फायरफॉक्स ३. ०, इंडीक व गिरगिट

Submitted by shantanuo on 2 July, 2008 - 13:24

फायरफॉक्स ३. ० खरोखरच भारतीय भाषांसाठी वरदान ठरणार आहे. आपण हा न्याहाळक (इंटरनेट एक्स्प्लोअर सारखा ब्राउझर) येथून मिळवू शकता...
http://www.mozilla.com/en-US/firefox/

१) यात इंडीक इनपुट एक्स्टिंशन वापरून सहजगत्या मराठी लिपीत मजकूर टंकित करता येतो.
मराठी RTS हा पर्याय निवडल्यास बराहा, 'गमभन' सारख्या सुविधेची गरज भासणार नाही. मायबोलीवर जितक्या सोप्या पद्धतीने टाईप करता येते तितक्याच सोप्या पद्धतीने कुठेही टाईप करता येईल. आंग्ल भाषेची गरज पडल्यास कंट्रोल + स्पेस ही कळ जोडीने वापरा. मी ही सुविधा वापरून याहू मेल मधून मराठी मेल पाठवतो.

https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/3972

२) लिप्यंतरासाठी गिरगिट हे अवजार आता येथे उपलब्ध आहे.

https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/5483

तेथेच त्याचा स्रोतही पाहता येईल.
अधिक माहिती उपक्रमाच्या या पानावर वाचता येईल.

http://mr.upakram.org/node/367

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शन्तनू, ग्रेट

मराठी इ मेल पाहिल्यावर माझ्या मित्राना फेफरे आले Happy
धन्यवाद लिंक दिल्याबद्दल.
मात्र जी मेलमध्ये हे देवनागरीकरण फक्त ऍड्रेसमध्ये चालते की ज्याचा काही उपयोग नाही. आणि टेक्स्ट मध्ये चालत नाही. तू म्हणतो तसे याहू अगर वाय मेलवर व्यवस्थित चालते.....

फारच सुंदर Happy

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

या सुविधेने केवळ ब्राऊझरमध्येच टंकीत करता येऊ शकतं. तुम्हाला बरहा हे software माहिती आहे का?
नसेल तर इथे टिचकी मारून ते मिळवा. बरहा डायरेक्ट हे अतिशय उत्तम software चालू करून तुम्ही अगदी मायबोली मध्ये जसे टाईप करता तसे तुमच्या कंप्युटरवर कुठल्याही application मध्ये टाईप करू शकता. अगदी MS Word, GTalk पासून MS Excel Sheets मध्ये सुद्धा!!
ब्राऊझरमध्ये तर होतंच होतं.
हे software घेतल्यापासून मराठी लिखाण इतकं सोपं झालं आहे की मी आता चॅट सुद्धा मराठी लिपीतूनच करतो.
आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे फुकट आहे Happy

बरहा विस्टा मधे चालत नाही...
आणि काही प्रोग्राममध्ये गरबेज येते अन्यथा बरहाही चान्गलेआहे...

क्ष, बरहा विस्टात चालवायला काही उपाय आहे का?

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

टोणगा, बराहा विस्टा मधे नीट चालण्यासाठी, कन्ट्रोल पॅनेल->युझर अकाऊंट्स -> turn user account control on or off येथे क्लीक करा.. वर युझर अकाऊंट कन्ट्रोल ऑफ करा.. बराहा विस्टामधे,आय-ई मधे तसेच सर्व ऍप्लीकेशन्स मधे नीट चालेल.

मला फक्त आयई लाच प्रॉब्लेम येत होता विस्टामधे, तो याने सुटला..

ऑफीस २००७ सोबत मिळणारा युनिकोड चा फाँट सुबक नाही. आणि फायर फॉक्स मध्ये डायनामिक फॉन्ट चालत नाहीत.

नमस्कार मीत्रांनो,
मी गेले सहा महिने एअरसेलचे नेट वापरत आहे. खुप छान स्पीड आहे. माला एक प्रश्न पडला आहे, क्रुपया त्याचे उत्तर द्यावे.
मी काही दिवसांपुर्वी माझ्या नेट वर मोझिल्ला फायरफॉक्स इंस्टॉल केले. पण त्यामुळे माझ्या नेटवर काहि साइट ओपन होतात काहि नाहि, तर असे का होते?
क्रुपया मार्गदर्शन करावे.