सप्रेम नमस्कार - प्रवेशिका १३ (लालू)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 08:45

वाचकहो,
सप्रेम नमस्कार!

या उपक्रमासाठी दोन पत्रे दिली आहेत. पहिले पत्र माझ्या वयाचे चौदावे वर्ष चालू असताना मी मामेबहिणीला लिहिलेले आहे. तेव्हा आमचा नेहमी पत्रव्यवहार व्हायचा. त्यातले हे एक पत्र काही वर्षांनी मामाला सापडले आणि ते त्याने आठवण म्हणून ठेवायला मला दिले. त्यातले एक पान नातलगांची नावे, माहिती/चौकशी याचे असल्याने ते गाळले आहे. बाकीची तीन पाने देत आहे.

दुसरे पत्र माझ्या चौदा वर्षाच्या मुलाने मला लिहिले आहे. माझी नुकतीच भारतवारी झाली तेव्हा मी तिकडे आहे असे समजून हे काल्पनिक पत्र लिहिले. पहिल्यांदा इंग्रजीत लिहून, माझी थोडी मदत घेऊन त्याचे भाषांतर केले. मग त्याने स्वहस्ते लिहून काढले.

ही दोन्ही पत्रे 'टीनएजर्स'ची आहेत, तेव्हा कृपया समजून घ्या. Happy
धन्यवाद.

आपली,
-लालू

lalu1.jpglalu2.jpglalu3.jpgmanas1.jpgmanas2.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लालु अक्षर मोत्यासारख सुरेख म्हणतात तस आहे की. Happy
अजुनही तसच येत का अक्षर??? Happy
तुझा मुलगा मराठी लिहितो ते ही चांगल. गुड. Happy

मस्त.. लालु टिनेजर असतानाचे पत्र पुर्ण शाबुत अजुन आहे Happy
मुलानेही खरेच छान लिहिलेय.. माझ्या मुलीचे पहिलीत असताना सेम असेच अक्षर होते त्याची आठवण झाली..

मायलेक दोघेही त्यांच्यात्यांच्य वेळचे टिनेजर असताना त्यानी लिहिलेले पत्र ही कल्पना खुप आवडली. Happy

व्वा! दोन्ही पत्रे (मजकुरासहित) झक्कास! Happy

पहिले पत्र वाचताना चक्क वीसपन्चवीस वर्षान्पूर्वीचा तो कालखण्ड आठवला!

दुसरे पत्रातील "दुरेघी" वही बघुनही मला माझे अन पोरान्चे बालपण आठवले Happy अहाहा..........

मस्त! लालूचं अक्षर अजूनही तितकंच वळणदार आणि सुंदर आहे (पहा, दिवाळीअंक २००९ची एक जाहिरात!) काय हे! आम्हाला गमतीजमती कळल्याच नाहीत! Happy Light 1

मानसचं पत्र गोड झालंय Happy काय अवघड अभ्यास!

किती गोड. लालू खरेच मस्त अक्षर आहे. छोट्याचे पत्र पण छान आहे. कॅनी मजेत आहे हे खूप आवडले.

दोन पिढ्यांच्या त्याच वयातली पत्र देण्याच्या आयडियेलाच पहिली टाळी! लालू , काय सुंदर अक्षर!मॅचची मजा भारी बाई! तुझ्या पत्राच्या कागदाचा पिवळेपणा जास्तच त्या दिवसात घेऊन जातो नाही? मुलाचंही पत्र गोड! Happy

लालू , अप्रतिम अक्षर आहे तुझं , सिंप्ली सुपर्ब . पूनम ने सांगितल्यामुळे कळलं की अजूनही ते तितकंच सुंदर आहे . मानसचे खास कौतुक , मराठीत इतकं छान पत्र लिहिल्याबद्दल . मस्त .

लालू अक्षर ईतक सुंदर आहे की पत्र वाचायच्याएवजी मी आधी अक्षरच बघत होते.

<<एका टीनएजपासून दुसर्‍या टीनएजपर्यंतचा प्रवास. दोन पत्रे एका पानावर दाखवण्याची कल्पना मस्त! >> खरच.

मस्त. एकदम भारी आयडीया असे आईचे आणि मुलाचे पत्र एकत्र द्यायची.
अक्षराबद्दल तर बोलायलाच नको मस्तच आहे.

दोन पिढ्यांच्या त्याच वयातली पत्र देण्याच्या आयडियेलाच पहिली टाळी!>>>> माझ्याकडुनही.
लालू तुझं अक्षर सुरेखच. नात्यातलं प्रेम, जिव्हाळा, एक मस्त घरगुतीपण हे सगळं खुप आवडलं.
मुलगा मराठी लिहीतो याबद्द्ल तुमचं दोघांचं अभिनंदन. त्याचही पत्र छान आहे.

लालू अक्षर सुरेख आहे तुझं. मुलानेही तुझच अक्षर उचललय. दोन्ही पत्रं किती नीटनेटकी दिसतायत!
मजकूरही छान!

किती सुंदर अक्षर आहे तुझं लालू. < मिळाल्यावर वाचलस तरी चालेल >> Happy खूप क्यूट वाटल वाचून हे Happy . मानसचही गोड आहे खूप पत्र.

सही आहे आयडिया दोन पत्रांची. लालू, अक्षर म्हणजे अगदी मोत्याचे दाणे की! अन ते लाल समास असलेले वहीचे लहान कागद ,आणि वर्ल्ड कप ची आठवण वगैरे पाहून मस्त नॉस्टेल्जिक वाटले.

Pages