नावगुंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र. १

Submitted by संयोजक on 2 September, 2008 - 20:58

उखाणा...
मराठी परंपरेतील एक गोड् रिवाज!
(सध्या ज्याच पेटंट बांदेकरांच्या होम मिनिस्टर कडे आहे )
कसा बर झाला असेल या प्रकाराचा जन्म?... कुणाच्या सुपीक डोक्यातुन निघाली असेल ही कल्पना?
एकमेकांनाना "अहोजाहो" करणार्‍या किंवा त्याच्याही आधी "इकडुन बोलावण झालय", "तिकडच येणं झालय" अश्या जमान्यात नवराबायकोला या निमित्ताने का होइना एकदुसर्‍याच "नाव" घ्यायची संधी देण्यासाठी झाला असावा बहुदा उखाण्याचा जन्म!
एकमेकांना उठ्सुट नावानं हाका मारणार्‍या आजच्या कपल्सना त्यात काय अप्रूप... आपल्यासाठी तो एक टाइमपास किंवा आपल्या अर्ध्या अंगाला टोमणे मारायची ऑफिशियल संधी!
तुमच्या काउंटरहाफ च "नाव" तस तुम्ही बर्‍याच वेळा घेतल असेल (किंवा घ्यावं लागल असेल अस म्हणू) आता जरा चेंज...
इथे तुम्हाला देण्यात येइल एका जोडीच नाव/चित्र आणि तुम्हाला त्या दोघांच्याही भुमिकेत शिरुन एकदुसर्‍याच्या नावाने शंख करायचा आहे ... नाही म्हणजे एकदुसर्‍याचे नाव गुंफुन उखाणे घ्यायचे आहेत

जमेल ना!
(न जमायला काय झाल म्हणा... एखाद्याची खेचायची संधी तुम्ही थोडीच सोडणार.. पण नुसती खेचू नका फोर अ चेंज कौतुक केल तरी चालेल... खेचायला आहेच की आपली घर की मुर्गी! )
तर असो...
समोरच्या कोनाड्यात उभ्या असलेल्या हिंदमातेच स्मरण करा आणि होउन जाउ द्या!

अरे हो हो ... जरा दमानं!
नियम तरी वाचा....

जोडी चे नाव/चित्र

नियमः
१) जोडीतल्या दोघांच्याही तोंडचा एकेक उखाणा लिहावा.
२) एकाच्याच तोंडचा उखाणा लिहला असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही.
३) एका आयडीवरुन तुम्ही कितीही प्रवेशिका टाकू शकता फक्त त्या वेगवेगळ्या पोस्टमध्ये पोस्ट कराव्यात.
४) उखाणा मुख्यतः मराठी भाषेतच असावा... एखाददुसरा अमराठी शब्द चालू शकेल
४) विजेत्याची निवड जनमत चाचणी (पोलिंग) नुसार होइल.

आजची जोडी :
युवराजसिंग - दिपीका पदुकोन

yuvraaj-deepika-301007.jpgउदा :

युवराज :
ओम शांती ओम
म्हणत करतो मी दंगा
दिपिकाच नाव घेउन
कॅप्टन (धोनी)शी पंगा

दिपिका :
स्टंपामाग धोनी आणि
युवराज उभा कव्हरला
कुणाची करू निवड
चिंता रणवीरच्या लव्हरला

लोकाग्रहास्तव सर्व स्पर्धांची अंतिम तारीख रविवार (१४ सप्टेंबर) ऐवजी सोमवार (१५ सप्टेंबर) केली आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीपिका:
रणबीर च्या कंबरेला टॉवेल चं कव्हर
युवराज चं नाव घेते,धोनीची लव्हर !!

युवराज
धोनी आहे बुजरा
रणबीर आहे बायकी
दिपिका ला मिळवायची
माझीच आहे लायकी !

दिपिका:
रणबीर ला म्हणले धर धीर
धोनी ला सानगितले कर ब्याटीन्ग
आणी युवराज सोबत मी केले सेटीन्ग

युवराज:
ना धोनी ची नशा ना रणबीर ची झिन्ग
मीच आहे दिपिका चा किन्ग!

दिपिका :
बॅटिंग करताना मारतो छक्क्यावर छक्का
युवराज हाच माझ्या दिलाचा इक्का!

युवराज :
पदार्पणातच केली जिने चित्रपटसृष्टी सर
अशी दिपिका जीवनात येता आला बहरच बहर !

युवराजः

धोनीला गंडवल आणि रणबीरला मिळवल
दीपिकाने टाकून गुगली मला खेळवल!

दिपीका:

दिसते मी दक्षिणेची मुलगी साधी भोळी
युवराजशी लग्न करायला मी नाही खुळी!

दिपीका :
धोनी पकडत बसला नुसता यष्टीमागे चेंडू
टॉवेल सोडुन नाचणारा रणबिर आहे पांडू
युवराजच नाव घेते आता नका कुणी भांडू

युवराज:
छक्यावर छक्के, छक्यावर छक्के,छक्यावर छक्के
छक्यावर छक्के, छक्यावर छक्के, छक्के मारले सहा
बिना चेंडु दिपीकाने माझी विकेट काढली पहा

युवराज :

अंगत पंगत पत्रावळ, पत्रावळीवर ठेवली लिंबाची फोड
सारखे सारखे लव्हर बदलायची दिपीकाला खोड

दिपीका :
नको मला रणबीर, नको मला धोनी
सध्यातरी युवराजच माझ्या दिलाचा धनी !

दिपिका:
क्रिकेटचा राजा धोनी पण मी नाही त्याची राणी
युवराजाची युवराज्ञी माझ्याविना नाही कोणी

युवराजः
आता कुठे जिवाला जरा 'शांति' मिळाली
दिपिकाने जेंव्हा 'सावरिया' म्हणून निवड केली

दिपिका :
कोण धोनी? कोण रणवीर? सार्‍यांचा पडतो विसर
युवराजराव मारतात छक्के तेंव्हा बॉलर होतो पसार

युवराज :
भिरकावला चेंडू स्टेडिअमबाहेरच्या तळ्यात
मंगळसुत्र बांधीन तर फक्त दिपिकेच्याच गळयात

दिपिका :
युवराज बॅट्समन आहे म्हणतात चिकट
पण शेवटी मीच घेतली त्याची विकेट

युवराज :
काय सांगु मित्रान्नो पोरी आल्या होत्या सांगुन कोण कोण.
पण पटली आपल्याला शेवटी दिपिका पदुकोण

दिपिका:-
रणबीरला जळविण्याची ही नामी संधी आहे भाऊ
धोनी झाला एकदा आता युविला जरा वापरुन पाहु...

युवराजः-
धोनी,रणबीर गेले उडत माझाच नंबर पयला
दिपिकासारखी भारी आयटम कसली गटवली आयला

मायबोली गणेशोत्सवातील स्पर्धा प्रवेशिका स्विकारण्याही मुदत संपली आहे. यापुढे कुठलीही प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारली जाणार नाही. लवकरच निकालासाठीचे मतदान सुरु केले जाईल त्यात सर्व मायबोलीकरांना मतदान करता येईल.

मायबोली गणेशोत्सव २००८