नुकताच कोल्हापुरला जायचा योग आला. जस जस कराड मागे पडल तशि हळुहळु हिरवाई चोहीकडे दिसायला लागलि. जिकडे तिकडे ऊसच उस. तुरा आलेल्या उसाकडे पाहिले की मला तरी कपाळावर मोरपिस लावलेला, नृत्यात एक पाय थोडासा दुमडुन चवडयावर ठेवलेला व एक हात कमरेवर तर दुसरा नृत्याच्या पोजमध्ये असलेल्या श्रीकृष्णाचेच दर्शन होते. उसाचा रंगही तसाच व गोडीही त्याच्या सारखीच. इथे तर जिकडे तिकडे कृष्णाचे सहस्त्रदर्शन होत होते.
मी उसापासून बनणारी साखर पाहिली होती. म्हणजे साखर कारखान्यात एके ठिकाणी बेल्टवरुन उस सरसरत वर जातो. आणि एकदा का तो मशीनमध्ये गेला की ह्या मशीन मधून त्या मशिनमध्ये करता करता डायरेक्ट शुभ्र साखरेच्या रुपातच बाहेर येतो. सगळच मशीनमेड . पण गुळ अजुन तरी ब-यापैकी मॅनमेड बनतो. ह्या वेळेला प्रथमच आम्ही गु-हाळावर गेलो. लोडशेडिंगमुळे संध्याकाळपासून सुरु झालेल गु-हाळ थेट सकाळ पर्यंत सुरु असते. सगळे फोटो रात्री काढल्याने जर बरेवाईट आले असतील तरि गुळासारखे गोड मानुन घ्या.
ज्याचे गु-हाळ असते त्याच्याकडे एकदा कुणी ऊस आणून टाकला की त्याची जबाबदारी जी सुरु होते ती थेट गुळ तयार होऊन तो मालक जो सांगेल त्या अडत्याकडे पोहोचेस्तो.
इथेच फक्त पहिल्यांदी मशीनचा उपयोग होतो तो उसाचा रस काढण्याकरता.
हा रस इथे साठवला जातो. इथे भेंडीची पावडर मिक्स केली जाते की, ज्यामुळे त्यातली पहिली मळी म्हणजे घाण बाहेर काढली जाते.
इथुन हा रस पंपाने दोन छोटया टाक्यात साठवला जातो. साधारण दोनशे लिटर रस इथे साठवला जातो. त्यात काही केमीकल्स टाकून परत त्यातली मळी/ घाण काढली जाते. हा जो काळपट पण स्वच्छ रस असतो तो अमृत म्हणजे काय असेल असाच असतो.
हा ९.५ बाय ९.५ फुटाच्या मोठया कढईत ओतला जातो. कढईचा आकार बघुनच दडपायला होत.
साधारण दोन ते सव्वा दोन तास तो इसे उकळवला जातो. म्हणजे जशी बासुंदी करतांना आपण छोटा झारा वापरतो तर इथे हा झारा.
रस दुध ऊतु झाल्यासारखा सारखा वर वर येत असतो तो हे सारख फिरवत राहिल्याने वर येत नाही.
रस काढल्यानंतर राहिलेली चिपाड ही दोन दिवस वाळवली जातात व तीच ह्या भट्टीत जळण म्हणून वापरतात.
इथे प्राईम माणसाच काम सुरु होत. त्याला गुळव्या म्हणतात. जसजसा रसाचा पाक होत जाईल तेव्हा त्याला कीती कढ द्यायचा, खाली आच किती द्यायची हे तो अनुभवाने सांगतो. जसे घरी पाक करतांना एखादा कढ जास्त झाला किंवा कमी झाला तरी लाडवाच्या चवीत फरक पडतो तस इथे चालत नाहि. जर चवीत फरक झाला तर बाजारात त्यांच्या ढेपेना किंमत कमी, रंग जरी बदलला तरी तसेच, त्यामुळे हा माणुस म्हणजे इथला किंग. इथेही काही केमिकल्स गुळाचा रंग, चवीकरता थोडया फार प्रमाणात घालतात. पाक तयार होत असतांना तो लाकडी मोठया झा-याने त्यातला थोडासा हातावर घेऊन तो बघतो. इतका पारदर्शक, थोडासा गरम व अप्रतिम चविचा असा हा पहिला गुळ.
मोठया कढईच्या दोन्हीकडे असलेल्या कडांत बांबु घालून देवाचा गजर करत ति कढई सरकवत इथे आणतात.
