'बेटा हे माझे तुला शेवटचे पत्र. तुझ्या मनात माझी काय प्रतिमा शिल्लक राहीली आहे मला माहीत नाही. ती कशी असावी याचा माझा काही आग्रह नाही, पण माझ्या मनातील विचार तुला कळावे म्हणून हा पत्रप्रपंच.
तो माझ्या आयुष्यात आपल्या बाबांच्यापुर्वीच आला होता. बी.ए. ला आम्ही एकाच वर्गात शिकत होतो. त्याच्यासोबत असताना मला एक छानशी अनुभुती होत असे. सुरक्षित वाटत असे. विविध विषयांवर एकमेकांचे विचार ऐकणे, तासंतास एकमेकांशी बोलत राहणे, महाविद्यालयातील विवीध कार्यक्रमात दोघांनी मिळुन भाग घेणे सगळं छान सुरु होतं.
बी.ए. च्या दुसर्या सेमिस्टरला आपले बाबा आमच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजु झाले. अल्पावधीतच ते आमच्या वर्गात प्रिय झाले. आमच्यासोबत ते बर्याचवेळा येत असत. आमच्या वयातील अंतर काही फार नसल्याने ते आम्हाला आमच्यातील एक वाटत असत. त्याच्यातील आणि माझ्यातील जवळीकीचा अंदाज सुरुवातीलाच बाबांना आला. त्याबद्द्ल त्यांनी आमच्याशी सविस्तर चर्चा देखिल केली होती.
पहिलं वर्ष व्यवस्थित पार पडलं. आप्पांनी माझ्यासाठी स्थळं बघायची का अशी आईकडे विचारणा केली. आईनं ते माझ्या कानावरं घातलं. बी. ए. पुर्ण होऊ दे असं मी त्यावेळी आईला सांगुन वेळ निभावून नेली. या संदर्भात आप्पांशी स्पष्टपणे मी बोलणे त्याकाळी अजिबातच शक्य नव्हते. जी काही चर्चा व्हायची ती आई मार्फत.
मी हा प्रसंग त्याच्या कानावर घातला. शिक्षण अजुन सुरु असल्याने काय करावे असा प्रश्न होताच. तरी मी घरी तसे सांगावे असं त्याचं मत होतं. माझ्याने त्यावेळी हिंम्मत झाली नाही, पण अगदीच प्रसंग उभा राहील त्यावेळी धीर करु असं ठरविले.
तसा प्रसंग एवढ्या लवकर समोर उभा ठाकेल असे वाटले नव्हते. एक दिवसं कॉलेजसाठी निघतांना आईने मला ते सांगितले एक स्थळ सांगुन आले आहे. उद्या ते आपल्या घरी येणार आहेत तुला बघायला, आणि मुलगा तुमच्याच महाविद्यालयात प्राध्यापक आहे. पायाखालची जमिनच सरकल्यासारखे वाटले.
आईला सगळा प्रकार सांगितला. आई प्रचंड घाबरली. तिला काही सुचेनासे झाले. ती मटकन खाली बसली. आप्पाना हे कसे सांगावे हा गहन प्रश्न तिच्यासमोर उभा राहीला. मीच तिला आधार देऊ लागले. थोड्या वेळाने शांत झाल्यावर तिने मला महाविद्यालयात जायला सांगितले. म्हणाली मी बोलुन बघते आप्पांशी. ऐकतील की नाही हे मी नाही सांगु शकत. घरातुन निघताना आईला विचारले मुलाचे नांव काय ? आईने आपल्या बाबांचे नाव सांगितले. मला हसावे की रडावे तेच कळेना. धीर करुन महाविद्यालयात गेले.
त्याच्या कानावर सगळं घातलं. दोघेही गंभिर झालो. थोड्यावेळाने आपले बाबा आमच्या जवळ आले. मला विलक्षण संकोचल्यासारखे झाले. काय विचित्र परिस्थितीत मी अडकले होते माझं मलाच ठाऊक. काय करायचं ठरवलं आहे ? आपल्या बाबांनी आम्हाला सरळ सरळ प्रश्न केला. सरं तुम्ही या स्थळाला नकार द्या. काय म्हणून ? आपल्या बाबांनी मला विचारले. माझ्या डोळ्यातुन घळाघळा पाणी वाहू लागले.
दोघांनी माझी समजुत काढ्ली. आप्पा काय म्हणतात यावर संगळं अवलंबून होते. घरी जाऊन काय वाढुन ठेवले आहे याची भयंकर धास्ती वाटत होती. भीत भीत घरात प्रवेश केला. घरात विलक्षण शांतता होती. घरात फक्त आईच होती. तिच्यासमोर उभी राहीले. आईने मान हलवुनच सांगितले. नाही. शक्य नाही.
