ह्या लेखात उल्लेख केलेल्या घटना मी पुणेकर नव्हतो आणि अधून-मधूनच पुण्यात येणे व्हायचे तेव्हाच्या आहेत.

बर्याच वर्षांपूर्वी काही कामानिमित्त मला पुण्याला यावं लागलं. मंगेश तेंडुलकरांच्याच भाषेत सांगायचं तर जिला 'पुण्याची ऐश्वर्या राय' म्हणतात ती पी.एम.टी. ची बस हिच्याबद्दल मी काही-बाही ऐकून असल्याने मामाकडे औंधला जाण्यासाठी कॉर्पोरेशन पर्यंत साधी रिक्षा करून मग शेअर रिक्षाने औंध गाठावे असा विचार करत होतो. पण स्वारगेटला उतरल्या उतरल्या समोरच औंधची बस दिसली आणि मोह आवरता आला नाही. "चला सुटलो, आता मेंढरासारखे कोंबून शेअर रिक्षात बसायला नको," मला पटकन वाटून गेलं. त्याच आनंदात मी झटकन बसमध्ये शिरलो आणि मला चालकाशेजारची जी सिंगल सीट असते ती मिळाली. एक तर पुण्यात लगेच बस मिळणे आणि चक्क बसायला जागा आणि तीही आवडती जागा मिळणे हा एक दुग्धशर्करा (च्यामारी दोन्ही महागलंय हल्ली. त्या शरद पवाराच्या फुल्या फुल्या फुल्या) योग का काय म्हणतात तोच होता की!
मला फक्त हर्षवायूच व्हायचा शिल्लक होता."याSSहु" असं जवळ जवळ ओरडतच मी बसलो. पण पुढे काय वाढून ठेवलंय ते मला तेव्हा कसे बरं कळणार? लवकरच हाय रे रामा, जळ्ळं मेलं नशीब ते, नशीब XX तर काय करील पांडू, अशा असंख्य म्हणी, वाकप्रचार आणि अनेक हताश विचार मनात येऊन गेले. कारण बस सुरु होताच मला लक्षात आलं की बस मध्ये ड्रायव्हरच्या शेजारी जे इंजिन असतं त्याचं झाकण गायब होतं आणि त्यातून एक गरम वाफेचा झोत थेट माझ्या चेहेर्यावर येत होता. माझा त्या बसमधला पुढचा अर्धा-पाउण तास कसा गेला असेल ह्याची तुम्ही कल्पना करू शकता. औंधला उतरेपर्यंत चेहेर्याची उजवी बाजू आकाराने एखाद्या भरल्या वांग्यासारखी (बी.टी. नै हो, साध्या) आणि रंगाने टोमॅटोसारखी लालेलाल अशी दिसत होती. मामा-मामी दोघेही माझ्या या अशा चमत्कारिक अवताराकडे पाहून हसत होते. मामीने तर विचारलंच, "काय रे, पुण्यात आल्या आल्या मारामारी वगैरे केलीस की काय?" तिचं बरोबरच होतं, कारण माझा उजवा गाल कुठल्यातरी कोल्हापुरी पैलवानाने थोबाडीत ठेऊन दिल्यावर सुजावा तसा दिसत होता. त्यानंतर मी "पुण्यात ह्यापुढे कधीही बस मध्ये बसणार नाही" अशी किर्लोस्करांच्या बंगल्यासमोर घोर प्रतिज्ञा केली.
......पण ती फारशी टिकली नाही. पैसे वाचवण्याच्या नादात मी काही महिन्यांनी मी पुन्हा तीच चूक केली. यावेळी मला धायरी परिसरात जायचं होतं. पुणे एस.टी. स्थानकावर उतरताच मित्राला फोन केला. "समोरच पी.एम.टी चा स्टँड आहे, तिथे अशा अशा नंबरच्या बस धायरीला जातात. आत्ता आठ वाजले आहेत. टाईमटेबलप्रमाणे आत्ता आठ वीसची एक बस आहे, ती तुला मिळेल," तो म्हणाला. त्याने नक्की कुठले नंबर सांगितले ते आत्ता आठवत नाहीत, तसे तेव्हाही आठवून उपयोग नव्हताच. कारण वीरेंद्र सेहवागने वेडावाकडा फटका खेळून देखील चौकार गेला की टोनी ग्रेग वगैरे मंडळींच्या म्हणण्याप्रमाणे जसं "दी बॉल हॅज नॉट क्वाईट गॉन व्हेअर ही इंटेंडेड टू, बट दोज आर फोर रन्स ऑल राईट. इट डज नॉट मॅटर हाऊ दि रन्स कम, इट ओन्ली मॅटर्स दॅट दे डू" असं असतं, अगदी तस्सच पुण्यात बसचे क्रमाक महत्वाचे नसतात, ती तुमच्या इच्छित स्थळी जाते आहे ना, मग झालं तर, असं असतं.