हा साधारण १० बाय १० फुटाचा व 6 इंच उंची असलेला चौरस असतो. त्यात ह्या कढईतला पाक ओततात.
ह्यात थोडी ही ढिलाई दाखवून चालत नाही. गुळाच्या ढेपेचे आकार असलेले व आतमध्ये पातळ कापड घातलेले बादलीसारखे साचे असतात त्यामध्ये हा गुळ पटापट झा-याने गोळा करुन घालतात.
ह्या गरम गुळाची चवही अप्रतिम.
साधारण अडीच तास चाललेला ह्या प्रकारातुन 25 च्या आसपास ढेपा तयार होतात. एका रात्रीत साधारण चार वेळा हा कार्यक्रम होतो.
पण ह्या सर्व कष्टाच चीज होत. तो तयार झालेला गुळ खाल्यावर खरच ब्रम्हानंदी टाळी लागते व ह्या कृष्णाच्या रुपालाही सलाम करावासा वाटतो.
चंपक व्हिडिओ मस्त आहे , ५०-६०
चंपक व्हिडिओ मस्त आहे , ५०-६० टन प्रति दिन उस गाळप @ १५ लाखात म्हणजे खुपच चांगलं आहे . किती गुळ बनतो येवढ्या गाळपाने .
सुनील लिंक चालत नाहीये , परत टाकणार का ?
५०-६० टन प्रति दिन उस गाळप >>
५०-६० टन प्रति दिन उस गाळप >> साधारणपणे ११ टक्के उतारा साखरेला असतो! गुळाला १३ टक्के. हे सगळे क्रशर किती चांगला आहे ह्यावर डिपेंड आहे. कारण क्रशर मधुन जितका रस जास्त निघेल तितका गुळ बनण्याचा उतारा जास्त. (उसाची जात, प्रत, अन पाण्याचे प्रमाण हे ही आवश्यक भाग आहेत.)
७ ते ८ टन गुळ तयार होतो दररोज. दोन दिवसाला एक ट्रक (१०-१२ टन)भरते! (काही माल शिल्लक राहतो)
**********
त्या लिंक मधला शेवटचा डॉट काढला कि लिंक चालते! सुनील संपादन कर तेव्हढे!
थँक्स चंपक , तु दिलेली लिंक
थँक्स चंपक , तु दिलेली लिंक ओपन झाली , मस्त आहे व्हिडिओ . मोठ जिकिरीचं काम आहे तेवढी मोठी काहीली उचलुन नेण आणि उपडी करणं .
दिसतो रे मला. sunilparchure
दिसतो रे मला.
sunilparchure चे व्हिडीओ सर्च कर बघु! http://www.youtube.com/user/sunilparchure
सहीच! मागे लिंबुने टाकले होते
सहीच! मागे लिंबुने टाकले होते ना गुळ बनविण्याची माहीती?
चिन्नू, हो, गम्मत म्हणून सहज
चिन्नू, हो, गम्मत म्हणून सहज लिहून टाकली होती!
तीसेक वर्षान्पूर्वी कराडजवळ पाहिलेल्या गुर्हाळाचे काम आठवुन आठवुन लिहीले होते! 
लिम्बीच्या मामाचे गुर्हाळ होते, पण आमच्या लग्नाच्या आधीच त्यान्नी ते बन्द केले, त्यामुळे प्रत्यक्ष कामाचा मला अनुभव नाही
मस्त माहिती मिळाली.
मस्त माहिती मिळाली.
हा पहा कोल्हापुरचा गुळ
हा पहा कोल्हापुरचा गुळ पॅरिसला पोचला!
पॅरिसमध्ये भारतीय दुकानात जास्तकरुन तामिळ गोष्टीच मिळतात (लिज्जत, टाटा टी, हलदिराम वै अपवाद वगळता)... यावेळी पहिल्यांदाच काहितरी मराठी मिळालंय!!
गुळपण एकदम झकास आहे!
लई भारी ! कोल्हापुरी !
लई भारी ! कोल्हापुरी !
आ हा हा! काय झ्याक
आ हा हा! काय झ्याक वाटलं!
'ऐश्वर्या' चा फोटु पण एवढा झ्याक कधी वाटला न्हाई
चंपक
चंपक
माहितीपूर्ण धागा! अनेक
माहितीपूर्ण धागा! अनेक धन्यवाद.
Pages