आक्षेप - शेवट सुचवा

Submitted by एस अजित on 25 March, 2010 - 11:10

'बेटा हे माझे तुला शेवटचे पत्र. तुझ्या मनात माझी काय प्रतिमा शिल्लक राहीली आहे मला माहीत नाही. ती कशी असावी याचा माझा काही आग्रह नाही, पण माझ्या मनातील विचार तुला कळावे म्हणून हा पत्रप्रपंच.

तो माझ्या आयुष्यात आपल्या बाबांच्यापुर्वीच आला होता. बी.ए. ला आम्ही एकाच वर्गात शिकत होतो. त्याच्यासोबत असताना मला एक छानशी अनुभुती होत असे. सुरक्षित वाटत असे. विविध विषयांवर एकमेकांचे विचार ऐकणे, तासंतास एकमेकांशी बोलत राहणे, महाविद्यालयातील विवीध कार्यक्रमात दोघांनी मिळुन भाग घेणे सगळं छान सुरु होतं.

बी.ए. च्या दुसर्‍या सेमिस्टरला आपले बाबा आमच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजु झाले. अल्पावधीतच ते आमच्या वर्गात प्रिय झाले. आमच्यासोबत ते बर्‍याचवेळा येत असत. आमच्या वयातील अंतर काही फार नसल्याने ते आम्हाला आमच्यातील एक वाटत असत. त्याच्यातील आणि माझ्यातील जवळीकीचा अंदाज सुरुवातीलाच बाबांना आला. त्याबद्द्ल त्यांनी आमच्याशी सविस्तर चर्चा देखिल केली होती.

पहिलं वर्ष व्यवस्थित पार पडलं. आप्पांनी माझ्यासाठी स्थळं बघायची का अशी आईकडे विचारणा केली. आईनं ते माझ्या कानावरं घातलं. बी. ए. पुर्ण होऊ दे असं मी त्यावेळी आईला सांगुन वेळ निभावून नेली. या संदर्भात आप्पांशी स्पष्टपणे मी बोलणे त्याकाळी अजिबातच शक्य नव्हते. जी काही चर्चा व्हायची ती आई मार्फत.

मी हा प्रसंग त्याच्या कानावर घातला. शिक्षण अजुन सुरु असल्याने काय करावे असा प्रश्न होताच. तरी मी घरी तसे सांगावे असं त्याचं मत होतं. माझ्याने त्यावेळी हिंम्मत झाली नाही, पण अगदीच प्रसंग उभा राहील त्यावेळी धीर करु असं ठरविले.

तसा प्रसंग एवढ्या लवकर समोर उभा ठाकेल असे वाटले नव्हते. एक दिवसं कॉलेजसाठी निघतांना आईने मला ते सांगितले एक स्थळ सांगुन आले आहे. उद्या ते आपल्या घरी येणार आहेत तुला बघायला, आणि मुलगा तुमच्याच महाविद्यालयात प्राध्यापक आहे. पायाखालची जमिनच सरकल्यासारखे वाटले.

आईला सगळा प्रकार सांगितला. आई प्रचंड घाबरली. तिला काही सुचेनासे झाले. ती मटकन खाली बसली. आप्पाना हे कसे सांगावे हा गहन प्रश्न तिच्यासमोर उभा राहीला. मीच तिला आधार देऊ लागले. थोड्या वेळाने शांत झाल्यावर तिने मला महाविद्यालयात जायला सांगितले. म्हणाली मी बोलुन बघते आप्पांशी. ऐकतील की नाही हे मी नाही सांगु शकत. घरातुन निघताना आईला विचारले मुलाचे नांव काय ? आईने आपल्या बाबांचे नाव सांगितले. मला हसावे की रडावे तेच कळेना. धीर करुन महाविद्यालयात गेले.

त्याच्या कानावर सगळं घातलं. दोघेही गंभिर झालो. थोड्यावेळाने आपले बाबा आमच्या जवळ आले. मला विलक्षण संकोचल्यासारखे झाले. काय विचित्र परिस्थितीत मी अडकले होते माझं मलाच ठाऊक. काय करायचं ठरवलं आहे ? आपल्या बाबांनी आम्हाला सरळ सरळ प्रश्न केला. सरं तुम्ही या स्थळाला नकार द्या. काय म्हणून ? आपल्या बाबांनी मला विचारले. माझ्या डोळ्यातुन घळाघळा पाणी वाहू लागले.

