सोलापूर सेक्स स्कँडल - क्रमशः - भाग ३

Submitted by बेफ़िकीर on 28 March, 2010 - 15:55

आजची सकाळ मीना अन तिच्या आईसाठी नवे संकट घेऊन आली. केवळ अठ्ठेचाळीस तासात आणखीन एका प्रकाराला तोंड द्यायची वेळ आली होती. आता घराबाहेर पडले तरी आपल्यावर नजर असणार हे भय सतत राहणार होते. उठल्या उठल्याच दारातील पाकिटात पत्र मिळाले. ’तुझ्या हालचाली माह्यती हायत, त्या बंद कर, न्हाईतर मुडदा पडंल’!

संकटांना प्रत्यक्ष तोंड द्यायची वेळ येते तेव्हा स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त धीराने वागतात.

हे गृहीत सत्य झाल्याचे प्रत्यंतर एक स्त्री असूनही मीनाच्या आईला आले.

पत्र वाचून मीना क्षणभर चरकली. पण तिने शांतपणे विचार केला. हालचाली म्हणजे काय असणार? एक तर आपण हॊस्पीटलमधे राठींना भेटलो अन दुसरे म्हणजे राठी इथे आले होते. जर आपण हॊस्पीटलला गेलेलोच माहिती नसेल तर राठी इथे आलेले या लोकांना समजणारच नाही. याचे कारण ती राठींना भेटली हे समजले तरच राठीवरही लक्ष ठेवण्याचे कारण निर्माण होणार. त्यानंतरच राठी इथे आले होते हे त्यांना समजलेले असणार. हॊस्पीटलला ती गेल्याचे माहीतच नसले तर राठींवर उगीच कोण लक्ष ठेवेल? मग हॊस्पीटलमधे गेलेले सांगायला कोण उरले? एक स्वत: राठी अन दुसरा तो चहा आणणारा! आणखीन काही लोकांनीही तेथे आपल्याला पाहिले असेल. पण त्यांचे महत्व आत्ताच गृहीत धरण्यात काही अर्थ नाही. याचा अर्थ राठींवर पूर्ण विश्वास ठेवणेही शक्य नाही अन त्या शिपायाची माहिती मिळायला हवी.
पण राठी तसा माणूस असता तर त्याला आपल्या मुलीची आठवण आली नसती. पण तरीही सावध राहणेच योग्य आहे. आता आईची भीती घालवणे महत्वाचे होते.

मीना - आई, तू घाबरू नकोस. नीट लक्षात घे. ज्या अर्थी आपल्याला हे पत्र आले त्या अर्थी कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेवत आहे. पण तसे करण्याचे कारण त्यांना काय? कारण हेच की मी जर भांडे फ़ोडायला पोलिसात गेले किंवा हॊस्पीटलमधे तक्रार नोंदवली तर त्यांना प्रकरण निस्तरायला जड जाईल. याचा अर्थ मला जितकी भीती आहे तितकीच त्यांनाही आहे की नाही? आणि माझ्यावर जो प्रसंग गुदरला तो बदनामीच्या भीतीने माणूस बोलणार नाही या अगतिकतेची यथार्थ जाणीव असल्यामुळे गुदरला. पण खून असा कुणीही कुणाचाही करत नसते. खून पचवणे ही सामान्य गोष्ट नसते. तेव्हा या सगळ्याचा अर्थ हा आहे की मी नुसती हॊस्पीटलला गेले तर त्यांना चिठ्ठी पाठवायची गरज भासते. म्हणजेच आता ते जास्त घाबरलेले आहेत. आपण आपले काही बरे वाईट होऊ नये म्हणून काहीही हालचाली करायच्या नाहीत. म्हणजे आपल्याला काहीच धोका होणार नाही. पण मी जर नुसता वार्ताहराला फ़ोन केला तर त्यांचे धिंडवडे निघतील. तेव्हा आता तू शांत हो.

आईला आता मीनाच तिच्या आईप्रमाणे बोलत असल्यासारखे वाटू लागले. या वयात आणखीन काय काय पचवायचे होते काही समजत नव्हते.

दोन तास उदासवाणेपणातच गेले. मीनाने आता दोन तीन दिवस घराबाहेर पडायचे नाही अशी अट आईने घालून पाहिली. मीनाने तिला स्प्ष्ट सांगीतले की शिक्षणाच्या उद्देशाने तिला लायब्ररीत तरी जायलाच हवे. तसेच, शोभा या तिच्या मैत्रिणीच्या घरीही जायला काही हरकत नव्हती. शोभा दहा घरे सोडून त्याच गल्लीत राहात होती.

दहा वाजता मीना आवरून शोभाकडे गेली. नवीन नोकरी लागलेली असल्याने मीना खुषीत असणार याची शोभाला जाणीव होती. तिने पार्टी मागीतली. मीनाने कोणता धीर धरून चेहयावरून कसलाही पत्ता लागू दिला नाही कोण जाणे!

दोघी गप्पा मारत असतानाच शोभाला फ़ोन आला. मीनाने जवळच पडलेला पेपर उचलला.
शोभाचा फ़ोन जरा जास्तच लांबला होता. मीनाने संपूर्ण पेपर वाचायला सुरुवात केली. आणि त्यातल्या एक बातमीवर तिचे लक्ष खिळले. ती बातमी तिने किमान चार वेळा वाचली. मीनाच्या सूडनाट्याची पहिली पायरी म्हणजे ही बातमी!

