपशीलवार वर्णन ऐकवत असतात. यातून मित्र मैत्रिणींची यथेच्छ करमणूक होत असते. कित्येक किस्से दोन-चार वर्षं मागे पुढे असलेल्यांना पण माहित होतात.

'अय्या, तुला ती सुलेखा आठवते का गं?, अगं ती साठ्याच्या नावाने पांढरे बुधवार करायची ना, अन तिचे वडील पोलिसात होते म्हणून साठ्या तिला जाम टरकून असायचा, ती सुलेखा गं.' अशा आठवणी कॉलेज सुटल्यावर सुद्धा वर्षानुवर्ष निघतात.

त्यामानाने इथल्या स्कूल मधल्या प्रेम प्रकरणात काही दम नसतो. क्वचित आंतरदेशीय प्रेम प्रकरणाचे किस्से ऐकून लोकांच्या भुवया उंचावतात एवढंच. एक तर मोठाल्या युनिव्हर्सिटीज, वेगवेगळे डिपार्टमेंट अन त्यांच्या वेगवेगळ्या इमारती. कधी कधी तर लायब्ररी सुद्धा वेगवेगळी असते. शिवाय स्वतः शिकणे, टी ए वगैरे असेल तर शिकवणे इतर पोटापाण्याचे उद्योग संभाळणे, इत्यादी करून इतरांच्या भानगडींबद्दल बोलत बसायला वेळ तरी कुठे असतो?

तरी जोड्या जमत असतात, अन एकतर्फी प्रेम प्रकरणांची अखेर प्रेमभंगात होत असते.

युनिव्हर्सिटी मधे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इन्टरनॅशनल स्टूडंट ऑफिसने एक कार्यक्रम आयोजित केला होता. सर्व नव्या जुन्या परदेशी विद्यार्थ्यांची एकमेकांशी ओळख व्हावी, एकमेकांचे कॉमन प्रॉब्लेम्स मांडण्याची त्यांना संधी मिळावी हा ऑफिशियल हेतू. वेगवेगळ्या देशातून आलेले , वेगवेवगळी भाषा बोलणारे, एकमेकांचं इंग्रजी सुद्धा जेमतेम समजणारे विद्यार्थी , त्यांनी आपापल्या गटातच राहू नये, इतरांची ओळख करून घ्यावी, स्टिरिओटाइप वर जाऊ नये, ऑल xxxx डू नॉट लुक अलाइक हे सर्वांच्याच मनावर बिंबवण्याचा प्रयत्न.

गौरीने त्या कार्यक्रमात बराच पुढाकार घेतला होता. जवळच्या भारतीय रेस्टॉरंटमधनं जेवण, त्याधी तबला, सतार , हार्मोनियम वाजवणार्‍या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम, ललिताचं भरतनाट्यम् , निशाचा चांदनी मधल्या गाण्यावर नाच असा भरगच्च कार्यक्रम होता. या सगळ्या कलाकारांना पकडून त्यांची तयारी करणे, हॉलवर सामान सुमान ने आण करणे यात तिचा मोठाच वाटा होता.

ललिताला ख्रंर तर भरतनाट्यम् करायचं फारसं मनात नव्हतं. साथीला कोणी नाही, नुसती कॅसेट लावून नाचायला लागणार. घरी तिने प्रॅक्टिस करताना सुद्धा तिची आई गाणं म्हणत असे अन ताल देत असे. इथल्या लोकांना त्यातलं काही कळणार नाही. उगीच काहीतरी एक्झॉटिक बघितल्या सारखं वाटेल. अन हजार प्रश्नांना उत्तर द्यावं लागेल. पण एक दोन कॅसेट लावून ऐकल्यावर तिला वाटलं की इथे नाहीतरी सर्व तयारीनिशी भरतनाट्यम् करायला परत कधी मिळेल ? घरातल्या घरात कॅसेट लावून अन ट्रॅक सूट घालून प्रॅक्टिस करणं वेगळं अन सगळ्या साजशृंगारानिशी चार लोकांपुढे सादर करणं वेगळं. तेवढ्या एका कारणाने ती भरतनाट्यम् करायला तयार झाली होती. अन शिवाय गौरी तिची रुममेट होती. एकदा गौरीने काही मनावर घेतलं की ते तडीस नेणारच ह्याची ललिताला चांगलीच खात्री होती. भरतनाट्यम् करायला नकार दिला तर गौरीने कर्नाटक संगिताचा कार्यक्रम ठेवायला सुद्धा मागेपुढे पाहिलं नसतं. अन कर्नाटक संगीत पहिल्यांदा ऐकताना लोकांची काय रिऍक्शन असते याचा ललिताला तरी चांगलाच अनुभव होता.