प्रचंड उत्साहात मी स्टँडच्या दिशेने मोर्चा वळवला. बाहेरून प्रथमदर्शनी तो स्टँड रामसे बंधूंच्या चित्रपटातल्या भूतबंगल्यासारखा दिसत होता. म्हणजे एकदम काळोखी वगैरे, आतून चित्रविचित्र आवाज येतायत पण आत जिवंत माणसांची वर्दळ आहे की नाही याची शंका यावी असे असा. अचानक एखादी हडळ यावी तशी एक बस रोरावत बाहेर पडली. तिला चुकवून मी आत शिरलो. आत समोर दोन व त्यामागे दोन अशा चार बस उभ्या असलेल्या दिसल्या. चारही बसचे क्रमांक नीट दिसत नव्हते.
"अहो, धायरी फाट्याला जाणारी बस कुठून सुटते हो?" फाटकाजवळ एक खाकी कपड्यातले मामा उभे होते त्यांना मी विचारलं. अशोक सराफचा फोटो आणि त्याखाली 'माझ्या यशाचे कडवट रहस्य: वैद्य-पाटणकर काढा' असं लिहिलेल्या बसकडे बोट दाखवून त्यांनी, "ती काय मागेच उभी आहे" अशी बहुमूल्य माहिती दिली. एखादा प्रश्न विचारल्यावर एखाद्या पुणेकराने मला दिलेले हे पहिले सरळ उत्तर! मामा बहुतेक मुंबईहून पेशल डेप्युटेशनवर आले असावेत. 
असो. त्यांनी सांगितलेली बस नक्की धायरी फाट्याच्याच दिशेने जाईल ह्याची बसवरची अस्पष्ट पाटी वाचून खात्री करून घेतल्यावर मला पुन्हा एकदा ह.वा. झाला. पण ती सुद्धा रा.ब. च्या भू.बं. मधल्या अंधार्या खोली सारखी दिसत होती. सव्वा आठ वाजलेले असूनही आतले दिवे लागलेले दिसत नव्हते, पण इच्छुक प्रवासी मात्र होते.
"ती धायरीची बस कधी सुटेल हो?" बसमागे असलेल्या हापिसवजा खोपटासमोर खुर्ची टाकून आणखी एक मामा बसले होते त्यांना मी प्रश्न टाकला.
"कुण्या गावाच्च आलं पाखरू" अशा नजरेने माझ्याकडे पाहत त्यांनी उत्तर दिलं, "सुटेSSSल होS".
मी निमुटपणे बशीत जाऊन बसलो. आठ वीसचे साडेआठ केव्हाच होऊन गेले होते. तसं म्हणाल तर मुंबईतल्या सगळ्या बस अगदी वेळेवर सुटतात असा आपला दावा नाही बुवा. पण निदान बसमधले दिवे लागले आहेत, चालक बाहेरची पाटी फिरवतोय, कंडक्टर जवळच्याच पानपट्टीवर स्वतःच्या मुख-वंगणाची सोय करतोय, अशी सूचक दृश्य तरी दिसतात. इथे तर आत बसलेल्या इच्छुक प्रवाशांच्या चेहेर्यावर देखील तशी काही लक्षणे दिसेनात!