आरोग्यमंत्र्यांचे चिरंजीव व उस्मानाबादमधील एका मतदारसंघाचे आमदार असलेले बंडाभाऊ देशमुख सोलापुरात कोणत्यातरी परिसंवादासाठी दोन दिवसांच्या वास्तव्यासाठी येणार होते. तेही आजच संध्याकाळी! खरे तर ही बातमी तितकी महत्वाची नव्हतीच. पण वडिलांनीच बांधलेल्या हॊस्पीटलच्या कॊलनीतील गेस्ट हाउसेसपैकी एक आलिशान गेस्ट हाऊस त्यांनी राखून ठेवायला सांगीतले होते. वार्ताहरांनी या गोष्टीचा उदो उदो केलेला होता. सर्व पंचतारांकित हॊटेल्स सोडून बंडाभाऊंनी सरकारी तिजोरीवर पडू शकणारा बोजा रद्द केला. या त्यागाबाबत स्तुती चाललेली होती.
त्यात त्यांनी आणखीन एक घोषणा केली की त्यांचा ताफ़ा यावेळेस फ़क्त दहा टक्क्यावर येईल अन अत्यंत कमी खर्चात सोलापूरची ट्रीप होईल. खरे तर एवढे सगळे सेव्हिंग करून वाचणार असतील वीस, पंचवीस हजार रुपये पण वर्तमानपत्रातून जाहिरात करून पंचवीस लाखांची पत मात्र वसूल होत होती.
हॊस्पीटलमधे त्यांच्या स्वागतासाठी डीन व न्यायाधीश यांचे पाच, पाच मिनिटांचे भाषण, त्यांचा सत्कार, मग आमदारांचे स्वत:चे भाषण, एक गायन समारंभ, भोजन समारंभ असे पहिल्या दिवशी होते. दुसया दिवशी आमदारांचा सकाळी अकरा पासून ते सायंकाळी सहापर्यंत सेमिनार होता. सात ते साडे नऊ पक्षातील स्थानिक पुढारी, कार्यकर्त्यांच्या भेटी असे ठरले होते. तिसया दिवशी आमदारांचा पुन्हा दिवसभर सेमिनार व रात्री भोजनोत्तर उस्मानाबादला प्रयाण असा भरगच्च कार्यक्रम होता.
मीनाने अत्यंत काळजीपुर्वक ती बातमी वाचली. पेपर हातात धरूनच तिचे लक्ष शुन्यात लागले. मनात विचारांचे जोरदार प्रवाह चाललेले होते. तिकडे शोभा काहीतरी उत्साहात बोलत होती. मीनाला त्यातले काहीही ऐकू येत नव्हते. तिच्या मनात फ़क्त एकच विचार होता. ’आपल्या मनात जी योजना आहे ती प्रत्यक्षात उतरणे खरोखरच शक्य होईल का’ हा तो विचार! एकाचवेळी तिला आश्चर्य वाटत होते की ज्याला सुडाची संधी म्हणावे अशी गोष्ट इतक्या लवकर आपल्याला उपलब्ध व्हावी अन त्याचवेळी असेही वाटत होते की ही संधी घ्यायला गेलो अन कुणाच्या काही लक्षात आले तर आपण जिवंत तरी राहू का?
मीनाने पेपर गुंडाळताना निर्णय पक्का केला. तिची योजना अर्धवट तयार होती. आता त्यावर विचारपुर्वक वागणे आवश्यक होते. पण जे मनात होते ते करायचे हे तिने ठरवले.

शोभा - मीना... ऐक ना... ज्योतीचा फ़ोन होता.. अजय अन ती लग्न करतायत
मीना - ठरलं?
शोभा - घरच्यांना मान्य आहे.
मीना - मस्तच बातमी आहे.
शोभा - आज आपल्या सगळ्या ग्रूपला पार्टी आहे. सात वाजता
मीना - कुठे?
शोभा - नैवेद्यम
मीना - सात वाजता?
शोभा - हो. ए आपल्याला गिफ़्ट घ्यायला पाहिजे नाही का गं काहीतरी?
मीना - सात वाजता म्हणजे घरातून सहाला तरी निघायला पाहिजे ना?
शोभा - हो. काय घेऊयात गं? की फ़क्त बुके ठीक आहे?
मीना - आणि साते ते किती थांबावे लागेल?
शोभा - काय दहा, साडे दहा वगैरे होतील...
मीना - मी दुपारी जरा बाहेर जाणार आहे. तिकडून डायरेक्ट येईन.
शोभा - कुठे जाणारेस?
मीना - अगं... हॊस्पीटलला जॊईन व्हायच्या आधी मेडिकल सर्टिफ़िकेट हवे आहे.
शोभा - कधी जॊईन व्हायचंय?
मीना - पुढच्या एक तारखेला
शोभा - उद्यापासून व्हायचं होतं ना?
मीना - अगं मी त्यांना सांगीतलं कोर्स कंप्लीट होतोय या महिन्यात
शोभा - मग तू सातला येशील का तिकडेच?
मीना - हो
शोभा - ठीक आहे. मग बुके मी घेऊन जाईन
मीना - हं! मला... शोभा..
शोभा - काय गं? बोल ना?
मीना - तुला माहितीच आहे.. पार्टीला जायला...
शोभा - समजलं! दर वेळेस बोलायची गरज नाहीये...

शोभा आत गेली. पाच मिनिटांनी ती आली तेव्हा तिच्या हातात एक चांगल्यापैकी ड्रेस, काही प्रसाधने वगैरे होती. मीना यापुर्वीही अशा गोष्टी तिच्याकडून घेऊन गेलेली होती. पण आज मीनाने त्या सर्व गोष्टी जरा जास्तच निरखून पाहिल्या. मनपसंतीस उतरल्यानंतर मीना घरी निघताना शोभाने विचारले...

शोभा - मीना....
मीना - अं?
शोभा - माझ्याकडे बघ?

मीनाने शोभाकडे पाहिले.

शोभा - सगळं... बरं आहे ना?
मीना - म्हणजे?
शोभा - तू अशी का दिसतीयस?
मीना - कशी?
शोभा - थिजल्यासारखी.. विचारात असल्यासारखी...
मीना - छे ग? काहीतरी काय? चल येते...

जायला पाठ वळवल्यावर मीनाच्या डोळे क्षणात भरून आले. तिने अश्रू शोभापासून लपवले होते. पण तिला हेही जाणवत होते की पाठीमागे शोभा खिळून राहिल्यासारखी आपल्याला जाताना पाहात आहे. पण पर्याय नव्हता. झालेले प्रकार सांगण्याची ही वेळच नव्हती. उलट त्यामुळे नुकसान होण्याची शक्यताच जास्त होती.

