सोलापूर सेक्स स्कँडल - क्रमशः - भाग ११

Submitted by बेफ़िकीर on 18 April, 2010 - 01:02

रस्त्यातून नाचत सुटावे की हत्ती मागवावा अन साखर वाटावी की सोलापुरातल्या सगळ्या बारमधल्या सगळ्यांची बिले आपण भरावीत हे काही भाऊसाहेबांना समजत नव्हते.

आपल्याला एड्स झालेला नाही हे ऐकून ते आनंदाने पिसाळलेले होते. सकाळच्या मीटिंगमधील अपमान कधीच विसरले होते. सिर सलामत तो पगडी पचास!

अचानक त्यातच त्यांना कावेरीची आठवण झाली. साली! गेली गाडीखाली! तुकडे तुकडे! आपल्याकडे होती तेव्हा? व्वा! तिला हात लावलाकीच पेटायला व्हायचं! कावेरी! काय लिहून गेली? 'वेलकम टू द वर्ल्ड ऑफ एड्स'?? हा हा! वेलकम, वेलकम! वेलकम टू नरक म्हणाव! का गुडबाय टू नरक म्हणतात? काय माहिती! साहेबाची भाषा! लिपस्टीकनीच लिहावी लागणार ती भाषा! तासभर नुसता धिंगाणा घातला. एखाद्या घोरपडीसारखी चिकटते अंगाला. कुत्र्यासारखी मेली रस्त्यावर!

कावेरीची आठवण आल्यावर हे सगळे विचार करताना अचानक त्यांना काहीतरी चुकतंय अशी जाणीव झाली. काय चुकतंय? काहीतरी... कुठलातरी विचार करायचा राहून गेलेला आहे. कुठला? मीनाचा? अंहं! शर्मिला, माधव, नंदन तर सडतायतच! त्यांची काही बोलायचीही हिम्मत व्हायची नाहीच. त्यात परत पुरावे म्हणून ज्या कामी आल्या असत्या त्या सी.ड्या सद्याने मोडून फेकल्या. सद्याकडे बघायलाच हवे. कुठे गेलाय ***** कोणास ठाऊक! बग्गा? नाही! बग्गाचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग कोणता विचार करत नाही आहोत आपण? पुन्हा कावेरी..! कावेरी तर... मेली आणि... मरायच्या आधी... आपल्या** *** गेली आणि ते झाल्यावर बाथरूममधे ... धमकी लिहून...

लख्ख प्रकाश पडला. कावेरीने जाताना लिहिलेले धमकी! वेलकम टू द वर्ल्ड ऑफ एड्स!

धमकी दिली ते ठीक आहे. एड्स झाला नाही हे तर फारच उत्तम! पण.... तिने... धमकी दिली कशाला?

म्हणजे.. तिचं ते कालचं.. उसळून उसळून आपल्याला ओढून घेणं... सोडायला तयारच नसणं... हे सगळं.. एक प्लॅन होता? आपल्याला तो रोग व्हावा याचा प्लॅन? का पण? कोणाचा प्लॅन होता? कावेरी आपल्याविरुद्ध का जावी? तिचं काय च्यायला घोडं मारलं होतं आपण?

जाम लक्षात येईना! बरेच दिवसात कावेरीला बोलावलंच नव्हतं! साला सुंदरमल अन सिसोदिया दादासाहेबाला काही बरळले तर पंचाईत होईल म्हणून बोलवलं नाही.. तर ही स्वतःच आली. आणि आली म्हणजे अशी आली की नीयतच खराब व्हावी. पण ... तिचा आपल्याला खलास करायचा प्लॅन होता म्हणजे नक्कीच... सुंदरमल किंवा सिसोदिया... नाही.. हे दोघे आपल्या विरुद्ध जाणं शक्यच नाही... त्यांच्या हातात फायनान्स असला तरी आपल्या हातात पार्टीची सत्ता आहे. दादासाहेबावर आपला वट जास्त आहे. सी.डी काढलेली तिला माहीतच होती. फक्त त्याच पुढे काय होतं ते तिला माहीत नव्हतं! म्हणजे... मीना अन कावेरी भेटल्या की काय? कुठे? कधी? कुणीतरी.. कुणीतरी आपल्याला खलास करायला बघतंय! दुसरं कोण असणार आहे? मीनाच! मीना कातगडेच! हं! आपणच... तिला... की इतक्यात नको? पण मग नंतर करायला आपण जिवंत राहू का? हा हा! भाऊसाहेब बनसोडे? एका बारक्या पोरीपुढे ***?

भाऊसाहेबांचे विचार वेगात चालले होते आणि तितक्यात फोन वाजला.

बग्गा - बनसोडे? कहा रहते हो? पचास फोन किये सुबहसे..?
भाऊ - हा हा हा हा! मुझे एड्स हुवाही नही...
बग्गा - क्या? दिमाग खराब होगया क्या?
भाऊ - तुम बोलो.. कायको फोन किया?
बग्गा - शर्मिलाको क्यु बताया उसकी सी.डी. बनायी करके?
भाऊ - क्यु मतलब? उसने मारा मुझे नाक पे... सुजन है
बग्गा - बनसोडे... पी रख्खी है क्या? या तबीयत खराब है? वो क्युं मारेगी?
भाऊ - मै उसकी जब *** हूं तब वो नाकपे मारके जाती है... तुमसे क्या लेना देना?

भाऊ भंजाळल्यासारखे बोलत होते. एक तर जागरण, जखमा, सततचे पिणे अन त्यात कावेरीला कुणी पाठवले याचे नुकतेच सुरू झालेले टेन्शन आणि नसलेल्या एड्सचा आनंद! आपण काय बोलतोय हेच त्यांना समजत नव्हते.

बग्गा - बनसोडे.. ढंगसे बात करो..
भाऊ - अरे ढंगसे तू कर बात पहले.. मीनाकी सी.डी. क्युं नही भेजता
बग्गा - बनसोडे.. वो छोडो, पहले ये बताओ शर्मिलाने उसकी सी.डी. तुमसे चुरायी कैसे?

भाऊ हे ऐकून वेड्यासारखे हसायला लागले. सुरुवातीला बग्गाला हा कसला आवाज आहे हेच समजेना. नंतर त्याला कळले की म्हातारा हसतोय.

बग्गा - बनसोडे.. पागल हो गये हो क्या? हस क्यूं रहे हो? ... अबे बीमार हो क्या?
भाऊ - मै हस रहा हूं!
बग्गा - वही पुछ रहा हूं! क्युं हस रहे हो..?
भाऊ - क्युंकि सालोसे मुझे एक सवाल का जवाब मालूम नही था...
बग्गा - कौनसे?
भाऊ - लोग सरदारोंपरही जोक्स क्युं लिखते है...
बग्गा - ओय बुढ्ढे! सठियागया है तू! ***की तरह बक मत... हसता क्यूं है?
भाऊ - शर्मिला सी.डी. कैसे चुरायेगी?
बग्गा - क्युं?
भाऊ - सी.डी. तो तोडदी ना सदू ने?
बग्गा - किसने?
भाऊ - सदू
बग्गा - कौन सदू?
भाऊ - मेरा नौकर
बग्गा - बनसोडे... ये कैसे होने दिया तुमने?
भाऊ - *** इसलियेही तो मीनाकी सी.डी. मांग रहा था तुमसे...
बग्गा - लेकिन शर्मिलाने तो कहा सी.डी. उसके पास है...

भाऊ पुन्हा हसायला लागले. त्यांना एड्स नसल्याचा आनंद इतका झाला होता की कोणाशी आपण काय बोलायचंय हेच समजेनासं झालं होतं! आजवर बग्गाकडून त्यांना रकमाच्या रकमा मिळायच्या.

बग्गा - अबे हस मत?
भाऊ - शर्मिला को कल चार बजे यहा पता चला की उसकी सी.डी.भी है, और वो चोरी कब करेगी?
बग्गा - बुढ्ढे, कल मेरी उससे बात हुवी है
भाऊ - कब?
बग्गा - रात मे पौने बारा बजे, उसीके घरपे...

आता मात्र भाऊंचे नियंत्रण सुटले. ते वाट्टेल तसे हसायला लागले. बग्गा आता निश्चीत समजू लागला की बनसोडे वेडा झाला आहे. तरी त्याने एक प्रयत्न केला.

