ह्या लेखात उल्लेख केलेल्या घटना मी पुणेकर नव्हतो आणि अधून-मधूनच पुण्यात येणे व्हायचे तेव्हाच्या आहेत.

बर्याच वर्षांपूर्वी काही कामानिमित्त मला पुण्याला यावं लागलं. मंगेश तेंडुलकरांच्याच भाषेत सांगायचं तर जिला 'पुण्याची ऐश्वर्या राय' म्हणतात ती पी.एम.टी. ची बस हिच्याबद्दल मी काही-बाही ऐकून असल्याने मामाकडे औंधला जाण्यासाठी कॉर्पोरेशन पर्यंत साधी रिक्षा करून मग शेअर रिक्षाने औंध गाठावे असा विचार करत होतो. पण स्वारगेटला उतरल्या उतरल्या समोरच औंधची बस दिसली आणि मोह आवरता आला नाही. "चला सुटलो, आता मेंढरासारखे कोंबून शेअर रिक्षात बसायला नको," मला पटकन वाटून गेलं. त्याच आनंदात मी झटकन बसमध्ये शिरलो आणि मला चालकाशेजारची जी सिंगल सीट असते ती मिळाली. एक तर पुण्यात लगेच बस मिळणे आणि चक्क बसायला जागा आणि तीही आवडती जागा मिळणे हा एक दुग्धशर्करा (च्यामारी दोन्ही महागलंय हल्ली. त्या शरद पवाराच्या फुल्या फुल्या फुल्या) योग का काय म्हणतात तोच होता की!
मला फक्त हर्षवायूच व्हायचा शिल्लक होता."याSSहु" असं जवळ जवळ ओरडतच मी बसलो. पण पुढे काय वाढून ठेवलंय ते मला तेव्हा कसे बरं कळणार? लवकरच हाय रे रामा, जळ्ळं मेलं नशीब ते, नशीब XX तर काय करील पांडू, अशा असंख्य म्हणी, वाकप्रचार आणि अनेक हताश विचार मनात येऊन गेले. कारण बस सुरु होताच मला लक्षात आलं की बस मध्ये ड्रायव्हरच्या शेजारी जे इंजिन असतं त्याचं झाकण गायब होतं आणि त्यातून एक गरम वाफेचा झोत थेट माझ्या चेहेर्यावर येत होता. माझा त्या बसमधला पुढचा अर्धा-पाउण तास कसा गेला असेल ह्याची तुम्ही कल्पना करू शकता. औंधला उतरेपर्यंत चेहेर्याची उजवी बाजू आकाराने एखाद्या भरल्या वांग्यासारखी (बी.टी. नै हो, साध्या) आणि रंगाने टोमॅटोसारखी लालेलाल अशी दिसत होती. मामा-मामी दोघेही माझ्या या अशा चमत्कारिक अवताराकडे पाहून हसत होते. मामीने तर विचारलंच, "काय रे, पुण्यात आल्या आल्या मारामारी वगैरे केलीस की काय?" तिचं बरोबरच होतं, कारण माझा उजवा गाल कुठल्यातरी कोल्हापुरी पैलवानाने थोबाडीत ठेऊन दिल्यावर सुजावा तसा दिसत होता. त्यानंतर मी "पुण्यात ह्यापुढे कधीही बस मध्ये बसणार नाही" अशी किर्लोस्करांच्या बंगल्यासमोर घोर प्रतिज्ञा केली.
......पण ती फारशी टिकली नाही. पैसे वाचवण्याच्या नादात मी काही महिन्यांनी मी पुन्हा तीच चूक केली. यावेळी मला धायरी परिसरात जायचं होतं. पुणे एस.टी. स्थानकावर उतरताच मित्राला फोन केला. "समोरच पी.एम.टी चा स्टँड आहे, तिथे अशा अशा नंबरच्या बस धायरीला जातात. आत्ता आठ वाजले आहेत. टाईमटेबलप्रमाणे आत्ता आठ वीसची एक बस आहे, ती तुला मिळेल," तो म्हणाला. त्याने नक्की कुठले नंबर सांगितले ते आत्ता आठवत नाहीत, तसे तेव्हाही आठवून उपयोग नव्हताच. कारण वीरेंद्र सेहवागने वेडावाकडा फटका खेळून देखील चौकार गेला की टोनी ग्रेग वगैरे मंडळींच्या म्हणण्याप्रमाणे जसं "दी बॉल हॅज नॉट क्वाईट गॉन व्हेअर ही इंटेंडेड टू, बट दोज आर फोर रन्स ऑल राईट. इट डज नॉट मॅटर हाऊ दि रन्स कम, इट ओन्ली मॅटर्स दॅट दे डू" असं असतं, अगदी तस्सच पुण्यात बसचे क्रमाक महत्वाचे नसतात, ती तुमच्या इच्छित स्थळी जाते आहे ना, मग झालं तर, असं असतं.
