कोल्हापुर कि गुळ्पुर

Submitted by सुनिल परचुरे on 15 January, 2010 - 04:48

नुकताच कोल्हापुरला जायचा योग आला. जस जस कराड मागे पडल तशि हळुहळु हिरवाई चोहीकडे दिसायला लागलि. जिकडे तिकडे ऊसच उस. तुरा आलेल्या उसाकडे पाहिले की मला तरी कपाळावर मोरपिस लावलेला, नृत्यात एक पाय थोडासा दुमडुन चवडयावर ठेवलेला व एक हात कमरेवर तर दुसरा नृत्याच्या पोजमध्ये असलेल्या श्रीकृष्णाचेच दर्शन होते. उसाचा रंगही तसाच व गोडीही त्याच्या सारखीच. इथे तर जिकडे तिकडे कृष्णाचे सहस्त्रदर्शन होत होते.

IMG_0696_0.jpgIMG_0712_0.jpg

मी उसापासून बनणारी साखर पाहिली होती. म्हणजे साखर कारखान्यात एके ठिकाणी बेल्टवरुन उस सरसरत वर जातो. आणि एकदा का तो मशीनमध्ये गेला की ह्या मशीन मधून त्या मशिनमध्ये करता करता डायरेक्ट शुभ्र साखरेच्या रुपातच बाहेर येतो. सगळच मशीनमेड . पण गुळ अजुन तरी ब-यापैकी मॅनमेड बनतो. ह्या वेळेला प्रथमच आम्ही गु-हाळावर गेलो. लोडशेडिंगमुळे संध्याकाळपासून सुरु झालेल गु-हाळ थेट सकाळ पर्यंत सुरु असते. सगळे फोटो रात्री काढल्याने जर बरेवाईट आले असतील तरि गुळासारखे गोड मानुन घ्या.

ज्याचे गु-हाळ असते त्याच्याकडे एकदा कुणी ऊस आणून टाकला की त्याची जबाबदारी जी सुरु होते ती थेट गुळ तयार होऊन तो मालक जो सांगेल त्या अडत्याकडे पोहोचेस्तो.
इथेच फक्त पहिल्यांदी मशीनचा उपयोग होतो तो उसाचा रस काढण्याकरता.
Image0235_0.jpg

हा रस इथे साठवला जातो. इथे भेंडीची पावडर मिक्स केली जाते की, ज्यामुळे त्यातली पहिली मळी म्हणजे घाण बाहेर काढली जाते.

Image0236_0.jpg
इथुन हा रस पंपाने दोन छोटया टाक्यात साठवला जातो. साधारण दोनशे लिटर रस इथे साठवला जातो. त्यात काही केमीकल्स टाकून परत त्यातली मळी/ घाण काढली जाते. हा जो काळपट पण स्वच्छ रस असतो तो अमृत म्हणजे काय असेल असाच असतो.
IMG_0725_0.jpg

हा ९.५ बाय ९.५ फुटाच्या मोठया कढईत ओतला जातो. कढईचा आकार बघुनच दडपायला होत.
Image0234_0.jpgImage0171_0.jpg
साधारण दोन ते सव्वा दोन तास तो इसे उकळवला जातो. म्हणजे जशी बासुंदी करतांना आपण छोटा झारा वापरतो तर इथे हा झारा.
IMG_0736_0.jpg

रस दुध ऊतु झाल्यासारखा सारखा वर वर येत असतो तो हे सारख फिरवत राहिल्याने वर येत नाही.
Image0169_0.jpgImage0196_0.jpg
रस काढल्यानंतर राहिलेली चिपाड ही दोन दिवस वाळवली जातात व तीच ह्या भट्टीत जळण म्हणून वापरतात.
Image0180_0.jpgImage0183_0.jpg

इथे प्राईम माणसाच काम सुरु होत. त्याला गुळव्या म्हणतात. जसजसा रसाचा पाक होत जाईल तेव्हा त्याला कीती कढ द्यायचा, खाली आच किती द्यायची हे तो अनुभवाने सांगतो. जसे घरी पाक करतांना एखादा कढ जास्त झाला किंवा कमी झाला तरी लाडवाच्या चवीत फरक पडतो तस इथे चालत नाहि. जर चवीत फरक झाला तर बाजारात त्यांच्या ढेपेना किंमत कमी, रंग जरी बदलला तरी तसेच, त्यामुळे हा माणुस म्हणजे इथला किंग. इथेही काही केमिकल्स गुळाचा रंग, चवीकरता थोडया फार प्रमाणात घालतात. पाक तयार होत असतांना तो लाकडी मोठया झा-याने त्यातला थोडासा हातावर घेऊन तो बघतो. इतका पारदर्शक, थोडासा गरम व अप्रतिम चविचा असा हा पहिला गुळ.
Image0199_2.jpg

मोठया कढईच्या दोन्हीकडे असलेल्या कडांत बांबु घालून देवाचा गजर करत ति कढई सरकवत इथे आणतात.

