आज पहली तारिख है!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

माझ्या लहानपणी रेडिओवर दर एक तारखेला 'खुश है जमाना आज पहली तारिख है!' हे गाणे वाजवले जायचे! तेंव्हा त्याचा 'अर्थ' कळत नव्हता. मग जेंव्हा नोकरी सुरु झाल्यावर हाती पगार पडु लागला तेंव्हा त्या एक तारखेची जादु कळु लागली! Happy

ऑस्ट्रेलियात आल्यापासुन मात्र दर दोन आठवड्याला पगार होत असल्याने एक तारखेची मजा च निघुन गेलीय. दर दुसर्‍या गुरुवारी पगार होत असल्याने 'मन्थ एन्ड' चा आर्थिक ताण पडत नाही, पण पगार झाल्याचे / न झाल्याचे काही वाटत नाही.... पगाराच्या गुरुवारी काही दुकाने रात्री ८ किंवा १० पर्यंत चालु असतात (इतर दिवशी ५ ला च बंद!) तेव्हढाच काय तो फरक...!

विषय: 
प्रकार: 

मी पण ऑस्ट्रेलिया मध्ये च आहे, पण माझा पगार दर १५ तारखेला होतो.....त्यामुळे मला त्या दिवसाची मज्जा अजुनही मिळते....खरच खुप excitement असते.....

इथे खरेच ती सर येत नाही. आम्हालापण महिन्यातुन दोनदा पगार. लहानपणी १ तारखेची वाट पहात असायचो. काही विकत घ्यायचे असेल तर १ ते १० पर्यंत मागितले तर्च मिळायचे. नंतर भाउ जसे कमावु लागले तेव्हा १ तारखेला मिठाई यायची घरात आणि पॉकेट मनीपण त्याच दिअवशी मिळायचा. त्यानंतर सासरी पण मिठाई, आइसक्रिम आणि पॉकेट्मनी मिळायचे. आता मी स्वतः कमावुनही ती मजा येत नाही जी १ तारखेत होती.

आम्हीच बरे बाबा.सर्व तारखा सारख्याच.
माल विकून झाल्यावर ज्या दिवशी चुकारा हाती पडेल ती तारीख. कायम बदलणारी.
जुलै मध्ये पोरगा बिमार झाला तर त्याला डिसेंबर मध्ये दवाखाण्यात न्यायचे.
नो टेन्शन.. Proud

दर दोन आठवड्याला पगार होत असल्याने एक तारखेची मजा च निघुन गेलीय >>> खरयं चंपक , पण काय करणार जमानेके साथ चलना पडता है