संपले. माझ्या पायातली शक्तीच नाहीशी झाली. आता काय? थोड्यावेळाने आप्पा बाहेरुन आले. त्यांच्या नेहेमीच्या जागेवर बसुन मला समोर उभे केले. माझ्या डोळ्यात पाणी मावत नव्हते. त्यांनी माझ्याकडे एकदा बघितले. तुला कसे सांभाळेल तो? शिक्षण सुरु, नोकरी नाही. आप्पा नोकरी मिळेल ना बी. ए. झाल्यावर. आप्पानी हवेत नकारार्थी हात हलवित मला विचारले जातीचं काय? तो आपल्या जातीचा नाही त्यामुळे हे शक्य नाही. उद्याच्या तयारीला लागा, आणि हो या प्रकाराची कुठेही वाच्यता केलेली मी खपवून घेणार नाही.
माझे प्राणच कंठाशी आले. आता सगळं काही आपल्या बाबांच्या हाती होते. दुसर्या दिवशी तो सोपस्कार पार पडला. आता आपल्या बाबांकडून काय उत्तर येते यावर संगळं अवलंबून होते. दुसर्या दिवशी मला महाविद्यालयात जाण्याची हिंम्मतच होईना. काय करावे काही सुचत नव्हते. पण गेले नाही तर त्याच्याशी बोलणे कसे होणार या विचाराने मनाचा निग्रह करुन मी महाविद्यालयात गेले. आपल्या बाबांनी आम्हाला दोघांना बोलावुन घेतले. परत एकदा विलक्षण विचित्र परिस्थीती उभी राहीली.
आपले बाबा आम्हाला म्हणाले तुम्ही थोडं धाडसं केलं तर काही बिघडणार नाही. काही काळानंतर संगळं काही सुरळीत होईल अश्या घटना घड्ल्या आहेत. त्यात आजकाल एवढं विशेष राहीले नाही. मी तुमच्या सोबत आहे. त्याचं म्हणणं होतं मी आप्पांना समजवावे. त्याला आमच्या नात्यात कुणाचाही आक्षेप नको होता. जे कधीही शक्य नव्हते.
मग माझ्या अग्निदिव्याचा दिवस उजाड्ला. आपल्या बाबांचे आणि माझे रितसर लग्न झाले. एका जिवलग मित्राप्रमाणे त्यानी मला सांभाळले. लग्न झाल्याबरोबर पहिल्या एकांतात त्यांनी मला विचारले तुला त्याच्याकडे जायचे आहे का? आता तु माझी बायको आहेस, आणि मी तुझ्या सोबत आहे.
मी आपल्या बाबांना विचारले सगळं माहीत असुन देखील तुम्ही लग्नाला का तयार झालात? ते म्हणाले हे बघ मी तुला नकार दिल्याने काय फरक पडला असता? मला आधीपासुनच सगळं माहीत होतं म्हणून ठीक, त्यामुळे तुझ्या मनात अपराधी भावना निर्माण होण्याचे काहीच कारण नाही. समजा मी नकार दिला असता आणि तुझं लग्न तिसर्या कुणाशी झाले असते तर तिघांची फसवणूक झाली असती. मी तुला परत एकदा सांगतो, तुला त्याच्याकडे जायचे असल्यास माझी हरकत नाही फक्त जाण्यापुर्वी सांगून जा.
माझ्यात तेवढी हिंम्मत नव्हती. मनाचा निग्रह केला. आपल्या बाबांचा स्विकार केला. तुझा जन्म झाला. तुझं शिक्षण, लग्न, तुझं मातृत्व संगळं व्यवस्थित पार पडलं तु सुखात आहेस हे बघुन जीवन धन्य झाले. जीवनातील सगळी कर्तव्यं पार पड्ल्यानंतर आपल्या बाबांनी मला परत हिंम्मत दिली. विचारले तुला त्याच्याकडे जायचे असेल तर तु अजुनही जाऊ शकतेस.
मधल्या काळात आई गेली, आप्पादेखील गेले. हे संगळं तुझ्यासमोर मांडले. तुला ते पटले नाही. बेटा आधी आप्पांच्या आक्षेपाखातर अग्निदिव्य केले. आता तुझा आक्षेप सहन होत नाहीये. मला परत एकदा अग्निदिव्य करायचे नाही. याक्षणी धरणीमाय मला उदरात घेईल का? माझी तेवढी पात्रता नाही...........संपविते आता.'
