तुला पाहुनी बाप म्हणाला....

Submitted by कौतुक शिरोडकर on 17 February, 2010 - 07:52

(शरदराव, विडंबनकार क्षमाप्रार्थी आहेत. याची नोंद घ्यावी.)

तुला पाहुनी बाप म्हणाला, "कूSSSल कोण हे नवे?",
त्या आधीच्या चार हडकुळ्या, त्यांच्यापरी उजवे!

फॅशन ऐसी, दिपले डोळे, जणू रँपवर नटी,
किंवा चुकला टेलर म्हणू मी? ठिगळांस लाजवे!

सौंदर्याची चर्चा होते आहे चोहीकडे,
'मापे' सांगती नाकोनाकी, रोमिओंचे थवे!

मेकप मारी, नखरे भारी, नाद लावला खुळा
रूप हिचे की चटक चांदणी.... घोंगावे पारवे!

अशी तुझी ही बाला बघता 'खरच' जाहलो खुळा,
ही अशी तर 'मम्मा' कशी तिची ? भेटावया हवे!!

गुलमोहर: 

वा !

शि रोडवर करतो का?

तुला आया बहीणी नाहीत कारे सुक्काळीच्या. Light 1 हलके घ्या जड घ्या.
------------------------------------------------------------------
जावय माझा भला.

आक्का, तुमच्यासारख्या या नस्त्या 'हौसा' नाहीत हो मला.
आया नव्हतीच कधी. आई आहे आणि बहिणही आहे. फाटक्या तोंडाची आक्काच नव्हती बघा. आता ती हलके घेते की जड होते ते बघू.
............................................................................................................
जावय सख्खा की मानलेला ?

हाच तो! हाच मुलाचा बाप!
भेट, भेट. अवश्य भेट. तसेही मम्मा ग्रूपमधून'सुद्धा' बरेच फॅन फॉलोईंग आहे तुझे. Wink
'मम्मा' म्हणता ओठा लागी ओठ.... 'जुळे'
आई म्हणता केव्हढे अंतर पडे! (स्व.बहिणाबाईंची क्षमा मागून)

<<<'मम्मा' म्हणता ओठा लागी ओठ.... 'जुळे'
आई म्हणता केव्हढे अंतर पडे! (स्व.बहिणाबाईंची क्षमा मागून)>>>

ग्रेट. अशक्य हसलो. Rofl

शरद

उमेशा, 'हाच मुलाचा बाप' हे एवढ्या पोटतिडकीने का सांगतोयस ? तुझ्यावर कोणी आरोप केला होता का रे ? आणि करपलास कारे फॅन फॉलोईंग मुळे ?
'मम्मा' म्हणता जुळुनी विलगती ओठ जरी
'आई' म्हणता हाक अंतरी पुन्हा ठरे ! (कोणाचीही क्षमा न मागता. क्षमा मागावी लागेल असली कामे करावीच कशाला माणसाने ? )

:P:-P

फॅशन ऐसी, दिपले डोळे, जणू रँपवर नटी,
किंवा चुकला टेलर म्हणू मी? ठिगळांस लाजवे!

ही अशी तर 'मम्मा' कशी तिची ? भेटावया हवे!!

"कौतुक" करावे तितके थोडेच......!!!