सोलापूर सेक्स स्कँडल - क्रमशः - भाग २

Submitted by बेफ़िकीर on 27 March, 2010 - 06:53

मीना - अं... मी मीना कातगडे..
अधिकारी - बोला?
मीना - मी काल ते लेटर नेले ना? ते चुकून फ़ाटले माझ्याहातून...
अधिकारी - कसले लेटर?
मीना - अपॊइंटमेंटचे... नर्स म्हणून...
अधिकारी - तुम्ही नेलेत?
मीना - म्हणजे... ते नंदन म्हणून आहेत ना त्यांनी नेले होते...
अधिकारी - नंदन? आम्ही कुठलेच लेटर दिले नाही...
मीना - सर माझ्या हातात होते काल लेटर... ते फ़ाटले चुकून.. म्हणून कॊपी घ्यायला आलीय..
अधिकारी - अहो सिस्टर... दोन महिन्यांपासून नियुक्त्याच बंद आहेत... लेटर कसे मिळेल?
मीना - अहो माझा इंटरव्हिव्ह झाला परवा इथे..
अधिकारी - कुणी घेतला?
मीना - त्यांचे नाव नाही माहीत.. पण या शेजारच्या केबिनमधे बसले होते ते...
अधिकारी - तिथे मीच बसतो.
मीना - तुम्ही?
अधिकारी - हो... का? कोण बसले होते तिथे?
मीना - ......
अधिकारी - इंटरव्हिव्ह घेतला तुमचा?
मीना - होय...
अधिकारी - नाही.. काहीतरी घोळ आहे... तुम्हाला लेटर दिले?
मीना - हो... सव्वीसशे रुपये स्टार्ट होता... उद्यापासून जॊईन व्हायचे होते...
अधिकारी - नर्सला इतका स्टार्ट कधीच देत नाहीत इथे... तुम्ही भामटेपणा करणार असाल तर कारवाई करू आम्ही...
मीना - (तिच्या डोळ्यात पाणी आले.) नाही हो... खरच सांगतीय... बघा ना कॊपी असेल लेटरची

अधिकायाने पाच दहा मिनिटे संबंधीत फ़ाईल्स तपासल्या. अर्थातच लेटरची कॊपी नव्हतीच!

अधिकारी - सॊरी... असे काहीही लेटर आमच्या हॊस्पीटलकडून दिले गेलेले नाही...

मीनाच्या डोळ्यातून आसवे आली.

मीना - सॊरी... नंदनने नेहमीप्रमाणे थट्टा केली असणार माझी.. मी खरच समजून बसले...
अधिकारी - असली कसली थट्टा? मित्र आहेत ना तुमचे ते?
मीना - असुदेत... सर आपलं आडनाव कळेल का?
अधिकारी - मी राठी... ऎडमिन मॆनेजर
मीना - सॊरी सर... तुम्हाला उगीच त्रास दिला...
राठी -इट्स ओके.. पण मला या प्रकरणात लक्ष घालायलाच पाहिजे... कसा होता तो माणूस सांगा बरे?
मीना - सर... जाउदेत ते आता
राठी - हे पहा.. मी कंप्लेंट करू शकतो... ही फ़ोर्जरीची केस होऊ शकते.
मीना - सर... नंदननी उगाच चेष्टा केलेली असावी...
राठी - प्रश्न त्यांचा नाहीये ... लेटर कसे मिळाले तुम्हाला इथून... की नव्हतेच मिळाले?
मीना - नाही नाही.. मिळालेले होते... पण सर... तुम्ही संध्याकाळी फ़्री असाल तर मी ... काही गोष्टी बोलायच्या होत्या

राठी विचारात पडला. तो सोलापुरचा नव्हता. त्याला इथे जॊईन होऊन दोन महिनेच झाले होते. त्यात परवा नेमकी त्याची आई आजारी असल्याचे कळल्याने त्याला मुंबईला जाऊन यावे लागले. तेवढ्यात हा प्रकार घडला असावा असे त्याच्या मनात आले. हे प्रकरण दिसते तितके साधे वाटत नव्हते त्याला. एखादी मुलगी फ़क्त लेटर घ्यायला आली असती तर तिची कुणीतरी चेष्टा केलेली आहे असे मानायला वाव होता. मात्र ही मुलगी तर लेटर चक्क मिळाल्याचे सांगत होती. वर परत ते चुकून फ़ाटले म्हणत होती. जी मुलगी लेटरची कॊपी नाही म्हंटल्यावर भर हॊस्पीटलमधे रडते तिच्या हातून इतक्या महत्वाचे लेटर फ़ाटेल कसे? सकृतदर्शनी मुलगी भामटी वाटत नव्हती. बर! दिसते तशी नसून चांगली मुरलेली भामटी आहे असे मानले तर तसेही, समजा लेटर दिलेलेच नसले तर कुणीतरी येऊन उगीचच कॊपी आहे का असे विचारून काहीच साध्य करू शकणार नव्हते. नोकरी तर मिळणारच नव्हती. मग ही असे का म्हणते? हिला आपल्या अपरोक्षा लेटर कसे मिळेल? कसलीच कॊपी कशी नाही? ही वेडी वगैरे तर नाही?