दोघांनी माझी समजुत काढ्ली. आप्पा काय म्हणतात यावर संगळं अवलंबून होते. घरी जाऊन काय वाढुन ठेवले आहे याची भयंकर धास्ती वाटत होती. भीत भीत घरात प्रवेश केला. घरात विलक्षण शांतता होती. घरात फक्त आईच होती. तिच्यासमोर उभी राहीले. आईने मान हलवुनच सांगितले. नाही. शक्य नाही.

संपले. माझ्या पायातली शक्तीच नाहीशी झाली. आता काय? थोड्यावेळाने आप्पा बाहेरुन आले. त्यांच्या नेहेमीच्या जागेवर बसुन मला समोर उभे केले. माझ्या डोळ्यात पाणी मावत नव्हते. त्यांनी माझ्याकडे एकदा बघितले. तुला कसे सांभाळेल तो? शिक्षण सुरु, नोकरी नाही. आप्पा नोकरी मिळेल ना बी. ए. झाल्यावर. आप्पानी हवेत नकारार्थी हात हलवित मला विचारले जातीचं काय? तो आपल्या जातीचा नाही त्यामुळे हे शक्य नाही. उद्याच्या तयारीला लागा, आणि हो या प्रकाराची कुठेही वाच्यता केलेली मी खपवून घेणार नाही.

माझे प्राणच कंठाशी आले. आता सगळं काही आपल्या बाबांच्या हाती होते. दुसर्‍या दिवशी तो सोपस्कार पार पडला. आता आपल्या बाबांकडून काय उत्तर येते यावर संगळं अवलंबून होते. दुसर्‍या दिवशी मला महाविद्यालयात जाण्याची हिंम्मतच होईना. काय करावे काही सुचत नव्हते. पण गेले नाही तर त्याच्याशी बोलणे कसे होणार या विचाराने मनाचा निग्रह करुन मी महाविद्यालयात गेले. आपल्या बाबांनी आम्हाला दोघांना बोलावुन घेतले. परत एकदा विलक्षण विचित्र परिस्थीती उभी राहीली.

आपले बाबा आम्हाला म्हणाले तुम्ही थोडं धाडसं केलं तर काही बिघडणार नाही. काही काळानंतर संगळं काही सुरळीत होईल अश्या घटना घड्ल्या आहेत. त्यात आजकाल एवढं विशेष राहीले नाही. मी तुमच्या सोबत आहे. त्याचं म्हणणं होतं मी आप्पांना समजवावे. त्याला आमच्या नात्यात कुणाचाही आक्षेप नको होता. जे कधीही शक्य नव्हते.

मग माझ्या अग्निदिव्याचा दिवस उजाड्ला. आपल्या बाबांचे आणि माझे रितसर लग्न झाले. एका जिवलग मित्राप्रमाणे त्यानी मला सांभाळले. लग्न झाल्याबरोबर पहिल्या एकांतात त्यांनी मला विचारले तुला त्याच्याकडे जायचे आहे का? आता तु माझी बायको आहेस, आणि मी तुझ्या सोबत आहे.

मी आपल्या बाबांना विचारले सगळं माहीत असुन देखील तुम्ही लग्नाला का तयार झालात? ते म्हणाले हे बघ मी तुला नकार दिल्याने काय फरक पडला असता? मला आधीपासुनच सगळं माहीत होतं म्हणून ठीक, त्यामुळे तुझ्या मनात अपराधी भावना निर्माण होण्याचे काहीच कारण नाही. समजा मी नकार दिला असता आणि तुझं लग्न तिसर्‍या कुणाशी झाले असते तर तिघांची फसवणूक झाली असती. मी तुला परत एकदा सांगतो, तुला त्याच्याकडे जायचे असल्यास माझी हरकत नाही फक्त जाण्यापुर्वी सांगून जा.

