व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क. २

Submitted by संयोजक on 5 September, 2008 - 02:20

१) चारोळीचा विषय व्यंगचित्राला धरुन असावा
२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी
३) एका आयडी ला कितीही चारोळ्या लिहता येतील फक्त त्या वेगवेगळ्या पोस्ट मध्ये पोस्ट कराव्यात
४) विजेत्याची घोषणा जनमत पद्धतीने (पोलिंग) होइल!

************************************************************

आजचे चित्र :
Vyangchitr_2.jpg

लोकाग्रहास्तव सर्व स्पर्धांची अंतिम तारीख रविवार (१४ सप्टेंबर) ऐवजी सोमवार (१५ सप्टेंबर) केली आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समदु:खी

कोसळले दु:खाचे आभाळ तुझ्यावर...
बुडालो दु:खाच्या सागरात मी,
शेवटची इच्छा माझी ऐकशील?
तळाशी जाशील तेव्हा माझ्या सखीचे अश्रू पुसशील?

इथे फुग्यांना मरण जन्मता
दगडांना पण चिरंजिवीता !
बुडुनीया वा उडून जाऊ,
पण नको जन्म हा आता !

कुणी मरत बुडुन
कुणी मरत उडुन
जिवनाचा हा खेळ माणसा
शिक मरत्या कडुन

छान आहे.

आत्महत्येच्या मार्गास
दिशेचे नाही बन्धन
बस्स, निमित्त हवे थाम्बवण्यास
हृदयाचे स्पन्दन

...;
आपला, लिम्बुटिम्बु

जन्म आपला वेगळा
तरी मरणयातना एकच
सुखं आपली वेगळी
पण दु:खाची कळ एकच..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नको दंड नको शिक्षा , शांत मंगलमय गणेशोत्सव हीच अपेक्षा!
Happy

मृत्युस कवटाळण्या
सिद्ध जीव दोन
अन्तिम ध्यास एकच परी
मार्ग ते भिन्न
...;
आपला, लिम्बुटिम्बु

लिंबूदा Sad
आशू, छान गं...

हाय टॉमी, बाय टॉमी
पुरेशी खोल, आहे रे खाडी | Happy
घाबरुन कस चालेल रे भो
आता मार की बुडी || Proud

(आयटे, अग आता विषयच असला, तर चारोळ्या कसल्या??)
...;
आपला, लिम्बुटिम्बु

चल, प्रार्थना करू
त्या दयाघनापाशी
दगडाला लाभो हलकेपणा
अन् फुग्याला वजनाच्या राशी

-अश्विनी

अश्विनी.... याला म्हणतात आशावाद.... good positive thinking Happy

अश्विनी, गुड वन! Happy
फक्त पहिली ओळ अशी हवी अस वाटते
चला, करूयात प्रार्थना
म्हणजे, ते आवाहन त्या दोघान्पैकी एकमेकास नसुन वाचकास केल्यासारखे होईल! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

शेवटी एकदा वाटून गेलं,
जगनं हे जगणं नव्हतंच..
निकराने जगण्याच्या लायकीचं
हे आयूष्य नव्हतंच!!

च् च्.. जास्तच गंभीर झालो राव आपण सगळे.
थोडे हलके व्हा पाहू..
--
मृत्यू समोर आल्यावर त्याच्या
गळ्यातच हात टाकला..
म्हटलं, बरं झालं, आजपर्यंत
कूणी भेटलाच नव्हता आपला!

....दगडाला लाभो हलकेपणा
अन् फुग्याला वजनाच्या राशी

Happy अतिशय सुन्दर...... Happy

LT.. पहिली मस्त आहे..
अश्विनी.. मस्त !!

बापाण्ची क्रुपा झाली
जन्म झाला naturally,
माणसाची क्रुपा झाली
मरन मात्र technically!!!

टेकनिकल मरण.... Happy

काहीच्या काही उखाणा Lol

गेले थकवायचे राहुनी
कितीतरी बँकाचे हफ्ते|
माझ्यापास डेबिट कार्डे
पण अकाउंट मध्ये नाही पैसे||

बुडालो होतो आकंठ मी
माझ्या प्रियेच्या प्रेमामध्ये|
एके दिवशी आला शार्क
आता उरलो नावापुरते||

भलामोठा दगड, बांधुन पायाला
आलो आज सागरात, जीव द्यायाला|
वाटले, होइल हलके ओझे जड दगडाने
पण दिसला एक मासा, जीव देता हलक्या फुग्याने||

काय म्हणता मिष्टर
मन अगदी झालय जड?
भार हलका करण्याची
भलती एकेकाची खोड!

प्रवेशिका - १
नभाची मर्यादा शोधायला
जाणार्‍या मित्रा एक सांग
अफाट भव्य या सागराचा
तरी लागतो का रे कुठे थांग ?

    ***
    If dreams are like movies, then memories are films about ghosts...

    प्रवेशिका - २
    मी : निळ्या सागराच्या तळाशी
    खरंच रत्ने असतात का रे ?
    तो : मीही शोधत आहे मित्रा
    या निळ्या नभीचे तारे

      ***
      If dreams are like movies, then memories are films about ghosts...

      प्रवेशिका - ३
      पुसशी मला, निळ्या तळाशी
      खरंच रत्ने असतात का रे ?
      सांग आधी, निळ्या छतावर
      कसे जडवलेत हे तारे ?

        ***
        If dreams are like movies, then memories are films about ghosts...

        माझा फुगा तुला घे
        तुझा दगड मला दे !
        स्वप्नं माझी तुला घे
        दु:ख तुझी मला दे !!

        स्लार्टी... प्रवेशिका २ मस्त आवडली... Happy

        स्लार्टी,
        प्रवेशिका २ उत्तम आहे....आवडली....

        स्लार्टी... प्रवेशिका २ मस्त

        हवेतले नी पाण्यातले
        दोघेही खिन्न
        एकाच ठिकाणी जायला
        मार्ग मात्र भिन्न

        साध्य आहे मरण आणि
        साधन फुगा व दगड
        कारण, ऐनवेळी घात करेल
        जगण्याची तडफड

        वर खालीचा अर्थ निखळला,
        बुडुनि मरा वा उडुनि मरा |
        पल्याड भेटू उद्या गड्या रे ,
        धरू धारेवर चक्रधरा ||

        Pages