राठी - तुम्ही आणखीन कुणाला भेटलात त्या दिवशी?
मीना - कुणालाच नाही.. ते सर होते... नंदन होते .. आणि
राठी - आणि कोण?
मीना - एक शिपाई होते...
राठी - जरा समोरच्या खुर्चीवर बसा...मी चहा मागवतो..
मीना - नको सर...
राठी - ऐका... ज्या माणसाकडे चहा मागवणार आहे तोच माणूस त्या दिवशी होता का ते सांगा...

मीनाने मान डोलावली. ती समोर बसली. राठींनी बेल दाबल्यावर काही सेकंदानी खाकी ड्रेस घातलेला एक माणूस डोकावला. मीना सतर्क झाली. तिने त्याचा चेहरा पाहिला. त्यानेही तिला क्षणभर पाहिले. राठींनी ’दोन चहा’ असे सांगताच तो माणूस निघून गेला. तो गेल्या गेल्या मीना म्हंटली:

मीना - हेच होते त्या दिवशी...
राठी - हाच? मग आता एक काम करा. तो चहा घेऊन येईल तेव्हा मी फ़ोनवर बोलल्यासारखे करेन. तुम्ही त्याला ओळख दाखवून ’कसे काय’ असे विचारा... जर तो ओळख दाखवत नसला तर पुन्हा विचारा व सांगा की ’त्या दिवशी नव्हते का मी इथे आले तेव्हाच नाही का तुम्हाला बघितले’. मी नुसते फ़ोनवर ’हं, हं’ असे करत असेन. मधेच एखादे वाक्य बोलल्यासारखे करेन. मात्र त्या माणसाची प्रतिक्रिया मला समजून घ्यायची आहे. तेव्हा त्याच्याशी इतके तरी बोलाच.

मीनाला आता हा वेगळाच प्रश्न सुरू झाला असल्यासारखे वाटले. आपले लेटर खरे होते की खोटे व अजूनही नोकरी मिळण्याची शक्यता आहे की नाही याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी खरे तर ती इथे आली होती. एखादी संस्था लेटर देते तेव्हा संस्था जबाबदार असते, संस्थेतील एखादी व्यक्ती नसते हे तिला माहीत होते. भाऊंनी लेटर फ़ाडले असले तरी संस्थेला त्या लेटरची काळजी असणे शक्य होते. अर्थात, जर सगळेच सामील असतील तर लेटर मिळणार नाहीच हे ती जाणून होती. पण निदान ते सत्य तरी समजावे या इच्छेने ती आली होती. पण इथे आली तर राठी हा माणूस तिला बयापैकी प्रिन्सिपल्सचा असावा अशी शक्यता वाटली. म्हणूनच त्याची मदत मिळेल या उद्देशाने ती त्याला संध्याकाळी भेटू का असे विचारत होती. पण आता प्रश्न आला तो समोरासमोर सोक्षमोक्ष लावण्याचा! राठी हा माणूस चांगला आहे असे गृहीत धरून आता वागावे लागणार होते. जर तोही त्यातलाच असला तर मात्र तो भाऊंना ’मीनाने शिपायाला ओळखले’ असे सांगून आपल्याला गप्प करण्यासाठी काहीतरी योजना व्हावी या दिशेने प्रयत्न करू लागला असता. पण याक्षणी त्याच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय तिच्याकडे पर्यायच नव्हता. अचानक ती उठून गेली असती तर राठीला कदाचित तिचाच संशय आला असता अन तो चांगला असता तर काहीतरी वेगळेच उपटले असते. मीनाने क्षणभरच विचार करून होकारार्थी मान डोलावली.

जवळपास बारा मिनिटे दोघे नुसते बसून होते. बाहेर पायांचा आवाज आला की राठी फ़ोन उचलून बोलायला सुरुवात करायचा अन मीना खाली मान घालू बसून राहायची. पण दोन वेळा असे झाले मात्र केबिनमधे कुणीच आले नाही. ते दुसरेच कुणीतरी होते. तिसया वेळेला मात्र तो शिपाई आत आला.

राठी फ़ोन धरून बोलल्यासारखे करू लागला. मीनाने खाडकन वर पाहिले व ती ’अरे?’ असे म्हणून स्मितहास्य करू लागली. त्या माणसाने शांतपणे तिच्याकडे पाहिले व चहाचे कप ठेवू लागला.

मीना - काय म्हणताय?

यावर शिपाई काहीच बोलला नाही. त्याने दुर्लक्ष असल्यासारखे दाखवले. मीना पुन्हा हसत म्हणाली:

मीना - कसे काय आहात?

मात्र एवढ्यात चहाचे कप ठेवून झालेले होते. शिपाई काही समजायच्या आतच दार ढकलून बाहेर गेला.