साडेआठ, आठ पस्तीस, आठ चाळीस, असं करता करता पावणेनऊला शेवटी ड्रायव्हरसाहेब येऊन स्थानापन्न झाले आणि त्यांनी बसमधले दिवे लावले. माझ्याइतक्याच कावलेल्या एका आजींनी शेवटी, "काय हो किती वाजले, किती हा उशीर?" असं विचारलं. मला वाटलं लोकलाजेस्तव किंवा स्त्रीदाक्षीण्यापोटी तरी काहीही न बोलता ते बस सुरु करतील. पण बोलण्यात हार जातील तर ते पुणेकर कसले! त्यांनी तोंडात नुकताच भरलेला मौल्यवान ऐवज तोंडातल्या एका सोयीस्कर कोपर्यात तात्पुरता ढकलून टाळूला लावायला जीभ मोकळी करून घेतली आणि "ए आज्जे, थोडी बी कळ सोसंना का तुला" अशी मुक्ताफळं उधळली. पु.लं.च्याच भाषेत सांगायचं तर असा 'एक अकारण हिणकस शेरा' मारला. त्यानंतर त्या आजींबरोबर आलेले आजोबा आणि चालक महाशय यांनी एकमेकांच्या मातोश्रींची काही मिनिटे जाहीर विचारपूस केली, तेव्हा मला आपण आज काही धायरीला पोहोचत नाही असं वाटू लागलं. कंडक्टरसाहेब जास्त समजूतदार असावेत. त्यांच्या हस्तक्षेपाने आणि आमच्या सुदैवाने ही विचारपूस कुटुंबातील इतर सदस्यांवर घसरली नाही आणि ड्रायव्हरसाहेबांनी बस सुरु केली.
बस सुरु करेपर्यंत आळशीपणाचा महामेरू असलेल्या ड्रायव्हर साहेबांनी मग जेव्हा "च्यामारी, फॉर्म्युला वन मध्ये मायकल शुमाकरला टफ देणारी नोकरी सोडून पी.एम.टी. सारख्या तुच्छ ठिकाणी आपल्याला नाईलाजाने बस चालवावी लागत आहे" अशा आविर्भावात बस चालवायला सुरुवात केली तेव्हा माझ्या छातीत परत धडधड सुरु झाली.
पण जिलब्या, खुन्या, वगैरे मारुतीच्या आणि गणपतीच्या कृपेने मी सुखरूप धायरीला उतरलो आणि पुन्हा एकदा "पुण्यात ह्यापुढे कधीही बस मध्ये बसणार नाही" अशी घोर वगैरे प्रतिज्ञा केली.
हल्ली पी.एम.टी. ला पी.एम.पी.एम.एल. असं कैतरी म्हणतात नै? द्याट रिमाईंड्स मी. आता तिला पुण्याची कतरिना म्हणावं काय?
हा लेख पुणेकरांना अर्पण
हा लेख पुणेकरांना अर्पण
हल्ली पी.एम.टी. ला
हल्ली पी.एम.टी. ला पी.एम.पी.एम.एल. असं कैतरी म्हणतात नै? <<< कैतरी नाही काही..
कतरिना म्हणतात
"फाटकाजवळ एक खाकी कपड्यातले
"फाटकाजवळ एक खाकी कपड्यातले मामा उभे होते त्यांना मी विचारलं. अशोक सराफचा फोटो आणि त्याखाली 'माझ्या यशाचे कडवट रहस्य: वैद्य-पाटणकर काढा' असं लिहिलेल्या बसकडे बोट दाखवून त्यांनी, "ती काय मागेच उभी आहे" अशी बहुमूल्य माहिती दिली. एखादा प्रश्न विचारल्यावर एखाद्या पुणेकराने मला दिलेले हे पहिले सरळ उत्तर! मामा बहुतेक मुंबईहून पेशल डेप्युटेशनवर आले असावेत." --> हा खास पुल टच दिसतोय
छानच लिहिलय!! मजा आली..
कैतरी नाही काही.. कतरिना
कैतरी नाही काही.. कतरिना म्हणतात<<<
मस्त रे मंदारा ! "कुण्या
मस्त रे मंदारा !:D
"कुण्या गावाच्च आलं पाखरू" >>> तुला पाखरु म्हणलं तर पाखराला काय म्हणायचं ?
पुने तेथे सगळेच उने. मस्त
पुने तेथे सगळेच उने. मस्त लेख.
कतरिना<<<<<<< छान लिहिलयस.
कतरिना<<<<<<<
पीएमटी ऐश्वर्या राय तर मग अभिषेक बच्चन कोण्,सहा आसनी रिक्षा? 
छान लिहिलयस.
तोषा
तोषा
माझा एक पी.एम.टी.चा अनुभव...
माझा एक पी.एम.टी.चा अनुभव... मागे एका लेखात दिला होता..
पण कंडक्टर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं किं मी इथे नविन आहे, तेव्हा स्टॉप आल्यावर मला तसे कळवा. तुम्ही का नाही सांगितलं?
