मायबोली: खरेदी सुविधा आता भारतातही.

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

http://kharedi.maayboli.com
ऑनलाईन पुस्तक खरेदी
गेली काही वर्षे परदेशस्थ मराठी वाचकांसाठी उपलब्ध असलेली ही सुविधा आता भारतातही चालू करत आहोत.

म्हणजे नेमकं कायः
१. तुमच्या भारतातल्या नातेवाईकांना पुस्तके भेट पाठवू शकता.
२. तुम्ही जर भारतात असाल तर घरबसल्या कुरीयरद्वारे पुस्तके मिळवू शकता.

सध्या शिपींग आणि पुस्तकांच्या किंमती USD मध्ये दिसत आहेत. त्या लवकरच भारतीय रुपयांमध्ये पण दिसतील.

विषय: 
प्रकार: 

ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशासकांचे आभार. Happy
मायबोलीवर सध्या सर्व आघाडीच्या प्रकाशनांची पुस्तकं उपलब्ध आहेत. सर्व मायबोलीकरांनी या सोयीचा लाभ घ्यावा, ही विनंती..

अहाहा !! हे फारच उत्तम !! खूप धन्यवाद. चिनूक्साच्या आवाहनाला पाठिंबा.

    ***
    जळल्यावर उरते एक शेवटी राख / ती फेक विडी तोंडातील काडी टाक
    जळण्यातच आहे गंमत वेड्या मोठी / दिव्यता अमरता मायावी फसवी खोटी (- रॉय किणीकर)

    दिवसभरातली सर्वात उपयोगी माहिती. Happy धन्यवाद अ‍ॅडमिन.
    --------------
    नंदिनी
    --------------

    ही व्यवस्था नक्कीच उपयुक्त आहे. धन्यवाद अ‍ॅडमिन !

    अरे वा. हे एकदम मस्तच झालं आता.

    अरे वा वा..... ये हुई ना बात. हे एकदम बेस्ट काम केलेत तुम्ही अ‍ॅडमिन.
    आजच पुस्तकं ऑर्डर केलीत.

    आजच खरेदी पण केली. सोयीबद्दल आभार.

    वा मस्त. म्हणजे आता रंगिबेरंगी भारतातून पण विकत घेता येईल!
    ----------------------
    हलके घ्या, जड घ्या
    दिवे घ्या, अंधार घ्या
    घ्या, घेऊ नका
    तुमचा प्रश्न आहे!

    वाह तसेच मालिनी राजुरकर यान्च्या सी डी वगैरे? शक्य अस्ल्यास.

    आभार हे उपलब्ध करून दिल्याबद्दल.

    मायबोलीवर उपलब्ध असलेल्या पुस्तकांना मायबोलीकरांनीच लिहीलेल्या परीक्षणांची लिन्क देता येइल का? अ‍ॅमेझॉन वर असतात तसे रिव्यूज लगेच वाचता येतील.

    अर्रे, सही काम केलंत अ‍ॅडमिन टीम! धन्यवाद! धन्यवाद! धन्यवाद! Happy

    अ‍ॅडमीन टीम, किंमती अजूनही डॉलर्स मध्येच दिसतायत.
    कृपया रुपयांमध्ये किंमती प्रकाशित कराव्यात, ही विनंती.

    मी गेल्या आठवड्यात 'वेदार्थ निर्णयाचा इतिहास' मागवलेले आहे... पुस्तके शिपने निघाली आहेत, असा इ मेल २-३ दिवसांपूर्वी आला आहे... पैसे मात्र डॉलरमध्येच दिसत होते.

    भारतातून खरेदी केली तर काही भारतीय बॅंका ० ते ४% अधिभार लावतात असे लक्षात आले आहे. ते ज्या बॅंकेचे कार्ड आहे त्यावर अवलंबून आहे. भारतातल्या मायबोलीकरांना हा जास्तिचा भूर्दंड पडू नये म्हणून काही करता येईल का यावर प्रयत्न चालू आहेत. म्हणून आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतो आहे. तुम्हाला हा अधिभार देणे शक्य असेल किंवा तुमची बॅंक अधिभार लावत नसेल तर आतासुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. आता सध्याही भारतातून खरेदी चालू आहे.