तो गेल्यावर काही क्षण अजून राठीने फ़ोनवर बोलल्यासारखे करून ’ओके, मग भेटू’ असे म्हणून फ़ोन जोरात ठेवला.

राठी - तो काही बोललाच नाही.
मीना - पण हेच होते त्या दिवशी
राठी - मला एक सांगा, पत्रावर सही कुणाची होती?
मीना - नाव नव्हते.... ऒथोराइझ्ड सिग्नेटरी असे लिहिले होते.
राठी - लेटरहेड.. हे असे होते?
मीना - असे? छे! तुमचे लेटरहेड असे आहे?
राठी - होय
मीना - नाही... त्याच्यावर लाल पक्षी होता अन काहीतरी संस्कृतमधे घोषवाक्य लिहिले होते. रुग्णसेवेबाबत असे काहीतरी...
राठी - संस्कृत? मला एक सांगा... तुम्ही अगदी खरे बोलताय?
मीना - म्हणजे काय सर?
राठी - एक काम करा.. यापुढे माझ्याशिवाय कुणाशीही हे बोलू नका.
मीना - अं?
राठी - अगदी डीनशी सुद्धा...
मीना - का?
राठी - प्रकरण तुमच्या एकटीने उलगडणारे नाही.. काहीतरी मोठा बनाव दिसतो.. किती घेतले पत्र देण्याचे?
मीना - कुणी?
राठी - तो नंदन का कोण तो?
मीना - त्यांनी काहीच नाही घेतले... ते माझे मित्र आहेत.
राठी - काय करतात ते?
मीना - समाजकार्य करतात...
राठी - समाजकार्य करतात? कधीपासून ओळखता तुम्ही त्यांना?
मीना - झाले चार सहा महिने ( मीनाने खोटे सांगीतले).

आता हा राठी त्या नंदनला पकडायचे प्रयत्न करतो की काय असे तिला वाटू लागले. तिला स्कॆन्डल बरबाद करायचे होतेच. पण स्वत:च्या अब्रूचे धिंडवडे निघू द्यायचे नव्हते. ती तिच्या मार्गाने जाणार होती. आता यात राठी पडला तर काय होणार याचा तिला अंदाज येत नव्हता.

राठी - नंदनने तुम्हाला पत्र कसे काय दिले पण? त्याला सांगीतलेत का पत्र फ़ाटले म्हणून...

या प्रश्नावर मीनाचा चेहरा गंभीर झाला. शेवटी तिचेही वय काही फ़ार नव्हते. एका अत्यंत निर्घृण कृत्याला सामोरे जाऊन तिला चोवीस तासही झाले नव्हते. त्या धक्क्यातून बाहेर पडून निदान नोकरीची आशा आहे का हे पाहण्यासाठी व नसलीच तर प्रकरणाचा काही सुगावा लागतो का हे पाहण्यासाठी ती इथे आलेली होती. म्हणजे संस्था तरी खरी आहे की संस्थाही सामील आहे इतकेच तिला तपासायचे होते. पण आता राठीसमोरून उहून गेले तर तोच तिच्या मागे हात धुवून लागण्याची शक्यता दिसू लागली होती. मीनाच्या डोळ्यात पाणी तरळले.

मीना - सर.. मला फ़सवलंय हो... मला काही विचारू नका प्लीज.

मीना तोंड झाकून रडायला लागली. राठीला हे प्रकरण काही निस्तरता येईना. एक मुलगी येते. केबिनमधे बसून ओक्साबोक्शी रडते, कुणी पाहिले तर आपलीच खैरे नाही असे त्याला वाटले. त्याने तिच्यापुढे पाण्याचा ग्लास ठेवला.

राठी - रडू नका. प्लीज... हे ऒफ़ीस आहे. मी आपल्या भावना समजू शकतो.. पण इथे रडू नका प्लीज...

काही क्षणांनी मीना सावरली.

मीना - सॊरी... मी आपल्याला संध्याकाळी भेटू शकते का?
राठी - नको... माझे घर हॊस्पीटलच्याच आवारात आहे. इतह्ल्याच कॊलनीत राहतो मी.
मीना - मग?
राठी - तुम्ही एखाद्या रेस्टौरंटमधे याल का?
मीना - नको सर... मला ते बरोबर वाटत नाही...
राठी - तुमच्याकडे
मीना - सर.... सहा वाजता याल का घरी?
राठी - पत्ता द्या...