मीनाने घरी आणलेल्या वस्तू पाहून आईचे पित्त खवळले. ती मीनाला खूप बोलली. मीना जणू ऐकतच नसल्याप्रमाणे दुर्लक्ष करत होती. मनावर दगड ठेवून ती आईकडे दुर्लक्ष करत होती. शेवटी आईने तिचे खांदे गदागदा हालवून ’कुठे जाणारेस’ विचारल्यावर तिने ’ज्योतीचे लग्न ठरलय, बैठक आहे त्यांच्या घरी, सगळ्या मैत्रिणींना बोलवलय मुलगा बघायला’ असे सांगीतले. आईने खूप विरोध केला. पण शोभा आहे, आणखीन चार मैत्रिणी आहेत, घरीच बैठक आहे, आम्ही मैत्रिणी ज्योतीच्या आईची स्वयंपाकघरात मदत करणार आहोत’ वगैरे सांगून तिचा विरोध शेवटी नष्ट केला.
वामकुक्षीनंतर मीनाने आवरायला घेतले. तब्बल एक तास आवरल्यावर पाच वाजता ती जेव्हा तयार झाली तेव्हा आई तिच्याकडे बघतच राहिली. सजली तर आपली मुलगी नक्षत्रासारखी दिसते हे काही तिला नवीन नव्हते. पण असे प्रसंग मात्र वारंवार येत नसत. मग तिची दृष्ट काढल्यावर मीना आईच्या नकळत अगदी क्षणभरच बाबांच्या फ़ोटोसमोर थांबली. फ़ोटोकडे बघत मनात म्हणाली की ’जे मी करायला चाललेले आहे ते निंद्य आहे, सहज टाळण्यासारखे आहे, पण मी आता पुर्वीची मीना राहिलेली नाही बाबा, की मुळूमुळू रडेन, मला त्यांच्यात घुसून त्यांचा नाश करायचा आहे’! आईचा फ़क्त हात दाबून ती घराबाहेर निघाली.
एका गरीब घरातील गरीब स्वभावाची सुस्वरूप मुलगी जहरी नागीण होऊन आपले बळीसत्र सुरू करायला प्रथमच मोहिमेवर निघाली होती.

हॊस्पीटलच्या प्रांगणात साधारण दिडशेचा जमाव असावा. हा सगळा मेडिकल व नॊन मेडिकल स्टाफ़ होता. त्यांच्यामागे शंभर एक विद्यार्थी उभे होते. आमदार साहेब व्यासपीठावरील खुर्चीत मध्यभागी बसलेले होते. डीन त्यांच्या उजव्या तर न्यायाधीश त्यांच्या डाव्या बाजूला बसले होते. त्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष एका बाजूला व सोलापूरमधील समाजसेवक नाफ़डे काका दुसर्‍या बाजूला. नगरसेवक भाऊ व सूत्रसंचालक हे टेबलांच्या दोन कोपर्‍यांमधे बसलेले होते.
आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी वाघमारेवर होती. तो स्टेजवर नजर ठेवून खाली उभा होता. नंदन मात्र प्रवेशद्वारापाशी उभा राहून संयोजकांशी नंतरच्या कार्यक्रमांची तयारी व चर्चा करत होता.
आमदारांच्या आगमनाबाबत घोषणा व टाळ्या झालेल्या होत्याच. आता सूत्रसंचालकाने ’साहेबांचा व्यवस्थापनातर्फ़े सत्कार व्हावा’ असे संदेश दिले. राठी स्वत: वर आले व त्यांनी आमदारांना हार घातला. राठींच्या हातातील पुष्पगुच्छ डीन यांनी आमदारसाहेबांना देताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

आता नॊन मेडिकल स्टाफ़तर्फ़े व विद्यार्थ्यांतर्फ़े साहेबांचा सत्कार व्हावा असे सूत्रसंचालकाने जाहीर केले.
येथेच प्रसंगाला वळण लागले. कार्यक्रमपत्रिकेवर वरिष्ठ सिस्टर श्रीमती बोधे या नॊन मेडिकल स्टाफ़कडून सत्कार करतील असे लिहिले होते. पण बोधे कुठे दिसतच नव्हत्या. अन अचानक एक रूपवान मुलगी हातात हार घेऊन स्टेजच्या पायया चढू लागली. तिच्या हातातील हार अन ती स्वत: यात काही फ़रकच वाटत नव्हता इतकी ती सुरेख दिसत होती. पण काहीतरी गडबड मात्र वाटत होती. त्या मुलीच्या डोळ्यांत बावरलेपण किंवा लज्जा यातील काहीच नव्हते. तिच्या डोळ्यांत होते आव्हान! कोणत्याही सभ्य पुरुषाचीही चलबिचल होईल असे आव्हान! मीना कातगडे शरीराला अत्यंत लाडीक हेलकावे देत हातात हार घेऊन स्टेजच्या पायया चढत होती अन आमदार तिची ती चाल पाहूनच किंचित बहकला होता.

इकडे भाऊंच्या हृदयाचे ठोके वाढले. ही मुलगी परवा आपल्या बंगल्यावर होती तेव्हा अब्रूची भीक मागून पाय धरत होती. आणि आत्ता इथे अशी? इतक्या हसया चेहयाने? भाऊंनी ताडले की ती पटकन माईकपाशी जाणार आणि भर सभेत आपले बिंग फ़ोडणार. कदाचित याचसाठी ती राठीला भेटली असावी. इतके सगळे विचार भाऊंच्या मनात केवळ दोन तीन सेकंदात येऊन गेले. स्वत:च्या तोंडाने ती असे बरळेल? की नुसतेच म्हणेल की व्यासपीठावर बसलेले नगरसेवक हा राक्षस आहे वगैरे? भाऊ हादरले. ते खुर्चीतून अर्धवट उभे राहिले होते. त्यांच्या चेहयावर ताण स्पष्ट दिसत होता. आमदार त्यांच्यापासून पाच फ़ुटांवर बसले होते व मधे दोन माणसेही होती. भाऊंना आमदारांचा चेहरा स्पष्ट दिसत होता. आमदार खिळल्यासारखे मीनाकडे बघत होते. हा प्रकार थांबवणे आपल्याला अशक्य आहे याची दु:खद जाणीव भाऊंना झाली. या क्षणी त्यांना नंदन भेटला असता तर भाऊंनी त्याच्यावर कदाचित गोळीही झाडली असती इतका त्यांना नंदनचा राग आलेला होता. भाऊ रोखून मीनाकडे पाहात असतानाच एक अनपेक्षित वळण घेतले सगळ्या गोष्टींनी.