    पुस्तके सुस्थितीत १५ दिवसापूर्वीच मिळाली... Happy छान सोय आहे.... शिपिंगचे ३ डॉलर पण फार नाहीत... पुण्यात पुस्तक शोधत फिरताना रिक्शाचे बिल याच्यापेक्षा जास्त झाले होते! Sad

    वेदांचा तो अर्थ हे पुस्तक हवे आहे..... मायबोलीवर आहे का?

    इथे रेव्ह्यु आहे... http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5680825.cms

    (वेदांचा तो अर्थ : रवींद गोडबोले, देशमुख आणि कंपनी, पुणे. पाने : ३०० (मोठी), किंमत : ५०० रुपये)

    मायबोलीच्या सूचीत नसलेले कुठलेही पुस्तक support @ maayboli . com ला मेल पाठवून (आणि पुस्तकाची माहिती कळवून) मिळते आहे का ते विचारू शकतात. पुस्तक बाजारात उपलब्ध असेल तर ते ऑनलाईन ठेवले जाते आणि त्यानंतर तुम्ही हवे असल्यास ते ऑनलाईन विकत घेऊ शकता.

    किंमती आता भारतीय रुपयांत दिसू लागल्या आहेत.
    भारतातील मायबोलीकरांसाठी एकूण खरेदीवर जास्त सूट (discount) दिसेल. ती सूट तुमचा पत्ता (shipping address) खरेदीत (shopping cart) टाकल्यावर दिसेल.

    वा मस्तच.. मी लगेच तपासले.. दिसताहेत हो किंमती रुपड्यात Happy

    असो.. पैसे फक्त क्रेडिट कार्डानेच भरता येताहेत का अजून? नेट बँकिंगचा पर्याय दिसला नाही.. का त्यासाठी पेपॅलचे लॉगिन करणे आवश्यक आहे?

    क्रेडिट कार्ड आणि पेपाल या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. खालील सगळे पर्याय उपलब्ध आहेत.

    १. पैसे क्रेडिट कार्डने भरता येतात.
    २. पैसे पेपालने, पेपालच्या खात्यातले भरता येतात.
    ३. पैसे पेपालने, पण क्रेडीट कार्ड वापरून भरता येतात.

    खुलासा हवा आहे:

    १) भारतीय क्रेडिट कार्ड - भारताबाहेरुन भारतात्तील पत्त्यावर खरेदी.
    २) परकीय क्रेडिट कार्ड- भारताबाहेरुन भारतातील पत्त्यावर खरेदी.
    ३) पे पल अकाउंट- परकीय बेंकेशी निगडीत- भारतातील पत्त्यावर खरेदी.

    यात परकीय चलन भारतीय रुपयात वा अमेरिक डॉलर मध्ये बदलण्यासाठी किती फी पडते?

    पुस्तके वाहतुक खर्च जास्त होत असल्याने मला इथे बोलावणे शक्य नाही. पुस्तके १०० डॉलरची अन गाडीभाडे ८० डॉलर! भारतात पुस्तके जमा करुन ठेवलेले परवडतील.

    (हा प्रश्न मी मागे ई मेल ने विचारला होता. पण मला उत्तर समजले नाही.)

    वरील तीनही प्रकारात परकीचलन किंवा रुपयात कुठलेही रूपांतर करण्यासाठी लागणारी फी ही मायबोलीतर्फे नसून ज्या बॅंकेकडून तुम्ही क्रेडीट कार्ड घेतले आहे ती बॅंक ते धोरण आणि फी ठरवते आणि त्यामुळे ती वेगवेगळी असते. आणि आम्ही त्याबाबत कल्पना देऊ शकत नाही. बर्‍याच बँका काहीही फी आकारत नाही. माझ्या माहितीनुसार अमेरीकेतले पेपॅलही कुठलीही फी (चलन रुपांतरासाठी) आकारत नाही. त्या त्या देशातले नियम वेगळे असू शकतात.
    अशी फी लागू होईल अशी शक्यता असल्याने आम्ही स्वतःहून भारतातले क्रेडिट कार्ड वापरले असले तर एकूण रक्कम ३-५% आणखी कमी करतो ज्या योगे असा खर्च ग्राहकाला पडू नये. आणि त्या ग्राहकाची बँक जर काहीच फी आकारत नसेल तर तो फायदा ग्राहकाला मिळतो. सध्या ही सवलत फक्त भारतात राहणार्‍या ग्राहकांसाठी आहे.

    Pages