'म’ वाली ....

Submitted by विशाल कुलकर्णी on 23 February, 2010 - 04:48

बरेच दिवस शांत होतो. पण सद्ध्या शिरोडकरांनी लावलेला धडाका बघून आम्हालाही सुरसुरी आली. कौतुकरावांच्याच http://www.maayboli.com/node/14055 या सुंदर कवितेला आमचे हे विडंबन सादर समर्पित.

’बाई’ ने पुरावे खुले मांडलेले...
'साहेबां'शी दुरावे किती वाढलेले...,

पिपासू नेत्यांचे घसे कोरडे अन...
खंड भुखंडांचे वाया चाललेले ....,

वासना धनाची प्रभागास जाळी ....
चरे नित्य आमदार निधीस लाभलेले,

दिसे राजधानीची कवाडे मनाशी...
रडतात पुढारी, तिकीट कापलेले,

द्यावे..? घ्यावे..? कसे सिद्ध व्हावे..?
सारेच प्रश्न जनपथी टांगलेले...,

उठे हात दोन्ही, " कुणी होय वाली?"
मन - मोहन सोनिया चरणी गुंतलेले .... !

(आता जुना झालेला) ईडंबनकार ईरसाल खोटे

गुलमोहर: 

Lol

वा .... कुलकर्णी. बघा शिरोडकर ... कुलकर्ण्यांनी .... `म'वाली ...पोस्टवून ... `ह'वाली केलयं ... काय म्हणणं आहे तुमचं !!!

विशल्या, माझ्या कवितेच्या विडंबनाची सुपारी कोणी दिली ? नाव सांग आधी. नाही त्याच्या विपूत चार कायच्या काय खरडल्या तर नावाचा.....
पण मित्रा, वृत्तात बसला असतास तर अजून मजा आला असता... कधी सुधरणार तू ? हे तुझं अस 'लय' सोडून वागणं म्हणजे लय झाल बघ.

Lol

कौतुकला अनुमोदन लयीने अजुन मजा आली असती. आता इडंबन करत वेळ फुकट न घालवता त्या बिलंदराला तडीपार ने एकदाचा Proud

विशाल,
मस्त विडंबन रे. पण कौतुक म्हणतोय तेही खरं आहे. कोणतीही कविता लयीत साधली ना, की मग तिची खुमारी अधिक वाढते.
पण चिमटे झक्कास. लगे रहो मुन्नाभाय Happy

मस्त... आम्हाला ते वृत्त बित्त काही कळत नाही तेच बरे.. त्यामुळे काहीही न खटकता कवितेचा आनंद घेता येतो.. Happy

विश्ल्या लै भारी... Lol
"काही लोकांना वाटतं की फक्त तेच विडंबन करू शकतात"
बरी खोड मोडलीस... Proud