माझ्यात तेवढी हिंम्मत नव्हती. मनाचा निग्रह केला. आपल्या बाबांचा स्विकार केला. तुझा जन्म झाला. तुझं शिक्षण, लग्न, तुझं मातृत्व संगळं व्यवस्थित पार पडलं तु सुखात आहेस हे बघुन जीवन धन्य झाले. जीवनातील सगळी कर्तव्यं पार पड्ल्यानंतर आपल्या बाबांनी मला परत हिंम्मत दिली. विचारले तुला त्याच्याकडे जायचे असेल तर तु अजुनही जाऊ शकतेस.

मधल्या काळात आई गेली, आप्पादेखील गेले. हे संगळं तुझ्यासमोर मांडले. तुला ते पटले नाही. बेटा आधी आप्पांच्या आक्षेपाखातर अग्निदिव्य केले. आता तुझा आक्षेप सहन होत नाहीये. मला परत एकदा अग्निदिव्य करायचे नाही. याक्षणी धरणीमाय मला उदरात घेईल का? माझी तेवढी पात्रता नाही...........संपविते आता.'

या कथेचा शेवट ती आपल्या आयुष्याच्या शेवटाने करते असा माझा विचार होता. तो मी तुमच्यावर सोपवतो. वाचकांनी आपल्या सोईचा शेवट सुचवावा.

१. मुलीने आईला परवानगी दिली, आई त्याच्यासोबत निघुन गेली.

२. आईने परिस्थितीशी तड्जोड करुन बाबांसोबतच आयुष्य घालविले.

३. आक्षेप आणि परिस्थितीला शरणं न जाता तिने आपला जीवनकाळं संपविला.

मित्रहो प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. धन्यवाद.

गुलमोहर: 

आईचे मुलीस पत्रः

बाळ,
तु सुचविल्याप्रमाणे मी त्याला जाउन भेटले. त्याला सर्व काही लक्षात आहे. तो कोणत्याच 'तारखा' विसरलेला नाही. हे मी अगदी खात्रीने सांगत आहे कारण, मी त्याच्या घरी गेल्यावर त्याने मला 'दुधाला हात लाऊ नकोस', 'लोणच्याला हात लाऊ नकोस'... इत्यादी सुचना देण्यास सुरुवात केली. या गोष्टीचा मला फार राग आला. तुला आश्चर्य वाटेल, पण आता मी ती पूर्वीची राहीलेली नाही. हल्लीच एक मराठी संकेतस्थळावर अनेक तेजस्वी विचार वाचल्याने माझ्यात हा बदल घडून आला आहे.
मी तशीच संतापाने त्याला सोडून निघाले. एकंदर पुरुषजातीवर सूड म्हणून मी आता जीन्स वर मॅचीग टीकली, बांगड्या इत्यादी पेहराव करणे सुरू करणार आहे. मला अश्या अवतारात पाहून तुझ्या बाबांच्या डोळ्यात उमटणारी सुक्ष्म भीती पाहून मला पुरुषजातीवर सूड उगवल्याचे समाधान मिळणार आहे.

- तुझीच (तेजस्वी) आई.

दीपांजली Lol अगदीच भारी...
नितीनचिंचवड, आता लेखकनेच शेवट करायला सांगितला म्हनुन इथे लोकांनी केला, त्यात एवढं मनाला लावुन घेन्याजोग काही नाहीये.. जरा हे पण enjoy करता यायला हवं.. Happy

आता माझ्याकडूनही भर (खरं तर भर घालायला काई जागाच ठेवली नाही तरी पण .... )

मुलगी आईला --

आई तू जातेच आहेस तर जा. मी स्वतः तुझं "आय दान" करेन. सर्व सौभाग्य अलंकार घालून तुझी सासरी पाठवणी करेन. पण त्या आधी.....
तुला हे माहीतेय का आई "तो" कधीच रीटायर झालाय. तुझ्या स्त्रीधनाची किम्मतच जास्त असेल असा तुझ्याइतकी NAV नसलेल्या माणसाशी लग्न करायला तुला आवडेल का? माझंच लग्न ठरवताना नाही का आपण अट घातली होती की मुलगा कमावता, माझ्यापेक्षा जास्त पगार असलेला हवा