बग्गा - बनसोडे, तुम हसोगे तो मै फोन रखदुंगा
भाऊ - अरे हसाते हो क्युं पहले? एक तो पहलेही एड्स नही है, उसपर तुम हसारहे हो..
बग्गा - बनसोडे, ये एड्स क्या है?
भाऊ - मुझे होनेवाला था, हुवा नही..
बग्गा - तुम्हारी उतरजायेगी तब फोन करना, मै रख रहा हूं
भाऊ - सुनो, तुमने कल जिससे शर्मिलाके घरपे रातमे पौने बारा बजे बात की, वो शर्मिला नही थी... शर्मिला अ‍ॅरेस्ट हुवी थी, सव्वा नऊ बजेही...

बग्गाने भयंकर धक्का बसल्यामुळे फोन ठेवला. त्यानेतर काल आपला पत्ताही दिला होता फोनवर!

आणि हसणं पूर्ण थांबल्यावर मग भाऊंना तोच धक्का बसला.

.............................बग्गा जिच्याशी बोलला ती होती कोण?

भाऊंनी शर्मिलाच्या नोकराला फ़ोन केला. त्याने कुणीही आलेले नसल्याची शपथ घेतली. बग्गाला चढलेली असणार हे भाऊंनी ठरवून टाकले.

यंत्र! यंत्र होतं का काय ते? शरीरसुखाचं? नाव तर किती कोमल! सोनल! च्यायला ’हो’ म्हणत नाही, ’नाही’ म्हणत नाही, ’थांबा’ म्हणत नाही की ’सोडा’ म्हणत नाही. काहीही करा, कितीही करा! ही बाई पक्षात घेतली पाहिजे. आपला पार दोन तासात खुळखुळा झाला. दोन दिवस बाईमाणसाकडे त्या नजरेने पाहता येणार नाही आता आपल्याला. कुठून आली, का आली, का झोपली, का बोंब नाही मारली, का तापली नाही, का निघून गेली काही समजतच नाहीये.

आमदारांचे वाट्टेल ते विचार चाललेले होते.

मीनाताई गेल्यागेल्या सोनलताई आल्या अन सोनलताई गेल्यागेल्या मीनाताई आल्या. सहाय्यकाला काही समजेना! आपला साहेब करतोय काय? त्याने आपले साहेबांना न विचारताच मीनाला आत जाऊ दिले. मात्र मीनाचा चेहरा पाहून मात्र त्याला वाटले की सोनलबरोबर बहुधा साहेबांनी मजा केलेली असणार अन ते या मीनाताईंना समजलेले असणार! आणि आता वाद होणार! तो जवळपासच थांबला.

मीना भकास चेहरा करून आत आली. आधी आमदारांना सुधरेना! ही आली? हिचं काय करायचं? ही स्वत: काही म्हणाली तरी आपणच प्रतिकार करू अशी अवस्था झालीय! अन आता ही आलीय!

मीनाने आमदारांकडे त्वेषाने बघत सरळ दोन सी.डी. त्यांच्या अंगावर फ़ेकल्या. हे धाडस फ़ार महागात जाईल याची तिला कल्पना होती. पण ते करायलाच हवं होतं! त्याशिवाय योजना पूर्ण झालीच नसती.

बंडा - ए? काय आहे हे? फ़ेकतेस काय?
मीना - तुमच्या भाऊसाहेब बनसोडेंचे प्रताप बघा. चांगल्या घरच्या बायका नासवतायत. आत्ताच्याआत्ता राजीनामा घ्या माझा!

आमदार हबकले. काय चाललंय काय? ही मीना आल्यापासूनच चाललंय सगळं! बाबा म्हणतायत ते बरोबर आहे. आपला निर्णय चुकला की काय? आज सकाळच्या मीटिंगमधे तर नुसता जयजयकारच झाला. तपासणी काहीच झाली नाही. नंदन पकडला गेला. माधव पकडला गेला. आता भाऊकाका? हिला आत्ताच गप्प केलं पाहिजे.

बंडा - ए... जीभ सांभाळ! कोणाबद्दल बोलतेस? तू काल आलीयस पक्षात
मीना - आज चाललीय... त्या सी.डी. बघायच्या असतील तर बघा. सरळ पेपरात चालला होता भाऊंचाच नोकर या सी.डी. घेऊन. मला टीप लागली. तुमचा अन पक्षाचा विचार करून त्याला वाटेतच अडवला अन सी.डी. घेऊन तडक इथे आले. त्याला धाडला त्याच्या गावी. नाहीतर भाऊ त्याला खलास करायचे. या सी.डी. बाहेर फ़ुटल्या तर सोलापुरातच पार्टी संपेल असे नाही, महाराष्ट्रात डोकं वर काढायला अवघड होईल.
बंडा - (जोरात ओरडले) थोबाड बंद!
मीना - बंदच ठेवतीय हे नशीब आहे तुमचं! निघाले मी..
बंडा - थांब! जायचं नाही.

आमदारांनी हुकूम देऊन तिला तिथेच बसवलं! मीना टी.व्ही.कडे पाठ करून बसली. आमदारांनी दोन्ही सी.डी. फ़ास्ट फ़ॊरवर्ड करून पाहिल्या. आमदारांना हा प्रचंड मोठा धक्का होता. या प्रकरणात बाबांना इन्व्हॊल्व्ह करावेच लागणार होते. आपल्या हातातले हे प्रकरण नाही याची त्यांना जाणीव झाली होती. भाऊ शर्मिलाबरोबर रत होते. माधव अन कावेरी यांच्या शुटिंगसाठी स्वत: शर्मिला प्रयत्न करत होती. कावेरीचा विरोध मोडून काढत होती.

आपल्याच स्विटमधे आपल्याच स्वत:च्या पक्षातील एक किरकोळ पदस्थ मीना बसलेली आहे अन आपणच घाबरलेलो आहोत याची जाणीव आमदारांना झाली. त्यांच्या स्वरात आता हुकुमत आली.

बंडा - हा खेळ कुणी केलाय? भाऊकाकांना गुंतवण्याचा?
मीना - भाऊसाहेबांनी स्वत:च खेळ मांडलाय, पक्षाच्या प्रतिमेवर चिखलफ़ेक करण्याचा
बंडा - तो त्यांचा नोकर कुठे आहे?
मीना - त्याला विजापूरला धाडलाय मी
बंडा - त्याला आत्ताच्या आत्ता इथे यायला सांगायचं!
मीना - तो केव्हाच गेला असेल बसने
बंडा - मी मोरेला माणसं पाठवायला सांगतो. तुला बरी टीप लागली. तुलाच सगळ्या टीपा कशा लागतात?
मीना - माझा काय दोष आहे? संजयला सदूने स्वत:च फ़ोन केला होता. त्याने सांगीतले की तो भाऊंचा बुरखा फ़ाडायला चौकीवर चाललाय.
बंडा - पण सदूला हे करण्याचे कारणच काय?
मीना - सदू.. तुम्हाला माहीत नसणारच... भाऊंचाच अनैतिक मुलगा आहे.. त्यांच्या कामवालीला झालेला
बंडा - क्काय??? हे तुला कसे माहिती?
मीना -सगळ्या सोलापुरला माहितीय
बंडा - मग बापाला तो कसा अडकवेल?
मीना - बाप नाही! अनैतिक बाप!
बंडा - मग?
मीना - अनैतिक मुलगा असल्याने भाऊ त्याच्या नावाने काहीच ठेवायला तयार नव्हते. म्हणून तो सूड घेणार होता. आपल्याला साधे बापाचे नावही लावता येत नसले अन कुणीच आधारस्तंभ जगात नसला तर माणसाने करायचे काय?
बंडा - मला उलट प्रश्न विचारायचे नाहीत. ( मीना चरकली ). अजून कुठे बोललीयस हे?
मीना - कुठे बोलायचं असतं तर थेट इथे आलेच नसते.
बंडा - पुन्हा सांगतोय, जेवढं विचारलं असेल तेवढं बोलायचं! जास्त तोंड चालवायचं नाही
मीना - मी आता अहिंसा क्रान्ती पक्षात नाही. तुमच्याबद्दल वाटतं आणि संस्थापकसाहेबांना तुमचाही राग येऊ नये म्हणून सी.डी. घेऊन तडक इथे आले. इथे आले तर तुम्ही माझीच तपासणी करताय. मी निघते.
बंडा - ए... बस इथे... बरी जाशील...

दहा मिनिटे आमदार विचार करत होते. प्रकरण भलतंच होतं! हे कसं काय झालं? भाऊंनी स्वत:चेच शुटिंग कसे घेतले असेल? कशाला?

