ईमु पालन-(शेती)

Submitted by विक्रांत on 29 January, 2010 - 06:39

मी दिड वर्षापुर्वी पुण्यापासुन ६० किमी अंतरावर ईमु पालनाचं प्रोजेक्ट्/शेती सुरु केलीय. सुरुवातीला साधरनतः ७-८लाखाचं खर्च येतो पण नंतर उत्पादनावर नफा अवलंबुन असतं. माझा दिड वर्षातील ईमु पालनाचा अनुभव ईथे देणार आहे. तसं मी मायबोलीवर नविनच आहे, पण मधुकर कडुन ईथे सदस्यत्व घेण्यासाठी विचारणा झाल्यावर मी लगेच तयार झालो.
मी ईमुची पिल्ल्/पक्षी, अंडी व ईमु फार्मवरील पक्ष्यांसाठी लागणारा ईतर खादय पदार्थाची विक्रिही करतो. कुणाला ईमुपालना बद्दल अधिक माहीती हवी असल्यास मला थेट संपर्क साधु शकता.

लागणारी जमिनः
ईमु पक्षाना राहायला साधारणता १५-२० गुंटे जमिन असल्यास जास्त सोयीच पडतं. कारण त्याना हिंडायला फिरायला जेवढी जास्त जागा मिळेल तेवढी चांगली वाढ होते. या जागेमधे त्या पक्ष्याना राहायला एक शेड करावं लागतं. शेडचा खर्चही फारसा नसतो एखाद्या लाखात चांगलं शेड तयार करता येतं. या व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याची सोय मात्र असावी लागते.

ईमू पक्षी:

ईमू पक्षी नर्-मादी अशा जोडीने घ्यावे लागतात. जोडीतिल नर किंवा मादीचं मृत्यु झाल्यास दुसरा पार्टनर एकटाच राह्तो पण दुस-या जोडप्यात मिसळत नाही. अशा वेळी अशा एकट्या उरलेल्या पक्षाला जिथून विकत घेतलं होतं तिथेच परत करावं लागतं. ईमू पालन नव्याने सुरु करायचे असल्यास किमान २० जोडपी घेणे जास्त फायदेशीर ठरतं.
जेंव्हा पक्षी विकत आणतो तेंव्हा ते साधारणता ३ महिन्याचे असतात, प्रती जोडपे रु. १८००/- पर्यंत आजचा भाव आहे. वयाच्या १८ व्या महिन्यात पक्षी अंडी दयायला सुरुवात करतात. म्हणजे तब्बल दिड वर्ष खिशातिल पैशातुन सगळं करावं लागतं.

खादयाचा खर्चं:
एका जोडप्यावर सर्वसाधारण वर्षाला १२ हजारा पर्यंत खाण्यावर व इतर वैद्यकिय खर्च करावं लागतं.

अंडी देण्याचं प्रमाणः
एक जोडप्यामागे वर्षाला २०-२५ अंडी मिळतात, व बाजारात या एका अंड्याला १८००-२०००/-पर्यंत भाव मिळतो. ह्या पक्ष्यांच सरासरी वय ४० वर्षे असतं.


फायदा किती होतो

समजा तुम्ही २० जोडपी घेऊन ईमुपालन सुरु केलं, तर खाली प्रमाने गणित असेल.

जमिन स्वतःची असाल्यास फार चांगले नाही तर तुमच्या एरियात शेतजमिनीचा जो काही भाव आहे त्या प्रंमाणे किंमत धरावी.

१) पक्षी : २० * १८,००० = ३,६०,०००.००
२) खाद्य : २० * १२,००० = २,४०,०००.००
३) शेड : = १,००,०००.००
४) बोअर्वेलः = ५०,०००.००
एकुण खर्च ७,५०,०००.०० + जमिनीचा खर्च अधिक करावा.

उत्पन्नः

एकुण अंडी २०*२०= ४०० (वर्षाला )
विक्रितुन मिळनारं उत्पन्न ४०० * २००० = ८,००,०००.०० ( आठ लाख रुपये प्रती वर्षी )

हे असं आहे गणीत. सुरुवातिच्या वर्षाला पक्षी,जमिन, बोअरवेल व शेड्चं खर्च आहे. पण दुस-या वर्षापासुन हे खर्च नसल्यामुळे नफ्याचं प्रमान वाढतं.

मो. नं. 9881733622 (विक्रांत पासाळकर )
Email ID: vikrant.pasalkar@gmail.com

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहिती बद्दल धन्यवाद विक्रांत!!

मला काही प्रश्न आहेत. तसेच सवडीने तुम्हाला फोन करेनच.