प्रचंड उत्साहात मी स्टँडच्या दिशेने मोर्चा वळवला. बाहेरून प्रथमदर्शनी तो स्टँड रामसे बंधूंच्या चित्रपटातल्या भूतबंगल्यासारखा दिसत होता. म्हणजे एकदम काळोखी वगैरे, आतून चित्रविचित्र आवाज येतायत पण आत जिवंत माणसांची वर्दळ आहे की नाही याची शंका यावी असे असा. अचानक एखादी हडळ यावी तशी एक बस रोरावत बाहेर पडली. तिला चुकवून मी आत शिरलो. आत समोर दोन व त्यामागे दोन अशा चार बस उभ्या असलेल्या दिसल्या. चारही बसचे क्रमांक नीट दिसत नव्हते.
"अहो, धायरी फाट्याला जाणारी बस कुठून सुटते हो?" फाटकाजवळ एक खाकी कपड्यातले मामा उभे होते त्यांना मी विचारलं. अशोक सराफचा फोटो आणि त्याखाली 'माझ्या यशाचे कडवट रहस्य: वैद्य-पाटणकर काढा' असं लिहिलेल्या बसकडे बोट दाखवून त्यांनी, "ती काय मागेच उभी आहे" अशी बहुमूल्य माहिती दिली. एखादा प्रश्न विचारल्यावर एखाद्या पुणेकराने मला दिलेले हे पहिले सरळ उत्तर! मामा बहुतेक मुंबईहून पेशल डेप्युटेशनवर आले असावेत. 
असो. त्यांनी सांगितलेली बस नक्की धायरी फाट्याच्याच दिशेने जाईल ह्याची बसवरची अस्पष्ट पाटी वाचून खात्री करून घेतल्यावर मला पुन्हा एकदा ह.वा. झाला. पण ती सुद्धा रा.ब. च्या भू.बं. मधल्या अंधार्या खोली सारखी दिसत होती. सव्वा आठ वाजलेले असूनही आतले दिवे लागलेले दिसत नव्हते, पण इच्छुक प्रवासी मात्र होते.
"ती धायरीची बस कधी सुटेल हो?" बसमागे असलेल्या हापिसवजा खोपटासमोर खुर्ची टाकून आणखी एक मामा बसले होते त्यांना मी प्रश्न टाकला.
"कुण्या गावाच्च आलं पाखरू" अशा नजरेने माझ्याकडे पाहत त्यांनी उत्तर दिलं, "सुटेSSSल होS".
मी निमुटपणे बशीत जाऊन बसलो. आठ वीसचे साडेआठ केव्हाच होऊन गेले होते. तसं म्हणाल तर मुंबईतल्या सगळ्या बस अगदी वेळेवर सुटतात असा आपला दावा नाही बुवा. पण निदान बसमधले दिवे लागले आहेत, चालक बाहेरची पाटी फिरवतोय, कंडक्टर जवळच्याच पानपट्टीवर स्वतःच्या मुख-वंगणाची सोय करतोय, अशी सूचक दृश्य तरी दिसतात. इथे तर आत बसलेल्या इच्छुक प्रवाशांच्या चेहेर्यावर देखील तशी काही लक्षणे दिसेनात!