बंडा - मूर्ख आहेस तू! यात भाऊ नाहीयेत. ते स्वत:चे शुटिंग घेतील का करून?
मीना - तुम्ही म्हणाल तसं! मला काय? मी आता पक्षातच..
बंडा - पुन्हा पक्षात नाहीये म्हणू नकोस... अजून निर्णय झाला नाही आमचा, तुला ठेवायचं की नाही हा..भाऊ स्वत:चे शुटिंग कशाला घेतील?
मीना - शर्मिला चौकीवर आहे हे आपल्याला माहीतच आहे.
बंडा - मग?
मीना - अजून नंदन, माधव अन शर्मिला, कुणीच भाऊंचे नाव घेतलेले नाही हेही आपल्याला माहीतच असेल.
बंडा - काय म्हणायचंय ते स्पष्ट सांग!
मीना - या सी.डीच्या जोरावरच तर भाऊ स्वत:चे नाव बाहेर पडू देत नाहीयेत.
बंडा - मुर्ख आहेस. नंदन अन माधव बायकांचे अश्लील फ़ोटो काढतात हे खात्याला आधीच माहिती आहे.
मीना - अन शर्मिला?
बंडा - काय शर्मिला?
मीना - शर्मिला जर म्हणाली की भाऊसाहेब बनसोडे या सगळ्याच्या मागे आहेत .. तर...
बंडा - पुरावा लागेल
मीना - पुरावा आरोप सिद्ध करायला लागतो तसा आरोप खोटा आहे हे सिद्ध करायलाही लागतो.
बंडा - म्हणजे?
मीना - भाऊंनी शर्मिलाचे तोंड बंद करण्यासाठी ती सी.डी. केलीय.
बंडा - कशावरून?
मीना - सी.डी. पुन्हा नीट बघा. एन्ड बघा एन्ड! भाऊ कॆमेरामनकडे बघतायत. शर्मिलाला काही कल्पनाच नाहीये. भाऊंनी एक खुण्सुद्धा केलीय कॆमेरामनकडे पाहून!

आमदारांनी पुन्हा पुन्हा तो शॊट तपासला. त्यांना त्यात तथ्य वाटले. पण हे सगळे मीनाने कधी बघितले?

बंडा - तू दोन्ही सी.डी. बघितल्यास?
मीना - होय
बंडा - कधी?
मीना - तुमच्याकडे येऊन मी खोटी पडायला नको म्हणून आधी सदूकडून सी.डी. मिळताच मैत्रिणीच्या घरी गेले व सी.डी. पाहिल्या.
बंडा - मैत्रिणीच्या? मैत्रिणीला क...
मीना - मी इतकी वेडी नाही. अहिंसा क्रान्तीच्या प्रतिमेची मलाही तितकीच काळजी आहे.

आमदारांनी पुन्हा पुन्हा फ़ास्ट फ़ॊरवर्ड करत दोन्ही सी.डी. तपासल्या. या सी.डी. बनवण्याचा हेतूच समजत नव्हता. कावेरीला ब्लॆकमेल करून उपभोगले अन वेश्या व्यवसाय करायला भाग पडले हे माधवच्या जबाबातून सिद्ध झाले होते. पण ही बाई? ही शर्मिला? ही तीच की? जी आपल्याबरोबर एकदा उस्मानाबादला अन एकदा मुंबईला होती. ही याच्यात कशी? जर मुलींचेच शोषण करायचे आहे तर एक बाई कशी काय आली या भानगडीत?

अंहं! आपण हालचाल करणे योग्य नाही. बाबांना सांगणे हे पहिले काम आहे. आमदारांनी तीर्थरुपांना फ़ोन लावला.

बंडा - बाबा...
दादा - काय रे?
बंडा - मोठा घोळ झालाय इथे
दादा - काय झालं? कुठेयस तू?
बंडा - सोलापूर
दादा - काय झालं?
बंडा - ते प्रकरण नाही का, माधवचं..??
दादा - हं!
बंडा - त्यात ... भाऊकाकापण..
दादा - बंडा.... काय बोलतोस? माझ्यासारखे आहेत तुला भाऊकाका! डोकं फ़िरलं का?
बंडा - नाही नाही, मी आत्ता पुरावा बघितला...
दादा - कसला पुरावा?
बंडा - सी.डी आहे भाऊकाकांची
दादा - सी.डी.? बनसोडेची? म्हणजे?
बंडा - म्हणजे... भाऊकाका अन ... एक बाई...
दादा - बंडा, तुला वेड लागलं का? कुणीतरी बनसोडेवर चिखलफ़ेक करण्यासाठी बनाव केलेला असणार
बंडा - आणखीन एक सी.डी. आहे.. त्यात तीच बाई, माधव आणि... आणखीन एक बाई...
दादा - अरे ... त्या बाईला पकडलंय ना पण..?
बंडा - हो... पण भाऊकाका...
दादा - सरळ आहे. बनसोडेला फ़सवलंय त्यात त्या बाईने..
बंडा - नाही हो बाबा, भाऊकाकांनीच फ़सवून काढलीय तिच्याबरोबर त्यांची सी.डी.
दादा - हे तुला सगळं त्या नवीन मुलीने सांगीतलं असेल.. हो ना?
बंडा - अहो बाबा, आत्ता इथे मी ती सी.डी. बघतोय

आमदारांनी साद्यंत कथन केले. दोन मिनिटे दोन्ही बाजुंनी फ़ोनवर सुन्न शांतता होती. अचानक दादासाहेब बोलायला लागले.

दादा - बंडा, हा सगळा प्रकार भयंकर आहे. एक अक्षर पेपरात येता कामा नये. तू स्वत: जातीने लक्ष घाल. आत्ता मी तिथे येणे म्हणजे असल्या माणसांना जास्त महत्व दिल्यासारखे होईल. तू सांभाळ! माने पुण्यापर्यंत पोचलाच आहे. त्याला माघारी पाठवतो. स्वत:ची चार माणसं कामाला लाव. कुणावरही विसंबू नको. तिथे एक म्हस्के म्हणून जुना कार्यकर्ता आहे आपला. त्याला काका म्हणतात. त्याला भेटलायस का? हं! तो जुना माणूस आहे आपला. त्याला थोडी कामे सांग! सगळे पेपरवाले अन सगळे केबलवाले! सगळ्यांशी तू स्वत: बोलू नकोस. वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना बोलायला सांग! आणि कार्यकर्त्यांना सुगावा लागू देऊ नकोस. एक अक्षर छापले मात्र जायला नाही पाहिजे. तिथे संध्याकाळी पण एक पेपर निघतो. त्याच्याकडे आधी चौकशी कर! अन त्या नव्या मुलीला स्थानबद्ध कर. तुझ्या माहितीशिवाय तिने एक फ़ोनही करता कामा नये. बनसोडेला काहीही कल्पना येऊ देऊ नकोस. सरळ संध्याकाळी पत्रकार परिष बोलव! रेव्हन्सलाच आहेस ना? हं! तिथेच बोलव. आणि सरळ बनसोडेची हकालपट्टी केली म्हणून जाहीर कर. कारण विचारतील. त्यांना म्हणाव आम्हाला त्यांच्या निष्ठेची शंका येत होती. कार्यकर्ते या घोषणेमुळे बिथरतील. त्यांना चुचकार. सगळ्यांना आजच रात्री कॊकटेल डिनर दे. शंभर जण जेवले तरी चालेल. पेपरकडे काहीही चुकून सुगावा लागला असेल तर सुंदरमलला मधे घाल. तू फ़ार मधे पडू नकोस. माने येईल. पण प्रवक्ता असल्याप्रमाणे तूच ही घोषणा जाहीर कर. कुणाकडून तरी मानेपर्यंत असा निरोप पोचवायची व्यवस्था कर की माने वेळेवर पोचेल की नाही हे माहीत नसल्यामुळे मीच तुला प्रवक्ता केले. याचे कारण समजले का? माने आणि बनसोडे जुने मित्र आहेत. माने बिथरेल. तू स्वत: मात्र त्याला सांगू नकोस की मी तुला प्रवक्ता केलंय या परिषदेसाठी! आणि चौकीवर जातीने लक्ष घाल. कुणी बनसोडेला पकडतंय बिकडतंय का ते बघ! बाकीचे पकडलेले काय काय बोलतायत ते बघ. आणि त्या नव्या मुलीवर विसंबून निर्णय घेऊ नकोस. काय वाट्टेल ती शंका असली तरीही आम्हालाच फ़ोन कर... समजलास का? आणि सर्वात महत्वाचं! ... हे सगळं जर खोटं निघालं... बनावट निघालं.. तर... पक्षाच्या प्रतिमेसाठी मला तुझा राजीनामा घ्यावा लागेल. मग मी आमदार बघणार नाही अन खासदार! मुलगा बघणार नाही अन बाप! त्याच रेव्हन्समधे तुला सर्वांदेखत राजीनामा देऊन बनसोडेची माफ़ी मागायला लागेल.