ललिता अन गौरी दोघी मुंबईच्या काँसुलेटमधे पहिल्यांदा भेटल्या होत्या. दोघींची युनिव्हर्सिटी एकच म्हणून कळल्यावर त्यांनी तिथेच बर्‍याच गप्प्पा मारल्या होत्या. दोघींनाही व्हिसा मिळाल्यावर त्यांनी पुढचे सर्व प्लॅन जोडीनेच केले होते. युनिव्हर्सिटी मधे एकत्र जरी रहात असल्या तरी त्यांचं फ्रेन्डस सर्कल वेगवेगळं होतं. ललिताच्या डिपार्टमेंटमधे भारतीय कोणी नव्हतेच. पी एच डी करणारे तर जवळ जवळ सगळेच अमेरिकन , क्वचित कॅनडा नाहीतर ऑस्ट्रेलियाहून आलेले विद्यार्थी होते. ललिता जास्त करुन आपल्या डिपार्टमेंटच्या लोकांबरोबर असायची. गौरी केमिस्ट्री मधे पी एच डी करत होती. तिच्या बरोबर शिकणार्‍यांमधे पन्नास टक्के मंडळी भारतीय, एशियन नाही तर सोव्हियेत युनियन मधली होती. त्यामुळे गौरी च्या मित्रमंडळाला ललिता 'युनायटेड नेशन्स' म्हणत असे.

त्यादिवशीचा कार्यक्रम अगदी अपेक्षेबाहेर रंगला होता. समोसे, तंदूरी चिकन,नान अन गुलाब जाम भारतीय रेस्टॉरंटमधून मागवलेले. त्याच्या जोडीला चायनीझ रेस्टॉरंट मधून फ्राइड राइस, नूडल्स अन चिकनचा एक प्रकार असं जेवण होतं. सगळ्यांना तंदूरी चिकन अन गुलाब जाम अतिशय आवडले होते.

पहिल्यांदा अमेरिकेत भरतनाट्यम् करायचं थोडं दडपणच आलं होतं ललिताच्या मनावर. त्याकरता, अन पोट हलकं असावं म्हणून तिने आधी काही खाल्लं नाही. तिचा कार्यक्रम संपवून, कपडे बदलून येईपर्यंत समोसे संपून गेले होते अन बाकी चायनीझ पदार्थांमधे काही ना काही नॉन व्हेज असेल अशा संशयाने तिला ते काही खावंसं वाटेना. नुसतेच दोन गुलाब जाम प्लेटमधे घेउन ती बसायला खुर्ची शोधत होती.

' बस इतनासा खाना ?' तिने समोर पाहिलं तर समोर एक उंच, जरासा सुकडाच वाटेल असा, चष्मा लावलेला मुलगा उभा होता.

तिने काहीच उत्तर दिलं नाही तेंव्हा तोच म्हणाला
' मैं नरेंद्र टंडन, आप गौरी की रूम मेट हैं ना?'

'जी हां, मैं ललिता रामभद्रन'

'जानता हूं, मैं गौरी के साथ पढता हूं, और फिर आपके डांस के पहले अनाउंसमेंट भी तो हुआ था.'

मग ललिताला आठवलं की जेवण ऑर्डर करण्यासाठी अन रेस्टॉरंटमधून सर्व घेऊन येण्यासाठी यानेच मदत केली होती.

'आपने बहुत हेल्प किया गौरी को आज के प्रोग्रॅम के लिये. वो बता रही थी आपके बारेमें'

'वो तो कोई बडी बात नहीं. आपने भरतनाट्यम् कहां सीखा? लगता है काफी साल सीखा है. '

'हां पहले घरमें सीखा मां के पास और फिर क्लास जाके सीखा है.'

'अरंगेत्रम भी कर लिया होगा आपने ?'

'उसके बिना आज यहां कैसे परफॉर्मनंस कर सकती थी?' अरंगेत्रम झाल्या खेरीज, गुरूच्या आज्ञेशिवाय एकट्याने लोकांसमोर नॄत्य सादर करायच्या विचारानेच तिने दोन्ही कानांच्या पाळ्या पकडल्या अन जीभ चावली.

'गौरी को पता था आपने कुछ खाया नहीं होगा. उसने आपके लिये कुछ समोसे भी बचाके रखें हैं. चलिये मैं आपको दिखाता देता हूं'

ललितान जेवेपर्यंत मग तो तिच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होता.
तोपर्यंत निशा लग्नातले वेगवेगळे विधी, त्यामागचा उद्देश, वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या पद्धती वगैरेवर बराच वेळ भाषण देत होती. सगळी माहिती सांगून झाल्यावर एकदाचा तिचा चांदनी मधल्या गाण्यावर नाच सुरु झाला. ललिता अन नरेंद्र दोघंही नाच बघू लागले. तिचा नाच बघून नरेंद्र म्हणाला

'लगता है निशा भी भरत नाट्यम् जानती है, लेकिन आपके जितनी प्रॅक्टीस नहीं है'

'आजकल कई लोग एकही तरह का डांस सिखना नहीं चाहते. दे वॉन्ट व्हरायटी. थोडा भरतनाट्यम् , थोडा कथ्थक , और बहोत सारा हिंदी फिल्मोंवाला डांस.'