मी अगदी तावातावाने बस कंडक्टरशी भांडत होतो. झालं असं कि बसमध्ये बसताना मी चव्हाणनगरचं तिकीट काढलं होतं. स्टॉपची माहीती नसल्याने कंडक्टरला सांगितलं की स्टॉप आल्यावर मला कळवा. या शहाण्याने मला सांगितलच नाही. मध्येच शंका येवुन त्याला विचारायला गेलो, चव्हाणनगर आलं का म्हणुन तर तो पर्यंत बस एन.सी.एल.ला पोचली होती. तो शहाणा माझ्यावरच आरोप करायला लागला की मी कमी पल्ल्याचं तिकीट काढुन जास्त प्रवास करतोय आणि सरकारला फसवतोय.
माझं टाळकं सटकलं, "पगार कशाचा घेता मग? नव्या माणसाने काय प्रवास करायचाच नाही काय?"
"ओ, आम्हाला काय तेवढंच काम आहे का?" सौजन्यशील बसवाहक.
"अहो ते तुमचं कामच आहे ना ? नविन माणसाला थोडंच माहित असणार आहे कुठलं ठिकाण कुठे आहे ते? तो तुम्हालाच विचारणार ना? आणि पैशाचं मला सांगु नका...!"
मी रागारागात खिशात हात घातला आणि हाताला आली ती नोट बाहेर काढली. त्याच्या हातावर टेकवली आणि खेकसलो.
"हे घ्या यातुन माझ्या जादाच्या प्रवासाचे पैसे कापुन घ्या आणि राहीलेल्या पैशाचे तुमच्या लेकरांना खाऊ घेवुन जा."
(अरे देवा, ती चुकुन वीसची निघाली, आता सुटे परतही मागता येत नव्हते.)
बाकी तुझा लेख मस्तच झालाय, नेहमीप्रमाणेच !
विशाल, सौजन्याची ऐशी तैशी हा
विशाल, सौजन्याची ऐशी तैशी हा तर बस वाहकांचा "मोटोच" आहे
(No subject)
(No subject)
(No subject)
मंद्या..
मंद्या..
मंदार मस्त अरे देवा, ती
मंदार मस्त

अरे देवा, ती चुकुन वीसची निघाली
मी पुण्यात नवीन असताना,
मी पुण्यात नवीन असताना, पी.एम.टी ने जात होते. जागा अर्थात नव्हतीच. मी उभी होते. ड्रायव्हर फूल्ल स्पीडने बस मारत होता. कोलमडताना घंटे साठी असणार्या दोराचा आधार घेतला. बस जागेवर थांबली. असे तीनदा झाल्यावर मी गुमान खाली उतरले.
>> कोलमडताना घंटे साठी
>> कोलमडताना घंटे साठी असणार्या दोराचा आधार घेतला. बस जागेवर थांबली
ज्याच्या हाती घंटेची दोरी, तो जगाते उद्धारी

मंद्या मस्त लिहिल हायेस.. पण
मंद्या मस्त लिहिल हायेस.. पण पीएम्टी च्या ड्रायव्हर्स ना मानल पाहिजे.. पेठेतल्या अरुंद रस्त्यात आणि पुण्याच्या ट्राफिक मधे अतिशय लीलया गाडी मारतात..
पने
कतरिना >>> भारीच.....
कतरिना >>> भारीच.....
छान लिहीलय! (आता पीएमटीसुद्धा
छान लिहीलय!
)
(आता पीएमटीसुद्धा पुणेरीच आहे म्हणल्यावर कुणालाही लिहायला "चेव" चढणारच की! त्यात विशेष ते काय?
हे बघ मंदार एक तर तू हे सगळं
हे बघ मंदार एक तर तू हे सगळं खोटं लिहिलं आहेस नाहीतर हे पुणं नाहीये!
कारण -
)
अहो, धायरी फाट्याला जाणारी बस कुठून सुटते हो?" फाटकाजवळ एक खाकी कपड्यातले मामा >> त्या मामांनी तुला उत्तर देणे अपेक्षित नाहीये! उलट त्यांनी मला काय ठाऊक? असं खेकसायला हवं! (डेप्यूटेशनच वगैरे सब झूठ आहे
त्यांनी उत्तर दिलं, "सुटेSSSल होS>>> वेळ झाली की! असं उत्तर अपेक्षित!
? विचारला की बोलायला पैसा लागतो अश्याच आविर्भावातली मंडळी अपेक्षित!
डुआय, limbutimbu
डुआय, limbutimbu
"कुण्या गावाच्च आलं पाखरू"
"कुण्या गावाच्च आलं पाखरू" अशा नजरेने माझ्याकडे पाहत त्यांनी उत्तर दिलं, "सुटेSSSल होS".