तुझी - मुलगी

पत्र हातात पडताच आईची रिअ‍ॅक्शन ..... नहीऽऽऽऽऽऽऽऽऽ ये तो मैने सोचा ही नही... मुली तू मला कुठल्या महान संकटातून वाचवलंस. चल आपण माझंही नाव त्याच (तुझं लग्न ठरलं ना त्यावाल्या... Happy ) वधु वर सूचक मंडळात घालू यात.. निदान चांगली पेन्शन असलेला तरी भेटेल.. चल चल.

अगं आई, फियर नॉट. माझा आधी आक्षेप होता. पण आजच मी आमच्या सायन्स क्लास मध्ये
मेनी वर्ल्डस हायपोथेसीस बद्दल सगळे शिकले. त्याप्रमाणे प्रत्येक क्षणी प्रत्येक डिसीजन च्या वेळी २ विश्वे वेगळी होतात. एकात असे होते आणि दुसर्यात तसे. या मुळे आपल्या (आणि आपल्या बाबांच्या) सिच्युएशनला एक वेगळीच कलाटणी मिळते.

माझा आधी आक्षेप होता कारण मी पुराण मतवादी (तुझे संस्कार, वागणुक यांचा काही संबंध नाही). पण मला असे जाणवले की कुठे ना कुठे सर्वच (प्रकारच्या) गोष्टी होत असतात. त्यामुळे माझ्या आक्षेपाला काही अर्थच उरत नाही. दुसरे म्हणजे, कोणत्या तरी विश्वात तु आपल्या बाबांशी लग्न न करता कॉलेजमधील 'आपल्या' प्रियकराबरोबर पळुन गेलीच आहेस. (हे म्हणणार नव्हते, पण माझ्या या नव्या ज्ञानामुळे इतकी एक्साईट झाले आहे की राहवत नाही - तुला आत्महत्या करायची असेल तर खुशाल कर. कुठे तरी तु जिवंत असशीलच).

व्हॉटएव्हर यु डिसाईड, बों वोयाज.

- तुझी (आणि वेगवेगळ्या विश्वांमध्ये वेगळ्यांचीच) मुलगी.

aschig, Lol

OMG Lol

Rofl Biggrin Biggrin Biggrin
असाही एक शेवट!!!

हे संगळं तुझ्यासमोर मांडले. तुला ते पटले नाही. बेटा आधी आप्पांच्या आक्षेपाखातर अग्निदिव्य केले. आता तुझा आक्षेप सहन होत नाहीये. मला परत एकदा अग्निदिव्य करायचे नाही. याक्षणी धरणीमाय मला उदरात घेईल का? माझी तेवढी पात्रता नाही...........संपविते आता.'>>

तुझे बाबा देवमाणूस होते...लग्नानंतर त्यांनी अनेकदा विचारलंही, मला माझ्या प्रियकराकडे जायचे असल्यास... पण सर्वांचं करता करता.... आणि पुन्हा तू होतीस पदरात, आणि खोटं कशाला बोलू, यांचं स्टेट्स, मुळातल्याच हुषार आणि हरहुन्नरी स्वभावामुळे वाढणारा पगार आणि पत... यांचा लोभ सोडवू शकत नव्हते...

पण मग एवढ्या वर्षांनंतर "तो" भेटला आणि पूर्वीच्या त्या आठवणी उचंबळून आल्या... नाही रोखू शकले स्वतःला त्याच्याकडे आकर्षीत होण्यापासून...

तुझ्या बाबांना हे समजलं... आश्चर्याची गोष्ट म्हणजे आधी मला प्रियकराकडे जा सुचवणार्‍या त्यांना आता एवढ्या वर्षांनंतर पण बायकोचं मन परपुरूषाकडे ओढ घेतंय, हे पचलंच नाही तरीही त्या सजान माणसाने एकदा आम्हा दोघांना एकत्र बसवून एक मिटींग घेतली... आणि एक विचित्र परीक्षा घेतली आमच्या प्रेमाची...