मीनाने पत्ता लिहून दिला. राठीचा चेहरा अधिकच गंभीर झालेला होता. हे प्रकरण कोणत्या पातळीवर असावे याची त्याला भीती वाटत होती. उद्या काही म्हणता काही झाले तर आपलेही करीअर बरबाद व्हायचे असेही त्याला वाटत होते. डीनबद्दल त्याच्या मनात नितांत आदर होता. डीन सहासष्ट वर्षांचे अनुभवी गृहस्थ होते. डॊ. देविदास पांढरे! कित्येक वर्षांचा अनुभव गाठीशी घेऊन ते आरोग्य मंत्रालयातून आलेल्या विनंती पत्राचा मान ठेवून खास नागपूरहून या हॊस्पीटलला डीन म्हणून आले होते. पोस्ट रिटायरमेंट! आरोग्य मंत्र्यांनी मागील निवडणूकीत अद्ययावत रुग्णालयाची घोषणा केली होती. त्यानुसार हे रुग्णालय उभे राहिले. होते छोटेखानीच... पण अद्ययावत! येथेच वैद्यकीय महाविद्यालयही उभे राहिले. त्याच महाविद्यायलयाचे सन्माननीय डीन हे रुग्णालयाचेही प्रमुख होते. महाविद्यालयात केवळ एका वर्षी दोनशेच विद्यार्थ्यांची सोय होऊ शकत होती. त्यामुळे सोलापुर विभाग सोडला तर फ़ारशी बाहेरची मंडळी इकडे प्रवेश घेत नव्हती. मात्र रुग्णालय अद्ययावत असल्यामुळे जवळपासच्या छोट्या गावातील रुग्णही येथे येऊ लागले होते.

एकंदर रुग्णालयामुळे जवळपासही बरीच वाढ झाली. काही टपर्‍या, हॊटेल्स, लॊजेस, बाजार अशा गोष्टी प्रामुख्याने वाढल्या.

नंदनने येथेच नर्सचे काम देण्याचे आश्वासन मीनाला दिले होते.

राठीला हा मुद्दा डीनशी टेक-अप करावा की करू नये हे समजत नव्हते. त्याने मीनाची भेट घ्यायचे ठरवले.

अगदीच गचाळ नसलेल्या, परंतू गिछमिड असलेल्या व तिय्यम दर्जाच्या वसाहतीत मीना राहात होती. तल्लख बुद्धी, प्रसन्न रूप यामुळे सगळ्यांनाच तिच्याबद्दल प्रेम वाटायचे. घरची परिस्थिती अशी असल्यामुळे सहानुभुतीही वाटायची. भाडे परवडते हे एकच कारण तिथे राहण्याचे होते. बाबा असतानाचे त्यांचे स्वतंत्र एकमजली घर कधीच बाबांच्या हॊस्पीटलायझेशनमुळे व व्यसनांच्या कर्जामुळे गेलेले होते. मीनाने तेव्हाच डॊक्टर व्हायचा निर्णय घेतला होता. पण नशीबाने नर्स करण्याइतपत तिच्या आकांक्षांना मर्यादा घातल्या होत्या. प्रवेश फ़ी व डोनेशन परवडणे शक्यच नव्हते. तसेच, मीना अगदीच काही पहिली वगैरे आली नव्हती. उत्तम गुण मिळाले होते इतकेच! असे तर कित्येक विद्यार्थी सोलापुरात होते. सायन्स किंवा कॊमर्सला जाण्याऐवजी जाणूनबुजून तिने रुग्णसेवेचा मार्ग स्वीकारण्यामधे तिचा फ़क्त उदात्त हेतूच होता असेही नव्हते. पुढे मागे जमले तर नर्सिंग होम काढायचे असा तिचा प्लॆन होता.

सहा वाजता राठीने वसाहतीत प्रवेश केला तेव्हा लिहिलेला पत्ता कुचकामी असल्याची त्याची खात्री पटली. घर क्रमांक कुठेही नव्हते. गल्ल्यांना काही अर्थच नव्हता. कोणतेही घर कसेही बांधलेले होते. कुठेतरी चौकशी केल्याशिवाय मीनाकडे पोचणे शक्य नव्हते. दोन तीन ठिकाणी चौकशी करत आल्यावर शेवटी तो तिच्याघरी पोचला तेव्हा ती घरात आधण टाकत होती. तिची आई देवघरापाशी डोक्याला हात लावून बसली होती. रडून रडून डोळे सुजलेले दिसत होते आईचे. मीनाचा चेहरा भीतीदायकरीत्या शांत होता. राठीचे स्वागत हसून करण्याची कुणाचीही मानसिकता नव्हती.

मीना - बसा सर.. आई.. हे राठी सर...

मीनाने त्याला पलंगावर बसायला सांगीतले कारण एकमेव खुर्ची मोडकी होती व त्याशिवाय बसण्याची जागाच नव्हती. टिचभर खोलीला मागच्या बाजूला एक फ़ळी उभी करून दार केलेली बाथरूम होती. पंधरा वीस भांडी एका कोपयात, दोरीवर कपडे वाळत टाकलेले अन एका कोपयात मीनाला शाळेत असताना मिळालेली कसलीतरी सर्टिफ़िकेट्स ठेवलेली होती. एका ठिकाणी छोटे देवघर होते. राठीला ती गरीबी पाहून वाईट वाटले. या मुलीवर नोकरीच्या बाबतीत असा प्रसंग यावा हे त्याला अजिबात आवडले नाही.

आई राठीकडे उदास नजरेने बघत होती. राठीने हात जोडून तिला नमस्कार केला.

मीना - सर... पाणी...