मीना ओठ मुडपून लाजरे हसू खेळवत आमदाराकडे पोचली. तिचे डोळे गुढ अर्थाने आमदारावर रोखलेले होते. तिने हार आमदाराच्या गळ्यात घालण्यासाठी हात उंचावले. आमदार चांगला धिप्पाड होता. एरवी कार्यकर्त्यांनी घातलेले हार अर्ध्या वाटेतच रोखून तो हातात घेऊन स्वत:ची नम्रता दाखवायचा. मात्र आज तो बहकला. या मुलीचा निकटचा सहवास मिळणार या लालसेने तो तिच्या हार घालण्याची वाट पाहात उभा राहिला. मीना त्याला हार घालायच्या पोझिशनमधे होती. पण आमदाराच्या डोक्यावरतून तिचे हात पोचत नव्हते. त्यात मधे टेबल होते.

मीना जणू त्यांच्या उंच्यापुर्‍या देहाचे कौतूक डोळ्यांतून सांडत असावे अशी क्षणभर लाजत हळूच त्याला म्हणाली:

मीना - जरा पुढे व्हा ना सर!

आमदार मिशीतल्या मिशीत हसत हळूहळू पुढे झुकला. दोन्ही चेहरे जवळ आल्यावर मीनाने डोळे त्याच्या डोळ्यात मिसळले. या पोझिशनमधे असताना हा सत्कार आहे हे माहीत असल्याने लोक टाळ्या वाजवत होते. हे सगळे अक्षरश: क्षणार्धांमधे घडत होते. टाळ्यांच्या आवाजामुळे भाऊंना मीना व आमदार साहेबांचे बोलणे ऐकू येणे शक्यच नव्हते.

प्रत्यक्ष हार घालताना तर दोघे एकमेकांच्या जास्तच निकट आले. निकटच्या सुगंधाने आमदार कासावीस झाला. या क्षणी या पोरीला मिठीत घ्यावे असे त्याला वाटू लागले. मनातल्या मनात त्याने हिला भेटायला बोलवायचेच असा निर्णय होईपर्यंत मीनाच्या हाताची बोटे त्याच्या कानांना गुदगुल्या करून मागे येताना फ़क्त आमदारालाच कळेल अशा पद्धतीने क्षणभर त्याच्या गालावर रेंगाळली. हा गुप्त संदेश आमदाराने चाणाक्षपणे ओळखला. हे शरीर प्राप्त होणार याची त्याला चाहूल लागली. त्यातच मीना गहिर्‍या आवाजात त्याला म्हणाली:

मीना - ओळखलं नाहीत ना सर?
आमदार - ओळखलं तर.. अं
मीना - मीना सर...
आमदार - हां! साडे नऊला गेस्ट हाऊसवर भेट रात्री...

ही चार वाक्ये डीन अन न्यायाधीश यांना टाळ्या अन सूत्रसंचालकाची बडबड यामुळे धड ऐकूही आली नाहीत अन त्यात त्यांना काही गंभीरही वाटले नाही. कॊलनीतील किंवा स्टाफ़पैकी कोणातरी मुलीला साहेब बहुधा ओळखत असावेत अशी त्यांची समजूत झाली. मात्र भाऊंना घाम फ़ुटलेला होता. ही साहेबांशी बोलली? ही साहेबांना कशी ओळखते? अती म्लान नजरेने भाऊ मीनाकडे पाहात होते. मुळात ही हॊस्पीटलची कुणीच नसताना स्टेजवर पोचलीच कशी? पण भर व्यासपीठावर हा प्रश्न विचारणे शक्य नव्हते. एकतर त्यांचे भाषण नव्हते. त्यात ते या मुलीला कसे काय ओळखतात हा नवाच प्रश्न निघाला असता. अन सुरक्षा व्यवस्था असताना भलतीच मुलगी स्टेजवर येऊ शकते हे पाहून कदाचित आमदारसाहेबांनी भेट गुंडाळली असती अन ते उस्मानाबादला गेले असते. तसे झाले असते तर पक्षाचे जिल्हाउपप्रमुख व्हायचे भाऊंचे स्वप्न आणखीन लांबले असते. आज त्यांना कार्यकारी अधिकार असले तरीही जबाबदार्‍याही खूप होत्या व विरोधकांना टीकेस संधीही! मात्र पक्षाचे अंतर्गत पद घेतल्यावर त्यांना ’पक्ष निधी’ या नावाखाली कुरण तर होतेच पण शिवाय पक्षांतर्गत आदर व समाजाभिमुख नसल्याने टीकेला वाव नाही हे ते जाणून होते. मात्र सर्वात महत्वाचे कारण होते ते हे की पक्षात पक्षांतर्गत काम करणार्‍यांना वरच्या निवडणूकांमधे तिकीट मिळण्याची शक्यता ही नगरसेवकांसारख्या कार्यकारी पदांपेक्षा जास्त होती. आजची साहेबांची भेट ही भाऊंसाठी जिल्हा उपप्रमुख होण्याच्या प्रक्रियेतील एक महत्वाचा टप्पा ठरणार होती. अन त्यात हा प्रकार झालेला. भाऊ अंतर्बाह्य हादरलेले होते.

मात्र मीना आमदाराला घायाळ करण्यासाठी पराकाष्ठा करत होती. ’तू मला भेट’ हे वाक्य ऐकल्यावर मनात अतिशय निराश झालेली मीना तोंडावर जणू ’आमदारांना काय हवे आहे ते समजले’ अशा स्वरुपाचे ’खास तुमच्याचपुरते’ असे स्मितहास्य ठेवून आकर्षक हालचाली करत परत चालली होती. आमदार तिच्या स्मिताचा घ्यायचा तो अर्थ घेऊन तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बेभान होऊन पाहात असतानाच सूत्रसंचालकाने ’आता साहेब मार्गदर्शन करतील’ असे उद्गार काढले.