१. ह्या अंडी कुठे विकत घेतली जातात? विकत घेणारे व्यापारी असतात की एन्ड युजर? आणि मुख्य म्हणजे ह्या अंड्यांचे काय करतात?
२. अंडी पाठवायचे साधन काय? विशिष्ट प्रकारचे क्रेट वगैरे लागतात का? अंडी फुटु नये म्हणुन काय काळजी घ्यावी लागते? दळणवळणात अंडी फुटण्याचे प्रमाण काय? अंडी किती दिवसात बाजारात पोचवावी लागतात (किंवा बाजारपेठेपासून कमाल किती दिवसाच्या अंतरावर जमीन पाहिजे?)
३. मीठ फुटलेल्या जमिनीवर इमु पालनाची शेड उभी करता येईल का?
४. नदीच्या पाण्यावर पक्षी वाढतात का? की पाण्यावर प्रक्रिया करुन (क्षारता वगैरे वाढवून वा कमी करुन गरजेनुसार) मग ते द्यावे लागेल?
५. पक्षांचे खाद्य कोंबडी खाद्यासारखे तयार मिळते की काही ताजे खाद्य (चार्‍यासारखे) घालावे लागते?
६. शेड बंदिस्त बांधावी लागते की फक्त छप्पर? फक्त छप्पर असेल तर जागेला चेन-लिंक वगैरेचे कांपाउंड किती उंचीचे बांधावे लागेल?

माझ्याकडे साधारण एकर-दीड एकर मीठ फुटलेली जमीन आहे. पण आता त्या जमिनीवर पाणी साचत नाही. प्यायला पाणी मुबलक आहे. पावसाळ्यात जमिनीत चांगल्यापैकी चिखल होतो (नदीकाठची काळी माती असल्याने). पक्क्या सडकेपर्यंत साधारण १ किमी अंतर आहे. आणि पुण्यापासून २५० किमी.

याच्यात आजून एक फायदा आहे. जर स्वतःच अंडी उबवायची मशीन घेतली व थेट पक्ष्यांचं उत्पन्न काढलं तर मात्र एका अंड्या मागे २००० ऐवजी ९,००० रुपये मिळतात. अंडी बाहेरूनही उबवून मिळतात. त्याला थोडसं खर्च करावं लागतं.
अंडी उबविण्यावर स्वतंत्र लेख लिहिणार आहे.

विक्रांत , माहीती बद्दल धन्यवाद ,

१) जेंव्हा पक्षी विकत आणतो तेंव्हा ते साधारणता ३ महिन्याचे असतात, प्रती जोडपे रु. १८००/- पर्यंत आजचा भाव आहे. >>> इथे बहुतेक तुम्हाला १८०००/- म्हणायचं असेल .
२) टण्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणार का ? त्यामुळे सगळ्यांनाच माहीती होईल .
३) काही ठिकाणी वाचलं होतं की ह्या पक्षाचं सरासरी वय २०-२२ वर्ष असतं , कदाचीत ते चुकीचही असु शकेल .

इमुपालनावर माहिती देणार्‍या काही वेब्साइट्स खाली दिल्यात. :

इमुइंडीया फार्म अँड हॅचरी
इमु पक्षांचे रोग
इथे इमुपक्षांच्या पालनाबाबत चर्चा दिसली.

इब्लिस, खरं आहे हे. आता इमूपालन हा स्कॅम आहे हे दिसून आले आहे. माझ्या एका मित्राचा पण इमू फार्म होता, तोही तोट्यात गेला आहे.

सिन्धुदुर्गात ईमु पालनाचा अनुभव खुपच वाइट आहे..
टण्या यांनी विचार्ल्रेल्या प्रश्नाणंचि उत्तरे अनेकांना मिळालिच नाहित. /आज ईमु शोभेचे ठरले आहेत..लाखो रुपयांचे शो 'पिस'

एक बातमी :

कणकवली-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इमू पालन करणा-या शेतक-यांनी उद्योगमंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन व्यवसायात होणा-या नुकसानाबाबत कैफियत मांडली. तसेच बँक कर्ज माफ करावे व इमूच्या अंड्यांना शेतक-यांना परवडेल असा दर मिळावा, अशी मागणी केली.
इमू व्यवसायात फायदा असल्याची खोटी माहिती देऊन आमची फसवणूक झाली. बँकेचे अधिकारी, इमूची अंडी विकणारे व्यापारी यांनी अनेक वेळा आम्हाला या व्यवसायात गुंतवणूक करण्याचे सांगितले. शेतीपूरक व्यवसाय असल्याने आम्ही गुंतवणूक केली. इमूच्या अंडय़ांना मिळणारा दर आणि खाद्य यांची गोळाबेरीज करून काही दिवस चांगल्या प्रकारे व्यवसाय चालला. मात्र काही वर्षापासून अंडी विकणारा दलाल आणि बँकांचे अधिकारी यांच्यातील खोटेपणा उघड झाला. व्यावसायिकांनी इमू पक्ष्यांच्या जोडय़ा विक त घेण्यास आम्हाला भाग पाडले. पण, नर इमूचा काहीच उपयोग नसतो. त्यामुळे नरांची जोपासना करून खाद्यापोटी खर्च वाढवला जातो. अंडय़ांचे पूर्वीचे दर आणि आता मिळणारे दर यांच्यातील तफोवत लक्षात घेता इमू व्यावसायिक शेतक-यांना वेठीस धरले जात असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
इमू व्यवसायातील नफा-तोटा लक्षात घेता अन्य शेतक-यांची फसवणूक होऊ नये, अशी व्यवस्था सरकारस्तरावरून व्हावी, शेतक-यांनी इमू व्यवसायासाठी घेतलेली कर्ज माफ व्हावीत किंवा काही टक्के अनुदान मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.