जबरदस्त हादरा! आमदारांच्या पायाखालची वाळूच सरकली. मात्र त्यांना प्रथमच बाबांचे व्यवस्थापन कौशल्य जाणवले. आपणही असेच निर्णय घ्यायला हवेत. आता त्यांना जरा हलके वाटू लागतंय तोवरच पुन्हा फ़ोन वाजला. पुन्हा बाबाच होते.

दादा - बंडा, बाप म्हणून सांगतोय, संस्थापक म्हणून नाही
बंडा - .... काय?
दादा - तरुण आहेस. दोन गोष्टींपासून कायम जप.... खून... आणि ... स्त्री!

फ़ोन ठेवला तेव्हा आमदार खलास झाले. त्या रात्री गेस्ट हाऊसवर मीना आली होती ते बाबांना कळलं की काय? कसं? मोरे? पण आत्ता तरी मोरेवर विश्वास ठेवायलाच हवा होता.

बंडा - मोरे... ताबडतोब काका म्हस्के आणि पाच एकदम जुने कार्यकर्ते कार्यालयात बोलवा. तुम्ही इथेच थाबा. या मुलीने येथून हालता कामा नये. तिने एक फ़ोनही करता कामा नये. कुणाही आल्यागेल्याशी बोलता कामा नये. आणि ... यात जर काही गफ़लत झाली तर...

आमदारांच्या बोलण्यातली धमकी अन त्यांचा भयानक चेहरा पाहून मोरे हादरला. त्याने जोरजोरात मान हलवली. आमदार तडक बाहेर पडले.

पुढील एक तासात आमदारांनी सोलापुरात अक्षरश: थैमान घातले. बाबांचा प्रत्येक हुकूम पाळला. दोनच गोष्टी हाताशी आल्या. दोन तासांनी जे वर्तमानपत्र निघणार होतं ते किंवा उद्या निघणार होती त्यातील कुणालाच काहीही सुगावा नव्हता आणि.. चौकीवर काहीही कळलेले नव्हते.

एकंदर, मीना म्हणत होती ते खरंय! ती तडक आपल्याचकडे आलेली आहे हे आमदारांनी जाणलं! पण तिच्यावर इतक्यात विश्वास दाखवता येणार नव्हता. पत्रकार परिषदेची सूचना दिली. त्या परिषदेत भाऊंनी येऊ नये असे म्हणणेच शक्य नव्हते. कारण त्यांना आत्ताच सुगावा लागला असता. कार्यकर्त्यांमधे उत्साहाला उधाण आलं! आधी काहीतरी महत्वाची घोषणा! त्यानंतर कॊकटेल डिनर! परवाच तर झालं! आजही! वा वा!

सहा वाजता आमदार रूमवर परत आले. दादासाहेबांचे पाच फ़ोन येऊन गेले होते. पण कार्यालयात त्यांनी मुद्दामच फ़ोन केला नव्हता. आमदारांनी वडिलांना सर्व परिस्थिती कथन केली. बरेचसे नियंत्रणातच आहे, आता फ़क्त भाऊकाकांच्या पक्षातून जाण्याची घोषणा केली की झाले असे ते म्हणाले. दादासाहेब जरासे तरी शांत झाले. माने निघाला आहे असे त्यांनी आमदारांना सांगीतले. साडे सात पर्यंत तो पोचेल. बरोब्बर साडे सातलाच परिषद सुरू होणार आहे असे आमदारांनी त्यांना सांगीतले.

बाप, मुलगा जरा शांत झाले होते. मीनाकडे बघत आमदार म्हणाले:

बंडा - तू निष्ठेने वागलीस हे मला समजलेले आहे. काळजी करू नकोस. मी बाबांना सांगेन. तुला जायची गरज नाही पक्षातून. भाऊकाकांनाच जायला लागेल. आजच परिषद बोलावतोय.
मीना - सर.. तुम्ही एवढे करताय.. मी कशी जाईन.. पण... संस्थापक सर
बंडा - त्यांना तसं वाटणं साहजिक आहे. तू आल्यापासून दोन दिवसात किती घोळ झाले. पण तो गैरसमज आहे हे त्यांच्या लक्षात आलेले आहे.
मीना - सर... आतातरी... आई जरा आजारी असते...
बंडा - हो हो.. जा तू! पण साडे सातला पुन्हा आलं पाहिजे.

रूममधून बाहेर पडताना आमदारांच्या मनात विचार होता... जमलं तर आज रात्री ही पोरगी..... मीनाच्या मनात विचार होता की आलं पाहिजे काय म्हणतोय.. नाही म्हणालास तरी येणारच आहे मी... आणि

मोरेच्या मनात विचार होता की.... हे काय झाले? भाऊसाहेब बनसोडेंना का हाकलतायत? इतका चांगला माणूस? याच्यामुळे पक्ष उभा राहिला. आणि... ही नवी मुलगी आल्याआल्या त्यांना असे वागवतायत? सांगायला पाहिजे त्यांना... नक्कीच!

बरोब्बर सव्वा सहाला रेव्हन्सवरून बाहेर पडलेली मीना साडेसहाला विकी बारटक्केला भेटली अन तिथून पुढे जाऊन एका बूथवरून तिने नेमाडेंना काहीतरी फ़ोन केला. तिथून ती देशपांडे नावाच्या साधारण पासष्टीच्या गृहस्थाला त्यांच्याच कार्यालयात जाऊन बरोब्बर साडेसहाला भेटली. ते तिने सांगीतलेले ऐकून अवाक झाले होते. तिथून ती बाहेर पडली तेव्हा तिला माहीत होते. केवळ पाऊण तासाने, म्हणजे सव्वा सातला अख्खं सोलापूर ढवळलं जाणार आहे.

नानासाहेब पाटील, जे दादासाहेबांचे कट्टर राजकीय विरोधक होते, त्यांनी सोलापुरात चालवलेल्या एकमेव सायंदैनिकाचे देशपांडे हे संपादक होते.

त्यांचे नेहमीचे सायंदैनिक केव्हाच साडेपाचला प्रकाशितही झाले होते. पण स्पेशल पुरवणी सव्वा सातला काढायचे आश्वासन मिळाल्यावर मीना हसतमुखाने बाहेर पडली होती. बहुतेक ती एक पानीच अन छोट्या आकाराचीच निघणार होती. पण... अक्षरश:... घुसणार होती....

भाऊंना राहून राहून समजत नव्हते की बग्गा पुन्हा पुन्हा असे का म्हणतोय की तो काल रात्री शर्मिलाशी तिच्याच बंगल्यात फ़ोनवरून बोलला. मात्र त्यांचा स्वत:चा निर्णय झालेलाच होता. नानासाहेब पाटलांना त्यांनी बरोब्बर संध्याकाळी सहा वाजता फ़ोन करून ’मी पक्षात यायला तयार आहे’ असे सांगीतले. जणू भाऊसाहेब बनसोडे हा माणूस आला की जादू करेल अन सोलापुरची जागा अहिंसा क्रान्तीला जागावाटपात द्यावी लागल्याबद्दल वाईट वाटणारा अहिंसा क्रान्ती पक्षाचा पॆरेंट पक्ष - ज्यातून दादासाहेबांनी फ़ुटून अहिंसा क्रान्ती काढला होता - हा पुढच्या निवडणूकीत कुणाशीही युती न करता सत्तेवर येऊ शकेल. मात्र, नानासाहेब बेरकी माणूस होता. महाराष्ट्राचा पक्षाध्यक्ष होता. त्यांनी भाऊंना ’अहो म्हणजे काय, आपल्यासारख्या मुरलेल्या माणसांचीच तर गरज आहे आम्हाला, सहा आठ महिन्यात एखादे चांगले पद द्देऊन मग तुमची पुढची वाटचाल चालू करूचयात’ असे सांगीतले. ’आजच घोषणा करूनही टाका, उद्याच सोलापुरात मोठा कार्यक्रम ठेवूयात’ असेही ते म्हणाले. हुरळलेल्या भाऊंनी किंचित विचार करून पाच एक मिनिटांनी दादासाहेबांना फ़ोन लावला. त्यांनी ’बिझी असल्याचे’ सांगून घेतला नाही. तब्बल पाचवेळा फ़ोन केल्यावर दादासाहेब लाईनवर आले.

