पानावर..

Submitted by मीन्वा on 11 January, 2010 - 02:59

तहानल्या भुईवर..
थेंब दोन, ओले शार
रेंगाळला स्पर्श तुझा..
ओझरता.. हळूवार

जरा फुलला मोगरा..
धावे वारा रानभर,
दहा दिशांत सांडला
गंध झाला अनावर..

मग जागली कविता..
शब्द झाले पानभर
तरी कसे उतरेना
मनातले पानावर..?

गुलमोहर: 

धन्यवाद..
मिल्या लयबद्ध झालीये का चक्क Happy चांगलंय..
बाकी बर्‍याच दिवसांनी इथे लिहीण्याइतपत बरं असं काही तरी सुचलं .. त्यामुळे मलाही बरं वाटलं.

अप्रतिम...
मग जागली कविता..
शब्द झाले पानभर
तरी कसे उतरेना
मनातले पानावर..? >> क्लासच!