कोरीया

Submitted by admin on 20 April, 2008 - 21:17

कोरीयातले मायबोलीकर

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रशान्त, तुम्ही गेली ३ वर्ष इथं आहात म्हणजे कोरिया बर्‍यापैकी फिरून झालं असेल नां? स्वैंपाक घरी करता कां?

कोरिया बरयापैकि फिरलो आहे, पण बरच काहि बाकि आहे अजून....

स्वैपाक ..ओफिस मधे चक्रा झिन्दाबाद... weekend ला कधि घरि तर कधि रेस्तोरन्ट....Yoido परिसरात खूप सारे नेपाळी रेस्तोरन्ट आहेत.... again for food stuff Iteawon Foreigh Food mart....

भाज्यान्चे जास्ति options नाहियेत ना....

नाही नां? यापूर्वी थोडे महिने जपानमध्ये होते. भाज्या तिथे इथल्यापेक्षा थोड्या जास्त मिळायच्या.

चक्र कुठचं? हन्नामचं की इतेवॉनचं? हे योईदो नक्की कुठे येतं? नेपाळी रेस्टॉरन्टस आहेत म्हणताय म्हणून विचारतेय.

हो मी लाइन वरच्या Yeouido (Station 526 ???) जवळच रहातो, इकडे आसपास Ganga, Shanti, Alladin, Mt. Everest, Om Shanti, Himalayan......... बरेच नेपाळी / पाकिस्तानि रेस्टॉरन्टस आहेत.

ईतेवोन च्या फोरेन फूड मार्ट मध्ये बरयापैकि भाज्या मिळतात (Frozen)

गुडमॉर्निंग कोरिया.

ईतेवोन च्या फोरेन फूड मार्ट मध्ये बरयापैकि भाज्या मिळतात (Frozen)>>>>हो माहितीये मला. मागच्या वेळेस ठरवलं होतं की फ्रोझन ओकरा घेऊ म्हणजे आणखी एक भाजी होईल. पण कसचं काय, त्याचं पॅकिंग २००८ सालचं होतं, मग काय बेत रद्द केला. तिथे मसाले ही एक्सपायरी जवळ असलेले/झालेले असतात बर्‍याचदा. आपल्याला गरज असते, त्यामुळे कधी कधी घेण्याशिवाय पर्याय नसतो.

खरय आडो even फोरेन फूड वाल्याच वागण बर्र्याच वेळेला उपकार केल्यासारख असत, पण ते म्हण्तात ना अड्ला हरि......

हं खरंय. गेल्यावर कधीच निवांतपणे आपल्याला हवं ते शोधता येत नाही, कारण वीकांताला असलेली गर्दी व दुकान अतिशय छोटं.

फॉरेन फुड मार्ट पासून थोडं पुढे गेल्यावर एक पाकिस्तानी दुकान आहे, ते माहितीये का तुम्हांला?

हो तिकडे Marhaba mart / Muslim mart... अशि काहि दुकाने आहेत पण एकन्दरित सगळी कडचि परिस्थिति सारखीच.... even I tried for some Nepali stores near my place....but not much difference.

हो त्या स्टोअर मध्ये फार व्हरायटी नाही पण थोडं मोठं आहे इतकंच.

तुम्ही इथे ३ वर्ष आहात म्हणून विचारतेय, कोरियन भाषा येते कां? लिहायला-वाचायला. असेल, तर कोणत्या चांगल्या साईट्स आहेत कां शिकायला?

कोरिअन fluently बोलयला नाहि जमत पण बर्यपैकि समजते...लिहता / वाचता येते.
Seoul Global Centre (City hall) conducts free coaching for the foreigners (weekdays).... (गूगल वर अधिक माहिति मिळु शकेन)
Yonsai University इ७ / इ‍ॅ३ विजा होल्डेर्स साठि विकन्ताला free क्लासेस conduct करते...

आज सन्ध्याकळी एका Korean friend ला भेटनार होतो, आताच तिचा SMS आला - I go meeting evening not meet you.... काय समजु यातुन ??

