महाराष्ट्रदिन

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

केतकरांचे मत मला पटावे म्हणजे मला तातडिने वैद्यकिय सल्ला घ्यायला हवा! असो.

केतकर उवाच

विषय: 
प्रकार: 

गुजराती अस्मितेचा आत्मा फक्त त्यांच्या भाषेत नाही, तो त्यांच्या जेवणशैलीतही आहे.

<<<< या संपादकांच्या डुलक्या का? Lol
(तसे ते वाक्य अजिबात चुकीचे नाही) Happy

आपले बापू करंदीकरही त्या पंचात आहेत. Happy

लेख बरोबर आहे, पण गुज्जू मराठी तुलना बरोबर नाही. व जाता जाता आजचा मराठी मुद्याची तुलना उगाचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीबरोबर केली असे वाटते. संयुक्त महाराष्ट्र निर्मान होणे बरोबरच होते, त्यानंतर महाराष्ट पुढे गेला नाही, खरेतर १९९०-९५ पर्यंत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत (वासरात लंगडी गाय ) भरपुर पुढारलेला होता, नंतर मात्र गुजरातने मोदी नेतॄत्वाखाली बाजी मारली. पण नंतरच्या प्रगतीला (अधोगती ! ) संयुक्त महाराष्ट्र चळवळीला जबाबदार धरने कितपत योग्य ते काही कळाले नाही. नंतरच्या काळात (आजपर्यंत) येथील काँग्रेसी नेतृत्व केंद्राच्या पायतळी नेहमीच तुडवले गेले, मला वाटत आजच्या अधोगतीला नेतेच जबाबदार आहेत.

इथे चक्क केतकर गुजरातची प्रशंसा करत आहेत हे पाहून चक्कर यायची तीच बाकी होती. २००२ च्या दंगलीनंतर गुजरात फिनिक्स पक्षासारखा उभा राहिला आहे हे आमच्यासारख्यांना मान्य आहे, पण केतकर मात्र इतके दिवस अमान्य करत होते. (स्पेशली निवडणूकांदरम्यान व वरिल लेखात महाराष्ट्रातील नेतृत्वावर जेंव्हा टिप्पनी केली तेंव्हा) बापू हा मुद्दा जरा केतकरांपर्यंत पोचवा. Happy

२००२ च्या दंगलीनंतर गुजरात फिनिक्स पक्षासारखा उभा राहिला आहे हे आमच्यासारख्यांना मान्य आहे, पण केतकर मात्र इतके दिवस अमान्य करत होते. >>> एखादा मुलगा गणितात चांगले मार्क मिळवतो म्हनुन मराठीत पण त्याला कच्चा असला तरी पास करुन टाका असे होत नाही ना.गुजरातच्या आर्थिक प्रगतीसाठी मनमोहनसिंग सरकारनेसुदधा मोदींना सर्व राज्यांच्या कार्यक्रमात प्रथम क्रमांकाचे बक्षिस देउन गौरवले आहे.पण म्हनुन गुजरातमधल्या अमानवी दंगलींमधे त्यांचा जो सहभाग/पाठींबा होता त्याच्याकडे दुर्लक्ष करावे हा हट्ट चुकीचा आहे .

केतकरांचे मत मला पटावे म्हणजे मला तातडिने वैद्यकिय सल्ला घ्यायला हवा!>>>> म्हण्जे केतकरांना नावे ठेवली कि मी शहाणा ठरेल का?

केतकरांची काहि मते -

"मराठी बाण्याचा वा अस्मितेचा, भाषेचा वा संस्कृतीचा ‘गर्व’ करावा, अवास्तव अभिमान बाळगावा असे गेल्या ५०-७५ वर्षांत आपण काहीही केलेले नाही."

"तीच गोष्ट राजकारणातली. यशवंतराव चव्हाणांनंतर त्यांच्या तोडीचा एकही राजकीय नेता महाराष्ट्राने केंद्रीय पातळीवर दिलेला नाही."

त्यामुळेच निव्वळ नाईलाज म्हणून केतकर गांधी-नेहरू घराण्याची चमचेगिरी करतात. जर मराठी बाण्याचा वा अस्मितेचा, भाषेचा वा संस्कृतीचा ‘गर्व’ करावा, अवास्तव अभिमान बाळगावा असे एखाद्या मराठी माणसाने काहि केले असते किंवा यशवंतराव चव्हाणांच्या तोडीचा एखादा राजकीय नेता महाराष्ट्राने केंद्रीय पातळीवर दिला असता तर केतकरांवर ही वेळ आली नसती.