वाचताना माझ्या डोळ्यांसमोर मामांची कै च्या कै पुणेरी 'मुद्रा' आली आणि तुम्ही लेखाच्या समाप्तीला तर "ऐश्वर्या"ला डच्चू देणारी "नक्षत्र"कन्या कैटरिना ला आणलंत..... लई भारी!
झक्कास, मंद्या लगे रहो. <<
झक्कास, मंद्या लगे रहो.
<< तुला पाखरु म्हणलं तर पाखराला काय म्हणायचं ? >> बादवे गिधाड हे देखील एक पाखरुच आहे की.
एकदा पी.एम.टीची वाट बघत उभे
एकदा पी.एम.टीची वाट बघत उभे होतो. एक बाई तिच्या लहान मुलाबरोबर बस मध्ये चढत असलेली दिसत असूनही कंडक्टरनं बेल मारली (आम्हाला दिसत होतं की कंडक्टर त्या बाईकडे बघत बघतच बेल मारतोय!) - 'डायवर'नं पण पळाचाही विलंब न लावता गाडी सुरु केली.
हे सगळं होईतोवर बाईचा एक पाय बस मध्ये आणि एक पाय खाली होता.. ती बाई आणि मुल जोरात पडलं - एकाला खोक पडली - दुसर्याच्या ओठातून रक्त आलं!
माझा शांतताप्रिय आणि संयमाचा महामेरू नवरा पण चिडला तो प्रसंग बघून.. त्या दिवशी पहिल्यांदाच (आणि बहुतेक आत्तापर्यंत शेवटचही) मी त्याला कुणाशीतरी भांडताना पाहिलं (अर्थातच माझ्याशी सोडून इतर कुणाशी भांडताना)
पी. एम. टी चे असे कोटी कोटी किस्से निघतील!
पुण्यातल्या सायकल वाल्यांना ते पी.एम.टी चालवताहेत असं वाटतं आणि पी. एम. टी वाल्यांना सायकल!
(अर्थात त्यांचे प्रोब्लेम्स त्यांना माहिती! बसमध्ये हजार प्रकारची माणसं चढणार - त्या सगळ्यांना हँडल करायचं दिवस दिवस उभ्यानं प्रवास करायचा, बसेसची कंडिशन वगैरे)
पुण्यातले सायकल वाल्यांना ते
पुण्यातले सायकल वाल्यांना ते पी.एम.टी चालवताहेत असं वाटतं आणि पी. एम. टी वाल्यांना सायकल! >>>
बाप रे..मंदार्..पी एम टी चं
बाप रे..मंदार्..पी एम टी चं नुसतं बाह्यदर्शनच इतकं थरकाप उडवणारं असतं.. कि तीत बसून प्रवासाची कल्पना सुद्धा अशक्य वाटतेय.. एस्पेशली आता तुझा अनुभव वाचून ;०
गरम वाफेचा झोत व
गरम वाफेचा झोत व एकमेकांच्या मातोश्रींची काही मिनिटे जाहीर विचारपूस ... (खर म्हणजे यायला नको पण) फार हसु आले.
>> बाप रे..मंदार्..पी एम टी
>> बाप रे..मंदार्..पी एम टी चं नुसतं बाह्यदर्शनच इतकं थरकाप उडवणारं असतं.. कि तीत बसून प्रवासाची कल्पना सुद्धा अशक्य वाटतेय.. एस्पेशली आता तुझा अनुभव वाचून ;०
माझी आत्ताची कंपनी आम्हाला ट्रान्स्पोर्ट देत नाही. मी सध्या रोज पी.एम.टी. ने प्रवास करतो. तेव्हा माझं काय होत असेल त्याची कल्पना करा

>> अर्थात त्यांचे प्रोब्लेम्स त्यांना माहिती! बसमध्ये हजार प्रकारची
मी याबाबतीत नंतर लिहिणार आहेच, पण एका ललित मध्ये (गंभीर लेख). आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
>> बादवे गिधाड हे देखील एक पाखरुच आहे की.
करेक्ट
लेखतर भारीच. आणि ही
लेखतर भारीच.
आणि ही प्रतिक्रीया पण
>गिधाड हे देखील एक पाखरुच आहे की.
अनुभव आहे आपलाही..
आपल्यालाही "ऐश्वर्या रायनं" ३ वर्ष लिफ्ट दिली आहे.
Pages