इकडे आमदार बोलायला उठला तशी मीना गर्दीत सामील झाली अन हळूहळू दिसेनाशी झाली. त्याचक्षणी भाऊ साहेबांचे लक्ष नाही असे पाहून हळूच दुसर्‍या बाजूने उतरले व झपझप चालत गेटपाशी गेले. तिकडून रिसेप्शनकडून बोधे सिस्टर येऊन राठींना सांगत होत्या की ’अहो मी येणार होतेच, तितक्यात ती मुलगी आली अन म्हणाली की तुमचा तो पेशंट अर्धमेला झालाय, मी सत्काराचा हार घालते पण तुम्ही चवथ्या मजल्यावर पटकन जा’!

गेटपाशी आल्यावर भाऊंनी नंदनची गचांडी धरली अन त्याला बाजूला नेले.

भाऊ - ******* ती पोरगी कशी आली स्टेजवर *****
नंदन - अहो... भाऊ... भाऊ... अहो.. थांबा...
भाऊ - आली कशी ती स्टेजवर?
नंदन - कोण? कोण आली स्टेजवर?
भाऊ - ती परवाची पोरगी... लेटर फ़ाटले ती...
नंदन - मीना??????
भाऊ - ****** मलाच विचारतोस?***
नंदन - भाऊ शप्पथ सांगतोय, माझा कसूर नाही, साहेबांच्या व्यवस्थेत मी आहे तुम्हीच बघताय ना?
भाऊ - *** ती आली कशी ते पहिले तपास... व्यवस्था गेली *******
नंदन - कुठे आहे भाऊ ती?

यावर भाऊंनी सरळ नंदनच्या कानाखाली ठेवून दिली. नंदनने जाणले की आपण हा प्रश्न भाऊंना विचारणेच अयोग्य आहे. तो गर्दीत धावला. भाऊ दोनच मिनिटात परत स्टेजवर आले. मात्र एक झाले. ते स्टेजवर चढताना आमदाराचे त्यांच्याकडे लक्ष गेले. आमदाराने आपल्या भाषणाला हा म्हातारा बनसोडे उठून गेला होता हे नोंद करून ठेवले.

भाषण संपल्यानंतर एक गायनाचा सामान्य कार्यक्रम झाला. त्यानंतरच्या भोजनाला मात्र आमदारसाहेब थांबले नाहीत. साडे आठ वाजलेले होते. त्यांनी आपल्या कक्षातच जेवणे घेईन असे सांगीतले. साहेबांशी इन्फ़ॊर्मल गप्पा मारायची भाऊंची संधी नष्ट झाली. आजचा दिवस काही भाऊंना चांगला नव्हता. मात्र डीनला त्यांनी भोजनसमयी ’मगाशी आलेली मुलगी मला हॊस्पीटलमधली वाटत नाही’ असे सौम्यपणे सांगून पाहिले. डीन वेगळ्याच मनस्थितीत व आमदारांच्या वास्तव्याच्या टेन्शनमधे असल्यामुळे त्यांना हे विधान नीट समजलेच नाही खरे तर. परत परत तेच सांगत बसलो तर प्रकरण फ़ारच गंभीरपणे घेतले जाईल अन त्या मुलीला पकडले तर आयतेच ती आपले भांडे फ़ोडू शकेल असे वाटल्यामुळे भाऊ नॊन अल्कोहोलिक व प्युअर व्हेज जेवणाचा आस्वाद कडू तोंडाने घेऊन निघून गेले.

बंगल्यावर साडे नऊच्या सुमारास भाऊ पोचले तेव्हा नंदन बाहेरच उभा होता. दोघेही वरच्या खोलीत आल्यावर भाऊंनी सर्वप्रथम थ्री एक्स चे दोन ड्राय मोठे घोट घशाखाली ढकलले व नंदनवर शिव्यांचा भडिमार सुरू केला. त्यात काही शिव्या वाघमारेलाही बसल्या अन काही शर्मिलालाही. नंदन मुकाट ऐकून घेत होता. दोन पेग दोघांच्या पोटात गेल्यावर नंदनने सगळे शोधून काढायचे वचन दिले अन तो बाहेर पडला. मात्र भाऊंचा नंदनवर एकट्यावरच सगळा खेळ चाललेला नव्हता. त्यांच्या डोक्यातून मीना काही जाईना.

इकडे नऊ वाजल्यापासून आमदार साहेब चुळबूळ करू लागले. त्यांनी सहाय्यकाला बोलवून सांगीतले की मीना नावाच्या मॆडम येतील त्यांना साडे नऊ पर्यंत आत पाठवू नको. ’साडे नऊ पर्यंत पाठवू नको’ याचा अर्थ आत्ता या क्षणी आली तरी आत पाठव असा आहे हे त्या जुन्या सहाय्यकाला अनुभवाने माहीत झालेले होते. आमदार साहेबांचे वय होते तीस! अन तीस पेक्षा कितीतरी जास्त प्रकरणे ते करून बसलेले होते. त्यांचे हे रेप्युटेशन कुणाला फ़ारसे समजू नये यासाठी तो सहाय्यक, मोरे, काय वाट्टेल ते करावे लागले तरी करायचा. त्यामुळेच तोही साहेबांच्या गळ्यातला ताईत झालेला होता. सगळ्यात महत्वाचा बचाव करावा लागत होता तो स्वपक्षीयांकडूनच! त्यांनी काड्या केल्या तर आरोग्यमंत्र्यांकडूनच झापले जाईल याची त्याला कल्पना होती.