Image0172_0.jpg

हा साधारण १० बाय १० फुटाचा व 6 इंच उंची असलेला चौरस असतो. त्यात ह्या कढईतला पाक ओततात.
Image0202_0.jpg

ह्यात थोडी ही ढिलाई दाखवून चालत नाही. गुळाच्या ढेपेचे आकार असलेले व आतमध्ये पातळ कापड घातलेले बादलीसारखे साचे असतात त्यामध्ये हा गुळ पटापट झा-याने गोळा करुन घालतात.
Image0209_0.jpgImage0214_0.jpgImage0220_0.jpgIMG_0752.jpg

ह्या गरम गुळाची चवही अप्रतिम.
IMG_0745_0.jpg

साधारण अडीच तास चाललेला ह्या प्रकारातुन 25 च्या आसपास ढेपा तयार होतात. एका रात्रीत साधारण चार वेळा हा कार्यक्रम होतो.
Image0174_0.jpgImage0176_0.jpg

पण ह्या सर्व कष्टाच चीज होत. तो तयार झालेला गुळ खाल्यावर खरच ब्रम्हानंदी टाळी लागते व ह्या कृष्णाच्या रुपालाही सलाम करावासा वाटतो.

गुलमोहर: 

माझ्या आजोळी हा प्रकार मी स्वतः बघितला आहे.
ही सर्व माहिति प्रसिद्ध केल्याबद्दल तुम्हाला सलाम ...

सुनिल खूपच छान लिहिलेत..
काकवी प्यालात कि नाही ?. ती पण १ नंबर लागते..

त्या कढईला "काहिल" किंवा "काईल" असही म्हणतात.
गरमागरम गुळाची चव अफलातुन असते. Happy
उत्तम गुळव्या, उसाची उत्तम जात आणि जमिनीचा कस ह्यावर गुळाची क्वालिटी अवलंबुन असते.
माझे बाबा खास भेडसगाव (बहुद्धा शाहुवाडी तालुका असेल) इथल्या त्यांच्या खास ओळखीच्या गुळव्याकडुन काकवी आणायचे. Happy

तिळ गुळ घ्या गोड गोड बोला!!!
मस्त माहिती... आमच्या ज्ञानात भर पडली. फोटोपण छान..

मस्त लिहिलेय. मला एकद्म बेसिक प्रश्ण पडले... ती एवढी कढई लोखंडाची असते?
व झारा पण माणसेच हातानेच फिरवतात की काय?
व इतकी अवजड हातानेच उचलतात ही माणसे?

आवडले फोटो.

खुपच छान माहिती . केदार मी काकवी प्यायलोय पण गुळ कसा तयार होतो ते माहीती नव्हतं .
ठांकु सुनील , आमच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवल्याबद्दल . Happy

मस्त लिहिलेय. मला एकद्म बेसिक प्रश्ण पडले... ती एवढी कढई लोखंडाची असते?
व झारा पण माणसेच हातानेच फिरवतात की काय?
व इतकी अवजड हातानेच उचलतात ही माणसे?>>>