तेवढ्यात गौरी ललिताला शोधत आली.

' अच्छा, तो खाना मिल गया तुमको. मुझे पता था समोसे जल्दी से खतम हो जायेंगे. और तुम चायनीझ कुछ खाओगी नहीं. वैसे नूडल्स व्हेजीटेरियन है - अगर कोई कोशर रखनेवाले स्टूडंटस हो तो वो खा सकते हैं इसके लिये.'

'गौरी , इतने दिनोंतक आपने अपनी रूममेट को छुपाये रखा है. ये गलत बात है. अगले वीकेंड कुछ लोग मिलके बीच जानेका प्लॅन बना रहें है. आप दोनो आइयेगा.'

पुढच्या गुरुवारी गौरीला तिच्या ऑफिसमधे गाठून नरेंद्रने परत शनिवारच्या ट्रिपची आठवण करून दिली. दहा पंधरा मुलं मुली बीच वर जाणार होती दिवसभराकरता. ललिताचा विषयच मरिन बायॉलॉजी असल्या कारणाने ती अनेकदा समुद्रकिनार्‍यावरच काय समुद्रात सुद्धा जात असे. त्यामुळे तिला काही बीचवर जायचं फारसं मनात नव्हतं. पण रात्री नरेंद्रने फोन करुन ललिताला परत आटवण करुन दिली . गौरी पण म्हणाली ' चल ना, एकदिन बीच पर जाके एंजॉय करना. इटस डिफरंट, यू विल लाइक इट.'

अन खरंच ऑब्जरव्हेशन, डेटा कलेक्षन, स्पेसिमेन कलेक्षन काही करायचं नसल्यामुळे ललिताला अगदी वेगळंच वाटत होतं. मनसोक्त पाण्यात डुंबणे, बीच वर खेळणे अन सतत काही ना काही चरत रहाणे. दुपारून उन्ह फार वाढल्यावर सगळी मंडळी छत्र्यांच्या खाली गोळा झाली. एक दोन पत्त्यांचे डाव रंगले न काही जण चक्क घोरूही लागले. गौरी पत्त्यांचा डावात गुंगली होती. ललिताने थोडा वेळ बाहेरुन डाव फॉलो केले, पण लवकरच ती कंटाळली अन आपलं पुस्तक वाचत बसली.

'कौनसी किताब है जो आप इतने ध्यान से पढ रहीं है ? '

तिने पुस्तकातनं डोकं वर केलं. नरेंद्र तिच्या खुर्चीच्या समोरच उभा होता. तिने पुस्तक उचलून त्याला दिसेल असं धरलं .

'हम्म, नयी है क्या ये किताब ?'

'नहीं तो , काफी पुरानी है, इनको गुजरे हुए भी काफी साल हो गये हैं.'

'काफी शौक है पढने का?'

' शौक कुछ नहीं, लेकिन अच्छा लगता है. यहां आने के बाद फुरसत कम रहती है पढने की.'

'ललिता को अगर मौका मिले तो वो चलते फिरते भी किताबें पढ सकती है.' मैत्रिणीची टिंगल करायची संधी दवडेल तर गौरी कसली!

'और गौरी है की किताब छूती तक नहीं' इतक्या साळसूदपणे म्हणाली ललिता की गौरी सुद्धा चमकली एकदम. गौरीकडे पाहून मग ललिता खळखळून हसली.
' वी बोथ लाइक टू रीड. और हम एक दुसरे को किताबें सजेस्ट करते रहते हैं'

सगळ्यांनी खायचं प्यायचं बरचसं सामान कूलर्स मधे घालून आणलं होतंच. पण त्यात चहाकॉफीची काही सोय नव्हती. गौरीला चहाची अगदी तलफ आली होती म्हणुन ती म्हणाली ' आय ऍम गोइंग टू गेट सम टी. डू यू गाइज नीड समथिंग ?'

बाकीचे बरेच जण पण चहाचं नाव काढताच उठून चहाच्या दिशेने चालायला लागले.
इतके सगळे जण एकदम त्या स्टॉलवर पोचल्यावर नेहेमी सारखा गोंधळ झालाच. कोणाला डबल टी बॅग हवी होती, कोणाला जास्त साखर, कोण म्हणे इक्वल पाहिजे, दोन चार जणांना कॉफी हवी होती. त्या स्टॉलमधला शाळकरी मुलगा अगदी गडबडून गेला होता. सगळ्यांचं झाल्यावर मग नरेंद्र्ने दूध, साखर काही न घालता कोरा चहा अन त्यात लिंबू घालून घेतला.