या कथेचा शेवट ती आपल्या आयुष्याच्या शेवटाने करते असा माझा विचार होता. तो मी तुमच्यावर सोपवतो. वाचकांनी आपल्या सोईचा शेवट सुचवावा.
१. मुलीने आईला परवानगी दिली, आई त्याच्यासोबत निघुन गेली.
२. आईने परिस्थितीशी तड्जोड करुन बाबांसोबतच आयुष्य घालविले.
३. आक्षेप आणि परिस्थितीला शरणं न जाता तिने आपला जीवनकाळं संपविला.
मित्रहो प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. धन्यवाद.
मला हे कळत नाही..कथेचे लेखक
मला हे कळत नाही..कथेचे लेखक कोठे गेले आहेत??सर्वांनी भरपूर शेवट सुचवले आहेत..भरपूर हसले आहे मी..पोट खरचं दुखते आहे..
पण कोणी अशी कथा कशी लिहू शकतं??ज्या कथेला कोणतेही योग्य LOGIC नाही...कॄपा करून
एकता कपूरचा आदर्श घेऊ नका लेखकमहाशय...
पूर्ण कथाच खटकली आहे..
१)प्राध्यापक आपली सारासार विचार करण्याची क्षमता हरवून बसलेले दिसतात..
बायकोचे affair आहे माहीत असूनही लग्न करतात...आणि सारखे सारखे तिला जायला सांगतात..??
सत्ययुगातही अशी माणसे नसावीत..
२)एवढे वर्ष प्राध्यापकांबरोबर संसार करूनही "आईला" प्रियकराकडे जाण्याचे डोहाळे लागावेत??
आठवे आश्चर्य...काळाबरोबर कोणतीही व्यक्ती आपला भूतकाळ विसरून जाऊन वर्तमानकाळाचा स्विकार करते..
३)आणि परत मुलीची परवानगी मागणे म्हणजे कहर..
कॄपा करून आणखी अशा कथा लिहून आम्हाला जास्त हसवण्याचा आणि स्वतः हास्यास्पद बनण्याचा प्रयत्न करू नये..
धन्यवाद...
आप्पानी हवेत नकारार्थी हात
आप्पानी हवेत नकारार्थी हात हलवित मला विचारले जातीचं काय? तो आपल्या जातीचा नाही त्यामुळे हे शक्य नाही.

<<<
मला दररोज या वाक्याचं हसु येतय.. हवेत नकारार्थी हात हलवत अप्पा भलतेच डॉयलॉग्स कसे काय झाडतात .. हाताचा आणि वाक्यांचा काही ताळमेळ च नाहीये.. म्हणजे हात नकारार्थी हलवत 'नाही' म्हणणे सोपय पण नकारार्थी हात हलवत प्रश्न करणे.. बाप रे.. किती प्रॅक्टिस केली तरी जमत नाहीये.. अशक्य विनोदी..
डिजे.. अगं कसल्या कसल्या
डिजे.. अगं कसल्या कसल्या प्रॅक्टीसेस करतेस....
अगं नीरजा, ते अप्पा लय भारी
अगं नीरजा,

ते अप्पा लय भारी दिसतात, हवेत नकारार्थी हात हलवत प्रश्न विचारयचा म्हणजे महा अवघड..
करुन बघ ..हवेत नकारार्थी हात हलवायचा आणि विचारयाच 'जातीचं काय '?
हवेत हात नकारर्थी हलवायचा आणि बोलायच् भलतच, मग ते नकारार्थी हात 'टाटा बाय बाय' सारखे नाही का वाटणार
डीजे.. अचूक निरीक्षण!!
डीजे.. अचूक निरीक्षण!!
सर्वचेच शेवट महान आहेत. मी एक भर घालते...
प्रिय आई,
तुझे पत्र मिळाले. तुला माझी परवानगी नक्की कशासाठी हवीये ते मला समजले नाही. तरीपण मी तुला काही सल्ले देतेय. माबो वर लिहायला लागल्यापासून मला हे सल्ले देण्याचे काम फारच आवडलाय.
ला परत एकदा अग्निदिव्य करायचे नाही. >>> तुला अग्निदिव्य नाही करायचेय का? की करायचे आहे?? मग मागच्या आठवड्यात आणलेले कोळसे पेटव आणि त्यावरून चालत जा. अधिक माहितीसाठी युक्ती सुचवा/युक्ती सांगा बीबीवर प्रश्न विचार.