हो ही काइल लोखंडाचीच असते.
नेमका कोणता झारा?? जो काइलीत मिश्रण उकळताना फिरवतात तो की मिश्रण चौकोनी हौदात ओतल्यानंतरचा??
काइलीत असलेला झारा अधेमध्ये हाताने फिरवतात. आणि साधारण सेंटरला एक गोल गोल फिरणार यंत्र टाइप असत तेही हाताने फिरवतात.
अवजड काहिल (पुर्ण मिश्रणाने भरलेली) हातानेच उचलतात. फक्त त्याच एक वेगळ टेक्निक आहे.
तरफ (लीव्हर) टेक्निक वापरतात. त्या काइलीला असलेल्या कानांमधुन (आपल्या घरच्या कढइला पकडन्याचे कान असतात तसे कान) मोठे मोठे बांबु घालतात. असे चार पाच आरपार बांबु असतात. शिवाय डायरेक्शन देण्यासाठी एखादा माणूस असे ८-९ जण ती काइल तिरकी करुन ती मिश्रण त्या चौकोनी हौदात ओततात.
त्याच वेळी बोला "पुंडलिक वरदा........... ज्ञानदेव तुकाराम" असा जयघोष असतो. Happy
अर्थात हे स्किलच काम आहे. अशा कामात एखादा अपघातदेखील हु शकतो. (जसे की ते मिश्रण एखाद्याच्या अंगावर येणे) पण फारच कमी आहे ह्याची फ्रीक्वेन्सी.
हे सगळ मी पाहिल त्याला आता ७-८ वर्ष होउन गेली. आता काहि नवीन टेक्निक वापरत असतील तर माहिती नाहि.
पण घाण्याला भेट देणी हा सॉल्लिड्ड अनुभव आहे. तिथे सगळी काम करणारे पुरुषच असुनदेखील स्वच्छता आणि टापटीप उत्तम असते. मी पाहिलेल्या घाण्याला तर सगळीकडे शेणाच सारवणदेखील होत.
पिकासावर गुळ बनवण्याच्या प्रोसेसचे अजुन खुप सारे फोटो पाहिले होते मी.
त्यात अजुन डिटेल्स कळु शकजॉगरीतस सर्च करा अजुन फोटू पहायला मिळतील.

काहील उचलताना बहुतेक "श्री गुरुदेव दत्त' असा घोष करतात्.(म्हणजे मी पाहिले आहे तिथे). गूळ तयार होताना रसावरची जी साय येते ती चवील अफलातून. जर शेंगदाण्याचा अर्धवट कूट असेल तर त्या सायीत घालून मस्त चिक्की तयार होते. गुर्‍हाळात रस पिण्याचे समाधान. आम्हाला ग्लास नाही तर तांब्या भरून रस प्यायला दिला होता. ताजा गूळ अप्रतिमच लागतो खायला.
गेल्याच आठवड्यात औरंगाबादजवळ एक गुर्‍हाळ पाहिले. आता पूर्वीसारखी काहील बांबू घालून हाताने उचलत नाहीत. यांत्रिकीकरण झाले आहे. काहील जाळापासून दूर सरकवण्यासाठी लोखंडी खाचा आणि चाके असतात आणि काहील उचलण्याचे काम पुलीने करतात.

गुळव्याला 'गुळ्यामामा' व जाळ घालणाराला 'जाळ्यामामा' म्हणतात Happy

गुळापेक्षा साय हा फारच खास प्रकार असतो. हल्ली बाजारात सायीचाही गूळ मिळतो. केमिकल्सचे प्रमाण वाढल्याने गुळाचा रंग आकर्षक म्हनजे पान्ढरट पिवळा झालाय पण तो चवीला नीट लागत नाही. आणि पुन्हा त्याचे साईड इफेक्ट आहेच. काही दुकानात बिन केमिकलचा गूळ मिळतो पण तो लालसर असतो. व मॉडर्न गिर्हाइकाला आवडतही नाही...

गूळ निर्मितीवर सरकारची बंधने आहेत...

गूळ निर्मितीवर सरकारची बंधने आहेत... >>> कारण काय हुड , काही ठिकाणी कारखान्यांना ऊस जास्त झाल्यामुळे , ऊभा ऊस वाळुन चाललाय आणि वरन परत जर गुळ निर्मितीवर ही बंधन असेल तर शेतकर्‍यांनी काय करायचं ?

मस्त. गूळ कसा बनवतात हे मी नुसते ऐकले होते, तुमच्या फोटोमुळे ती प्रतिक्रिया बघायला मिळाली त्याबद्दल तुमचे आभार. प्रत्यक्ष हे सगळ कधी बघायला मिळेल कोण जाने.
कॉलेजात असतांना कराडच्या एका मैत्रीणीने काकवी आणली होती सगळ्यांसाठी तेव्हा मी काकवी प्यायलेली आहे, ती गूळ तयार करतांनाच तयार होते ना, तुम्ही ग्लासात दाखवलीये ती काकवीच का?

