ऑरगॅनिक आणि नॉन ऑरगॅनिक दुध - तुलना

Submitted by मो on 5 March, 2010 - 11:28

संयुक्ता वर ऑरगॅनिक आणि नॉन ऑरगॅनिक दुधाबद्द्ल थोडीशी चर्चा झालेली दिसली. मुद्दा होता नॉन ऑरगॅनिक दुध आणि मुलींची अर्ली प्युबर्टी. मी ही हे पुर्वी कुठेतरी वाचले होते आणि त्यावेळी इंटरनेटवर जरा शोधायचा प्रयत्न केला होता. इंटरनेटवर युजर फोरम्फोवर लोकांच्या चर्चा दिसल्या होत्या, पण विश्वसनीय साईटवरुन फार काही माहिती मिळाली नव्हती. ऑरगॅनिक आणि नॉन ऑरगॅनिक दुध, त्यांच्यातला फरक, तुलना इत्यादी मोलाची माहिती मात्र तेंव्हा कळली. संयुक्तावर रिप्लाय द्यायला घेतला पण विचार केला की ही माहिती सगळ्याच मायबोलीकरांकरता महत्वाची ठरेल, म्हणून वेगळा लेख!

थोडी माहीती रेग्युलर किंवा नॉन ऑरगॅनिक दुधाबद्दल -

अमेरिका, युरोप आणि जगातल्या इतर बर्‍याच प्रगत देशांमध्ये गायींना जास्त दुध यावे म्हणून ग्रोथ हॉर्मोन्स, अँटिबायोटीक्स इत्यादी देतात, त्यांना जो चारा आणि अन्न खायला देतात ते पण प्रॉसेस्ड असते. एका एका गोठ्यात हजारो गायी असतात आणि फक्त दुध निर्मीती ह्या करताच त्यांना पाळले जाते. बर्‍याच ठिकाणी त्यांना मोकळ्या कुरणांवर चरायलाही बाहेर सोडत नाहीत. नैसर्गि़क नसलेल्या अश्या वातावरणात ह्या गायी पाळून दूध निर्मिती केली जाते. ह्या दुधात हॉर्मोन्स आणि पेस्टीसाईड्स चे अंश जास्त प्रमाणात सापडतात. नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या दुधापेक्षा बर्‍याचदा हे निकॄष्ट दर्जाचे दुध असते (ह्याबद्दल इंटरनेटवर दुमत सापडेल). व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सीडंट्स, फॅटी अ‍ॅसिड्स, CLAs (Conjugated Linoleic Acids) ह्यांचे प्रमाण ह्या दुधात ऑरगॅनिक दुधापेक्षा कमी आढळते.

आता ह्याचा अर्थ असा नव्हे की हे दुध पिऊ नये किंवा शरीराला खूप अपायकारक असते, परंतू जी गोष्ट आपल्या रोजच्या आहाराचा अविभाज्य घटक आहे तिच्याबद्द्ल जास्त माहिती मिळालेली कधीही चांगली, म्हणजे मिळालेल्या माहितीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. म्हणूनच ऑरगॅनिक दुधाबद्दल थोडी माहिती लिहिते म्हणजे दोघांमधला फरक कळेल.

थोडेसे ऑरगॅनिक दुधाविषयी -
ऑरगॅनिक दूध बनवणार्‍या कुरणांवरच्या गायींना कुठलेही केमिकल्स, अँटीबायोटिक्स किंवा ग्रोथ हॉरमोन्स देत नाहीत. तिथल्या गायींना एकत्र ठासून भरण्यापेक्षा जास्त मोकळ्या जागेत ठेवले जाते. त्यांना जास्त वेळ कुरणांवर ताजा चारा चरु दिला जातो आणि सुर्यप्रकाशात अधिक सोडले जाते. जास्तीत जास्त नैसर्गिक वातावरणात त्यांचे संगोपन केले जाते. त्यांच्या आजारांवर उपचार करतांना त्यांना काही काही पद्धतीची औषधे दिली जात नाहीत जी दुधामध्ये उतरु शकतात. पुर्णपणे नैसर्गिक पद्धतीने हे दुध बनवण्याचा प्रयत्न असतो आणि त्यामुळे ह्या दुधाचा दर्जा अधिक चांगला असतो.

