Shikaleli manase ase ka wagatat

Submitted by सुधन्वा on 9 March, 2010 - 11:26

Manus ka shikato? kashasthi shikato? ani mukhya mhanje kay shikato? halli asale prashna far padatat. ata jawal jawal 12-13 warsh nokari karun zali. manufacturing industry baghitali ani IT industry pan baghitali. donhi kade kahi changale kahi waeit ani jast karun waeitach anubhav ale. pan ekandarit ase mat zale ki manufacturingch bare hote.

surawatila engineer zalyawar shop floorla kam karanyachi khumkhumi hoti mhanun dusarya departmentla sandhi asatana shop floor niwadale. 2-3 mahinyat ubag ala sagalya watawaranach. te ashikshit workers. tyanche bolane, rahane, sarakhya shiwya dene. bai warun prachand sherebaji karane. bolanya chalanyatali ek prakarachi magruri wagaire wagaire wagaire. satat tambakhu khawun thunkane ani tyach thikani daba khane. ashakya prakar. prachand gondhal udala manacha. he ase ka wagatat lok. far tar 10-12 zalele. kahi agadi bcom-bsc karun kuthe job milat nahi mhanun ITI karun alele. pan shewati sagale sambhaji bidi marat ani goa nahitar tatsam ghutaka khat bolane. sahebala satat shiwya denari ani atyant udhhat bhashet bolanari manase. he ase ka wagatat? hyanna ka kalu naye ki ase wagun sagalech ekmekanna panyat pahun kahich kaam na karanare anu fukat pagar khanare.

warshanuwarsh ekach thikani kaam karun ata majaleli mandali. nokari warun kadhanyachi bhiti nahi. union ahech pathishi. kahi zale tar union leader jo shop floorla basun fakt shittya marato ani dadagiti karato tyala dew mananari. mag kaam kon karanar. mag malak lokanni nawin klurpti shodhun kadhali. ITI madhalya shikawu mulanna 6-6 kamawar ghayachi. 6 mahine zale ki lath ghalayachi lagech pudhachi batch chalu. lokanna kamawar kayam karayachech nahi. satat adhantari thewayache. he mule diwasbhar rab rab rabanar. ani bakiche kayam zalele workers tyannachya kadhun ghanyala jumpalelya bailasarakhe kaam karawun ghenar.

mag hi nawin pore ani workers milun nawin alelya engineersna chalanar. haluhalu engineers pan tasech honar. lokanna shiwya det, tochun bolat kaam karawun ghenar. halu halu sagale tyache aaikanar. madhala engineer warun sahebache fatake khanar ani khalun worker lokanche.

kantala ala hya sagalyacha. ubag ala hya watawaranacha. he nahi karayache. hya sagalya ashikshitanpasun tambakhu/ghutaka ani widya odhanarya lokanpasun lamb palun jayache. marg kay? 1998-1999 la Y2K jorat. dusara marg MS karayala jayache. gharun pathimba nahi baher jayala. apalyakade paise nahit.

mag tharale IT madhye jayache. jaam paisa milato. chan chan chakachak mandali ani changale watawaran. hushar lok ajubajula. kay majja yeil. Computerscha course kela. watale ata kase sagale zale suralit. mag jirdar dattya basala 2000 chi web boom kosalali sagale jaminiwar ale thodya kala purate. parat market chadhale. chan chan mhanje baherun disanarya company madhye job milala.

aat sagale engineering kelele ajubajula. mag surwat zali projects chya chadha odhila. database design karanyapasun te final testing paryant roj marya marya. sagale swatahala shahane samajanre. ek dusaryala panyat pahanar. are hyala etaka pagar mag mala ka nahi. are hyala he project milale te mala nahi. chyayala hyachi kay layaki ahe he tyala kase kay milele? me kay zak marali ka? me kiti chan code lihito mag PM/PL lokanna kalat kase nahi.

1-2 warshachya anubhawawar lok team lead zali. sagale garam raktache. taje taje nawin rakt. junya lokanna kay kalate. nusate 9-5 kaam karatat. ahmi bagha kiti wel kaam karato te. kay ugachach etaka pagar milato ka? ha nawa darp. sagalech hushar lok mag kay wicharata ho.
halu halu ek ek projects sathi US/UK la jayala lagala. mag team madhye baher janyasathi marya marya. ek ek jan fielding lawun basalela. dusara jara pudhe gela ki magun khechalach. nahitar managerkade jawun kahitari chugali karun kahitari karun swatahache ghode damatnara. far zale tar lagech job change. 6-6 mahinyat job sodune dusarikade ekade jast pagar ahe. tikade tyahune jast pagar ahe. ekade he nawi technology ali ahe tikade ha nawa project chalu ahe.