राठीने घोटभर पाणी पिऊन भांडे बाजूला ठेवले.

राठी - आईंना बरे नाहीये का?
मीना - नाही नाही.. जरा कणकण आहे इतकेच! चहा ठेवलाय सर...
राठी - छे छे! सारखा चहा होतो..
मीना - नाही सर.. घोटभर घ्याच...
राठी - तुम्ही आता मला आधी सगळे सांगा बरे...

या वाक्यावर आई मुसमुसून रडू लागली. मीनाने तिच्या पाठीवर थोपटले. मीनाचेही डोळे ओलावले.

मीना - सर.. आधी मला एक सांगा... मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवू ना?
राठी - या प्रश्नाला कुणी नाही असे उत्तर देईल का?

राठीला अजून काय झाले आहे तेच माहीत नसल्यामुळे तो नॊर्मल बोलत होता.

मीना - सॊरी सर... मी असे विचारायला नको होते.
राठी - दॆट्स ओके.. सांगा बरे?
मीना - सर... दोन महिन्यापुर्वी नंदन आमच्याकडे....

मीना तब्बल अर्धा तास बोलत होती. एक एक शब्द बोलताना मीनाला आपल्या असहाय्यतेमुळे रडू येत होते. नंदनबरोबरचा लॊजमधील व भाऊंच्या बंगल्यावरील प्रसंग टाळायचा असेल तर राठीला घरी बोलवण्यात काही अर्थच नव्हता. त्यामुळे कसेतरी ते दोन्ही प्रसंग तिने राठीला सांगीतले. राठीच्या चेहयावरील रंग क्षणाक्षणाला बदलत होता. त्याला धक्क्यावर धक्के बसत होते. त्याला वाटले त्यापेखा हे प्रकरण भलतेच निघाले होते. त्याची अपेक्षा इतकीच होती की नोकरीच्या आमिषाने काही लोक उमेदवारांना फ़सवून पैसे घेत असावेत . येथे तर भलताच निंदनीय मामला होता.

अर्ध्या तासाने मीना बोलायची अन आई रडायची थांबली. त्या टीचभर खोलीत सन्नाटा पसरला होता. मीना जमीनीकडे पाहात निश्चल बसली होती. तिची आई कपाळाला हात लावून शुन्यात बघत होती. राठी अवाक झालेला होता. तीव्र धक्का बसला होता त्याला. अर्थात, या गोष्टीशी रुग्णालयाचा अजूनतरी ऒफ़िशियली काहीच संबंध नव्हता. असलाच तर इतकाच की कुणीतरी तिला तेथे बोलवून राठीच्या अनुपस्थितीत मुलाखतीचा देखावा केलेला होता व रुग्णालयातील एका शिपायाला मीनाने ओळखले होते. नियुक्तीचे पत्र मुळीच रुग्णालयाच्या लेटरहेडशी मिळतेजुळते नव्हते. त्यामुळे सकृतदर्शनी, रुग्णालयाची जागा वापरणे याहून फ़ारसा संबंध नसावा याची राठीला कल्पना होती. तसे हे प्रकरण बाहेरचे होते. पण तरीही आपल्याच केबीनमधे इंटरव्हिव्ह होतो अन आपल्यापासून ते लपवून ठेवले जाते यात रुग्णालयातील कुणीतरी सामील असणार याची त्याला खात्री पटली होती. मुलाखत कुणी घेतली असावी याचा त्याला अजिबात अंदाज येत नव्हता. मीनाने सांगीतलेल्या वर्णनाचा एकही माणूस रुग्णालयात नव्हता.

राठीने मीनाकडे पाहिले. त्याला त्याची स्वत:ची मुलगी आठवली. नुकतीच कॊलेजला जायला लागली होती मुंबईत! या मुलीवर सुरक्षेचे छत्र नसल्याने अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले हे पाहून राठीही ओलावला. या दोघी बिचार्‍या किती असहाय्य आहेत हे त्याला जाणवले. केवळ एका सी.डी. साठी इतके देखावे होत असतील? त्या सी.डी.चे काय करत असतील पुढे?

राठीचे सगळे आयुष्य प्रशासन विभागात काम करण्यात गेले होते. प्रकरणांचा सुगावा त्याला चटकन लागायचा. पण हे प्रकरण त्याच्या अनुभवांच्या बाहेरचे निघाले. कुठे कंपनीत चोरी झाली, कुणी वर्कर मशीनखाली हळूच रात्रीच्या शिफ़्टला झोपला होता असली प्रकरणे त्याच्यापुढे यायची. त्याला व्यवस्थित जाणवले की या प्रकरणात तो एकटा काहीही करू शकत नव्हता. पण कुणाची मदत मागण्यासारखेही हे प्रकरण वाटत नव्हते.