थोड्या गप्पा मारल्यानंतर खुप भावूक वगैरे होउन म्हणाले की ते आमच्या प्रेमाच्या आड आलेत... आणि झालेल्या चुका निस्तरण्याचा सगळयांना एक चान्स आहे... आत जाऊन फ्रीजमधून लिंबू सरबत आणि तीन ग्लासेस घेउन आले... तिन्ही ग्लासेस मध्ये सरबत ओतून "cheers" म्हणाले... पण तोंडाला ग्लास लावण्यापूर्वी त्यांनी त्यांची विचित्र अट सांगितली... त्या तीन ग्लासेस पैकी एका ग्लास च्या कडांना वरून जहाल विष चोळले होते... तो ग्लास कोणताही असू शकतो... आता ते सरबत पिण्याची हिंमत दाखवून आपल्या प्रेमाचा पुरावा द्यावा...

आमच्या दोघांच्या पायांखालची जमीन सरकली... माझा बूळा बॉ.फ्रे. (जो त्या वेळेसही मला पळवून नेण्याची पूर्ण हिंमत दाखवू शकला नव्हता) तो ग्लास तस्साच टाकून चक्क पळून गेला...

तुझे बाबा माझ्याकडे थंड नजरेनी पाहू लागले... माझी हिंमत झाली नाही, ग्लास तोंडाला लावायची... मग तुझे बाबा म्हणाले, "एवढ्या वर्षांनंतर तू माझ्याशी प्रतारणा करूनही माझं तुझ्यावर प्रेम आहे... आणि त्यांनी तो ग्लास तोंडाला लावला आणि... आणि ते थंडगार लिंबूसरबत मिटक्या मारत संपवलं आणि आणि... अगं त्यांना काहीSSसुद्धा झालं नाही... त्यांनी सांगितलं की काही विष वगैरे नव्हतं हे फक्त माझ्या डोळ्यांवरची आंधळ्या प्रेमाची पट्टी खोलण्यासाठी केलेलं नाटक होतं... तसे तुझे बाबा फारच हुषार हो!!

पण काय सांगावं दुर्दैव, माझ्या सारख्या चांडाळणीच्या नशीबात त्यांचं प्रेम नव्हतं बहुतेक! मीच केलेल्या जेवणातून नकळत विषबाधा होऊन गेल्यावर्षी गेले ना गं ते मला सोडून!!!

आणि खूनाचा आरोप ठेऊन मला पोलीस पकडून नेण्याच्या आत...संपविते आता. कडाना विष लावलेल्या ग्लासातून लिंबू सरबत पिऊन .. स्वतःचं आयुष्य संपविते आता!

तशा फ्रीजमध्ये पेप्सी आणि कोकाकोलाच्या बाटल्या होत्या... पण म्हटलं निदान मरताना तरी आपल्या देशाची करंसी वाढवण्याचा अल्पसा प्रयत्न आपले भारतीय प्रॉड़क्टस वापरून करूया.. तेवढंच पुण्याचं काम!!

तुला सुट्ट्या मिळत नव्हत्या म्हणून येऊ शकली नव्हतीस तेव्हा आशा आहे आता माझ्या "दिवसांना" तरी सुट्ट्या टाकून येऊ शकशील तू यु. एस. वरून... !

माझाही थोडासा हातभार >>

काय झालं ते मुलगी आठवायचा प्रयत्न करत्ये..

धरणीमाय मला उदरात घेईल का? असा विचार आईच्या डोक्यात आला होता...
कसला तरी जबरदस्त आवाज झाला येवढंच कळलं अन् पुढच्याच क्षणाला कसं काय झालं काय माहित एकदम चक्कर येऊन ती खालीच कोसळली. डॉकला बोलावलं डॉ़क म्हणाले काही नाही त्यांना चक्कर आली आहे फक्त.

( शी!!! काय फाल्तू डॉक आहे काय तर म्हणे नुस्ती चक्कर म्हणून मग सेकंड ओपिनियन घेतलं!)

डॉक २ - इट्स अ‍ॅन इमर्जन्सी!! शी इज इन कोमा.