भाऊ - सर नमस्कार
दादा - ..... बोला... भाऊसाहेब बनसोडे? (भाऊ चरकले. यांना आधीच समजलं की काय पक्ष सोडण्याचं?)
भाऊ - अं! जरा महत्वाचं बोलायचं होतं!
दादा - ऐकायला तयार आहोत आम्ही... म्हणूनच फ़ोन घेतलाय... बोला (भाऊ आणखीनच चरकले.)
भाऊ - आपला काहीतरी गैरसमज...
दादा - मुद्याचं बोल बनसोडे...
भाऊ - मला यापुढे... अहिंसा क्रां
दादा - पक्ष सोडायचाय?
भाऊ - ..... म्हणजे.. आजवरचे आपले..
दादा - प क्ष सो डा य चा य?
भाऊ - सोडायचाय म्हणजे .. तसं मनात काही...
दादा - एक तास थांब! मग निर्णय घे...

दादासाहेबांनी खाडकन फ़ोन ठेवला. या माणसाला इतक्यात कशी काय टीप लागली भाऊंना समजेना. पण आता झाले ते झाले... जुने नाते संपुष्टात आले होते. यापुढील प्रत्येक निवडणूकीत अहिंसा क्रान्ती हा कसा नालायक लोकांचा पक्ष आहे हे सांगावे लागणार होते. रक्तात इतकी वर्षे मुरलेले पक्षाचे विचार नष्ट करावे लागणार होते.

काही असो! भाऊ बनसोडे हा कितीही राक्षस माणूस असो. या क्षणी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं! त्यांना आठवले बावीस वर्षांपुर्वीचे दिवस. नानासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली दादासाहेब होते. आणि दादासाहेबांनी भाऊ बनसोडेला आपल्याबरोबर घेतले होते. माने अन काका म्हस्केही तेव्हापासूनच दादासाहेबांबरोबर होते. आमदार तेव्हा हाफ़ पॆंट घालत असत. दादासाहेबांच्या पत्नी व मानेंच्या पत्नीही भाऊंना घरातीलच माणूस समजायच्या. अक्षरश: दिवसरात्र पक्षाचा विचार चाललेला असायचा. त्यातच खुर्चीचा विचार मिसळलेला असायचा. मग त्यातच कधी शिकार, कधी एखादी बैठक हळूच, अनेकदा हळूच अपेयपान! प्रत्येकाच्या वैयक्तीक जीवनात दुसरा अगदी सहज सामावून जायचा. आमदार काही कारणाने दवाखान्यात होते तेव्हा भाऊ सलग आठ दिवस रात्रंदिवस तिथे बसून होते. आमदार घरी आले तेव्हा दादासाहेबांनी प्रेमाने भाऊंना मिठी मारून त्यांच्या खांद्यावर आपले अश्रू ढाळले होते. वहिनी भाऊंना राखी बांधायच्या. भाऊंनी लग्न करावे म्हणून सगळेच मागे लागायचे. पण भाऊ लाजून हसून नाही म्हणायचे. सणासुदीला तर भाऊ माने किंवा दादासाहेबांकडेच असायचे. मानेंची तर दोन्ही मुले भाऊंच्याच खांद्यावर मोठी झाल्यासारखी होती. भाऊंचा प्रवेश झाला त्यानंतर दोन वर्षांनी झालेल्या विधानसभा निवडणूकीत उस्मानाबाद, लातूर अन सोलापूर येथे पार्टीला घवघवीत यश मिळालं! दादासाहेबांना एक छोटेखानी मंत्रीपद मिळालं! माने आणि भाऊंपासून ते किंचितच लांब झाले. पण मनाने नाही. शरीराने! या निवडणूकीतील यशामुळे पार्टीतील माने अन भाऊंचा भाव वधारला. तर पुढील निवडणूक लगेच दोनच वर्षांनी झाली. आधीचे सरकार कोसळले होते. यावेळेस या त्रयीने चमत्कार केला. एकतर त्यांच्या मतदारसंघच्या मतदारसंघ घुसळून काढण्याच्या मोहिमेमुळे आधी मतदानाचे परसेंटेजच वाढले. भाऊंना या दरम्यान अपघात झालेला होता. तरीही ते अक्षरश: मैदान पिंजून काढत होते. प्रामुख्याने भाऊंचा अद्वितीय पराक्रम अन दादासाहेबांचे वक्तृत्व या जोरावर पार्टीला या तिन्ही जिल्ह्यांसकटच सांगली अन कोल्हापूरलाही प्रचंड यश मिळालं! सरकार आलं! नानासाहेबांनी यावेळेसही दादासाहेबांना चांगले मंत्रीपद दिले. भाऊ व माने यांनाही काही ना काही पदे दिली. सगळ्यांचाच सन्मान वाढला.

भाऊ कायमचे सोलापुरात शिफ़्ट झाले. माने मुंबईला दादासाहेबांबरोबर राहू लागले. अजूनही तेच जुने नाते, तीच मैत्री, तेच प्रेम, सगळे काही तसेच होते. अर्ध्या रात्री एकमेकांना हाक द्यावी असे होते तिघे!

आणि काही कारणाने नानासाहेबांनी दादासाहेबांचे खाते आपल्या पुतण्याला मिळावे याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडे चालू केले. संबंध बिघडले. मग दादासाहेबांनी कधीतरी पक्षाच्या सभेत बोलताना घराणेशाहीचा उल्लेख केला. सी.एम स्वत:चा एका माजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव होते. सगळंच हळूहळू बिघडलं! सी.एम ना ते आपल्याबद्दल बोलले असे वाटू लागले. तो गैरसमज काढण्यासाठी दादासाहेबांना खूप प्रयत्न करावे लागले. सतत आपली निष्ठा दाखवून द्यावी लागली. त्यातच भाऊंनी दादासाहेबांवरच्या प्रेमामुळे सोलापुरात भर सभेत नानासाहेबांबद्दल काहीतरी उद्गार काढले. नानासाहे आणखीन संतप्त झाले. दादासाहेबांनी भाऊंना यापुढे काळजी घ्यायला सांगीतलं! मात्र माने, ते व भाऊ मनातून खवळलेले होते.

एकदा काही कारणाने तिघेही भाऊंच्या सोलापुरच्या जुन्या बंगल्यावर जमले होते. रात्री दहापर्यंत ड्रिंक्स घेणे चालले होते. हास्य विनोद यांना ऊत आला होता. त्यातच नानासाहेबांना शिव्या दिल्या जात होत्या. साडे दहाला सगळे भरपेट जेवून निघून गेले. सगळे साहेब लोक गेलेले पाहून मागच्या बाजूला आपल्या सासूबरोबर राहणारी कविता नावाची पस्तीशीची मोलकरीण साफ़सफ़ाई उरकायला आली. तिच्या हालचाली निरखत असताना भाऊंचे नियंत्रण सुटले. त्यांनी नशेत तिच्यावर जबरदस्ती केली. पण इतका मोठा माणूस म्हंटल्यावर ती बाई गप्प राहिली. भाऊंना पश्चात्ताप झाला होता. पण आयुष्यात पहिल्यांदाच मिळालेले सुखही बेचैन करत होते. पंधरा दिवसातच कविताने जागा सोडणार असल्याचे सांगीतले. भाऊंनी तिला खूप समजावले. तू रखेली म्हणून राहू नकोस. पण मैत्रीण म्हणून तरी राहा. मी तुझे कल्याण करेन. नाहीतरी एकटी समाजात राहताना तुला त्रास होणारच. इथे सुरक्षित तरी आहेस. कसे काय जाणे, कविताला हे विचार पटले. सासूला हे काहीच माहीत नव्हते. भाऊ अन कविता यांचे संबंध आता राजरोस सुरू झाले. तिचा नवरा अपघातात मेलेला होता. तिच्या रुपाची जादू काही भाऊंच्या मनातून जाईना. मग तिला पैसे देणे, भेटी देणे हे सगळे सुरू झाले. मात्र आता एक गोष्ट झाली. कविता घरातील काम सोडून भाऊंना खुष करण्याच्या मागे लागली. तिला काही काम सांगीतले की ती नाराज होऊ लागली. शेवटी आणखीन एक वेगळीच बाहेरची बाई कामाला ठेवण्यात आली. कविता तिच्यावर हक्क गाजवू लागली. ती बाई स्वभावाने साधीसुधी नव्हती. तिला अंदाज आला होता की मुळात कविता ही या घरात कामालाच होती. आता मालक तिला असे वागवतात म्हणून ती या थाटात वागत आहे. तिने पाहिले पाहिले अन सरळ एक दिवस कविताला भाऊंसमोरच शिव्या दिल्या. दोघींमधे जुंपली. त्या बाईने काम सोडले. मात्र वेगळाच प्रकार घडला. तिने ते बाहेर अशा माणसाला सांगीतले जो पार्टीचा होता अन नानासाहेबांच्या चॆनेलमधील कार्यकर्ता होता. त्या चॆनेलला आधीच दादासाहेबांच्या चॆनेलची भरभराट पाहवत नव्हती. त्या माणसामार्फ़त नानासाहेबांनी हे प्रकरण पूर्ण पेटवले. भाऊंची पार्टीमधे सर्वत्र नाचक्की झाली. कसेबसे पेपर आऊट होण्यापासून वाचले. नंतर दादासाहेबांनी मधे पडून ’हा विरोधकांचा भ्याड आणि हीन दर्जाचा डाव आहे’ हे सिद्ध केले. आता दादासाहेब अन नानासाहेब यांच्यात अधिकच वितुष्ट आले होते. मात्र एक झाले होते. माने आणि दादासाहेब यांच्या घरी जाऊन तोंड दाखवणे भाऊंना शक्य नव्हते. त्यातच कविताने आपल्याला गर्भ राहिला आहे ही बातमी सांगीतली. भाऊंनी तिला ’हे कुठेही बोलू नको व मी तुझे अन तुझ्या मुलाचे सगळे खर्च करेन’ असे आश्वासन दिले. आता खरे तर त्यांचे तिच्याशी संबंधही राहिले नव्हते. तिला त्यांनी विजापूरला एक जागा बघून दिली. तेथे ती त्यांच्याकडून येत असलेल्या पैशांवर आरामात जगू लागली. तिला मुलगा झाला. त्याचे नाव सदू! मात्र त्यानंतर तिने तेथे अनेक रंग उधळल्याचे भाऊंना समजले. त्यांनी तिला पैसे मिळणार नाहीत असे सांगून पाहिले. त्यावर तिने बोंबाबोंब करण्याची धमकी दिली. पुन्हा कसेबसे जुळल्यानंतर भाऊ उस्मानाबादला निघून गेले.