Mag haluhalu koni gadi ghetali ki jaljal. tondawar tar far chan mhanayache. pan magun jaam jaljal. dusaryacha flat zala, are ajoon ek zala ki. chyayala kay paisa milato ahe. maja ahe buwa wagaire udgar. pan no to samadhani na ahmi samadhani. ahmi palatoch ahot. palatoch ahot. etaka paisa milawun etake sagale karun shewati baghawe tar hatat farach kami urat ahet.

mag ahmi pan alo bharata baher. mhatale ethe alele tari ase nasatil. tar ekade tyahun bhayanak prakar. sagale ektra rahatat pan dusaryala kiti milatat hyawar dola. jamatat sagale ektra pan tyatahi star ahet. contract walya mandalincha tora kahi aurach. te kami pagar walyanna haluchkan had hud karanar. tyanncha group wegala hyancha group wegala. mag garaj mhanun ektra yenar pan dhusfus chaluch. are hyachyakade he ahe. are ha ekade tikade jato sarakha. lai paisa milato mhanje. nidan 50% darubaj zalele. 50% unchi widya fukanare. ani bakiche odhat nahit mhanun tyanna katap karanare. tari marathi mandali ajoon barich bari ahe. North wali/panjabi tar attal darubaj. sagale ekmekanshi god god tondawar bolanar ani magun jaam ukhalya pakalya.

mag kay farak ahe workers ani shikalelya lokanchyat? tyanna dhad don welache milat nahi mhanun apalyala eka weli 4-4 welache milate mhanun? tikade pai pai karun paise sathawun jaganare ani ekade jast paise ahet mhanun udawanare. donhi kade tech widya funakanare. kay farak ahe?

गुलमोहर: 

रोमन लिपित लिहिलेले मराठी अगदी प्रयत्न करुनही वाचवत नाही हो.

थोडा प्रयत्न करा आणि देवनागरीत लिहा. दोनचार वाक्यांनंतर आपोआप जमायला लागेल...

साधनाला अनुमोदन. रोमन लिपीतील मराठी वाचतांना लेखाशी एकाग्र होता येत नाही. त्यामुळे वाचण्यातील मजा निघुन जाते.

प्लीज कोणी तरी मराठीत लिहा , मला फार उत्सुकता लागुन राहीलीय ह्यात नक्की काय लिहिलं असेल ते वाचण्याची , उत्सुकता जाम वाईट असते हो !
Smiley

लोकहो माफी आसवि पन एकदचे मरथि सोफ्त्वर फरच भन्नत अहे .एसकल मध्ये चोम्मेन्त्स लिहितन कहिच त्रस झल नहि. एकदे मल जाम वैतग अला.

सुधन्वा, अहो प्रयत्न करुन बघाच. तुम्हांला वाटतं तितकं अवघड तर नक्कीच नाही. अ-a , आ-aa, इ-i असं अक्षरांप्रमाणे करुन बघा. आणि हे घ्या अधिक माहितीसाठी मदतपुस्तिकेमध्ये देवनागरी कसे लिहावे ते वाचा.
http://www.maayboli.com/node/1554

प्रयत्न करुन बघा. वाटतं तेवढं कठीण नक्कीच नाही.
काय, रोमन लिपीतले मराठी वाचणे की मराठी लिहिणे?

मी वाचले सगळे. नाहीतरी मला काय उद्योग आहे?
थोडक्यात, भारतात नि परदेशात, मॅन्युफॅक्चरिंग नि आय टी, या दोन्ही क्षेत्रात त्यांना फार वाईट वर्तणूक दिसली. वैयक्तिक हेवेदावे, अहंकार, वाईट सवयी इ. अगदी शिव्या देणे, गुटका खाणे, उद्धटपणा वगैरे.