ऑरगॅनिक दुध नॉन ऑरगॅनिक दुधापेक्षा खालील बाबींमुळे जास्त सरस ठरते -
१. ऑरगॅनिक दुधामध्ये पेस्टीसाइड्स चे अंश अतिशय कमी प्रमाणात सापडतात. (जे थोडेफार पाणी, माती इ. मधून गायीच्या पोटात जाऊ शकतात तेवढेच)
२. ऑरगॅनिक दुधामध्ये विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ अ‍ॅसिड जास्त प्रमाणात मिळते.
३. ऑरगॅनिक दुध पिणार्‍या मातांच्या ब्रेस्ट मिल्कचा दर्जा अधिक चांगला असतो, ज्याचा उपयोग आपसूकच बाळाला होतो.
४. ऑरगॅनिक दुधाचे सेवन करणार्‍या लहान मुलांमध्ये दमा, एक्झिमा, अ‍ॅलर्जी इ. प्रमाण कमी असते

इतर अनेक वाद विवादांप्रमाणे ऑरगॅनिक दुध आणि नॉन ऑरगॅनिक दुध आणि त्यांचा दर्जा ह्याबद्दल इंटरनेट वर तुम्हाला बरीच माहिती मिळेत. पण ऑरगॅनिक दुधाच्या दर्जाबद्दल कुठेही दुमत नाही आहे. दोन्हीही प्रकारच्या दुधांमध्ये दुधात सापडणारे मुलभूत घटक हे असतातच, पण मुख्य प्रश्न दर्जाचा आहे.

आपल्या लहानपणी भारतात मिळणारे दुध हे ऑरगॅनिकच होते आणि अजुनही ते तसेच असावे अशी अपेक्षा आहे, मात्र बर्‍याच प्रगत देशामध्ये कॄत्रीम मार्ग अनुसरून दुध उत्पादन जास्त वाढवण्याचा मार्ग अनुसरला जातो. खरं तर तुम्ही विचार कराल गायींना सिंथेटीक ग्रोथ हॉर्मोन्स आणि अँटीबायोटीक्स देण्यात जास्त खर्च येत असेल आणि नॉन ऑरगॅनिक दूध जास्त महाग असायला हवे, परंतू नैसर्गिक रितीने गायींचे संगोपन करण्यात आणि ऑरगॅनिक दुधाचा स्टँडर्ड राखण्यात हा व्यवसाय करणार्‍या लोकांना जास्त खर्च येतो आणि त्यामुळे ऑरगॅनिक दुध हे जास्त महाग असते. मात्र ते टिकतेही जास्त.

महितीचा स्त्रोत -
अंतरजाल
http://www.organicconsumers.org/organic/seven052505.cfm
http://blogs.webmd.com/health-ehome/2009/02/organic-milk-does-body-bette...
http://www.dailygalaxy.com/my_weblog/2008/05/got-organic-new.html
आणि इतर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण अस सगळ पाहिल्यानंतर किंवा ऐकल्या नंतर गोष्टी खाता पिताना काळजी लागते त्याच काय करायच??

आजच oprah पाहिल का कुणी?? त्यात पण आज हाच विषय होता. Food Inc डॉक्युमेंटरी पण दाखवली थोडी. आता होल फुडस थोड लांब असल तरी तिथेच जाइन म्हणते.

आजच्या oprah शो बद्दल इथे बघु शकता.

पण अस सगळ पाहिल्यानंतर किंवा ऐकल्या नंतर गोष्टी खाता पिताना काळजी लागते त्याच काय करायच??>>>>>
खरच गं अमृता, माझं आता सध्या तेच झालं आहे.

Food Inc मध्ये होल फूड्स आणि एकूण 'बिग ऑरगॅनिक' वरही टीका केलेली आहे. त्यात आणि मायकेल पोलॉन च्या पुस्तकांमधे (आणि इतर ही बर्‍याच लोकांकडून) आता 'लोकल' चे महत्त्व जास्त दिसते ऑरगॅनिक पेक्षा.