Mandal.png

'मायबोलीकरांनो, अंकासाठी लेखन करा' असं आवाहन करणारी जाहिरात करायची ठरवल्यावर संपादकांना उत्साह आला. आजकालचा ट्रेंड आहे तसे जाहिरातीसाठी सेलेब्रिटी पाहिजे म्हणजे पाहिजेच, अशीही कल्पना तरुण, उसळत्या रक्ताच्या (म्हणजे जवळपास सर्वच!) संपादकांनी मांडली.

"अमिताभ बच्चनला विचारून बघूया. तो नवरत्न तेलाची पण जाहिरात करतो. तेलापेक्षा आपला अंक भारी आहे."
"पण आपल्याला मराठीत जाहिरात करायचीये. अमिताभच्या मराठीची बोंब आहे. 'लक्ष्य' पाहिला नाहीएस का?"
"राज ठाकरे? मायबोलीकरांनो, अंकासाठी 'मनसे' लिहा."
"मायबोलीवरच्या कॉंग्रेसवाल्यांना काय वाटेल मग?"
"आजि सोनियाचा दिनु, लिहायला हाती धरा पेनु... ख्या ख्या ख्या..."
"आणि शिवसेनावाल्यांचं काय?"
"गपा... नको राज ठाकरे आपल्याला..."
"मृणाल कुलकर्णी?"
"गाडगिळांच्या जाहिराती केल्यापास्नं बाई अंगभर दागिने घातल्याशिवाय जाहिराती करत नाहीत. आपण दागिने कुठनं आणायचे?"
"आपल्या संपादकमंडळातल्या बायका देतील ना दागिने जाहिरातीपुरते! आणि नव्वारी साड्यापण..."
(चर्चेत तणावपूर्ण शांतता. मृणाल कुलकर्णीला आपले दागिने टेम्परवारी का होईना घालायला द्यायची कल्पना अंमळ जड पडली.)
"सोनाली कुलकर्णी?"
"थोरली की धाकटी?"
"कुठलीही... आता त्यात काय?"
"पण दिवाळी म्हटली की कुठलीही बाई दागिने घालूनच जाहिराती करणार. दिवाळी अंकांत बघतोच की आपण."
"मग बायका नकोच... सलील कुलकर्णी?"
"जाहिरात करेल त्याचे कुलकर्णी आडनाव पाहिजेच अशी काय अट आहे काय?"
"संदीप खरे?"
"ते आयुष्यावर काही किंवा बरेच काही 'बोलतील'. आपला फोकस लिखाणावर आहे."
"रामदासस्वामी?"
(गोंधळलेली शांतता. संदीप खर्‍यांवरून थेट रामदासस्वामी ही उडी प्रचंड आहे.)
"लिखाणावर त्यांचा फोकस होता. 'दिसामाजि काहीतरी ते लिहावे...' म्हणणारे ते एकटेच."
"पण ते प्रत्यक्ष कसे येणार आता? प्रत्यक्ष माणूस असला की प्रभाव जास्ती पडतो."
"आपण लेखक किंवा लेखिकांनाच जाहिरातीसाठी तयार करू ना..."
"कवी का नको?"
"चालेल, कवीही चालेल...."
"कवयित्री?"
"तीही चालेल."
"बालकवी?? खि खि खि..."
"गपा ए... इथे आपल्याला जाहिरात करायचीये तर तुम्हाला विनोद कसले सुचतायत?"
("गंभीरपणे" चर्चा पुढे सुरू राहते.)

लोकहो, संपादकमंडळाची चर्चा सुरूच राहील. पण 'घटका जाती, पळे जाती...' करत वेळ पळतो आहे. त्यांचा सेलेब्रिटी जाहिरातीसाठी यायचा तेव्हा येवो, तुमचं साहित्य अंकासाठी महत्त्वाचं... !!

तेव्हा लवकरात लवकर आपले साहित्य पूर्ण करून, मुदतीच्या आत आम्हाला घोषणेत दिलेल्या दुव्यावर पाठवा. आणि हो, चित्रकलेचे कौशल्य असणार्‍यांनी इथेही बघा.