इतरांनी सांगितल्यावरून मला असे कळते की सर्व जगातच, सर्व धंद्यांमधे 'हे असेच चालायचे'. त्यामुळेच नोकरी करून पैसा मिळवणे हे एका वेगळ्या प्रकारच्या कष्टाचे काम आहे. मन थकते. ते सर्वात वाईट. थकलेले शरीर त्या मानाने लवकर ताजेतवाने होते. मन नाही. नि त्याला इलाज नाही. बाहेरची दु:खे बाहेर ठेवून घरात आनंदी असणे हे सुद्धा कठीणच. त्यामुळे घरच्यांनाहि त्रास होतो.

'याला जीवन ऐसे नाव'.

शारिरीक ताकद कमावणे त्या मानाने सोपे, पण मानसिक ताकद कमावणे हि अवघड.

सतत 'मनाचे श्लोक' वाचून काही परिणाम होईल का? कुणाला काही अनुभव?
मनाचे असे कोणते गुण आहेत की जे या सर्व प्रकाराला यशस्वीपणे तोंड देतील?
यावर चर्चा व्हावी असे वाटते.

असे बरेच लोक मला माहित आहेत की जे एव्हढे त्रस्त नाहीत. त्यांचा अभ्यास केला पाहिजे.

Manus ka shikato? kashasthi shikato? ani mukhya mhanje kay shikato? halli asale prashna far padatat. ata jawal jawal 12-13 warsh nokari karun zali. manufacturing industry baghitali ani IT industry pan baghitali.
ऐवजी
maaNus kaa shikato, kashaasaaThee shikato? aaNi mukjya mhaNaje kaay shikato? hallee asale prashna phaar paDataat. aataa javaL javaL 12-13 varshh nokaree karuun zaalee. mEneephEkchareeMg iMDasTree bagheetalee aaNi aay. Tee. iMDasTree paN bagheetalee

असे लिहा म्हणजे मग ते मराठीत नीट उमटेल
हे असे
माणुस का शिकतो, कशासाठी शिकतो? आणि मुख्य म्हणजे काय शिकतो? हल्ली असले प्रश्न फार पडतात. आता जवळ जवळ १२-१३ वर्ष नोकरी करून झाली. मॅनीफॅक्चरींग इंडस्ट्री बघीतली आणि आय टी इंडस्ट्री पण बघीतली.

देवनागरी साठी मदत इथे मिळेल http://www.maayboli.com/node/1554

आऊटडोअर्स, फार चांगले काम केलेत. आता बर्‍याच लोकांना वाचायला मिळेल नि त्यांचेहि अनुभव कळतील.
मलाहि सुधन्वांप्रमाणे या गोष्टीची उत्सुकता आहे, की असल्या वातावरणात कसे जगावे, उन्नति कशी करावी? माझ्या मते जगातले लोक सुधारण्यापेक्षा प्रथम स्वतः कसे त्याला यशस्वीरीत्या तोंड द्यायचे हे महत्वाचे.

झक्की, तुम्ही सर्वप्रथम ते योगाचं आठ दहा दिवसांचं मौनव्रताचं शिबीर असतं तिथे जा. त्याने सगळ्यात पहिली तुमची उन्नती होईल. तुमच्या घरच्यांना नी इथे माबोकरांनाही त्याचा फायदाच फायदा होईल. Light 1

सर्व प्रथम outsourced ह्यन्चे आभर. बकि लोकहो माझ्या मुल मुद्यल्ला कोनिच हात घतल नहिअ. सगले सल्ले देत अहेत कि नोकरि सोद अनि ध्यन कर. मुद्दा हा नहियी. थोदक्यत कोनि विचार करयल तयर नहिये असे दिसते.

मी एथे मझा अनुभाव मन्दलआ अहे. शिकलेले अनिअशिख्क्शित फर कहि फरक दिसत नहिये.

चला बरेच जामलए पन देव्नगरि typing सोपे नहिये. esakal चे

s/w बरे अहे

अहो पण esakal वर कशाला टाईप करताय ? इथे खाली खिडकी आहे त्यात करा ना टाईप.. !!!
रूनी ने वर मदतीची लिंक दिली आहे, तुमच्याच लेखातला मजकूर देवनागरीत दिसण्यासाठी कसं टाईप करावं ते पण दिलय.... प्रयत्न करून बघायचं नाही आणि वर कोनि विचार करयल तयर नहिये म्हणत बसायचं !!! Angry

e-sakal मधे लिहा तिथे जमतंय तर. इथे लिंक द्या. तुम्ही लिहिलेल्या रोमन लिपीमुळे 'ंनुस क शिकतो? कशस्थी शिकतो? अनि मुख्य म्हन्जे कय शिकतो?' हे असलं वाचवत नाही. किंवा इथे देवनागरीकरण करून दिलंय ना आउटडोअर्स ह्यांनी, ते टाका.