ह्म्म्म. जस माझा नवरा नेहेमी म्हणतो कि हे ऑरगॅनिक फूड एक फॅड आहे.
पण मग आपण काय करायच... लोकल आमच्याइथे तरी कुठे मिळत मला माहित पण नाही?? Sad

व्वा, खूपच छान व उपयुक्त माहिती. इथे कोरियात पण सगळ्या फूड सेक्शनमध्ये ऑरगॅनिकचा सेक्शन वेगळा असतो, अर्थातच किंमती खूपच जास्त.

पण अस सगळ पाहिल्यानंतर किंवा ऐकल्या नंतर गोष्टी खाता पिताना काळजी लागते त्याच काय करायच??>>>>>सहमत. इथे तर भारतासारखं दूध उकळलंही जात नाही.

प्रत्येक गावात weekend फार्मर्स मार्केट भरते तिथे (होपफुली) local सगळे मिळायला हवे.
http://www.localharvest.org/ - (CSA - Community Supported Agriculture) यांचे जाळे संपूर्ण अमेरीकेत पसरलेले आहे. हे प्रत्येक मोसमात त्या त्या मोसमात येणारी फळे, भाज्या घरपोच पाठवतात. अर्थात हे पण बरच महाग आहे ऑरगॅनीक सारखेच.
मला आठवतय त्याप्रमाणे मिनोती असा भाजीपाला मागवते/मागवायची.

मो,
सुंदर, माहितीपुर्ण लेखाबद्दल आभार...
भारतात अजूनही छोट्या गावात आणि कोल्हापुरासारख्या शहरात ऑर्गॅनिक दूध मिळते... निवांत ने सांगितल्याप्रमाणे भेसळीचे प्र॑माण सध्या प्रचंड वाढले आहे... पुण्यात तर मध्ये दर १० दिवसाला हजारो लिटर भेसळ पकडल्याची माहीती यायची...
मला तर वाटत दूध आणि अशा तत्सम पदार्थांची, जे लहान मुलापासून, वृद्धांपर्यंत गरजेच्या अन्नपदार्थात धरले जातात, यात भेसळ करणार्‍याना जन्मठेपेची शिक्षा अंमलात यायला हवी... मगच असले प्रकार बंद होतील

फारएण्ड, फूड इन्क अजून पहाणं झाली नाही आहे. (नेटफ्लिक्सवर 'इंस्टंट वॉच' च्या खाली आहे त्यामुळे वेळ मिळाला की आधी पहाण्याचा प्लॅन आहे), पण त्यात ऑरगीनिक वर टिका जरी असली तरी ऑरगॅनिक आणि नॉन-ऑरगॅनिक मधला मुलभूत फरक कोणीही अमान्य करणार नाही. मग ते नॉन-ऑरगॅनिक लोकल ग्रोन असले तरीही. लोकल कधीही चांगलेच, ते आपल्यापर्यंत पोहोचायला २-२ आठवडे घेत नाही, रिलेटिव्हली फ्रेश असते, सत्व शाबूत असतात इ., पण तेच लोकल जर खूप हॉर्मोन टोचून, पेस्टीसाईड्स वापरुन बनवलेले असले तर तेही वाईटच.
मला ऑरगॅनिक फॅड वाटत नाही. लोक करतात म्हणून एखादी गोष्ट आपल्याला पूर्ण माहिती नसताना/पटलेली नसताना करण्याच्या मी स्वतः विरोधात असते. पण एखादी गोष्ट माहिती नसताना फॅड आहे म्हणून दुर्लक्ष करणेही बरोबर नाही. आपण जे खातो/पितो त्याच्या आपल्यावर डायरेक्ट परिणाम होतो. त्यामुळेच हा निर्णय खूप महत्वाचा होतो.
ऑरगॅनिक चांगले असले तरीही सगळेच ऑरगॅनिक खाणे जरुरी नाही. खालच्या लिंक वर (किंवा नेट वर बर्‍याच ठिकाणी) तुम्हाला अशा गोष्टींची यादी मिळेल. दुध मात्र महत्वाचेच हे माझे मत. आईच्या किंवा कोणताही फिमेल अ‍ॅनिमलच्या दुधावर ती काय खाते ह्याने खूप फरक पडतो.

http://greenopolis.com/myopolis/blogs/aresende/what-you-should-shouldnt-...