आमदारांसाठी ब्लॆकडॊग तयार होतीच. तिचे घुटके घेत बसलेले आमदार कधी एकदा मीना येतीय या विचारात अस्वस्थ होते. ही पोरगी स्वत:हून कशी काय लाईन देतीय हे काही त्यांना समजेना. आपण आपल्याच वडिलांनी बांधलेल्या रुग्णालयात बसून हे सगळे विचार करतोय अन ही एक शैक्षणिक संस्था आहे अन बातमी फ़ुटली तर केवढ्यात जाईल इतके सारासार विचार आता राहिले नव्हते.

’ओळखलं नाहीत का सर’! मीनाचा तो लाडीक स्वर अन रेशमी स्पर्श आमदाराला पुन्हा आठवला. च्यायला हिला आपण कधी बघितलं? सोलापूरला मागे दोन वर्षांपुर्वी आलो होतो तेव्हा बाबाही होते. तेव्हा असले काही शक्यच नव्हते. दोन वर्षात आपण आमदार झालो. सत्तेमुळे हवे ते रंगढंग शक्य झाले आहेत. पण हे असे लपून छपून करावे लागते. कुणाला सुगावा लागला तर संपलेच! यावेळेस मुद्दाम त्यांनी येथे राहण्याचे व कमी ताफ़ा आणण्याचे ठरवले होते. सहाय्यकावर नाईट कंपनी शोधण्याची जबाबदारी देऊन निवांत सत्कार स्वीकारत होते. पण मीनाला पाहिल्यावर सहाय्यकाला बोलवून त्या जबाबदारीतून मोकळेही केले होते. मात्र मीना आलीच नाहीतर? असल्या गोष्टींचा अनुभव असल्यामुळे सहाय्यकाने मात्र उस्मानाबादमधीलच साहेबांच्या एका मैत्रिणीला आधीच सोलापुरातील एका चांगल्या हॊटेलवर रूम बूक करून दिलेली होती. ती तिकडे बसलेलीच होती. तिला सूचना अशी होती की यायचे की नाही ते साडे नऊ, दहा पर्यंत कळवण्यात येईल.

आणि मीना?

सगळ्यांच्या नजरा चुकवत चुकवत व्ही. आय. पी. कॊटेजकडे पोचलेली होती. बाहेर दोन हवालदार होते. तिला खटकल्यावर साहेबांचे पी. ए माझे भाऊ आहेत म्हणून सांगीतले. हवालदार विचारायला गेला तर येताना मोरे ’अगं मीना... इतक्या उशीरा का आलीस? मामा काय म्हणतायत, आलाच नाहीत तुम्ही उस्मानाबादला’ वगैरे बकवास करत तिला आत घेऊन गेला. पोलिसांनी एकमेकांकडे पाहिले. एकाने डोळे मिचकावले अन दुसरा गालातल्या गालात हासला. हा काही पहिला राजकारणी पाहिला नव्हता त्यांनी... ज्याला असे नाद होते.

मनावर दगड ठेवून मीनाने त्या भव्य कक्षात प्रवेश केला तेव्हा ती अभिनयसुद्धा करण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिच्या योजनेचा हा आत्तापर्यंतचा सर्वात महत्वाचा भाग होता अन अत्यंत नकोसा भाग होता. मीनाच्या बोटांची वेगात चुळबुळ चाललेली होती. तिला घाम फ़ुटलेला होता. मोरेने तिला लिव्हिंग रूममधून बेडरूमचा दरवाजा दाखवला अन तो क्षणात बाहेर निघून गेला. मीना प्रचंड घाबरली. पळभर तिने श्वास रोखून मन शांत करण्याचा प्रयत्न केला. ओढणीने तोंड पुसले. या क्षणी तिला आई आठवली. खरे तर रडूच यायचे, पण काट्यानेच काटा मोडला जातो या नियमाला अनुसरून तिने हा प्लॆन केलेला होता. बेडरूमच्या दारात ती उभी राहिली तेव्हा ती संध्याकाळपेक्षाही डिझायरेबल वाटत होती. बेडरूमच्या अत्यंत डीम लाईटमधे तिच्या स्वच्छ पांढया ड्रेसमधे ती रतीसारखी भासत होती. तिच्या केसातील गजर्‍याचा सुवास बेडरूममधे दरवळला. तिची मान खाली झुकलेली होती. दोन्ही हाताच्या बोटांनी ती ओढणीच्या टोकाशी चाळा करत होती. अन तिला या रुपात पाहून आमदार खलास झालेला होता. बेडवर बसलेला उघडाबंब आमदार पाहून तिला आपला निर्णय अत्यंच चुकीचा असल्याचे समजले. आज रात्रभर जर आपण घरी जाऊ शकलो नाहीत तर सत्यानाश होईल अन आई घाबरूनच प्राण सोडेल असे तिला वाटायला लागले.

बंडा - ये
मीना - ....
बंडा - ये ये, बैस इथे (आमदाराने तिला बेडवर बसायला सांगीतले.)

मीना सोफ़्यावर त्याच्या उजव्या बाजूला येईल अशी बसली.

बंडा - कोण तू? मीना म्हणजे आमच्या लक्षात आले नाही...
मीना - सर मी नंदनची मिसेस नाही का? तुम्ही मागच्यावेळी आलात तेव्हा लग्न व्हायचं होतं, पण यांनी ओळख करून दिली होती...
बंडा - कोण नंदन?
मीना - सर... पार्टीचेच काम करतात, भाऊसाहेबांबरोबर
बंडा - बनसोडेंबरोबर?
मीना - हो सर...
बंडा - अच्छा अच्छा! हां हां! नंदन आला नाही? ( हा प्रश्न उगाचच होता)
मीना - त्यांना नाही आवडत सर...
बंडा - काय? ।
मीना - मी पक्षाचे कार्य केलेले... त्यामुळे मी त्यांना न सांगता आले ...
बंडा - पक्षाचे कार्य केलेले आवडत नाही? का?
मीना - ते म्हणतात बायकांनी घरकामात लक्ष द्यायला पाहिजे. मला समाजकार्य फ़ार आवडते सर!
बंडा - अरे? आपल्या देशाला पराक्रमी स्त्रियांची केवढी मोठी परंपरा आहे.. झाशीची राणी, (त्याला पुढे आठवेना)
मीना - सर खूप कुचंबणा होते हो... खरे तर तुम्हाला हे सगळे सांगणे...
बंडा - नाही नाही नाही... बोल तू.. बोल
मीना - सर घरातले सगळे बघूनही आपल्या पार्टीच्या कामात झोकून द्यायला मी तयार असते पण...