पार्टीसाठी विविध उद्योजकांकडून डोनेशन मिळवण्याचे काम भाऊ फ़ार उत्तम करत. एकदा ते पुण्यात बजाजशेठ यांना भेटायला गेलेले असताना भेट तर काही झाली नाही. तसेच, बजाजशेठ हे अत्यंत सभ्य गृहस्थ होते. त्यांनी ’एखादे समाजोपयोगी काम असल्यास आमचे ट्रस्ट थेट ते काम करून देऊ शकेल, आम्ही रोख रक्कम देणार नाही’ असा निरोप ठेवला होता. निराश होऊन परतत असताना चंदीगढची डीलरशिप मिळवण्याच्या उद्देशाने तिथे आलेला बग्गा त्यांना भेटला.

केवळ वर्षभरातच भाऊ स्त्रीसुखाच्या मोहाने त्या चक्रात ओढले गेले. बग्गाने सुरुवातीला त्यांना मोह पडावा म्हणून खुष केले. नंतर हळूहळू त्याने प्रस्तावाचे स्वरूप सांगीतले. नंतर थेट प्रस्ताव मांडला. यात मिळू शकणारे स्त्रीसुख भाऊ सोडू शकत नव्हते. हळूहळू त्यांनी रॆकेटमधे प्रवेश केला. मग काही कारणाने त्यांना पुन्हा सोलापुरला सेटल व्हावे लागले. उस्मानाबादपेक्षा इकडे संधी जास्त होत्या रॆकेटला. त्यातच प्रथम माधव अन नंतर नंदन भेटले. तीन, चार मुली, स्त्रिया फ़सवल्या गेल्या. आणखीन दोनच वर्षांनी दादासाहेब मूळ पक्षापासून फ़ुटले. अहिंसा क्रान्ती पक्ष स्थापन झाला. मात्र तो मूळ पक्षाच्या धोरणांशी सहमत असल्यामुळे बाहेरून पाठिंबा देणारा किंवा युती करणारा पक्ष झाला. जागावाटप झाले. पुढच्या निवडणूकीत नासाहेबांच्या नाकावर टिच्चून भाऊंनी पुन्हा आपली जादू दाखवली. अख्खे सोलापूर अन उस्मानाबाद व लातूर ढवळून काढत त्यांनी विक्रमी विजय मिळवून दिले दादासाहेबांना! माने अन बनसोडे हे जुने मित्र आता पक्षाचे आधारस्तंभ झाले. आमदारांचा हळूच राजकारणात प्रवेश झाला. यावेळेस नानासाहेबांनी घराणेशाही म्हणून बोंब मारली. पण तिचा उपयोग झाला नाही. अनेक वर्षांनी शर्मिलाचा रॆकेटमधे प्रवेश झाला. पण आत्तापर्यंत भाऊंना त्या सुखाची चटक लागलेली होती. त्यात सत्ता हाताशी होती. तिकडे कविता मेल्याची बातमी भाऊंपाशी पोचली होती.

शर्मिलाने आल्या आल्या दोन मुलींना जाळ्यात ओढले. त्या दोघींना अजूनही माहीत नव्हते की त्यांच्या सी.डी. आहेत. मग नंदनने योगिताला फ़सवले. माधवने कावेरीला! एकसे एक मॊडेल्स फ़सवल्या गेल्या. अतीसुंदर असूनही त्यांच्या सी.डी.चे पैसेच मिळाले नाहीत. त्यात घोळ झाला होता. पण शर्मिला हुषार होती. तिने मेघनाला फ़सवले. नंतर नंदनने मीनाला! मात्र, भाउंना आजवर यातली कुठलीच स्त्री उपभोगायला मिळाली नव्हती. शर्मिलाशिवाय! पण शर्मिला ही काही स्वेच्छेने उपभोगता येईल अशी स्त्री नव्हती. ती रॆकेटमधे होती. मधेच एकदा दादासाहेबांनी शर्मिलाला पाहिले. ही कोण म्हंटल्यावर भाऊ हादरले होते. काहीतरी थातुरमातुर सांगून त्यांनी वेळ नेली. शेवटी भाऊंनी मीनावर डाव साधला.

आणि... नेमका तोच अंगाशी आला होता. आज काहीही कारण नसताना दादासाहेब आयुष्यात पहिल्यांदाच इतके रुक्ष वागले होते. मानेचा तर फ़ोनच लागत नव्हता. तो पुण्यातूनच अर्ध्या वाटेतून पुन्हा आजच्याआजच सोलापूरला निघाला असेल याची भाऊंना कल्पनाच नव्हती.

भाऊंना खूप लांबून कसलातरी आवाज ऐकू येऊ लागला. अनेक लोक ओरडत असावेत असा. आवाज हळूहळू जवळ येत होता. बराच जवळ आला तरी कसला ओरडा आहे इतके समजण्याइतके आवाज स्पष्ट नव्हते. तेवढ्यात फ़ोन वाजला. मोरे बोलत होता. तो काय बोलत होता तेच भाऊंना ऐकू आले नाही. आवाज जवळजवळ आला होता. अचानक.. अचानकच खळ्ळकन आवाज झाला. भाऊ असलेल्या खोलीची एक काच फ़ुटली. एक दगड आत येऊन पडला. खालच्या मजल्यावरची पण एक काच फ़ुटल्याचा आवाज झाला. रोमू भुंकू लागला. हे आवाज आपल्यासाठी आहेत याची भयावह जाणीव भाऊंना झाली. दुखरा पाय घेऊन ते तसेच खिडकीत धावले. त्यांचा चेहरा दिसताच बाहेरच्या जवळपास शंभरच्या जमावाने अक्राळविक्राळ घोषणा दिल्या. अनेक दगड मारले. भाऊ पळून आत आले. हे काय झाले? काय झालंय काय? भाऊंनी लक्षपुर्वक घोषणा ऐकल्या.

सोलापुरातील कामविकृत नराधम भाऊ बनसोडे..... खलास करा!

गेटवर धडका बसू लागल्या. तेवढ्यात एक व्हॆन आली. आपणच संरक्षण मागायला हवे होते हे भाऊंना व्हॆनचा आवाज आल्यावर समजले. जमाव हिंस्त्र झालेला होता. हे सगळे झाले कसे? भाऊंना काहीही समजेना. अचानक नेमाडे आत आले. आजवर या माणसाला आपले ऐकायची सवय लागलेली होती. भाऊंनी बघितले. नेमाडेने शक्य तितका आदर ठेवून त्यांना ताबडतोब चलायला सांगीतले.