तेवढ्यावरून मग राकेश, अजित, विवेक वगैरे त्याच्या मित्रांनी त्याची टिंगल सुरू केली. तो सिरियल बरोबर ऑर्गॅनिक, लो फॅट दूधच घेतो, त्याला पल्प असलेला ऑरेंज जूस चालत नाही, तो कॅन मधले छोले अन राजमा कधी खात नाही वगैरे त्याचं गुणगान सुरु झालं. मग राकेश ने त्याचा हेअर कटींगचा किस्सा अगदी रंगवून रंगवून सांगितला. राकेश अन नरेंद्र एकाच वेळी आलेले. पहिल्यांदा केस कापायला एकत्रच गेले होते. तिथे काम करणार्‍या मुलीच जास्त होत्या. मुलीकडून केस कापून घेणार नाही म्हणून तो बराच वेळ थांबला होता. शेवटी एकदाचा एक 'गाय' मोकळा झाल्यावर त्याच्या कडून केस कापून घेतले होते नरेंद्रने. अन त्याने इतकी कटकट केली होती त्या म्हातार्‍याला की त्या म्हातार्‍याने याने दिलेली टिप परत केली होती अन म्हणाला होता ' पुढच्या वेळी हॉलीवूडल जा केस कापायला. इथे येऊ नकोस.'

असे बरेचसे किस्से ऐकल्यावर परमिता म्हणाली ' लेकिन खाना बहुत अच्छा बनाता है नरेंद्र. सभी स्टूडंट्स मे सबसे बढिया खाना इसीका होगा शायद.'

राकेश म्हणाला ' महिने मे एक बार बनाता है साला, और फिर मैं दो दिन तक किचन साफ करते रहता हूं'

'रुम मेट हो तो तुम्हारे जैसा राकेश. साफ सफाई का कितना ख्याल रखते हो तुम' नरेन्द्रने म्हटल्याबरोबर एकच खसखस पिकली. साफसफाई करणे, अपार्टमेंट आवरणे, वेळच्या वेळी लाँड्री करणे या गोष्टी अगदी गौण होत्या राकेशच्या दृष्टीने.

हळू हळू सगळ्यांचं गुणदर्शन झाल्यावर मंडळी परत निघाली. ललिता अन गौरी राकेशच्या गाडीतनंच आलेल्या. परत जाताना ललिता म्हणाली ' आय हॅड अ ग्रेट टाइम टुडे गाइज. थॅन्क्स फॉर इन्व्हाइटिंग अस'

' मी टू. आय होप वी कॅन डू समथिंग लाइक धिस अगेन' गौरीने मैत्रिणीला दुजोरा दिला.

ते 'समथिंग लाइक धिस' जुळून यायला बरेच दिवस जावे लागले. ऑक्टोबर महिन्यापासून एक तर दिवस लहान होत गेले. शिवाय स्वतःच्या परिक्षा, इतर मुलांना शिकवायचं असे त्यांची परिक्षा, त्याचं ग्रेडिंग, टर्म प्रॉजेक्टस वगैरे मधे सगळी मंडळी बिझी झाली. कँपस च्या थियेटरमधे दाखवणारे सिनेमे बघायला सुद्धा दरवेळी जमत नसे सगळ्यांना.

थँक्स गिव्हिंगच्या सुटीत गौरीचे वडील न्यू यॉर्कला येणार होते कामासाठी. त्यांना वेस्ट कोस्टवर यायला जमणार नव्हतं म्हणुन गौरीच तिथे जाणार होती. इतरही बरेच विद्यार्थी विद्यार्थिनी कुठे कुठे जाणार होते. अगदी मोजकीच मंडळी कँपस वर रहाणार होती . राकेश अन नरेंद्रनी मिळून या सगळ्यांना आपल्या अपार्टमेंटवर जेवायला बोलावलं होतं. टर्की अन स्टफिंग वगैरे जमायला कठीण अन कोणाला फारसं आवडणार पण नाही. त्यांनी सरळ सगळ्यांना पॉटलक असल्याची इमेल पाठवली. ललिताने बरंच खपून इडली सांबार बनवलं होतं . नरेंद्रने चिकन अन आलू मटर बनवलं होतं . परमिताने गाजर हलवा करुन आणला. विवेक ने नान आणले . राकेशने बियर, सोडा, प्लॅस्टिकचे कप वगैरे आणले होते.