राठी - पोलिसांना.....
मीना - नाही सर... मला जगणे मुश्कील होईल.. पेपरात येईल... (मीना रडत म्हणाली.)
राठी - पण मग...
मीना - जरा स्पष्ट बोलू का सर?
राठी - काय?
मीना - मी काही इतकी सुंदर नाहीये... एखाद्या नटीसारखी... त्यात परत मी गरीब घरची आहे....
राठी - म्हणजे?
मीना - जरा विचार करा सर.... केवळ माझी सी.डी. करण्यात त्यांचा काय इंटरेस्ट असणार सर?
राठी - म्हणजे काय म्हणायचंय?
मीना - आणखीनही काही मुली....

हे ऐकून राठीला प्रचंड धक्का बसला. आई प्रथमच विचारमग्न चेहयाने मीनाकडे पाहू लागली. आपली एवढीशी मुलगी काहीतरी दिशा असलेला विचार करत आहे हे तिच्या दृष्टीने नवीनच होते.

आपल्या हॊस्पीटलमधे मुलाखती द्यायला येणाया मुलींच्या सी.डी. बनत असतील तर? राठीच्या मनात हा विचार आला. बनत असतील तर कधीपासून? आपण जॊईन व्हायच्या आधीपासून? मुलाखती आपल्याच केबीनमधे? हॊस्पीटलमधले किती लोक सामील असतील? पण आजवर आपल्याला असे कधीच कुणी का भेटले नाही? हिचे लेटर भाऊने फ़ाडले असेल, पण सगळ्यांची कशी फ़ाडेल? एकही मुलगी लेटर घेऊन येत ’मला जॊइन करून घ्या’ असे म्हणत कशी नाही आली? असे काही नसणार...

राठी - तू मला भेटलेली पहिलीच मुलगी आहेस मीना... असे काही नसणार
मीना - यापुढे लक्ष तर ठेवता येईल ना पण सर तुम्हाला...
राठी - अर्थात, हा प्रश्नच नाहीये.. पण...
आई - पण काय साहेब?
राठी - तुझी बदनामी होईल मीना... पण निदान असली माणसे खया स्वरुपात समाजाच्या समोर तरी येतील ना.. पोलिसांना
मीना - नाही सर... नगरसेवकाचे जास्त ऐकले जाणार...
राठी - पण मग, माझ्याकडून तुझी अपेक्षा काय आहे? निनावी पत्र लिहिले एखाद्या पेपरला तर?
मीना - सर... छापूनच येईल असे काही नाही. त्यातूनही, लोक पंधरा दिवसांनी विसरून जातील छापून आले तर..
राठी - मीना, हे सगळे स्वत:च्या तोंडाने सांगायला तुला अन आईंना काय वाटले असेल याची मला जाणीव आहे. मला तुझ्याहून दोन, तीनच वर्षांनी लहान असलेली मुलगी आहे. मी एक नोकरदार माणूस असल्यामुळे एकटा काय काय करू शकेन हे माहीत नाही. पण तू हे सगळे मला सांगण्याचे काहीतरी कारण असणारच ना?
मीना - सर... फ़क्त माझी साथ द्याल का?
राठी - साथ म्हणजे?
मीना - माझ्या डोक्यात काहीतरी योजना आहे. मात्र तुमची मदत लागेल.
राठी - मीना, रहस्यकथांमधे होते तसे प्रत्यक्ष आयुष्यात होत नसते. तू योजना वगैरे काही करू नकोस. एक तर सरळ पोलिसांकडे जा नाहीतर दुर्दैवाने आपल्याला हा प्रसंग उरावर दगड ठेवून विसरावा लागेल.
मीना - मला नोकरी देऊ शकाल?

राठीला हा आणखीन एक धक्का होता. जेथे तिच्यावर असा प्रसंग गुदरण्याची सुरुवात झाली तिथेच तिला अजूनही नोकरी हवी आहे हे त्याला विचित्र वाटत होते.

मीना - सर, हाताशी पैसे तरी पाहिजेत काहीतरी करायला...

राठीने शांतपणे विचार केला. मुलगी नर्सिंगचा कोर्स कंप्लीट करत आलेली आहे. घर गरीब आहेच. पण केवळ नोकरीसाठी ती असले प्रसंग खरे असल्याशिवाय सांगणार नाही. तिच्या विचारांना काहीतरी निश्चीत अशी दिशा असावी असे तिच्या बोलण्यावरून वाटते. केवळ नोकरीसाठी इतकी नाटके कुणी करणार नाही.

राठी - मला उद्या बायोडेटा घेऊन भेट. मी बघतो.

राठीने जाताना उंबयात क्षणभर थांबून मीनाच्या चेहर्‍याकडे पाहिले. मीनाच्या चेहयावर शुद्ध भाव होते. राठीला आपला निर्णय अनाठायी नाही हे पटले.

चहा कुणीच घेतला नव्हता. तिन्ही फ़ुटक्या कपात असलेला चहा केव्हाच गार झाला होता. एका भयंकर सूडनाट्याला सुरुवात होत होती.