अरे हे काय, मी त्यांना अनुवाद करून दिला तरी तो टाकला कां नाही? सुधन्वा, तुमच्या मेल मधला मराठी मजकूर इथे कॉपी पेस्ट करा की. आता तो कसा करायचा? माझे सदस्यत्व मध्ये जा, तिथे वर संपादन नावाचा ऑप्शन आहे, तिथे जाऊन हा इंग्लिश लेख मराठी ने रिप्लेस करा. हाकानाका.

वर रुनी ने तुम्हांला कसं टाईप करायचं ते सांगितलं आहेच. मी ही तुम्हांला वर सांगितलं आहेच.

माझं काही चुकत असेल तर जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे.

वाचणार नाही ज्जा!
सगळा मजकूर आडो ने पाठवलाय देवनागरी करून आणि तुम्ही कॉपी पेस्ट करायचे पण कष्ट घेत नाही. मग आम्ही कशाला विचार करायचे कष्ट घेऊ? आम्ही काय रिकामटेकडे बसलोय काय?

सुधन्वा यांची परवानगी न घेताच त्यांच्या लेखाचे देवनागरीकरण करून इथे खालीच टाकतेय. त्यांना ते एकंदरीत जमलेलं दिसत नाहीये.

शिकलेली माणसे असे कां वागतात?

माणूस का शिकतो? कशासाठी शिकतो? आणि मुख्य म्हणजे काय शिकतो? हल्ली असले प्रश्न फार पडतात. आता जवळ जवळ १२-१३ वर्ष नोकरी करुन झाली. मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्री बघितली आणि आय.टी. इंडस्ट्रीपण बघितली. दोन्हीकडे काही चांगले काही वाईट आणि जास्त करून वाईटच अनुभव आले. पण एकंदरीत असे मत झाले की मॅन्युफॅक्चरींगच बरे होते.

सुरूवातीला इंजिनिअर झाल्यावर शॉपफ्लोअरला काम करण्याची खुमखुमी होती म्हणून दुसर्‍या डिपार्टमेंटला संधी असताना शॉप फ्लोअर निवडले. २-३ महिन्यांत उबग आला सगळ्या वातावरणाचा. ते अशिक्षित कामगार. त्यांचे बोलणे, राहाणे, सारख्या शिव्या देणे. बाईवरून प्रचंड शेरेबाजी करणे. बोलण्या-चालण्यातली एक प्रकारची मग्रुरी वगैरे वगैरे वगैरे. सतत तंबाखू खाऊन थुंकणे आणि त्याच ठिकाणी डबा खाणे. अशक्य प्रकार. प्रचंड गोंधळ उडाला मनाचा. हे असे कां वागतात लोकं? फार तर १०-१२ झालेले. काही अगदी बी.कॉम, बी.एस्सी करुन कुठे जॉब मिळत नाही म्हणून आय.टी.आय. करून आलेले. पण शेवटी सगळे संभाजी बिडी मारत आणि गोवा नाहीतर तत्सम गुटखा खात बोलणे. साहेबांना सतत शिव्या देणारी आणि अत्यंत उद्धट भाषेत बोलणारी माणसे. हे असे कां वागतात? ह्यांना का कळू नये की असे वागून सगळेच एकमेकांना पाण्यात काहीच काम न करणारे आणि फुकट पगार खाणारे.

वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी काम करून आता माजलेली मंडळी. नोकरीवरून काढण्याची भिती नाही. युनियन आहेच पाठीशी. काही झाले तर युनियन लिडर जो शॉप फ्लोअरला बसून फक्त शिटट्या मारतो आणि दादागिरी करतो त्याला देव मानणारी. मग काम कोण करणार? मग मालक लोकांनी नवीन क्लुप्ती शोधून काढली. आय.टी.आय. मधल्या शिकाऊ मुलांना ६-६ कामावर घ्यायची. ६ महिने झाले की लाथ घालायची, लगेच पुढची बॅच चालू. लोकांना कामावर कायम करायचेच नाही. सतत अधांतरी ठेवायचे. ही मुले दिवसभर राबराब राबणार आणि बाकीचे कायम झालेले कामगार त्यांच्याकडून घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे काम करून घेणार.