जेवणं झाल्यावर नरेंद्रने सगळ्यांकरता कॉफी बनवली. पहिला घोट घ्यायच्या आधीच ललिता एकदम खुश झाली.

'आपने उस दिन बीचपे कहा था न की आपको यहां की कॉफी पसंद नहीं है. इसलिये आजकी कॉफी स्पेशली फॉर यू.'

कडक फिल्टर कॉफी, त्यात बेताचंच दूध अन ती वर खाली करुन आलेला फेस. अगदी मणीज मधल्या सारखी कॉफी. स्टीलची वाटी अन पेलाच काय तो कमी.
'वा! धिस इज पर्फेक्ट' ती म्हणाली.

परत एकदा सगळ्यांनी नरेंद्र कसा पिकी आहे, त्याचे नखरेच किती असतात याची उजळणी केली.

ललिताने मात्र त्याकडे लक्ष न देता दोन कप कॉफी पिउन घेतली.

गौरीने न्यू यॉर्क हून आल्या आल्या ललिताला थँक्सगिव्हिंगच्या जेवणाबद्दल विचारलं तेंव्हाही ललिताने आवर्जून कॉफीचा उल्लेख केला.

डिपार्टमेंटमधे गौरीने नरेंद्रला छेडलं सुद्धा ' सुना है आप साउदिंडियन स्टाइल कॉफी में मेजर कर रहें है.'

ते सेमेस्टर संपलं, ख्रिसमस ब्रेक मधे ललिताला तिच्या प्रोफेसर ने बरंच डेटा अनॅलिसिस चं काम दिलं होतं त्यामुळे तिला सुटी असल्या सारखं वाटलंच नाही. त्यातल्या त्यात गौरीबरोबर तिने काही सिनेमे पाहिले तेव्हढंच.
एका सिनेमाला नरेंद्र, राकेश अन अजित भेटले तेंव्हा सिनेमा संपल्यावर परत नरेंद्र अन राकेश च्या अपार्टमेंट वर जाउन कॉफी पिउन परत आल्या होत्या.

तिथनं येताना गौरी म्हणाली ' समथिंग इज नॉट राईट विथ दॅट गाय'

'बिकॉज ही मेक्स सच गूड कॉफी ?' ललिताला तिच्या म्हणण्याचा रोख कळला नाही.

' उसको देख के ऐसे लगता है जैसे वो हर काम बहोत सोच समझ के करता है.

' फिर उसमे नॉट राइट क्या हौ. अच्छी बात है ना.'

'नहीं नहीं ही सीम्स टू बी प्लॉटिंग एव्हरीथिंग.'

' येस, ये तो मुझे भी लगता है की वो हर काममे अपना फायदा सोचता है. डिड यू नो राकेश हॅज अ पर्फेक्ट जी पी ए. आय ऍम शुअर दॅट नरेंद्र पुटस अप विथ हिम फॉर दॅट अलोन.' ललिताने नरेंद्रची अभ्यासातली गती यथातथाच असल्याचं बरोबर ताडलं होतं.

'तुम बचके रहना हां. मुझे लगता है वो तुमको पटाने के कोशिशमें हैं. तब मुझे नहीं पता चला था ,लेकिन अब लगता है की भरतनाट्यम् वाले दिनसे वो तुम्हारे पीछे है.'

'हॅ! आय डोंट थिंक सो. उसको मेरे पीछे पडके क्या फायदा ?'

'मे बी ही हॅज फॉलन फॉर यू.'

'यू हॅव बीन वॉचिंग टू मेनी मूव्हीस' ललिताने गौरीला दटावलं.

पण नवीन सेमीस्टर सुरु झाल्यानंतर नरेंद्रने ललिताला जेवायला, कॉफीला, सिनेमा पहायला बोलवायचा सपाटाच लावला. दरवेळी इतरही कोण ना कोण असेच. क्वचित गौरीला पण आमंत्रण असे. इतर बरेच जण असल्यास कधि कधी ललिता जाई, नाहीतर अभ्यासाचं निमित्त सांगून टाळत असे. दरवेळेस तो 'तुम्हारी फ्रेंड', 'तुम्हारी रुमी' म्हणत गौरीची आवर्जून चौकशी करी.

असंच कधी तरी बोलता बोलता ललिता म्हणाली ' मराठी न्यू इयर आयेगा ना एप्रिल फर्स्ट वीक में. उस दिन गौरी का बर्थ डे है.'

'अँड व्हेन इज युअर बर्थडे ? '

'ऑगस्ट. बहोत टाइम है अभी. व्हेन इज युअर्स ?

'सप्टेंबर, और भी बहोत टाइम है.'

मग तो विषय तिथेच राहिला.