त्यात आणि मायकेल पोलॉन च्या पुस्तकांमधे (आणि इतर ही बर्‍याच लोकांकडून) आता 'लोकल' चे महत्त्व जास्त दिसते ऑरगॅनिक पेक्षा>>लोकल चे मह्त्व हे Food Quality पेक्षा going Green साठी आहे. लोकल असेल तर ऑरगॅनिक असेलच असे नाही, किंबहुना नसण्याचे चान्सेस अधिक आहेत. इथे बरेच असे लोकल Farmers' market आहेत जिथे ऑरगॅनिक आणि नॉनऑरगॅनिक असे वेगळे विभाग असतात.

खूप चांगली चर्चा सुरु केली आहेस मो. मी ऑरगॅनिक, नॉन-ऑरगॅनिक बद्दल आत्तापर्यंत अगदीच उदासीन होते. काहीच ऑरगॅनिक आणत नाही. अगदी दूधसुद्धा नाही. ह्या मागे एक विचार असा होता की आम्ही गेल्या पाच वर्षांत चारदा भारत-अमेरिका अशा वार्‍या केल्या. अजूनही करण्याची शक्यता आहेच. त्यातही भारतात बँगलोर, पुणे, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहणे होते. अशा वेळी इथे सगळे ऑरगॅनिक घेऊन खाल्ले तरी भारतात गेल्यावर तसे खाणे शक्य होईलच असे नाही मग उगीच शरीराची ते पचवायची सवय जाईल. ( नाहीतरी आधीचं सगळं आयुष्य भारतातच गेलं की तिथे कुठे मिळत होते ऑरगॅनिक पदार्थ. भाज्यांवर मारलेली पेस्टीसाईड्स तर अगदी उघडउघड दिसतात डोळ्यांना ) हा तद्दन मूर्खपणाचा विचार आहे खरं तर पण म्हणूनच जागरुक राहिले नाही हेही खरं.
आता इथली चर्चा वाचून्,कुठल्या गोष्टी ऑरगॅनिक खाव्या हे वाचून दूध, दही, अंडी तरी ऑरगॅनिक आणावी असं ठरवलं आहे.

परवाच मी कॉस्टको मधून ऑरगॅनीक बेबी स्पिनॅच आणला. खूपश्या पानांवर पांढरे ठिपके आहेत. नॉन- ऑरगॅनीक स्पिनॅच वर पण कधी असे ठिपके पाहिल्याचे आठवत नाही.
तेंव्हा ऑरगॅनीक म्हणजे सगळं चांगल हा भ्रम दूर झाला.
-- ऑफ सिझनला टोमॅटो महाग असतात म्हणून मी कॅन मधली टोमॅटो पेस्ट, फोडी (dicesd tomatoes )वापरत असे. त्यात भरपूर सायट्रिक अ‍ॅसीड असतं. तेही आता थांबवलं.
---- अमृता, तो Oprah show मी पण पाहिला. त्यातील काहीही खा पण घरी बनवुन खा हे खूप पटलं.

माझ्या मुलीला ओठान्भोवताली atopic dermatitis/ allergic dermatitis चा त्रास होतो .सहसा स्प्रिन्ग्/फॉल सिझन. अमीरीकेत असताना तो बळावतो.भारतात सुटी साठी गेलो असताना बरा असतो. तिला धुळ कोरडी गरम हवा गरम पाण्याने आन्घोळ, गायीच दूध , nuts , soy हे टाळायला सान्गीतलय्.तिला कोणत दूध देता येइल ? अमेरीकेत मला म्हशीचे दूध अस कुठे नाही दिसल. peadiasure /horizon /yoohoo/nesquick असे काही रेडी दूध देता येइल का? ही दुधे काय असतात??? प्लिज मार्गदर्शन कराल का.

ओह. छान माहीती. काहिच माहीत नव्हत. मलापण हे फॅड आहे का काय अस वाटत होतं.
मी पण कधि ऑरगॅनिक बघुन काही आणत नाही. पण इथे जपानी आणी चिनी अशा भाज्या मिळतात. त्यातल्या चिनी भाज्या स्वस्त असतात, पण शक्यतो त्या आणत नाही.
दुधाबद्दल काहीच माहीती नाही इथे. आता शोधुन बघायला हवं