मग ही नवीन पोरं आणि वर्कर्स मिळून नवीन आलेल्या इंजिनिअर्सना छळणार. हळूहळू इंजिनिअर्सपण तसेच होणार. लोकांना शिव्या देत टोचून बोलत काम करवून घेणार. हळू हळू सगळे त्यांचे ऐकणार. मधला इंजिनिअर वरून साहेबांचे फटके खाणार आणि खालून कामगारलोकांचे.

कंटाळा आला ह्या सगळ्याचा. उबग आला ह्या वातावरणाचा. हे नाही करायचं. ह्या सगळ्या अशिक्षितांपासून, तंबाखू/गुटखा आणि विड्या ओढणार्‍या लोकांपासून लांब पळून जायचे. मार्ग काय? १९९८-१९९९ ला वाय२के जोरात. दुसरा मार्ग एम.एस. करायला जायचे. घरून पाठिंबा नाही बाहेर जायला. आपल्याकडे पैसे नाहीत.

मग ठरले आय.टी. मध्ये जायचे. जाम पैसा मिळतो. छान छान चकाचक मंडळी आणि चांगले वातावरण. हुशार लोक आजुबाजुला. काय मज्जा येईल. कॉम्प्युटरचा कोर्स केला. वाटले आता कसे सगळे झाले सुरळीत. मग जोरदार दटट्या बसला. २००० ची वेब बूम कोसळली. सगळे जमिनीवर आले थोड्या काळापुरते. परत मार्केट चढले. छान छान म्हणजे बाहेरून दिसणाऱ्या कंपनीमध्ये जॉब मिळाला.

आता सगळे इंजिनिअरींग केलेले आजुबाजुला. मग सुरुवात झाली प्रोजेक्टच्या चढाओढीला. डेटाबेस डिझाईन करण्यापासून ते फायनल टेस्टिंग पर्यंत रोज मर्‍या मर्‍या. सगळे स्वत:ला शहाणे समजणारे. एक दुसर्‍याला पाण्यात पहाणार. अरे ह्याला इतका पगार मग मला कां नाही. अरे ह्याला हे प्रोजेक्ट मिळालं ते मला नाही. च्यायला ह्याची काय लायकी आहे हे त्याला कसे काय मिळाले? मी काय झक मारली कां? मी किती छान कोड लिहीतो मग पी.एम/पी.एल. लोकांना कळत कसे नाही.

१-२ वर्षांच्या अनुभवावर लोक टीमलीडर झाली. सगळे गरम रक्ताचे. ताजे ताजे नवीन रक्त. जुन्या लोकांना काय कळते. नुसते ९-५ काम करतात. आम्ही बघा किती वेळ काम करतो ते. काय उगाच इतका पगार मिळतो कां? हा नवा दर्प. सगळेच हुशार लोक मग काय विचारता हो.

हळू हळू एक एक प्रोजेक्टससाठी यु.एस/यु,के ला जायला लागलं. मग टीममध्ये बाहेर जाण्यासाठी मारामार्‍या. एक एक जण फिल्डिंग लावून बसलेला. दुसरा जरा पुढे गेला की मागून खेचाखेच. नाहीतर मॅनेजरकडे जाऊन काहीतरी चुगली करून काहीतरी करून स्वत:चे घोडे दामटणारा. फार झाले तर लगेच जॉब चेंज. ६-६ महिन्यांत जॉब सोडून दुसरीकडे. इकडे जास्त पगार आहे. तिकडे त्याहून जास्त पगार आहे. इकडे ही नवी टेक्नॉलॉजी आली आहे, तिकडे हा नवा प्रोजेक्ट चालू आहे.

मग हळूहळू कोणी गाडी घेतली की जळजळ. तोंडावर तर फार छान म्हणायचे. पण मागून जाम जळजळ. दुसर्‍याचा फ्लॅट झाला, अरे अजून एक झाला की. च्यायला काय पैसा मिळतो आहे. मजा आहे बुवा वगैरे उद्गार. पण ना तो समाधानी ना आम्ही समाधानी. आम्ही पळतोच आहोत. पळतोच आहोत. इतका पैसा मिळवून इतके सगळे करुन शेवटी बघावे तर हातात फारच कमी उरत आहेत.