पुढची दोन वर्ष आई कोमात!

आईने परिस्थितीशी तड्जोड करुन बाबांसोबतची पुढची दोन वर्ष घालवली. अन् एक दिवस बाबांना हार्टअ‍ॅटॅक आला अन् बाबा गेले.

नंतर दोनच महिन्यात आईची परस्थिती सुधारू लागली. डॉक म्हणाल्या त्यांना कसलीतरी ओढ लागल्ये त्यांना काही तरी हवय ते त्यांना द्या म्हणजे त्या ब र्‍या होतील.

मुलीने आईला परवानगी दिली, अन् शेवटी सहा महिन्यांनंतर आई बरी होऊन त्याच्यासोबत निघुन जायच्या तयारीला लागली होती.. आईला सोडायला ती एरपोर्टवर पोचली.

आई आय विल मिस यू .
आई अगं हे काय असं बोलत्येस जस की मी कुठं दूर निघून चालल्ये

रडारडी झाली आई निघाली..

टेकॉफची वेळ झाली. आईला अन् मुलीला एकदम तो दिवस आठवला

आई मनातल्या मनात धमाला उद्देशून चला बरं झालं इतक्या वर्षांनी का होईना आता तरी मी सुखी होईन!

मुलगी धमाला ये दिन देखने के लिए मुझे क्यों जिंदा रखा धमा??? काश की तुम मुझें उठालो

तो मनात च्यायला इतकी वर्ष सुखात होतो आता हिच्या बरोबर रहायच म्हणजे... देव जर असला तर त्यानं असं का केलं माझ्या बरोबर ?? काश...

पुरूषांच्या नशिबात सुख नाहीच...

धमा अन् देव इतकी वर्ष हा सारा प्रकार पहात असतात अन् ठरवतात ह्यांच्यापैकी कुणीच जर सुखी नसेल तर काय फायदा?

अचानक प्रचंड पाऊस सुरू होतो अन् विमान कॅन्सल होतं!!

मुलगी ही एरपोर्ट बाहेर ट्राफीक मध्ये अडकलेली असते. अन् तेवढ्यात एक अतिशय सुंदर आभू. विरहीत बाई येते अन् म्हणते दरवाजा उघड तू बोलावल्याप्रमाणं मी आल्ये तुला न्यायला मुलगी वाद घालत असते धमाबरोबर जेंव्हा बोलावल तेंव्हा आली नाहीस आता काय उपयोग ??

धमा - बोलावल्या बरोबर यायला मला काय उद्योग नाहीत काय?? आत्ताच इथले दोन नवे क्लायंट्स मिळवून आले तर तुझा विचार ध्या नात आला फॉलोअप लावला होता गं मी मेलमध्ये पण सिस्टीमच स्लो आहे त्याला काय करणार आत्ता तुझा नंबर लागलाय चल लवकर.

मला घरकामंही आहेत फॉलोअपवर

मुलगी अजूनही तिथं तूच घका करतेस ???

नाही गं सगळ्या पुरूषांना तिथं घका करावी लागतात त्यांच्यावर लक्ष ठेवायला मी

फारच ? विचारतेस चल आता..

मुलगी - म्हणजे काय?? असं ? विचारणं हेच तर आमच्या पिढीच महत्वाच काम आहे वेळच्यावेळी पुर्वजांनी उत्तर दिली असती तर ही वेळ आली नसती...

मुलगी धमाबरोबर गेली.. शेवटी जावंच लागलं तिला

***

आई अन् तो एरपोर्टच्याबाहेर पडतात तेवढ्यात... एक हॅन्डसम तरूण येतो अन् म्हणतो मी तुम्हाला न्यायला आलोय.

आई - गरज नाही त्याची आम्ही इथं जवळच रहातो

हॅ. त. - अहो मी तुम्हाला दोघांना नाही ह्याना न्यायला आलोय!

आई - का पण??? कुठं??

हॅ. त. - सॉरी ते सांगायची परवानगी नाही! चला लवकर

तो - अहो पण मला तरी विचाराल की नाही यायचय की नाही ते... काय व्यक्ति स्वा. आहे की नाही??