साडेआठ, आठ पस्तीस, आठ चाळीस, असं करता करता पावणेनऊला शेवटी ड्रायव्हरसाहेब येऊन स्थानापन्न झाले आणि त्यांनी बसमधले दिवे लावले. माझ्याइतक्याच कावलेल्या एका आजींनी शेवटी, "काय हो किती वाजले, किती हा उशीर?" असं विचारलं. मला वाटलं लोकलाजेस्तव किंवा स्त्रीदाक्षीण्यापोटी तरी काहीही न बोलता ते बस सुरु करतील. पण बोलण्यात हार जातील तर ते पुणेकर कसले! त्यांनी तोंडात नुकताच भरलेला मौल्यवान ऐवज तोंडातल्या एका सोयीस्कर कोपर्यात तात्पुरता ढकलून टाळूला लावायला जीभ मोकळी करून घेतली आणि "ए आज्जे, थोडी बी कळ सोसंना का तुला" अशी मुक्ताफळं उधळली. पु.लं.च्याच भाषेत सांगायचं तर असा 'एक अकारण हिणकस शेरा' मारला. त्यानंतर त्या आजींबरोबर आलेले आजोबा आणि चालक महाशय यांनी एकमेकांच्या मातोश्रींची काही मिनिटे जाहीर विचारपूस केली, तेव्हा मला आपण आज काही धायरीला पोहोचत नाही असं वाटू लागलं. कंडक्टरसाहेब जास्त समजूतदार असावेत. त्यांच्या हस्तक्षेपाने आणि आमच्या सुदैवाने ही विचारपूस कुटुंबातील इतर सदस्यांवर घसरली नाही आणि ड्रायव्हरसाहेबांनी बस सुरु केली.
बस सुरु करेपर्यंत आळशीपणाचा महामेरू असलेल्या ड्रायव्हर साहेबांनी मग जेव्हा "च्यामारी, फॉर्म्युला वन मध्ये मायकल शुमाकरला टफ देणारी नोकरी सोडून पी.एम.टी. सारख्या तुच्छ ठिकाणी आपल्याला नाईलाजाने बस चालवावी लागत आहे" अशा आविर्भावात बस चालवायला सुरुवात केली तेव्हा माझ्या छातीत परत धडधड सुरु झाली.
पण जिलब्या, खुन्या, वगैरे मारुतीच्या आणि गणपतीच्या कृपेने मी सुखरूप धायरीला उतरलो आणि पुन्हा एकदा "पुण्यात ह्यापुढे कधीही बस मध्ये बसणार नाही" अशी घोर वगैरे प्रतिज्ञा केली.
हल्ली पी.एम.टी. ला पी.एम.पी.एम.एल. असं कैतरी म्हणतात नै? द्याट रिमाईंड्स मी. आता तिला पुण्याची कतरिना म्हणावं काय?
"लिफ्ट" जिंदाबाद, काय केद्या?
"लिफ्ट" जिंदाबाद, काय केद्या?

चाग्ल लिहले पन भो एक सागतो
चाग्ल लिहले पन भो एक सागतो खर्र तेच लिहले नाहि तरि चाल्ते
आपुन बि आज पसुन लिहनार रे ब्व
आपुन बि आज पसुन लिहनार रे ब्व
रोजच मी नव्या पी. एम. पी. एम.
रोजच मी नव्या पी. एम. पी. एम. एल. ने प्रवास करतो. रोज वाट्त आंदोलन कराव निषेध करावा पण चिंचवड ते स्वारगेट रो़ज उभ्याने प्रवास केला की सगळा चेव संपतो. गर्दीच्या बसने प्रवास केला की ऑक्सीजन कमी पडुन एक नशा येते. या नशेत गपगुमान झोपतो. आंदोलन कराव हे स्वप्न पण पडत नाही.
१) २ कोटीचा तोटा झाला आपल काही म्हणण नाही.
२) महिना १२०० ट्रीपस रद्द होतात त्यामुळे बसला गर्दी होते आपल काहीच म्हणण नाही.
३) कात्रज / ह्डपसर डेपोचे कंड्क्टर एकच बस कायम मिळावी म्हणुन हवे तितके पॅसेंजर भरतात कारण त्यांचे डेपो मॅनेजर दररोज काही ठराविक व्यवसाय होणार असेल तरच कायम बस त्या कंड्क्टरला देतात. आपण काय म्हणणार ?