गौरीच्या आई वडिलांचं तिच्या वाढदिवसाकरता कॅलिफोर्नियाला यायचं घाटत होतं पण ऐनवेळी तिच्या वडिलांना दुसरीकडे जावं लागल्याने त्यांचा दोघांचाही प्लॅन बारगळला. वाढदिवसाच्या अगदी सहा सात दिवस आधी हे कळल्याने गौरी चांगलीच हिरमुसली होती. ललिताने तिची बरीच समजून घातली, आईवडीलांनी मे महिन्यात यायचं कबूल केलं तरी ती वैतागलेलीच होती.

ललिताने मग जवळच्या काही मित्र मैत्रिणीना बोलवून पार्टी करायचं ठरवलं.
निशा, परमिता, नरेंद्र , विवेक वगैरेंना तिने ललिताच्या नकळत निरोप पाठवले.
नरेंद्रने लगेच होकार कळवला. पाहिजे तर पार्टी आपल्या अपार्टमेन्टवर करुया सुद्धा म्हणाला. वाढदिवसाच्या दोन दिवस आधी पार्टीची तयारी करायला म्हणुन राकेश, नरेंद्र, निशा अन ललिता भेटणार होते.त्यादिवशी ललिताचं काम जरा लांबलं. तिने राकेशला आपल्याला उशीर होणार असल्याचा निरोप दिला तेंव्हा राकेश म्हणाला ' मिस्टर पर्टिक्युलर को देरी पसंद नहीं. नाराज हो जायेगा वो. कम ऍज सून ऍज यू कॅन' .

ती केमिस्ट्री च्या बिल्डींगच्या जवळ पोचली तेंव्हा राकेश अन नरेंद्र बिल्डींगच्या बाहेरच होते. राकेश जरासा चकित झाल्यासारखा दिसला अन नरेंद्र नेहेमी पेक्षा एकदम वेगळाच दिसत होता. ती हलकेच त्यांच्या मागच्या बाजूला उभी राहून एकायला लागली.

'वो तो सब मेरा प्लॅन था भाई. तुमको तो मालूम है की गौरी के साथ किसी भी लडके को चांस नहीं. वो सबके साथ बात वात करेगी, लेकिन आगे और कुछ नहीं. ललिताके साथ दोस्ती करने का यही तो मतलब है. उसको पटाके फिर गौरी को पटाया जायेगा.'

'लेकिन मैं तो सोचता था तुम ललिता को , आय मीन वो सब साउथि कॉफी वगैरा, उसका क्या मतलब था?'

' इट वॉज जस्ट पार्ट ऑफ अ प्लॅन.तुम जानते हो गौरी के डॅड एक बडि फार्मा कंपनी में काम करतें है. वो दोनों सालमें एक या दो बार यू एस आते हैं. ऐसे बडे घरकी इकलौती बेटी है वो. उसको पटाना है . प्यार, मोहोब्बत इन चीजोंसे पेट नहीं भरता, घर नहीं बनते.'

'कहां रह गयी ये लडकी भी. ऐसी शानदार पार्टी करना चाहता हूं मैं की गौरी खुष हो जाये. लेकिन ललितासे बहोत सारा काम निकालना है उसके पहले.'

कशी बशी घरी पोचली ललिता अन गौरी येईपर्यंत अंधारात सोफ्यावर बसुन राहिली. राकेशचा किंवा नरेंद्रचा फोन बरेच वेळा वाजला असावा . ती मात्र काही न करता बसून राहिली. गौरीने घरात आल्या आल्या दिवा लावला अन सोफ्यावर
बसलेल्या ललिताला पाहून एकदम दचकली.

' क्या हुआ लली? ऐसे अंधेरेमें क्युं बैठी है? कुछ तो बोल.तबीयत ठीक है ना? तेरे अम्मा , अप्पा तो ठीक है ना.?'

परत एकदा फोन वाजला. गौरी फोन घ्यायला गेली तर ललिताने तिला हाताला धरुन मागे केलं. दोन तीन वेळा वाजून बंद झाला फोन तरी ललिताला काही सांगायला सुधरत नव्हतं

डोळे पुसत, रडत रडत तिने गौरीला सगळी हकीकत सांगितली.

'गौरी, आय हॅड नो इंटरेस्ट इन हिम. ही वॉज जस्ट अनदर गाय. यू हॅव टु बिलिव्ह मी गौरी.'

'पागल, रोना बंद कर लली. तू क्या सोचती है, आय वॉज इंटरेस्टेड इन हिम ? ही इज जस्ट अनदर गाय ऍट स्कूल. फर्गेट हिम. देअर इज अ सरप्राइझ फॉर यू, इन टू डेज. चल् खाना खाते हैं.'