हॅ. त. - हे बघा तुम्हीच नाही का मगाशी बोलावलत मला चला आता लवकर. मला अजून बरीच कामं आहेत

तो त्या हॅ. त. बरोबर गेला...

आई गहन विचारात मला काय करावं हेच आता सुचेनास झालंय...

धरणीमाते त्याच वेळी तू मला न्यायला हव हो तस जूनही उशी...

धमा- चला जशी तुमची इ च्छा.

आई कोण तू हे बघा मला त्रास देऊ नका

धमा - मी धरणीमाता मागच्या वेळची चूक आता नाही करणार! ( ती चूक येवढी महागात पडेल असं माहिती असतं तर केंव्हाच निस्तरली असती मी केवळ ह्य एका केसमुळं माझ्या ह्यांच प्रमोशन नाकारलं ह्या वर्षीच्या अप्रायजल मध्ये तरी काहीतरी मिळूदे नाहीतर घस्फो. शिवाय मार्गच नाही उरत... नाही पण ह्या वेळेस मी माझं टारगेट अन् ह्याच टारगेट खूप आधीच अचिव्ह केलय सो फिकर नॉट बघुया आता काय होतंय ते...)

आई हे देवा उशीरा मिळालेला न्याय हा एक अन्यायच असतो! अन् माझ्या बाबतीत पूर्णपणे अन्यायच झालाय. धिस इज रिली सॅड!

देव - आता काय करावं अजूनही ही खुश नाही ती नाहीच! धमाच टारगेट पूर्ण झालं तर तिला अन् त्याच्या तिला प्रमोशन मिळणार हे नक्की हे होणं शक्य नाही.

कोण आहे रे तिकडं चिगू ला बोलवा

चिगू हे बघ ते मंगळावरन आले होते ना परवा लोक त्यांना म्हणावं मला डेमो बघायचाय आताच्या आत्ता

डेस्टीनेशन पॄथ्वी! धमा अन् तो ह्या सगळ्यांसकट पॄथ्वी उडवा!

फक्त एक कर त्या आईला फक्त जिवंत ठेव. तिला अजून एक संधी देणं आवश्यक आहे.

तिचा हा आक्षेप घेणं मला कदापिही मंजूर नाही!!!

मंगळावरन मिसाईल डागलं गेलं - अन् ...

क्रमश. Happy Biggrin Biggrin Proud

आईच्या "त्या" चे आईस पत्रः

प्रिय x,

तू माझ्या आयुष्यातून गेल्यावर माझे सगळे आयुष्यच बदलून गेले. तुझी आठवण येऊ नये म्हणुन मी अनेक मुलींबरोबर फिरायला लागलो. त्यातिल काही सॉल्लिड होत्या, काही आईटम होत्या आणि काही रापचिक पण होत्या. पण माझ्या आईला पसंत नव्हत्या. ती म्हणायची की, एखादी चांगली मुलगी बघून तिच्याशी लग्न कर. पण तिचं न ऐकता माझी ऐश चालूच होती. शेवटी तिनीच मझ्यासाठी एक गावाकडची मुलगी पाहून माझे जबरदस्तिनी लग्न लाऊन दिले.

त्या माझ्या बायकोला मी खूप त्रास दिला. कधी तिला वचावचा बोलायचो, कधी तिच्याशी कचाकचा भांडायचो आणि कधी तिच्यासमोर तुझ्या आठवणीनी ढसाढसा रडायचो सुद्धा. शेवटी ती मला कंटाळून निघून गेली. त्या धक्क्यानी माझी आई पण गेली.

मग मला जाणवलं, की मी सतत सर्व बायकांना त्रास दिला आहे. ज्या मुलीं बरोबर फिरलो त्यांना एका वेळी एकी बरोबर न फिरून, बायकोला काही सुख न देऊन, आईला मनस्ताप देऊन... मग मी ठरवलं की, माझी ही बायकांना त्रास द्यायची जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही. म्हणून मी जीव द्यायचं ठरवलं. पण मला कुठलाही रक्तबंबाळ होणारा पर्याय नको होता. म्हणून मी झोपेच्या गोळ्या घ्यायचं ठरवलं. आज रात्री घ्या, सकाळी ओके. शेवटी मी हाच पर्याय फायनली वापरला.