नंदन आज रात्री आठ वाजता भाऊंच्या घरी आला. भाऊंनी रॊयल चॆलेंजची बाटली काढली तसा त्याला मनातून आनंद झाला. साला म्हातारा स्वत:ही पितो अन पाजतोही. नोकराने टीपॊयवर सगळा इंतजाम केल्यावर तो खाली निघून गेला. नंदनने कपाटातील एक सी.डी. काढून कॊंप्युटरवर लावली. दोघांनी जोरात ’चीअर्स’ केले अन सी.डी. ऒन झाली.

हे विशाल लॊज नव्हते. कुठलेच लॊज नव्हते. त्या सी.डी. वर होते फ़क्त फ़ोटो. काही मुलींचे! नुसते चेहर्‍याचे! एकेक फ़ोटो स्लाईड शो प्रमाणे सरकत होता. भाऊंना फ़ोटो नीट निरखता यावा यासाठी नंदन माऊस हातात घेऊन टायमिंग कंट्रोल करत होता. या मुलींचे फ़ोटो एखाद्या फ़ोटो स्टुडिओमधे काढावेत तसे नव्हते. ते होते कोणत्यातरी सार्वजनिक ठिकाणचे, गर्दीतले वगैरे! ते एनलार्ज करून नंदन भाउंना दाखवत होता.

भाऊ - ही कोण रे?
नंदन - ही पंचम मार्केटमधे एका डेंटिस्टकडे काम करते.
भाऊ - काय शिकलीय?
नंदन - अजून एवढे कळले नाही.
भाऊ - फ़ेसिंग चांगलंय!
नंदन - भाऊ, मी कधी फ़ालतू सामाने दाखवतो का तुम्हाला?

दोघेही जोरात हसले.

भाऊ - हिला ओढायची का?
नंदन - तुम्ही सांगायचंत आम्ही ऐकायचं!
भाऊ - यावेळेस तूच जाणार का?
नंदन - बघू.. नाहीतर शर्मिलाला पाठवीन
भाऊ - स्साली कामाची नाही राहिली आता...
नंदन - शर्मिला?
भाऊ - हं!
नंदन - का?
भाऊ - तीन टक्के मागते. चेष्टाय का? मलाच सव्वीस टक्के मिळतात.
नंदन - भाऊ... तिला देता तेही मलाच द्या ना, मी फ़ुल्ल केसेस सांभाळतो.
भाऊ - अंहं! या कामात एक बाई असलेली बरी असते.
नंदन - सगळ्याच कामात एक बाई असलेली बरी असते.

पुन्हा दोघे जोरात हसले. नवीन ग्लास भरल्यावर स्लाईड पुढे सरकली.

भाऊ - अरे? हिचा फ़ोटो कसा आला परत?
नंदन - चुकून राहिला. डिलीट करतो. पण माल कसा वाटला भाऊ?
भाऊ - अरे अजून डोक्यातून जात नाही. उद्या बोलवायचा विचार करतोय पुन्हा.
नंदन - मला म्हणे... मला लग्नाला शब्द दिला होतात ना?
भाऊ - हा हा! म्हणाव मी महिन्यातून दोघींना देतो असला शब्द! कुठे नेले होतेस हिला?
नंदन - विशाल. म्हणे बाराशे कसे घेतले? दोनशे रुपायाच्या रूमचे? म्हंटलं ऎडव्हान्स आहे पुढच्या तीन दिवसांचा.
भाऊ - मला लाथ मारली सालीने.. उद्या काढतो भरून सगळं! कुठे राहते रे?
नंदन - आमच्या इथेच.. पलीकडच्या गल्लीत
भाऊ - बाप नाहीये नाही का तिला?
नंदन - अंहं! मी फ़ार निरखून केसेस आणतो भाऊ..
भाऊ - परवा वाघमारे आला होता हप्ता न्यायला
नंदन - मग?
भाऊ - म्हणे केसेस वाढल्यात... एखादी आमच्याकडेही पाठवा... नाहीतर फ़ार दिवस लपवून ठेवता यायचं नाही...
नंदन - ***** आहे साला. पाठवलं का कुणाला?
भाऊ - ह्यॆ! शर्मिलाच गेली होती.
नंदन - त्याला काहीही चालतं!
भाऊ - ही भेटली का पुन्हा?
नंदन - छे? हिला इतक्यात कसा भेटेन मी?
भाऊ - लेका तुझं मन बिन जडायचं एखादीवर. मला काळजी वाटते.
नंदन - इतक्या पोरी झाल्या भाऊ... आता तसलं काही होणार नाही.
भाऊ - पण हिनी काही हालचाल केली याबद्दल काही माहिती आहे का? (भाऊंनी रोखून विचारलं तसा नंद्या हादरला.)
नंदन - भाऊ... नाही.. का हो?
भाऊ - नंद्या *** लेका लक्ष ठेवत जा.. गोत्यात येशील...
नंदन - काय झालं?
भाऊ - लेका हॊस्पीटलमधे गेली ही पुन्हा... त्या मॆनेजरला भेटली.
नंदन - यंदे म्हणाला?
भाऊ - मग? तू यंदेशी कॊन्टॆक्ट ठेवायला नकोस का ***?
नंदन - चुकलं भाऊ... पण कशाला भेटली.
भाऊ - तेच तर समजत नाहीये. यंदेने फ़क्त चहा दिला त्या दोघांना.
नंदन - पण बोलणे ऐकले असेलच की..?
भाऊ - नाही. मॆनेजर फ़ोनवर बोलत होता म्हणे!
नंदन - च्यायला... पोरगी जड जाते का काय?
भाऊ - हे तू मला विचारतोस? तुला कशाला पोसलाय?
नंदन - सॊरी भाऊ! मी बघतो पुढचं!