जेवून आवरून अंथरूणावर पडल्यावर सुद्धा ललिताच्या मनात राकेश अन नरेंद्रचे संवाद घुमत होते. दुसर्‍या दिवशी ललिता भल्या पहाटे आपल्या लॅबमधे गेली अन रात्री उशीरा आली. तिने येईपर्यंत गौरी झोपून गेली होती. पाडव्याच्या दिवशी पण ती लवकर उठून निघाली होती. पण गौरी तिच्याही अगोदर उठून पूजा उरकून निघायच्या तयारीत होती.

'आज शाम को जल्दी आना हां . सरप्राइझ है' म्हणत ती निघून गेली सुद्धा.

ललिताला हॅपी बर्थडे म्हणायला ही वेळ मिळाला नाही.

संध्याकाळी गौरीसाठी फुलं अन गिफ्ट घेऊन ललिता घरी आली तर घरात दहा पंधरा मंडळी होती. निशा, राकेश, नरेंद्र, विवेक, मम्मी, पप्पा....

'अंकल्,आंटी आप लोग कब आये. नमस्ते आंटी कैसी हैं आप? एकदम से कैसे आना हुआ ?'

'तुम्हारी दोस्त ने कहा कुछ सरप्राइज है. इसलिये आये हैं बेटा. आज ही आयें हैं और दो दिन रहेंगे . उसके बाद इनको फ्रांस जाना है.'

'क्या सरप्राइज है गौरी? मुझे लगा मम्मी पप्पा आयें है यही सरप्राइज होगा.'

'अच्छा तो देखो.' म्हणत तिने डावा हात पुढे केला. डाव्या हातात एक नाजुकशी अंगठी अनामिकेत!

' हू? व्हेन? हाऊ? व्हेअर ?' ललिताची प्रश्नांची सरबत्तीच चालू झाली. राकेशने गौरीचा डावा हात हातात घेतला अन म्हणाला ' वॉच केअरफुली' .

मग अगदी सावकाश एक गुडघा जमिनीला टेकवून गौरीचा हात धरुन म्हणाला
'विल यू मॅरी मी डार्लिंग' .मग ललिताकडे पहात म्हणाला

'ऐसे पूछा, आज दोपहर को , मम्मी पप्पा जहां ठहरे हैं उस होटल में. अब व्हाय मत पूछो.'

सगळ्यांच्या टाळ्या अन काँग्रॅचुलेशन्स च्या गजरात नरेंद्र दार उघडून कधी बाहेर गेला ते फक्त राकेश ने टिपलं. ललिता अन गौरी एकमेकींच्या गळ्यात गळे घालून रडत होत्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! वेगळ्या आणि मस्तच आहेत या प्रेमकथा.... आवडेश...

अमेझिन्ग..
यावर एक हिन्दी फिल्म बनू शकेल...

मस्तच चाललंय शोनू.

अप्रतिम! फारच छान!

कल्पू

मस्तय गोष्ट.

पण मणीज कॉफीचा उल्लेख केल्याबद्दल निषेध निषेध निषेध !!! आज घरी जाऊन वाटीत कॉफी करुन प्यावी लागेल Wink

>>कॉलेजच्या आयुष्यात जितक्या प्रेमी जणांच्या जोड्या जुळतात ना त्यात सगळ्यात जास्त अकरावीच्या वर्षात जुळत असाव्यात. अन अकरावीत जुळलेल्या अशा जोड्या पैकी सगळ्यात जास्त बारावीच्या सहामाही परिक्षे पर्यंत काही ना काही कारणाने मोडत पण असाव्यात.
Happy
आफताबला मोदक. या गोष्टीवर छान हिंदी फिल्लम होवू शकते.

अग ही सर्वात जास्त आवडली शोनू. मस्त मांडली आहेस.साधा प्लॉट्च पण झकास खुलला आहे. पुढची लिही लवकर.

.............................................

मंद असावे जरा चांदणे कुंद असावी हवा जराशी..

अग हा तर तेजाबमधला फॉर्मुला अनिलकपूर सांगतोय आणि माधुरी ऐकतेय बुरख्यातून.. Happy
कॉलेजचे दिवस.. पुन्हा तेवढ्यासाठी शिकायची तयारी आहे Wink

अर्र, तो राहिलाच होता बघायचा. अनिल कपूरचा सिनेमा म्हणजे माधुरी असली तरी बघवत नाही. आता ष्टोरी लाईन कोणी तरी सांगा बरं पटकन.

सरोज खान ला १ २ ३ गाण्याकरता कोरिओग्राफीचं बक्षिस मिळालं होतं तेंव्हा तिने त्याच स्टेप्स करुन दाखवल्या होत्या. माधुरीच्या अन तिच्या वजनात जेवढा फरक तेव्हढाच नाचात पण होता!
आता अजून एकच गोष्ट उरली आहे - तुमच्या पेशंसचा जास्त अंत पहाणार नाही Happy
सगळ्यांना धन्यवाद...