हे वाक्य बोलून मीना खाली बघत बसून राहिली. आमदार मद्याचे घुटके घेत तिच्याकडे पाहात राहिला. त्याच्या मेंदूचा कब्जा आता पक्षकार्याऐवजी तिच्या सौंदर्याने घेतलेला होता.

बंडा - आम्ही तर म्हणतो अशा सुंदर लेडीज पार्टीत पाहिजेतच...

मीना यावर कृत्रिम लाजली. त्याला ते कृत्रिम वाटण्याची शक्यता नव्हतीच.

आमदार उठला. ती बसली होती तेथे जाऊन तिच्या शेजारी बसला. ती थोडी दूर सरकली तसा तो तिच्याकडे सरकला.

बंडा - बोल, आम्ही तुला काम देतो... काय काम पाहिजे? आमच्यासमोर नंदनची हिम्मत होणार नाही बोलण्याची
मीना - नको सर... एका मुलीसाठी पार्टीचे काही नियमबियम बदलायला लागू... (हे वाक्य अर्धेच तोडत आमदार म्हणाला)
बंडा - कसले नियम? पार्टीत लेडीज आहेतच की?
मीना - असे नेतृत्व पाठीशी असले की खूप आधार मिळतो सर...

मीनाच्या या वाक्याने आमदार पुरता अनियंत्रित झाला. त्याने ग्लास ठेवत मीनाला जोरात स्वत:कडे खेचले.
हाच तो क्षण! जेथे सावरायला हवे होते. आमदाराच्या तोंडाला येणारा मद्याचा वास तिला सहन होत नव्हता. त्याच्या हातात सत्ता होती. त्या सत्तेचे त्याला नको इतके भान होते. त्याच सत्तेच्या जोरावर वासना पूर्ण करण्याच्या मागे तो असायचा. पण अंदाज करण्याच्या बाबतीतही तो कच्चा खिलाडी नव्हता. ही मुलगी इतक्या रात्री बेडरूमपर्यंत स्वत: चालत आली आहे याचा अर्थ ही चालू आहेच हे त्याला समजले होते.

अन नेमके हेच त्याचे मत मीनाला खोडून काढायचे होते.

मीनाने जोरदार विरोध सुरू केला. मात्र तोंडातून आवाज येऊ दिला नाही. दोन, तीन क्षणांमधेच आमदार खाडकन भानावर आला.

आपल्याला मोहवून ’ये’ म्हंटल्यावर वाट्टेल त्या वेळेला आपल्या बेडरूममधे सहज आलेली पोरगी आता विरोध कशी काय करते हे त्याला समजेना.

जबरदस्ती केलेली बाहेर समजले तर आपल्या राजकीय कारकीर्दीला कायमचा काळिमा लागेल हे समजण्याइतका तो शुद्धीत होता.

आमदार खाडकन तिच्याकडे बघत बाजूला झाला. पण तो अचंबीतही झाला होता. मीना त्याच्या तावडीतून सुटल्यानंतरही तेथेच उभी होती. खाली पाहात, निश्चलपणे! ही वेश्या नाही? ही खरच एका कार्यकर्त्याची बायको आहे? च्यायला काय करून बसलो आपण? आणि अजून ही इथे कशी थांबलीय?

मीनाने आता नवाच डाव टाकला. तिने स्फ़ुंदत स्फ़ुंदत खाली बसून आमदाराचे पाय धरले व रडायला लागली.

आमदाराला काय करावे समजेना.

आमदार - ए... ए. उठ.. ए बाई उठ...
मीना - सर मला खरच माफ़ करा... पण मी तशी नाहीये हो...
आमदार - ओ बाई ... उठा उठा... बाहेरच्या खोलीत चला...

आमदाराच्या वासना खरे तर त्याला जबरदस्ती करायला प्रवृत्त करत होत्या. पण वडिलांची आठवण, सहा महिन्यानंतरच्या निवडणुका, हल्ली चालू असलेली स्टिंग ऒपरेशन्स वगैरे आठवून त्याला या पोरीला हात लावायची आता भीती वाटत होती.

दोघेही बाहेरच्या खोलीत येऊन बसले. आमदाराने आता खांद्यावर टॊवेल टाकलेला होता. मीना अजून रडतच होती. पावणे दहा वाजले होते.

बंडा - हे बघा बाई... तुम्ही कशा प्रकारच्या बाई आहात हे मी समजलेलो होतो... त्यामुळेच तुमची परिक्षा घ्यायचे ठरवले मी
मीना - सर पाहिजे तितक्या वेळा परिक्षा घ्या सर... पण असली परिक्षा प्लीज नको
बंडा - तुम्ही नेमक्या कशासाठी आला आहात इथे?
मीना - तुमच्या बरोबर राहून अनुभव घेत पार्टीचे काम करायचं होतं सर...
बंडा - कोणते काम करायचंय? आम्हाला कार्यकर्ते हवेच असतात.
मीना - मला पक्षाचं काम करायचंय सर...
बंडा - हे आत्ता जे झाले आपल्यात ते....
मीना - सर खरं सांगू? ...
बंडा - काय?
मीना - सर अशा वेळेला तुमच्या खोलीत माझे येणे हीच चूक होती. पण तुमच्यासारख्या मोठ्या माणसाने वेळ दिल्यावर आपण जायचे नाही हे चांगले दिसले नसते सर... आत्ता जे झाले त्याची प्लीज कुठे वाच्यता करू नका सर.. म्हणजे तुम्हाला मी असे सांगायलाच नको खरे तर

आमदाराचे काम परस्परच झाले. ते कुठे फ़ुटू नये ही त्याची इच्छा तिने तिची इच्छा असल्याप्रमाणे बोलून दाखवली. मात्र मीना हुषार होती. तिने मुद्दाम तसे केले कारण त्यामुळे आमदाराला ’ही आपल्या मुठीत आहे असा भास होत राहील’ हे साधले गेले.

