बायको म्हणजे

Submitted by तुष्कीनागपुरी on 14 April, 2010 - 12:59

बायको म्हणजे
एक सावली
उन्हाला शांत करणारी
बायको असते
पावलोपावली
घराला घरपण देणारी

बायको म्हणजे
निश्चिंतता
घर सुरळीत चालेल याची
बायको म्हणजे
नेमकी जाणीव
गृहस्थाला कर्तव्याची

बायको म्हणजे
ओले केस
न्हाल्यानंतर भुलवणारे
बायको म्हणजे
सुगंधाचेच
कारण जीवनात दरवळणारे

बायको म्हणजे
गोड कारण
घरी लवकर जाण्यासाठी
बायको म्हणजे
प्रेमळ घास
हसत हसत खाण्यासाठी

बायको म्हणजे
प्रेमळ काळजी
हवीहवीशी वाटणारी
बायको म्हणजे
अधिर ओढ
अस्तित्वाला व्यापणारी

बायको म्हणजे
सावध विवेक
सगळीकडे जाणवणारा
बायको म्हणजे
नेमका आवेग
सुरळीत गाडा चालवणारा

बायको म्हणजे
संपूर्णता
गृहस्थाच्या जगण्याची
बायको म्हणजे
समर्थता
माणसाला यश पचवण्याची

तुषार जोशी, नागपूर

गुलमोहर: 

माझ्या या कवितेला मिळालेला प्रतिसाद पाहता हा विषय फार जवळचा होता हे कळ्ते. कवतुक केल्याबद्दल धन्यवाद मंडळी.

<< हा विषय फार जवळचा होता हे कळ्ते. >>

अहो साहेब, हा विषय जवळचाच नव्हता तर अनोखाही होता बरका.
प्रेयसीची बायको झाली की तिचं कौतुकच संपतं.
"बायको" ची उपेक्षाच झाली हो साहीत्यात. Happy

छान Happy

Pages