भाऊसाहेब बनसोडे! ज्यांची गाडी रस्त्यावरून गेली की बापडे लोक मान लववायचे! मुले उत्सुकतेने पाहायची. कार्यकर्ते ज्यांच्या नावाच्या घोषणांनी सोलापूर दुमदुमवून टाकायचे.

अत्यंत अपमानीत चेहरा करून मान छातीला टेकवून नेमाडे अन तीन पोलिसांबरोबर बंगल्याच्या बाहेर आले. जमाव अधिकच पिसाळला. आणखीन चार पोलिसांनी शर्थ करून भाऊंवरील थेट हल्ला टाळला. पण तरी एकाने मारलेला दगड त्यांच्या पोटात लागला.

चौकीवर महिलांचा मोर्चा होता. एका ठिकाणी राठी थांबलेला होता. एका ठिकाणी भेंडे थांबलेले होते. महिला घोषणा देत होत्या. त्यांनी चपलांचा हार आणला होता. महिलांनी अचानक घातलेल्या गराड्याने नेमाडेही गोंधळला. भाऊंना अचानक गराडा घालून महिलांनी वीस एक सेकंद भयंकर जीवघेणी मारहाण केली. कपडे फ़ाटलेले, नाकातून रक्त, डावे मनगट रक्ताने भरलेले! अत्यंत भीषण दिसणारे भाऊ धड चालताही येत नसल्याने जवळपास ओढूनच चौकीत आत नेले गेले. तेथे गेल्यावर नंदन अन माधव त्यांना पाहून हादरले. मात्र शर्मिला खदाखदा हसायला लागली. तिने भाऊंना सगळ्यांसमोरच शिव्या दिल्या.

तेवढ्यात योगिताच्या रुग्णालयातील नर्सेसचा एक अगदीच छोटा मोर्चा आला. पण त्यांनी येऊन चौकीबाहेरच्या भिंतीवर फ़लक लावले. सोलापुरातील वासनाकांडाचे आरोपी आत आहेत. ज्यांनी बेकायदेशीरपणे सोलापूरची अब्रू लूटली त्यांना कायद्याने शिक्षा द्यावी काय? आजूबाजूला थांबलेले इतर लोक अजूनच चवताळले. तेही मोर्चात सामील झाले. नेमाडेंवर प्रेशर आले. त्यांनी आणखी कुमक मागवली.

आजवर ज्या सोलापूरला भाऊ बनसोडे हा माणूस निवडणूकीतला चमत्कार म्हणून माहीत होता त्यांना त्याचा आज नवीन परिचय झाला.

सायंकाळचे पावणे आठ वाजले होते. नानासाहेब पाटलांचे सायंदैनिक घराघरात पोचले होते. भाऊ बनसोडे, शर्मिला, माधव, नंदन, वाघमारे, मेहता, विकी बारटक्के, मणी.. सगळे जण आत होते. सगळ्यांची नावे छापून आली होती. आणि मुख्य म्हणजे... हरजिंदरसिंग बग्गा! हेही नाव त्यात होते. अख्खे सोलापूर हादरले होते. ज्या मुलींना किंवा स्त्रियांना हेच माहीत नव्हते की आपली सी.डी. बनवली गेली त्या हादरून पेपर वाचत होत्या. प्रचंड जनप्रक्षोभ उसळला होता. चौकी सोडून इतरही काही रस्त्यांवर उत्स्फ़ुर्त मोर्चे निघाले होते.

नेमाडेंवरचे प्रेशर वाढतच होते. लोक तावातावाने चौकीत जाऊन भांडत होते. वाघाच्या पिंजयात चुकून पोचलेल्या हरणाप्रमाणे सर्व आरोपी लोकांकडे पाहात होते. चौकीतील जागा इतक्या आरोपींना ठेवायलाच अपुरी पडत होती. त्यातच काही माणसांनी जबरदस्तीने चौकीत प्रवेश करून अर्धे गज असलेल्या खोलीवर लाथा अन काठ्या मारायला सुरुवात केली. अक्षरश: सगळे आरोपी भेसूर रडू लागले. माणसे आत पोचली तर आपले काय होईल ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती.

कुणीतरी चालूबाजी केली. बाहेर जाऊन सुपरिटेंडंटच्या नावाने चौकीवर फ़ोन केला की आरोपींना घेऊन हेडक्वार्टरला या. हा फ़ोन खरा आहे की नाही हे तपासणेही नेमाडेंना आवश्यक वाटले नाही. कारण इतका अभुतपुर्व गोंधळ चालला होता की त्यांना काहीही सुचत नव्हते. त्यातच चौकीवर मोठमोठ्या लोकांचे फ़ोन येऊ लागले. कमिशनरसाहेबांनी दोन मोठे अधिकारी अन तीस कुमक ताबडतोब रवाना केली होती. ऐकायचे कुणाचे हे नेमाडेंना समजेना. मात्र काही मिनिटे त्यांनी आरोपी बाहेर काढले नाहीत. पण तो फ़ोन करणारा माणूस परत आला अन त्याने बोंब मारली. आरोपींना हेड्क्वार्टर्सला घेऊन जायची इन्स्ट्रक्शन आली आहे. हे अजून का नेत नाहीयेत? एक प्रचंड दंगा झाला. नेमाडेंनी अजूनही तो डिसीजन घेतला नव्हता, शेवटी मात्र लोकांनी चौकीतच मोडतोड सुरू केली. आठ पोलिसांनी आवरण्यासारखा जमाव अजिबात नव्हता. केवळ तीनच मिनिटात नेमाडेंनी बाहेर दोन व्हॆन्स बोलावल्या अन आरोपींना व्हॆनमधे घालून न्यायचा निर्णय घेतला.

तीन मिनिटे! केवळ तीन मिनिटे! तीन मिनिटांनंतर तीस पोलिसांची कुमक आली होती. दोन खूपच वरिष्ठ अधिकारी चौकीवर पोचले होते. मात्र त्या तीन मिनिटात बरेच काही संपले होते.

शर्मिलाला समजलं , आपल्याला बाहेर काढण्यात येतंय! रडायची सुद्धा एनर्जी राहिली नव्हती. ती फक्त आता काय होणार याच्याकडे बघत होती. पोलिसांचा विरोध न जुमानता काही बायकांनी तिला धरले. शर्मिलाला समजले. आपल्या पाठीत काहीतरी जोरात आपटलं! त्यानंतर डोक्यात घण्ण! भयानक प्रहार! शुद्ध गेली असती. पण तितक्यात कुणीतरी मुठीने प्रहार केला आणि तो नेमका डाव्या डोळ्यावर बसला. त्या डोळ्यातील असह्य वेदना मेंदूत पोचल्यावर शर्मिला खाली कोसळली. उजव्या डोळ्याने काहीतरी दिसत असतानाच पोटात कुणीतरी लाथ मारली असावी. आणखीन काय झाले हे मात्र तिला समजले नव्हते. शुद्ध गेली.

जमावाची धावाधाव होईपर्यंत जमावाने चौकीच्या अंगणात आणून केलेल्या अमानवी धुलाईमधे शर्मिला, नंदन अन मणी मृत्यूमुखी पडले होते. त्यांना लोखंडी गजांनी मारहाण झाली होती. ते तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

शर्मिला! एक सुंदर स्त्री, जी लोकांचे आयुष्य बरबाद करून स्वतः गब्बर होत होती, जिला अनेक स्त्री-पुरुषांचे आयुष्य नरकाप्रमाणे केल्यानंतर अचानक चांगले वागण्याची उपरती झाली होती, जिचे नाव निघाले तरी संबंधीत फसवले गेलेले कडाकडा बोटे मोडत होते....

आज संपली होती. जमावाच्या भयानक प्रक्षोभात तीव्र मारहाणीमुळे जागच्याजागी खलास झालेली होती. तिच्याच बरोबर योगिताचे आयुष्य बरबाद करणारा अन मीनाचा सर्वात सुरुवातीचा गुन्हेगार, नंदन, गुप्तभागी असह्य प्रहार झाल्याने नुसत्या वेदनांनीच मेला होता. मणीचे डोके फुटले होते.