४) परदेशीसाहेब नावचे जनसंपर्क अधिकारी आहेत ना त्यांना रागारागाने लिहील होत पण त्यांच ऑफिस ए.सी. असाव. ते थंड असतात. मी पण आताशा थंड राहीन म्हणतो. बरोबर रोज प्रवास करणारे जर फाल्के, शंढ असतील तर आपण थंड राह्ण्यात शहाणपण.
५) असो लेखन विराम. मॅन्युफॅक्चरींग डिफेक्टला पर्याय नसतो.
मस्त लेख!!! बसची गर्दी
मस्त लेख!!! बसची गर्दी मुंबईकरांसाठीही काही नवीन नाही..पण खुप फरक आहे मॅनेजमेंट पासुन सौजन्यापर्यंत सगळ्यातच!!
लेख एकदम सहि.. सुमेधाला
लेख एकदम सहि..
पण मलाही बसची फारशी सवय नसल्यामुळे मीपण बसचा प्रवास टाळते..
सुमेधाला अनुमोदन
काही नाही ... मी एकदा सकाळी
काही नाही ...
मी एकदा सकाळी सहाला संचेती हॉस्पिटल पासून बस पकडली पिंपरी साठी.
माझ्याकडे सुटे सहाच रुपये होते आणि बाकी शंभर च्या नोटा होत्या.
तिकीट दहा रुपयांचे...
वाहक शहाणा म्हणतो कसा "एक तर सुटे द्या नाहीतर उतरा.. !"
मी म्हणालो कि माझे वजन जर उचलत असेल तर उचलून बाहेर फेक मला ... नाहीतर गप्प बसून राहा.
चक्क फुकट आणि ऐटीत प्रवास केलाय मी PMT तून.
ज्याच्या हाती घंटेची दोरी, तो
ज्याच्या हाती घंटेची दोरी, तो जगाते उद्धारी>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>नाही असं नाही....ज्याच्या हाती घंटेची दोरी, ती शेवटी लाजून शरमेनं उतरी
सहीच्च्च.... म्हणूनच म्हणतात
सहीच्च्च....
म्हणूनच म्हणतात की पुण्यात गाडी चालवायला शिकल की जगात कुठेही गाडी चालवू शकू....
पुण्यातले सायकल वाल्यांना ते
पुण्यातले सायकल वाल्यांना ते पी.एम.टी चालवताहेत असं वाटतं आणि पी. एम. टी वाल्यांना सायकल! >> :d
@डुआय अगदि अगदि ....
मंदार, अरे फोटो काढताना निदान
मंदार,

अरे फोटो काढताना निदान एखाद्या नविन पीएमटी बसचा (ऐश्वर्या रायचा) तरी काढायचा ...!
वरील बस पीमटी ची जणु एकुण दशाच दाखवतोय, सगळीकडुन चेपलेली ...झापलेली !
मंदार, तु म्हणे सध्या रोज
मंदार,
तु म्हणे सध्या रोज पि.एम्.पि.एम्.एल ने प्रवास करतो आहेस.
तुझ्या माहिती साठी एक इमेल फार्वड करतो.
"कुण्या गावाच्च आलं पाखरू .
"कुण्या गावाच्च आलं पाखरू
. मस्त लिहले.
आजींबरोबर आलेले आजोबा आणि
आजींबरोबर आलेले आजोबा आणि चालक महाशय यांनी एकमेकांच्या मातोश्रींची काही मिनिटे जाहीर विचारपूस केली. . . . . . . एकदम भन्नाट.
(No subject)
(No subject)
"कुण्या गावाच्च आलं पाखरू"
"कुण्या गावाच्च आलं पाखरू" >>>
भारीच लिहिलयं.....
तोंडात नुकताच भरलेला मौल्यवान
तोंडात नुकताच भरलेला मौल्यवान ऐवज तोंडातल्या एका सोयीस्कर कोपर्यात तात्पुरता ढकलून टाळूला लावायला जीभ मोकळी करून घेतली.
त्या आजींबरोबर आलेले आजोबा आणि चालक महाशय यांनी एकमेकांच्या मातोश्रींची काही मिनिटे जाहीर विचारपूस केली,
>>
छोटा आणि जबराट लेख उत्तम जमलाय.