तुला धरनीमातेने स्वतःच्या पोटात घ्यावे अशी इच्चा आहे का?? मग तिला नुसती रिक्वेस्ट करून काय फायदा? एक काम कर.. घराबाहेर पड. आणि रस्त्यावरून चालत जा. कुठेतरी लोक बोरवेल खणत असतील.. तिथून आत उडी मार. बोरवेल अम्धून जाणार नसशील तर् सांऑरस्॥णीर्ऑव्ण्स्ण (सॉरी, कॅप्स लॉक ऑन झालं) समोरच्या कुलकर्णीच्या विहीरीत उडी मार. आपोआप धरणीमायच्या उदरात जाशील. विहीरीतूनही उडी मारायला जमलं नाही तर अगोच्या "मी वजन कसे कमी केले?" या बीबीच्गी शंभर पारायणे कर.
माझी तेवढी पात्रता नाही...........संपविते आता.>>> हा प्रश्न तू स्वयंपाक घरातील भांडी व उपकरणे यावर विचारलास असतास तर बरे झाले असते. तिथे विविध पात्राची उदा, इडलीपात्र आप्पेपात्र मोदक्पात्र या वर चर्चा गेल्याच आठवड्यात चालू होती.
बरं आता तू संपवतच आहेस म्हटल्यावर मी काय बोलणार.. अॅडमिननी विषय बंद करण्याआधी तू संपवणे कधीही खरंच चांगले. यावर मी आता तुला काहीही प्रतिक्रिया देणार नाही याची खात्री बाळग.
आणि हो. या सर्व पत्रात उल्लेख केलेला तो "माणूस" कोण याची जाहीर कबूली दे असे आव्हान मी तुला देतेय अन्यथा, तो तुझाच एक डुप्लिकेट आयडी आहे हे मान्य कर आणि हे सर्व काही तू फक्त आणि फक्त बाबाना त्रास देण्यासाठी रचलेले कुभांड आहे हेदेखील मान्य कर..
तुझ्या या आचरट पत्रावरती प्रशासक काय कारवाई करत आहेत याचीच मला आता उत्सुकता लागलेली आहे.
==============
पहाटे पहाटे मला जाग आली..
==============
सगळ्यांचे शेवट एकदम जबरदस्त..
सगळ्यांचे शेवट एकदम जबरदस्त..
नंदू :D सुटली आहेस अगदी
नंदू
सुटली आहेस अगदी 
बापरे. त्याना काय अपेक्शित
बापरे. त्याना काय अपेक्शित असेल शेवट आणि तुम्ही कसले कसले शेवट लिहले हे?
मजा आली पण वेगळाआ विचार.
इतकी अचाट आणि अतर्क्य गोष्ट
इतकी अचाट आणि अतर्क्य गोष्ट लिहून शेवट विचारल्यावर सगळीच डोकी सुटणार ना अस्ताव्यस्त... तसंही इथे STY म्हणलं की सगळ्यांच्या अंगात येतं.. हा सिमिलर प्रकार...
या कथेवरच माझा आक्षेप
या कथेवरच माझा आक्षेप आहे.कथेचे नाव योग्य आहे
सगळेच आक्षेप घेत आहेत
STY म्हणलं की सगळ्यांच्या
STY म्हणलं की सगळ्यांच्या अंगात येतं.. >> नाही हां इतक्या पोस्ट तर गणेशोत्सवातल्या एसटिवाय मधेही नसतात हल्ली. इथे अगदी अंगात आलेय सर्वांच्या
मग यावेळी गणेशोत्सवात STY
मग यावेळी गणेशोत्सवात STY च्या ऐवजी शेवट सुचवा करायला हवे काय?
मी मुळ कथा खूप वेळा वाचली.
मी मुळ कथा खूप वेळा वाचली. खूप शेवट पण सूचत आले होते, पण दरवेळी 'आपले बाबा' हे वाचून गजनीचा जॅक ठाण्णकन डोक्यात बसल्यागत झाले. ही भयंकरच थोर क्रांतिकारी कल्पना आहे. 'आपले बाबा' इटसेल्फ हॅज अ बिग स्टफ इन इट. लेखक त्यातून काहीतरी सुचवू इच्छित आहे, पण ते कुणाच्याही लक्षात येत नाहीये. अरेरे, अरेरे.
साजिर्या... घाणेरड्या...
साजिर्या... घाणेरड्या...
साजिर्या नुसती हिंट नको
साजिर्या नुसती हिंट नको बुवा.. नीट काय ते लिही
जिरावन - लिहीच मग नीट ...
जिरावन - लिहीच मग नीट ...
दादा ..... मी काय म्हणतो
दादा .....
मी काय म्हणतो ....
असे होत नसते ..
काय्चाकै का मन्ग आता ..
हसाव कि रडाव तेच कळत
हसाव कि रडाव तेच कळत नाही..........
..................
..........................
..................................
