एका वविची गोष्ट

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

"एका वविची गोष्ट"

स्थळ कुणीकडंच? पुणं की मुंबई? जवळच की लांबच? खाण्याची सोय? बसण्याची सोय? (तुम्ही समजलात ती नाही... काय समजलात ते तुम्हालाच माहीत... ) बाकीच्या (गैर)सोई कश्या? मंडपाचा बजेट काय असेल? लेडीजबायांना सोबत घ्यायचं म्हंजी गाडी पाहिजे... रस्ता पाहिजे... पक्का पाहिजे... जल्ला वविच्या लग्नाला हजार विनोद... असो...

दोन्हीकडच्या वर्‍हाडी मंडळींना वेध लागले होते ते सालाबाद प्रमाणे होणार्‍या वविच्या लग्नाचे. बरं आपली ववि म्हंजी अगदी आनंदी, उत्साही, खोडकर, खेळकर, अगदी खट्याळ... मग तिला स्थळ पण तस्सच सुचवावं लागणार... बरं वर्‍हाडी पण कोणी साधीसूधी मंडळी नव्हेत, तर चक्क मायबोलीकर... काय त्यांचा उत्साह, त्यांच संयोजन, त्यांचे कार्यक्रम... सगळं कस्सं एकदम प ध्द त् शी र... आरामात उशीर!

जुनच्या पहिल्या धारेची (जल्ला हसू नका) साक्ष ठेऊन कार्यध्यक्षांनी स्थळशोध मोहिम हाती घेतली. लागलीच संयोजकांना तसे फतवे जारी करण्यात आले. संयोजकही उदंड उत्साहात कामाला लागले. पार नैॠतेपासून वायव्यपर्यंतचा सगळा परिसर पालथा घालून झाला... पण वविसाठी योग्य स्थळ काही सापडेना... "क्कसं नाही मिळत स्थळं तुम्हाला" असं म्हणत एका जुन्याजाणत्या मायबोलीकर अण्णांनी कंबर कसली आणि बाकीचे संयोजक हवालदिल झाले... Uhoh (काय करणार... या वयात पण अण्णांना स्थळं पाहण्यात प्रचंड उत्साह, अगदी एका पायावर तयार) झालं पुढारी निघाले... कधी डाविकडे कधी उजविकडे... प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणी आडवे... (घ्या घ्या दात विचकून घ्या) आडवे म्हंजी फोटो काढताना वैगरे... काय फोटो काढलेत म्हणून सांगू... अहाहा

"स्थळ कसं अग्दी आपल्या standardच हवं" अण्णा... मग जरा करा की प्रयत्न... म्हणतात ना 'प्रयत्ना अंती हेगडेश्वर'... अरे व्वा मिळालं की स्थळ... पाहिलतं 'बगल में स्थळ और गाँव में वळसा' हे असं असतं... कर्जतला डॉ. हेंगडेंच आयुरलाईफच स्थळं काही वाईट नाही... बरं मांडवाचा खर्च पण हेंगडेच करणार... अरे व्वा म्हणत अण्णांनी विजयी अविर्भावात एक तुतारी बाहेर काढली आणि शिलगवली...

सरतेशेवटी स्थळ ठरलं... घेण्या(न)देण्याची बोलणी झाली... आता वेळ होती ती सुमुहुर्त शोधायची... ते कामही कार्यध्यक्षांनी लगोलग उरकून टाकलं... पण हाय... इथचं घोळ झाला... अण्णांना हा मुहुर्त पसंत नव्हता त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. २७ जुलैच्या मुहुर्तावरच अण्णांना रायगड मोहीम फत्ते करायची होती... आता आली ना पंचाईत... कोण करणार कन्यादान? कसं होणार वविचं? सगळे संयोजक चिंतातूर... तरीही हार न मानता अण्णांची मनधरणी करू लागले... पण काही केल्या 'यश' येईना... (कसा येणार तो... तिकडे नविन संसारात अडकलेला) आणि अचानक एके दिवशी सकाळीच अण्णांचा फोन... "आधी लगिन रायगडचं मग आपल्या वविचं"... बस्स ही खबर मिळताच सगळे संयोजक परत हवालदिल... Uhoh (अण्णा तुम्ही एका वेळी एकच दगड का नाही मारून घेत पायावर...)

मुहुर्ताचा दिवस जसा जवळ येत होता, तसं सांस्कृतीक समिती आपलं जाळं विणत होती. पण त्यांच्या जाळ्यात एकही मासा गावे ना... कसा गावणार... सगळी वर्‍हाडी चहासदर्‍यांची विचारपूस करण्यात दंग...

हा हा म्हणता मुहुर्ताचा दिवस उजाडलं... आता लग्न म्हंटल की गडबड गोंधळ आलाच... त्याला आपण तरी कसे अपवाद... मुंबईच्या वर्‍हाडींना घेऊन जाणारी बस आदल्या दिवशीच दुसर्‍या वर्‍हाडाला घेऊन पुण्यात दाखल झालेली... मुंबईचे संयोजक tension मधे... अण्णा रायगड मधे... काय करायचे? देव तारी त्याला बस मारी... पण तसे काही झाले नाही... देवाच्या कृपेने एका रात्रीत दुसर्‍या बसची व्यवस्था झाली आणि वर्‍हाड निघालं कर्जतला...

IMG_0828.jpg

विषय: 

जल्लां तुमच्या वविचं दरवर्षी कसं काय बॉ लगीन ???? Happy

इन्द्रा मस्त लिहीलस रे Happy

चला आता पार्ट २ करायला हरकत नाही! काय म्हणतोस इंन्द्रा?? Wink
"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.

(अण्णा तुम्ही एका वेळी एकच दगड का नाही मारून घेत पायावर...) .. Happy

माझी परिक्षा होती... नाही तर मी पण आलो असतो......( आलो असतो तर बरे झाले असते.. नाही तरी रिझल्ट फेल आलाय ! )

व्वा.. इंद्रा.. पहिल्याच पानात सप्तरंग दाखवलेस रे.. !! असेच रंग उधळत जा.. !! Happy

-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks !! तुम्ही म्हणाल जसं..
-::- -::- -::--::--::--::--::-

प्यारे कुठली परिक्षा??
यो सप्तरंग कुठायात रे??

"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.

एम एस ( इन्शुरन्स ) . आय सी एफ ए आय .... नेमका त्याच रविवारी पेपर होता... ववि ही नाही आणि रिझल्टही फेल... लै वाइट वाटतय बघा..

(अण्णा तुम्ही एका वेळी एकच दगड का नाही मारून घेत पायावर... दोन दोन दगड घेऊनही अण्णान्चे पाय शाबूत.. आणि आम्ही एकच उचलला तर नेमका पायावरच पडला... Happy )

फोटो मात्र सुरेख आहे.... गाडीच्या काचेच्या तावदानातून दिसणारा पाऊस....काचेच्या वायपर नसलेल्या वरच्या भागात पावसाचे थेम्ब .. अप्रतिम.... ! गणेशोत्सवाच्या पावसाच्या फोटोचं पहिलं बक्षिस या फोटोलाच द्यायला हवं. ... कॅमेरा कुठला होता ? मोबाइल १.३ कॅमेर्‍यात हा इफेक्ट येऊ शकतो का?

Indraa ekadam sahiich utaraley lagnaachyaa purvatayaariche varNan.... Happy

```-```-```-```-```-```-```-```-```-```-```-```-```-```-```-```-```-```-```
“Confusion is always the most honest response.”