Submitted by कौतुक शिरोडकर on 17 February, 2010 - 08:28
(जयवी, तळीरामांना कैफीयत मांडण्याची संधी दिल्याबद्दल आभार. चुकलं माकलं असल्यास क्षमा असावी.)
झुलणे नव्याने नको आणखी
झिंगून पडणे नको आणखी
घायाळ व्हावे पुन्हा मीच का
भाळी लाटणे नको आणखी
वासात भारी काजू फेणी
रम, बियर, व्हिस्की नको आणखी
'घेरे' जरा... पेग भरावा का ?
मध्येच उठणे नको आणखी
नजरेत जबरी 'चडेली' नशा
कॉकटेल वरी नको आणखी
भाषा मराठी कळतेच मला
आंग्ल बरळणे नको आणखी
चखणाच आहे चना दाल ही
आचार लिंबू नको आणखी
संपेल सारी अता बाटली
'टाकी फुल बघा'.. नको आणखी
गुलमोहर:
शेअर करा
तू काय कुठल्या गझलेला सुट्टी
तू काय कुठल्या गझलेला सुट्टी देत नाही !
भारीच आहे...आणि काय ?
तळीरामगिरीवर टी.पी. लिखाण
तळीरामगिरीवर टी.पी. लिखाण आहे, बघा वाचुन वेळ असेल तर..
http://maayboli.com/node/13711
(No subject)
का रे कौतुक येवढ्यातच बास
का रे कौतुक येवढ्यातच बास केलस की काय
(No subject)
(No subject)
अशक्य आहेस अगदी!
(No subject)
हे हे हे...सही !!
हे हे हे...सही !!
कौत्या... हे आणखी कधी सुरू
कौत्या... हे आणखी कधी सुरू केलंस बाबा
विडंबनकार सुटला आहात अगदी..
विडंबनकार सुटला आहात अगदी..
(No subject)
नको थांबवू, नसे शांभवी
नको थांबवू, नसे शांभवी ही
विडंबने अम्हाला हवी आणखी
एकदम डिंगडाँग..... गोयच्या
एकदम डिंगडाँग.....
गोयच्या फेणिसारखीच कडक कविता!
भाळी लाटणे नको आणखी >> सुटला
भाळी लाटणे नको आणखी >>
सुटला आहेस मित्रा एकदम,
येऊदे तुझी विडंबने आणखी.
मस्तय की.. पण ते शीर्षकाला
मस्तय की.. पण ते शीर्षकाला कंस काहून?
घ्या रे कवींनो कोपच्यात
घ्या रे कवींनो कोपच्यात कौतुकाला
नको साहणे विडंबने आणखी
कौतुका, लाइट घे, हेवी नको.
हसुन लागली पुरती वाट आता पुरे
हसुन लागली पुरती वाट
आता पुरे नको आणखी.......