आणि इतर? इतर सर्व गंभीर जखमी होते. हे कधीही होत नाही. पोलीस पूर्ण संरक्षणाशिवाय असा निर्णय घेत नाहीत. परंतू अतीदबावामुळे नेमाडे स्वत:च हादरले होते. त्यांना त्यांच्याच जीवाची भीती वाटू लागली होती. काठ्या मारून लोक पळत नव्हते. उलट पोलिसांवरच संतापत होते. अश्रूधूर वगैरे प्रकार या चौकीवर तेव्हा नव्हतेच! नेमाडेंनी त्यांच्यामते योग्य निर्णय घेतला होता. मात्र, दोनच तासांनी आपल्याला भयानक चौकशीला सामोरे जावे लागेल याची त्यांना कल्पना होती. पण तोपर्यंत यातले किती जगणार होते कुणास ठाऊक!

माधवची दोन तर भाऊंची तीन हाडे मोडलेली होती. दोघांच्याही कवट्या तडकल्या होत्या. फ़ासळ्यांवर मार बसला होता. वाघमारे आक्रोश करत होता. विकी अन मेहता शरीरभर जखमा घेऊन बेशुद्ध पडले होते.

आणि याची खबर आमदारांना केव्हा लागावी? सात वाजता ते परिषदेसाठी तयार होऊ लागले. मोरे न बोलता काम करत होता. साहेब खाली गेले की तो रूममधून फ़ोन करणार होता भाऊंना!

खाली हळूहळू कार्यकर्ते अन पत्रकार जमू लागले आहेत म्हंटल्यावर आमदारांमधला आमदार जागा झाला. त्यांनी भाषण मनातल्या मनातच घोळवले. मानेकाका अजून आलेले नाहीत हे ऐकून त्यांना बरे वाटले.

बरोब्बर सात पस्तीसला आमदार खाली जायला तयार झाले तर मोरेने अचानक त्यांना वेगळीच अन भलतीच बातमी दिली. सगळे पत्रकार निघून चालले आहेत. का? निघून का चालले आहेत? माहीत नाही म्हणे! आमदार चक्रावलेच! त्यांनी कार्यालयात फ़ोन लावायला सांगीतला. कुणीच उचलला नाही. असं सोलापुरात काय झालं की चांगले जमलेले पत्रकार जायला निघाले? मोरेला पिटाळला. दहाच मिनिटात दुसरी बातमी घेऊन मोरे वर आला. सगळ संपलं होतं! जे होऊ द्यायचं नाही असे बाबा म्हणाले होते तेच झालं होतं! सोलापूर वासनाकांड पेपर आऊट झालं होतं! कस? कुणी केलं? का केलं? मीना?? शक्यच नाही? ती तर दुपारपासून इथेच आहे? सायंदैनिक तर आपण सहा वाजताच वाचलं! त्यात तर काहीच नव्हतं! मग हे कुठलं आणखीन दैनिक आलं? याचे अर्थ दोनच! मीना तरी खोटं बोलतीय... किंवा... हे सगळं आणखीन कुणालातरी माहीत होतं हेच मीनाला माहीत नाहीये...

धसका! धसका खाऊन आमदार खाली बसले होते. आमदारकी जाते की काय? बाबा काहीही करतील. भाऊकाकांनाही घालवतील अन आपल्यालाही! काही सांगता येत नाही. काहीही असलं तरी त्यांना कळवणं तर भाग होतंच! त्यांनी फ़ोन लावला.

बंडा - बाबा..
दादा - घालवलंस ना सगळं? तुझा उपयोग काय पक्षाला?

आमदार बसल्या जागीच थिजले होते. बाबांना हे समजलं कसं? कधी? आपल्याआधी? कसं? म्हणजे आपल्यापेक्षाही त्यांना जवळचे असलेले लोक??? आपण सोलापुरात असताना आपल्याला आत्ता समजतं अन त्यांना ते आधीच समजतं?

दादा - रिझाईन कर! केबलवर मुलाखत दे! सी.एम ना कळलंय सगळं! नानाने पत्रकार परिषद बोलवलीय जुहूला! मी पण बोलवतोय! आणि उद्या सकाळी सोलापूरला मी पोचतोय!

काय माणसं आहेत का काय? सी.एम.?? त्यांना कसं कळलं? अजून आपण आपल्या रूममधून बाहेर गेलो नाही आहोत. अन मुख्यमंत्र्यांना कळलं? बोंबललं सगळं! नानासाहेब? त्यांनी कशाला पत्रकार परिषद बोलवलीय? बाबा पण बोलवतायत? कुठल्याकुठे प्रकरण पोचलंय! आपण तर गेलोच!

पाच मिनिटे! पाच मिनिटात आमदारांनी स्वत:ला अती शांत केलं! आणि त्यानंतर मात्र त्यांच थैमान सुरू झालं! ते रेव्हन्समधून वादळी वेगाने चौकीवर पोचले. तिथून कार्यालयात. तिथून चौकाचौकात उभे राहून पक्षाच्या धोरणांबाबत बोलायला लागले. मी स्वत: नैतिक जबाबदारी उचलून राजीनामा देतो आहे असे सांगू लागले. या काळात त्यांच्यासमोर जो कार्यकर्ता येईल त्याची ते कातडी सोलत होते. काका म्हस्केही सुटले नव्हते. कमिशनर आमदारांचा वादळी वेग अन त्याला बसलेल्या शिव्या ऐकून हादरला होता. आमदार अक्षरश: सोलापूर ढवळत होते. त्यातच त्यांनी पत्रकार परिषद पुन्हा बोलवली. रात्री दहा वाजता. कार्यकर्ते चळचळा कापू लागले होते. उस्मानाबादहून काही जुने नेते आले. मानेकाका पोचले. मानेकाकांनी आमदारांना या स्वरुपात पाहिलेच नव्हते. हा तर दादासाहेबांपेक्षा भयानक माणूस आहे असे त्यांचे मत पडले.

केवळ दोन तास! दोन तासात मुबईत दोन पत्रकार परिषदा झाल्या. नानासाहेब पाटलांनी अहिंसा क्रान्तीवर जहाल टीका केली. हा पक्षच बरखास्त करावा अशी त्यांनी मागणी केली.

दादासाहेबांनी आपल्या परिषदेत ते स्वत: सोलापूरला जात असून सर्व आरोपींना शक्य तितकी कठोर शिक्षा देणार आहे असे म्हणाले.

आणि आमदारांनी एक रस्ताही सोडला नव्हता. केवळ दोन तासात त्यांनी जो पराक्रम सोलापुरात केला त्यामुळे अचानक सोलापुरातील जनमानसावर एक वेगळाच प्रभाव पडला होता.

भाऊ, माधव अन नंदन नालायक होते असा तो प्रभाव! पक्ष मात्र खरा चांगलाच आहे असे लोकांचे मत पडले होते.

आणि जवळपासच्या गावांमधलेही धरून यच्चयावत कार्यकर्ते अन पत्रकार रेव्हन्ससमोर जमले होते. रेव्हन्समधे इतकी मोठी कॊन्फ़रन्स रूमच नव्हती. फ़ार तर दिडशे जणांची होती. परिषदेचे स्थानच बदलले. एका मैदानावर हलवण्यात आले. परिषदेचे रुपांतर सभेतच झाले. आणि बरोब्बर साडे दहा वाजता जेव्हा लोक, कार्यकर्ते आणि पत्रकार घरी जात होते तेव्हा बहुतेकांच्या तोंडात एकच वाक्य होते...

सच्चा नेता असावा तर असा... आमदार बंडाभाऊंसारखा... स्वत: राजीनामा दिला.. बाप अध्यक्ष असूनही....

हे वाक्य बहुतेकांच्या तोंडावर होते असे म्हणण्याचे कारण म्हणजे एका व्यक्तीच्या तोंडावर अजिबात नव्हते. एकाच! त्या व्यक्तीच्या तोंडावर होते एक भेसूर हास्य! त्या व्यक्तीची आठवणही आमदारांना अडीच तासांत आली नव्हती...

मीना कातगडे....... जिला रेव्हन्समधून आमदार बाहेर पडल्यामुळे त्यांचीच सी.डी. त्यांना दाखवता आली नव्हती...

मीना कातगडे......... सोलापूर सेक्स स्कॆंडल जमीनदोस्त करणार होती... अतर्क्य पद्धतीने... आणि तेही... उद्याच!

गुलमोहर: 

बाप रे!!!! काय वेग घेतला कथेने ह्या भागात!!! जबरदस्त!!!! येऊदे शेवटचाही भाग आता!!

जबरदस्त..पुढील भागाची प्रतिक्षा पाहावी कि तो भाग शेवट असनार ह्याचे दुख करावे,,कळत नाही..
तुम्ही कथा लिहित रहावे हिच इच्छा..