व्हॅलेंटाइन च्या निमीत्ताने

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

व्हॅलेंटाइन च्या निमीत्ताने तूला काही सांगाव म्हणतोय
जून्या आठवणीतले जूनेच डाव तूझ्याशी मांडावे म्हणतोय

आइनस्टाइनचे सिद्धांत आणि ऍरीस्टोटल ची गणित मला जमलीच नाहीत
तशी ऐन वसंतात साद घालणारी 'तू' मला कधी कळलीच नाहीस

आता तूझ्यातल्या ' तू' ला आणि माझ्यातला ' मी' ला जरा पावसात न्याव म्हणतोय
द्वैताची भावना विरे पर्यंत चिंब चंब भिजवाव म्हणतोय.

तन भिजेल पण मन मात्र कोरडच राहील
कारण माझ्यातल्या 'मी' ला तुझ्यातली 'तू' कधी जाणवलीच नाहीस.

आता व्हॅलेंटाइन च्या निमीत्ताने आकाशातल्या बापाकडे एक गार्‍हाण घालाव म्हणतोय
पूढल्या व्हॅलेंटाइन पर्यंत, न जमलच तर निदान पूढल्या पावसापर्यंत तरी ...

तूझ्यातली 'तू' माझ्यातल्या 'मी' ला
तूझ्या आठवणीत भिजवत ठेवाव म्हणतोय.

(पहिला प्रयत्न. चूक भूल द्यावी घ्यावी)
**********************************************************

विषय: 

>>(पहिला प्रयत्न. चूक भूल द्यावी घ्यावी)>>

व्हॅलेंटाइन डे चा कि कवितेचा?

छान जमलयं.