मग आम्ही पण आलो भारताबाहेर. म्हटले इथे आलेले तरी असे नसतील. तर इकडे त्याहून भयानक प्रकार. सगळे एकत्र राहातात पण दुसर्‍याला किती मिळतात ह्यावर डोळा. जमतात सगळे एकत्र पण त्यातही स्टार आहेत. कॉन्ट्रॅक्ट वाल्या मंडळींचा तोरा काही औरच. ते कमी पगार वाल्यांना हळूचकन हाडहूड करणार. त्यांचा ग्रूप वेगळा ह्यांचा ग्रूप वेगळा. मग गरज म्हणून एकत्र येणार पण धुसफुस चालूच. अरे ह्याच्याकडे हे आहे. अरे हा इकडे तिकडे जातो सारखा. लई पैसा मिळतो म्हणजे. निदान ५०% दारुबाज झालेले. ५०% उंची विड्या फुकणारे. आणि बाकीचे ओढत नाहीत म्हणून त्यांना कटाप करणारे. तरी मराठी मंडळी अजून बरीच बरी आहे. नॉर्थवाली/पंजाबी तर अटटल दारूबाज. सगळे एकमेकांशी गोड गोड तोंडावर बोलणार आणि मागून जाम उखाळ्या पाखाळ्या.

मग काय फरक आहे कामगार आणि शिकलेल्या लोकांच्यात? त्यांना धड दोन वेळचं मिळत नाही म्हणून, आपल्याला एका वेळी ४-४ वेळचं मिळतं म्हणून? तिकडे पै पै करून पैसे साठवून जगणारे आणि इकडे जास्त पैसे आहेत म्हणून उडवणारे. दोन्हीकडे तेच विड्या फुकणारे. काय फरक आहे?

ह्या दुसर्‍या लोकांमुळे आपल्या आयुष्यात कीती फरक / त्रास करुन घ्यावा.
"मी समाजाला वाइट स्थितीतन बाहेर काढणारा अवतार नाही.
मी कोणी समाजसुधारक नाही."
ही दोन वाक्य प्रचंड स्वार्थी वाटली तरी रोज सकाळी स्वतःला आठवण करुन द्या.

मला प्रत्यक्ष कामाचा ९ वर्षाचा अनुभव आहे. मला चांगली लोकदेखील भरपुर भेटले होते राव.
कित्येक कामगार (जे की आयटीआय पेक्षा जास्त शिकलेले नाहियेत) अशा लोकानी केलेल चांअगल सामाजिक कामदेखील मी पाहिलय. असो.

तुमचा नेमका प्रॉब्लेमच कळाला नाहिये.

जगात काय मॅन्युफॅक्चरींग आणि कॉम्प्युटर एवढे दोनच मार्ग आहेत का?
आणि कुठल्याही मार्गावर चांगलीवाईट माणसे, चांगलेवाईट अनुभव येतातच की. तेच तर शिक्षण असतं.
डिग्री घेतली की सगळं पायघड्या घातल्यासारखं आपल्याला हवं तसं मिळतं का?
आपल्याला हवं तसं म्हणजेच योग्य असंही नाही ना?
कदाचित तुम्हाला इतके केवळ वाईटच अनुभव येतात तेव्हा थोडा 'अपने अंदर भी झांक कर देखो'.
कदाचित तुम्ही पण अनेकांच्या अपेक्षांना पुरे पडला नसाल.

छान लिहिलय (मराठी भाषांतर वाचलं!!), तुम्हाला इ-सकाळवर लिहिणं सोप्प वाटत असेल तर तिथे लिहुन इथे कॉपी करा.
झालचतर लेखाबद्दल ही (इतरांची) वाक्य.... (सुविचार समजुन सोडुन देउ नका)
People are not disturbed by things, but by the view they take of them. (Its not what happans to you thats important but how you react to it.)
We cannot choose our external circumstances, but we can always choose how we respond to them.
- Epictetuos

We want to happy at any cost; while we can be happy at no cost...

Srikumar Rao: Plug into your hard-wired happiness
Dan Gilbert asks, Why are we happy?
Dan Gilbert on our mistaken expectations
Benjamin Wallace on the price of happiness
Matthieu Ricard on the habits of happiness

Pages