बंडा - काळजी करू नकोस. (अचानक हातात नियंत्रण आल्यासारखा आमदार बोलला.)
मीना - ....
बंडा - तुला वाटले असेल साहेब असे कसे...
मीना - वाटले सर, अर्थातच वाटले. पण स्त्रीने परवानगी दिल्याशिवाय कोणताही पुरुष असे करणार नाही. आणि अशा परिस्थितीत तुम्हीच काय एखाद्या ऋषीचाही तपोभंग होऊ शकतो. मी तुम्हाला दोष देणार नाही सर...
बंडा - कारण मीही जरा बहकलोच होतो...

नेमकी हीच ती पातळी होती जिथे आमदाराला जिंकायचे होते.

क्षणभरच शांतता पसरली होती. ’मीही जरा बहकलोच होतो’ वर मीना ’नाही नाही हो तसे काही नाही’ असे म्हणाली की आमदाराला सुटल्यासारखे वाटणार होते. त्याच्या दृष्टीने प्रकरण किरकोळ होते. तिला कुठलेतरी पद हवे होते अन नवरा त्या कार्यात तिला सहभागी होऊ देत नव्हता. तिला आमदारसाहेबांनीच पद दिले की तो गप्प होणार होता. तसेच, तिने तिचे काही काम आहे असे सांगीतलेच नव्हते. तिने फ़क्त ’ओळखले नाहीत का’ इतकेच विचारले होते. आपणच तिला बोलावले. पण आमदार चाणाक्ष होताच. अजूनही ती बसून आहे पाहून त्याने आणखीन एक विधान केले.

बंडा - मी बहकलो म्हणजे काय ... तशी .. खरी तर तू आहेसच तशी... बहकवण्यासारखी!

मीनाने लटक्या रागाने पाहतात तसे पाहिले अन लाजत हसत खाली बघत म्हणाली:

मीना - सर... मी रागवले असते तर ...निघून नसते का गेले? (मीनाची योजना या वाक्यावर जवळपास पूर्ण झाली होती. आता पुढचे आमदाराच्या हातात होते.)

साडे अकराला आमदाराच्या तीन पैकी एका गाडीतून मीना घरी पोचली तेव्हा आई अन शोभा तिच्या दारात उभ्या होत्या. आई रडत होती. मीनाने शोभाला उद्या बोलू असे सांगीतले अन आईला सांगीतले की आज ती आमदारांना भेटली अन त्यांनीच त्यांच्या गाडीतून सेफ़ होईल म्हणून घरी पोचवायला सांगीतले व आमदार आपली साथ देतील अशी आशा आहे. आईचा भयंकर गोंधळ झालेला होता. आपली मुलगी हे सगळे काय करत आहे याचा उद्या सोक्षमोक्ष लावायचाच असे ठरवून ती माऊली झोपली तेव्हा मीना बाथरूममधे अंगावरील सर्व कपडे काढून थंड पाण्याने नाहताना आमदाराने एक तास तिच्या शरीरावर केलेल्या अत्याचारांच्या खुणा मोजत अन तपासत होती. त्याचवेळेस त्याचेच ते आश्वासनही तिच्या कानात पुन्हा पुन्हा घोळत होते..

"उद्या संध्याकाळच्या सभेत तुला जिल्हा उपप्रमुख जाहीर करतो... आता महिन्यातून तीन वेळा रिपोर्टींगला उस्मानाबादला यायचं’

मीनाची योजना पूर्ण झाली होती. तिने प्रथम विरोध करून नंतर समर्पण का केले याचे कारण फ़ार महत्वाचे होते. एका बाहेरख्याली वेश्येला भोगल्यानंतर आमदाराला रोख रकमेशिवाय काहीच द्यायला लागले नसते. पण पक्षातील कार्यकर्त्याची बायको आपल्याला पटली अन घरगुती बाई वारंवार हक्काने भोगायला मिळणार या खुषीत त्याने कोणताही अनुभव वा वयही नसलेल्या मीनाला सोलापूर जिल्हा उपप्रमुख करायचे ठरवले होते अन पक्ष बापाचाच असल्यावर त्याच्या निर्णयावर कुणी ’ब्र’ ही काढणे शक्य नव्हते.

मीनाने दिलेल्या आहुतीची व्याप्ती आता प्रचंड वाढणार होती अन भाऊंची शक्ती कितपत पुरी पडेल हा प्रश्नच होता.

नंदन निघून गेल्यानंतरही पीत बसलेले भाऊ हे अत्यंत चिंताग्रस्त झालेले होते. मीना कातगडे आमदाराला हार घालायला आली कशी अन त्याच्याशी बोलली कशी या विचारांनी मेंदू पोखरलेला असताना ’अशा परिस्थितीत आपण एरवी काय करतो’ हे त्यांना आठवले अन त्यांचे मन खूपच शांत झाले.

समोरचा फ़ोन जवळ ओढून त्यांनी साडे अकराला एक नंबर फ़िरवला. पलीकडून एक बायकी आवाज आला. त्यावर भाऊ म्हणाले:

भाऊ - शर्मिला......?????

शर्मिला! सोलापूर सेक्स स्कॆंडलची डेप्युटी ब्रेन कम ब्युटी आता या प्रकरणात इन्व्हॊल्व्ह होणार होती.

गुलमोहर: 

साधारण पंधरा - वीस वर्षापुर्वी सोलापूरातील पांजरापोळ चौकात असलेले पुनम लॊज अशाच एका स्कॆंडलसाठी गाजले होते, त्याची आठवण झाली. छान लिहीताय...पुढेल भाग लवकर येवू द्यात !पुलेशु Happy

मला जळगाव मधे ९० च्या काळात झालेल्या स्कँडलची आठवाण झाली. सर्व सलामत सुटलेत ह्याची चिड येते.

पुढे काय येते याच्या प्रतिक्षेत.

मस्त.
पुर्ण ओघवती कथा आहे.
लवकर येउ देत चौथा भाग.
वाट पाहतोय आम्हि माय्बोलिकर.