बोलगाणी- प्रवेशिका १६ अ - (रैना)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 13:55
मुलीचे नावः इरा
वय- २ वर्ष २ महिने

एक होती भिंगरी
तिचं नाव झिंगरी
सारखी सारखी फिरते गोल
फिरता फिरता जातो तोल
तिला आहे एकच पाय
पायावरती गिरकी खाय
गिरकी खाऊन आली चक्कर
भिंतीवरती
मारली टक्कर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही गाणी ऐकली इराची. टाईमपास आहेत एकदम. खणखणीत आवाज आहे आणि बोलही एकदम स्पष्ट आहेत.

हेहेहे टू गुड Happy भ न्नाट आवाज! >> तिला आहे एकच पाय, गिरकी खाऊन आली चक्कर सह्ही Happy

शेवटी आई मला एवढंच ऐकायला येतं... काय आहे ते गं?

आई म्हण हं- असं आहे ते Biggrin (त्यापुढील शब्द, "नीट म्हण, शब्द खाऊनक्को" अशी आहेत. आईची वाक्य साभार परत Proud
प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे.

मस्तच.. शेवटी अगदी गिरकी घेतल्यासारखाच तिने सुर एकदम वर नेला... Happy

आई म्हण ना.. हे तर एकदम भारी....