गाबीटो भेळ

Submitted by मंजूडी on 6 September, 2008 - 02:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ मध्यम आकाराची गाजरे (लाल असावीत, केशरी शक्यतो नकोत)
१ मोठे बीट
२ मध्यम टोमॅटो
१ छोटा कांदा (पांढरा मिळाल्यास उत्तम)
चवीप्रमाणे मीठ

भेळेच्या चटण्या :
खजुर-चिंचेची चटणी
पुदिना-कोथिंबीरीची चटणी
लसूण-लाल सुक्या मिरच्यांची चटणी

सजावटीसाठी :
मटकी शेव
बारीक चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

गाजर व बीट स्वच्छ धुवून कच्चेच किसून घ्यावे. टोमॅटो व कांदा धुवून बारीक चिरून घ्यावा. एका भांड्यात गाजर, बीटचा किस आणि चिरलेला कांदा, टोमॅटो हलक्या हाताने एकत्र करून घ्यावे. त्यात चवीनूसार मीठ व भेळेच्या चटण्या घालाव्यात. एका बोलमध्ये काढून घेऊन त्यावर मटकी शेव व कोथिंबीर भुरभुरवून खाण्यास द्यावे.

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांसाठी
अधिक टिपा: 

भेळेच्या चटण्या तयार असतील आणि किसण्याचा व चिरण्याचा वेग जास्त असेल तर ५-७ मिनीटांपेक्षा अधिक वेळ लागत नाही.
कच्च्या भाज्यांचा वापर केल्यामुळे ही भेळ पचायला एकदम हलकी व जास्त खाल्ली तरी पोट जड होत नाही. कॅलरीज् मोजून खाणार्‍या लोकांसाठी एकदम छान न्याहारी आहे.
भेळेच्या चटण्या वापरल्याने चमचमीत पदार्थ होतो.
भाज्या न खाणार्‍या मुलांसाठीही हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
साध्या नायलॉन शेवेपेक्षा मटकी शेव वापरल्याने वेगळीच छान चव येते.

माहितीचा स्रोत: 
स्वनिर्मीत
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजु, रेसिपी आवडली..

गोबीटो वाचुन काहीतरी इटालियन वाटले....मग कळले गाजर बीट टोमॅटो.

त्या चटण्यांचीही रेसिपी दे ना..

मटकी शेव चटकन उपलब्ध होते?? मी ऐकली नाही कधी म्हणुन विचारते..

साधना

मंजु नीरजा खाते का गाबिटो भेळ................

जोक्स बाजुला............ पण प्रकार मस्त आहे आजच करतो घरी

चटण्या आहेत घरी तयार पण बारीक शेव आहे बघु कसे लागते ते.........

मस्त रेसिपी आहे. रंगीबेरंगी आणि चविष्ट.

मला वाटतं, गाजर अन् बीट एकदा हलके वाफवून घेतले तरी चालेल. इतकं कच्चं सगळ्यांनाच पचतं असं नाही. कांदा, टमॅटो आणि चटण्यांमुळे सही लागत असेल. नावही कल्पक आहे. मुलांना वेगळी नावं असली की उगाचच आपण काहीतरी स्पेशल खातो असं वाटतं Happy

नक्की करणार! Happy
-----------------------------------------------
शरीर बारीक अन् मन मोठं करायला कधी जमणार????
Happy

मंजु ही मटकी शेव कुठे मिळते? रोज डब्यासाठी वेगवेगळे काय करायचे हा मोठा प्रश्न असतो, तेव्हा एकदा नक्की करुन बघीन. माझ्या सा.बा. एकदम खुश होतील हे बघुन नाहितरी नात भाज्या खायला त्रासच देत असते.

चितळ्यांची मटकी शेव एकदम प्रसिद्ध आहे आणि खुपच चविष्ट असते. जिथे चितळ्यांची उत्पादने मिळतात तिथेच ही मटकी शेवही मिळेल.

यश, मग कशी झाली होती भेळ?

अरे वा मस्त प्रकार आहे. आता रविवारी करुन बघते. वाचतांनाच तोंडाला पाणी सुटल

पूनम,

गाजर आणि बीटचा किस ओल्या चटण्या मिसळल्यामुळे मऊ पडतो, त्यामुळे मला असं वाटतं की तो वाफवून घेतला तर मग भेळ अगदीच पचपचीत लागेल.

मंजू.. हे गाबीटो वाचल्यावर मला दिलिप प्रभावळकरांच्या हसवा फसवी मधली "गोबूटू" भाषा आठवली.. Proud

ऍडॅम, त्या गोबूटू वरूनच मला हे 'गाबीटो भेळ' नाव सुचलं. आम्ही ह्या भेळेला खरंतर बर्मीज् भेळ म्हणायचो, पण ते सुद्धा काहीतरी उगाच फॅन्सी नाव ठेवायचं म्हणून ठेवलेलं.. आणि खरी बर्मीज् भेळ वेगळीच असते.