हायला हा लेख वाचायचा राहीला कसा?
मस्तच यार....!!!
मस्तच यार....!!!
भन्नाट आहे.
भन्नाट आहे.
(No subject)
आता नाही पण काही वर्षा पूर्वी
आता नाही पण काही वर्षा पूर्वी मुंबई मधील बेस्ट ची बस सेवा देशात एकच नंबर ला होती
पुण्यात मी पण अनुभव घेतला आहे नवीन माणसाला बरोबर मार्गदर्शन केले जात नाही इच्छित स्थळी जाण्यासाठी
लेख मस्तै. खुऽऽप हसले.
लेख मस्तै. खुऽऽप हसले.


मुंबईत जसं लोकलमधे चढायला हिंमत लागते तशीच पुणयात बसमधे.
मी 7वीत असल्यापासुन पुण्यात बसने प्रवास केलाय त्यामुळे आता काहीच वाटत नाही.
मुंबईत जसं लोकलमधे चढायला
मुंबईत जसं लोकलमधे चढायला हिंमत लागते तशीच पुणयात बसमधे>> हे थोडंस जास्त झालं.
अजिबात जास्त नाही.जीव गुदमरतो
अजिबात जास्त नाही.जीव गुदमरतो बसमधे गर्दीच्यावेळी. लोकांना बसमधे कधी कधी लटकुन प्रवास करावा लागतो..,आत्ताकुठे हि परिस्थिती सुधारते आहे.
अशाप्रकारचा बसप्रवास मीपण केलाय.
<<< मुंबईत जसं लोकलमधे चढायला
<<< मुंबईत जसं लोकलमधे चढायला हिंमत लागते तशीच पुणयात बसमधे. >>>
मुंबईची सर पुण्याला नाही.
https://youtu.be/tVHDTLPQ9qg
"अहो, धायरी फाट्याला जाणारी
"अहो, धायरी फाट्याला जाणारी बस कुठून सुटते हो?" फाटकाजवळ एक खाकी कपड्यातले मामा उभे होते त्यांना मी विचारलं. अशोक सराफचा फोटो आणि त्याखाली 'माझ्या यशाचे कडवट रहस्य: वैद्य-पाटणकर काढा' असं लिहिलेल्या बसकडे बोट दाखवून त्यांनी, "ती काय मागेच उभी आहे" अशी बहुमूल्य माहिती दिली. >> खत्तर्र्नाक!!!!

मला कुठलीही, म्हणजे कुठल्याही
मला कुठलीही, म्हणजे कुठल्याही राज्याची बस लाभते (लागते नव्हे) ,जिथे जायचे असते तीच बस सुटायच्या बेतात असते किंवा स्टॉपला येते. बस वेळेत पोहोचवायचं काम करते तर नावं का ठेवा? कतरिना वगैरे न मिळणाऱ्या नट्यांची?
"अमच्या घरापाशी स्टेशनवरून बसही येते?" असे प्रश्नही ऐकले आहेत.
बोकाभाऊ,
बोकाभाऊ,
तुम्ही दिलेली video पाहिली.4-5 वर्षापुर्वी पुण्यात बससाठी काही निवडक मार्गावर अशीच गर्दी असायची ; पण आत्ता परिस्थिती सुधारली आहे.हे पुणे मनपा कार्यरत असण्याचं उत्तम उदाहरण आहे.
So,तुमचंच खरं.
पुण्याला मुंबईची सर नाही;

फक्त आणि फक्त गर्दीच्याबाबतीत
भारी लिहिलंय! पुण्यात असताना
भारी लिहिलंय! पुण्यात असताना अधूनमधून प्रवास केलाय पीएमटीने! त्यामुळे अनेक गोष्टी पटल्या. अनेक वर्षांनी आत्ता काही महिन्यांपूर्वी बिबवेवाडी ते शनिवारवाडा ( जाऊन येऊन दोन्ही) असा प्रवास पीएमटीने केला आणि मरणाची गर्दी अनुभवली. बसने आल्याचा घोर पश्चात्ताप झाला. बरं, बस येत नाही म्हणून रिक्षा बघावी तर ते आपल्याकडे तुच्छ कटाक्ष टाकून जातात.
Pages