सुनिल्..छानै रे माहिती आणी फोटो..आम्ही फक्त ऐकूनच होतो आतापर्यन्त गूळ कसा तयार होतो ते!! काकवी शब्द 'शाम ची आई' वाचताना आला होता..

लै भारी सुनील!

हे कोल्हापुर पद्धतीचे गुळघर आहे. गुळवे मामा अन जाळ्यामामा चे!

यु पी - उत्तर प्रदेश- पद्धतीचे गुर्हाळात सगळे असेच असते, फक्त काहिली/कढाई छोटी असते, अन एका पेक्षा जास्त असतात. वेगवेगळ्या तापमानाला अन स्टेजेस ला ते पुढील कढईत ओतत/ ढकलत असतात. शेवटी एक व्यक्ती तो रस, थंड होत असताना झार्‍या ने सिमेंट च्या चौकोनात ढकलत असतो.

माझे कडे यु पी पद्धतीचे गुर्‍हाळाचे विडीओ आहेत, ते मी अपलोड करेल महंजे काही लोकांना याची देही याची डोळा पाहता येतील.

रॉबीन- काय बंधने आहेत? सध्या कोणताही शेतकरी गुर्‍हाळ चालु करु शकतो असा जी आर आहे. त्याची प्रत घ्यायला मी नगर ला उप विभागीय साखर आयुक्तांकडे गेलो होतो, पण मिळाली नाही.

माझ्या माहितीत आता गुळ निर्मीती सर्व बंधनातुन मुक्त केली आहे. वाजपेयी सरकारने! नवीन काही नियम असतील तर जरुर कळवा!

http://www.maayboli.com/node/13487

सदर व्हिडीओ हे यु.पी. टाईप गुर्‍हाळाचे आहेत. कोल्हापुर टाईप मध्ये एकच कढाई/काहिली असते. ह्यात तीन ते चार असतात.

१) ह्यात उसाचा रस बनवण्याचे क्रशर आहे. अगदी कमी खर्चात @ १५ लाखात हे उपयुक्त काम केले गेले आहे. क्षमता: ५०-६० टन प्रति दिन उस गाळप. मेकॅनिकल इंजिनीअर नी यावर कॉमेंट करावी अशी अपेक्षा आहे.

http://www.youtube.com/watch?v=lwnNpceVpmA

२) हा व्हिडेओ पाहण्या अगोदरः इथे बनलेला गुळ हा खाण्यासाठी नसुन, गुजरात, दीव, दमन ला डिस्टीलरी मध्ये लागणारा गुळ आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी अस्वच्छता खुप आहे.
http://www.youtube.com/watch?v=fFxM9zgSsNk

अरेवा मस्त, धन्यवाद, कधी प्रत्यक्ष बघायचा योग आला नाही पण तुझ्या फोटोस मुळे प्रक्रिया तरी कळली Happy

मस्तच! आमच्या घराच्या अगदी जवळ एक गुर्हाळ होते. त्यामुळे हे सगळे पाहिलेय. गुर्हाळावर भाजलेल्या चोथ्याचा, तयार होणार्‍या गुळाचा असा मस्त जळका-गोडसर वास भरुन राहिलेला असतो.
आहाहा! घरची आठवण झाली!
तुम्ही ग्लासात दाखवलीये ती काकवीच का >> नाही तो रस असावा!

गुळ खायाला जेवढा गोड , तेवढाच तो बनवण कठिण...
मला तर गुळ कसा बनवतात ते माहितच नव्हते.. निदान फोटोवरून आणि माहितीवरून तरी समजले.

सुनिल, व्हिडिओ पाहिला... बरिच मोठ्ठी असते रे ती काहिली! ती एवढी उचलायची म्हणजे कमाल आहे... आणि गरम असणार नं, मग हातानी कसाकाय पकडलं?

धन्यवाद सुनील!

काकवी अन ताज्या गुळाचा चाहता वर्ग बघता धंद्याला बराच स्कोप आहे, ह्यावर शिकामोर्तब झाले!

मस्त माहिती ...गुळ बनवण्याची प्रोसेस प्रथमच कळली. फोटोंमुळे मजा आली. ताजा गुळ कधी चाखला नाही,पण काकवी फार आवडते. काकवी,तुप आणि पोळी...अहाहा स्वर्गच!

Pages