मस्तच ! पण अजुन फक्त एकच गोष्ट? Sad

शोनू, ही कथा फारशी नाही आवडली. ती पहिली सर्वात जास्त चांगली होती शिवाय तू सुरवातीला जी प्रस्तावना लिहिली होती त्याला अगदी धरून होती. बाकी दोन गोष्टी अशाच टाईमपास वाटल्यात. रागवू नकोस अशी प्रतिक्रिया दिलीस म्हणून.. Happy

हे सगळे वाचून कॉलेजचे दिवस आठवले. कोणीतरी सोम्या गोम्या दिसायला बावळट असाच कोणाच्या तरी सुंदरीच्या प्रेमात पडणे वगैरे. मग नाही मिळाली तर त्याने cafetria त येवून दुख प्रदर्शन करणे वगैरे वगैरे.... मग सगळ्यानी 'ये नहि तो कोइ और सहि' , 'भूल जा गम पिजा रम', फेमस हिंदी गाणे सगळ्यानी तार स्वरात गाणे .. 'तेरा सुंदर स्वपना टूट गया' असे चिडवणे. काय दिवस होते बाकी......... पण शोनूच्या नम्बर २ गोष्टीसारखे व्हायचे बहुतेकदा.
'यामं चिंतयामी ...' तो मंत्र लिहिला ना तसेच.
हम जिसे चाहे वोह किसी और को और वोह तिसरी को.... तर कधी कधी आपण एकावेळी इतक्या जणाना आवडतो(आवडू शकतो?) ह्याच्यात पण खूप मजा वाटायची मग ते absent असताना स्वताच्या नोट्स दे, journal पुरी करायला मदत,drawing पुर्ण करायला मदत,लायब्ररीत पुस्तके मिळत नसताना असेच 'सोमे' मग कुठून तरी आणून देत hey manuswini I have it,you can use it ; I have finished studying असे म्हणत पुस्तके देणे, दुसर्या बरोबर चढाई की तो पुस्तके शोधून देणार आधी का दुसरा, मग मनात वाटायचे 'बिच्चारे.. काय येडपट आहेत एकदम'...

त्या दिवसात कोणी ना कोणी आवडायचे पण खरे. पण मनातल्या मनात्....(छे! हिम्मत न्हवती).

शूनू, एकदम त्या दिवसात घेवून गेलीस. (काय एकेक सुंदर चेहरे आठवले रुइया मधली सुरवातीचे वर्षे नी काही क्षेवीयर्स मधली. )...............

शोनू, खरंच मनु म्हणते तशी कॉलेजच्या त्या फुलपाखरी दिवसात घेऊन गेलीस... कालच कथा वाचली होती... असेच एकेक किस्से आठवत राहिले आणि काय येडचाप होतो आपण त्या वेळेला असं म्हणून बराच वेळ हसत राहिले.... मस्तच लिहिलंयस एकदम.

फक्त एक दुरुस्ती कर...
ललिताने मग जवळच्या काही मित्र मैत्रिणीना बोलवून पार्टी करायचं ठरवलं.
निशा, परमिता, नरेंद्र , विवेक वगैरेंना तिने ललिताच्या नकळत निरोप पाठवले.

तिने गौरीच्या नकळत निरोप पाठवले.. असं वाक्य कर...

हम जिसे चाहे वोह किसी और को और वोह तिसरी को >>> हो आणि मग तो हमे हमारा प्यार नही मिल सका तो क्या हमारे प्यार को उसका प्यार मिले अशा अर्थाचा काही एक शेर होता तो म्हणायचा Lol

अजुन एक आठवले, माझी सख्खी मैत्रिण फार छान आहे दिसायला. कॉलेजमधे असताताना तिच्यामुळे ललिताची भुमिका अनेकवेळा माझ्या वाटेला आली आहे Wink

शोनू, ही कथा इतर ३ कथांहून नक्कीच वेगळी आहे! थोडस पुढे जाउन मी म्हणेन की हीच कथा सर्वोत्तम आहे!
पण गौरीबद्दल थोड कमी लिहिलयस तू Sad

"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.

आवडली ही पण. पण आयडू म्हणतो तसं गौरी बद्दल आणि मी म्हणेन की राकेश बद्दल पण कमी लिहिलय.
मला तर कालजीच वाटते आहे गौरीची..राकेशने पण त्या बनेल नरेंद्रचे ऐकून श्रीमंत पोरगी त्याच्याआधी पटवूया असा विचार केला असेल असं वाटायला लागलय Uhoh
फार विचार करू नये ..