आता तुझ्या पत्रातून तुला माझ्याकडे यायची ईच्छा आहे हे कळलं. छानच आहे, नाहीतरी मला इथे खूप एकटं वाटतय. आणि बायकांना त्रास द्यायची माझी खोड पण आता मोडली आहे. मी तुला सुखात ठेवेन. मी आज रात्री बारा वाजता तुला घ्यायला येईन. आता तुझा त्याच्यावर आक्षेप असेल तरी मी येणारच. ही ही हा हा हा!

तुझाच,
y

हा घ्या अजून एक शेवटः

बाबा आनंदात होता, कारण एवढ्या वर्षांनी त्याला त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य परत मिळणार होते. कोणी त्याला तू ह्याच रंगाची पँट का घातलीस किंवा आई-अप्पांसमोर धप्पदिशी बसलास म्हणून फडाफडा बोलणार नव्हते.....

आई सचिंत होती कारण ''त्या''ची बायको तिचं हक्काचं नवर्‍याचं घर सोडायला तयार नव्हती. तिची अपेक्षा होती की आपल्या नवर्‍याच्या प्रेयसीने आपल्याच घरी येऊन राहावे व आपले सर्व घरकाम सांभाळावे, म्हणजे आपल्याला रोज नवर्‍याचे व स्वतःचे पैसे उडवायला, टाईमपास करायला संधीच संधी! आता प्रियकराचा सहवास हवा तर हे सर्व सहन करणे आईला भाग होते. त्याच्या बायकोला 'न्हाय' म्हणण्याची तिची हिम्मतच नव्हती ना!

बेटी खुश होती, कारण एकदा आई कटल्यावर तिला तिच्या बॉयफ्रेंडला घरीच राहायला बोलावता येणार होते.

आई निघाली. ''तो'' तिला घ्यायला आला होता. बाबा तिला सोडायला ''त्या''च्या गाडीपर्यंत आला. बेटीने आईचे सामान गाडीच्या डिक्कीत ठेवले. आता साश्रू नयनांनी, बॅकग्राऊंड म्युझिकसह ते एकमेकांचा निरोप घेणार तोच ध. मा. ला जाग आली.....अरेच्या! आईने मला तिला पोटात घ्यायची रिक्वेस्ट केलेली....पार विसरले होते.... त्या वेंधळेपणाच्या गप्पा वाचल्यापासून असंच होतंय राव...... आणि मग ध. मा. ने मोठ्ठा ssss आ sss वासला.... आणि आई, बाबा, तो आणि बेटी सगळेच्या सगळे ध. मा. च्या पोटात गुडुप्प जाऊन बसले!!! दि एन्ड! Happy

तळटीप : त्या वर्षी ''त्या'' च्या ''विधवा'' बायकोने ध. मा. ला विशेष बोनस दिल्याचे ऐकिवात येते!

>>>>>>>>>>>तुमचा संसार झाला असेल तर प्रोफेसरांना माझ्याकडे पाठवून दे.
Rofl

मन्या आणि अशिष , Rofl

Rofl Rofl Rofl Rofl Rofl हे खरं तर विनोदी लेखन सदरात यायला हवंय्...अजीत राव ..बघा किती पर्याय मिळाले तुम्हाला शेवटासाठी...किती चांगले आहेत सगळे मा.बो कर...अहो नाराच आहे इथला.."एकमेका साह्य करु...."

अशक्य हसले सगळे शेवट वाचुन..मस्त..विनामुल्य मनोरंजन Lol

तळटीप : त्या वर्षी ''त्या'' च्या ''विधवा'' बायकोने ध. मा. ला विशेष बोनस दिल्याचे ऐकिवात येते! >> अगदी अगदी सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळलाय नुसता

आणि हे काय गेल्या तीन दिवसात एकालाही नविन शेवट सुचला नाही???????????? शो. ना. हो. Proud

Pages