.....................................
वाचवा ह्या जीवघेण्या कॉमेडी पासून............
हसाव कि रडाव तेच कळत नाही..........
हसाव कि रडाव तेच कळत नाही..........
हसाव कि रडाव तेच कळत नाही..........
हसाव कि रडाव तेच कळत नाही..........
हसाव कि रडाव तेच कळत नाही..........
अरे वा, ही कथा आली का वर? मी
अरे वा, ही कथा आली का वर?
मी माबोवर नवीन असताना ही कथा आणि त्यावरच्या पोस्टी वाचून जाम हहपुवा झाली होती.

जबरी करमणुक
माझ्या की बोर्डचे पैसे भरून
माझ्या की बोर्डचे पैसे भरून द्या कुणीतरी!! कॉफी पिताना वाचायची चूक केली आणि फुर्र्किनी सांडली कॉफी इथे!!! आईगं!!!!
आवरा!!
माझी तेवढी पात्रता
माझी तेवढी पात्रता नाही...........संपविते आता...
----
मी घरी आले तेव्हा आइ कोठेच नव्हती. खुप शोधले, पोलिसात तक्रार दिली , आता ५ महिने होउन गेले....
---
शेवटची आठवण म्हणजे मी बिछान्यावर झोपले होते. मी कोण आहे काहिच कसे आठवत नाहि. माझि काळजी घेणारा हा सद्ग्रुहस्थ माझ्याच वयाचा असावा. चांगला वाटला. नंतर बोलताना कळले तो बी.ए. झालेला आहे. लग्न केले नाहि. कोणीतरी त्याला धोका दिला म्हणे. मग त्याने स्वताचा व्यवसाय चालु केला आणी आता ४ कंपन्या आहेत. हे सर्व सांगताना तो असा माझ्याकडे रोखुन का पहात होता कळले नाहि......
--- अजुन ३ वर्ष आहेत सिरियल संपायला. इतक्यात कसे सोडु तुम्हाला शेवट करुन ?
हम दिल दे चुके सनम ची आठवण
हम दिल दे चुके सनम ची आठवण झाली..
खूप हसले ब्वा! लै भारी! तोडलत
खूप हसले ब्वा! लै भारी! तोडलत राव........मी हे सुचवेनः
एक दिवस प्रियकर मुलीला पत्र
एक दिवस प्रियकर मुलीला पत्र लिहितो.......
''आयला तुझा बाप काय साठाळलाय का ग? तेव्हा सगळ माहित असून पण माझ प्रेम हिस्कावल. आणि आता कण्टाळा आला तेव्हा ही ब्याद माझ्या गळ्यात टाकतोय काय?.......आणि तुझ्या आईला माझ्याकडेच पाठवायची होती तर गेल्या आठवड्यात आपल्या लग्नाला होकार का दिला..........त्याला म्हणाव हे एकता कपूर श्टाईल फालतू खेळ थाम्बव आता....( बायको मुळे ह्या सिरियल मी सकाळ दुपार सन्ध्याकाळ बघत असतो. तेव्हा आता ते सगळे खेळ माझ्यासाठी रोजचेच पोरखेळ झालेत).
आणि हो त्याला म्हणाव आता दोघे म्हातारा म्हातारी पोरीच कन्यादान करा आणि जा तिर्थयात्रेला.........तेवढाच आपला हनिमून चा खर्च तरी वाचेल ना.......तुझ्या घरीच साजरा करुया!''
कथेबद्द्ल काहीच म्हणायचं
कथेबद्द्ल काहीच म्हणायचं नाही, पण प्रतिसाद.... सही रे सही !
अशा उदास पावसाळी दुपारी (म्हणजे ऑफिसमधे असेल तर उदास, नाही तर झकास), खुप खुप बोअर झालं असताना, प्रचंड करमणुक झाली.
आणि दीपांजली सगळ्यात भारी,
आणि दीपांजली सगळ्यात भारी, कारण मी इथे ते पिल्लु सोडुन दिले आहे, सगळे प्रॅक्टिस करताहेत ते - नाही नाही असा हात हलवत वाक्य भलतंच बोलायची. प्रचंड करमणुक.
थोर, महान, भयंकर विनोदी असे
थोर, महान, भयंकर विनोदी असे कायसेसे आहात सगळे
हि हि हि
हि हि हि हि......................
बाबा म्हणजे महाराज कि मुलांचे
बाबा म्हणजे महाराज कि मुलांचे बाबा ?
पण मला एक कळले नाही.. "आपले
पण मला एक कळले नाही.. "आपले बाबा" ??? तुझे बाबा ठिक .. पण आपले?
Pages