बराच वेळ दोघे फ़ोटो न्याहाळत पीत बसले होते. बारा साडे बाराला फ़ुल्ल टाईट होऊन नंदन बाहेर पडला. बाहेर पडताना तोल गेल्यामुळे भाऊंच्या नोकराने त्याचा हात धरला. त्याबरोबर नंदन चिडला. नंदनने त्याला शिव्या घातल्या व निघून गेला. नोकराला भाऊंनी वर बोलावून ’काय गडबड आहे’ विचारल्यावर नोकराने झालेला प्रकार सांगीतला. भाऊंनी तो फ़ारसा मनावर घेतला नाही हेही नोकराने पाहिले.

नंदन थेट चौकीवर गेला. वाघमारे निवांत बसला होता. अचानक नंदनला पाहून तो चरकला. काहीतरी लफ़डे असणार हे त्याने ताडले. दोघे बाहेर आले. नंदनला नीट उभेही राहता येत नव्हते.

नंदन - साहेब... आपलं काम आहे
वाघमारे - ल्येका हितं काय येतोस? कितींदा सांगीतलंय...
नंदन - मीना कातगडे... श्रीधरनगर... पुतळ्याबाजुचं उजवीकडचं तिसरं घर.. हिरव्या रंगाचं.. रात्री बाराच्या पुढे... दादू... दारावर ... दातखीळ...
वाघमारे - पुन्न्हा हितं येऊ नको... चल्ल ... चल्ल घरी हो...
नंदन - आज रात्री काम झालं तर तुम्हाला....
वाघमारे - आता जातो का....?
नंदन - होईल ना?

वाघमारेने नंदनला ढकलले. नंदन फ़ियाटमधे बसला. वाघमारे पुन्हा चौकीवर आला. त्याने एक फ़ोन केला.

वाघमारे - हॆलो

तिकडून दादू बोलत होता.

वाघमारे - दादू
दादू - हा
वाघमारे - श्रीधरनगर.. कातगडे.. हिरवं घर आहे..
दादू - कुटं?
वाघमारे - श्रीधरनगर
दादू - हा
वाघमारे - कातगडे नाव.. हिरवं घर..
दादू - श्रीधरनगर लय मोठंय..
वाघमारे - पुतळ्यापाशी आहे घर...
दादू - काम?
वाघमारे - चिठ्ठी
दादू - हा... कधी?
वाघमारे - आत्ता
दादू - आत्ता? काय ल्ह्याचंय?
वाघमारे - हालचाली बंद!
दादू - नीट पत्ता सांगा...

वाघमारेने कुजबुजत पुन्हा पत्ता सांगीतला.

दादू - मागच्यावेळेसचे तीन हजार नाय आले अजून
वाघमारे - मिळनार त्यातले देणार.. जास्त हाव करू नको..
दादू - उद्या गेले तर न्हाय का चालणार?
वाघमारे - दुसरा बघू का कामाला कोणतरी...?
दादू - जातो आत्ताच...

वाघमारेने फ़ोन ठेवला.

दादू त्याच्या झोपडीतून बाहेर आला. बाहेरच्या उजेडात एका कागदावर काहीतरी लिहिले. एका पाकीटात तो कागद ठेवला. सायकलवरून श्रीधरनगरला पोचला. जवळपास अर्ध्या तासाने, म्हणजे दोन वाजण्याच्या सुमारास त्याला मीनाचे घर सापडले. त्याने हळुच ते पाकीट घराच्या दाराच्या आत सरकवले अन सायकलवर पटकन टांग मारून निघाला. मोकाट कुत्र्यांना हाड हाड करत दादू श्रीधरनगरच्या बाहेर आला अन चौकीवर गेला. वाघमारेला काम झालेले सांगून तीनशे रुपये घेत तोंड वाकडे करत घरी गेला.

इकडे नंदन स्वत:च्या घरी पोचला. त्याने वाघमारेकडून फ़ोनवर बातमी घेतली अन भाऊंच्या नोकराला फ़ोन करून सांगीतली.

सोलापुर सेक्स स्कॆन्डलमधील बहुतेक संबंधीत पावणे तीनच्या सुमाराला झोपी गेले.

क्रमश:

गुलमोहर: 

समाजात वावरताना खूप जबाबदारीने वागायला पाहिजे असे वाटते ,पुढच्या भागात मीना कसासूड घेते हे वाचण्याची इच्छा आहे.
पण एकूण कदंबरी खतर्नाक आहे.