महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरात आज रिक्षा बंदचं आवाहन होतं. पुण्यात सकाळी रिक्षावर अवलंबून असलेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली. काही भागात सकाळी रिक्षा चालू ठेवून दुपारी रिक्षा बंद पाळला. काही भागात कडकडीत बंद पाळला. मुंबईत संमिश्र प्रतिसाद होता. ठाणे, कल्याण भागात पण बंद जोरात नव्हता. मुंबईत प्रवाशांचं रिक्षावाचून फारसं अडत नाही.
पुण्यात रिक्षावाल्यांनी लोकमत लाईव्हशी बोलताना सांगितलं कि रॅपिडो बाईक टॅक्सी मुळं त्यांचा धंदा बुडाला आहे. बाईक टॅक्सीचे चालक सगळे तरूण मुलं असतात. लेडीज प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? रिक्षावाल्यावर लोक विश्वास ठेवून रात्री बेरात्री महिलांना निर्धास्त पाठवू शकतार. बाईक टॅक्सी मधे परप्रांतीय येणार. मग गुन्हेगारी वाढणार. याला जबाबदार कोण?
एकाने विचारलं कि पाऊस आला कि तुम्ही आमच्या रिक्षात येऊन बसणार. आणि पाऊस गेला कि लगेच बाईकवर बसून निघून जाणार. गरज सरो वैद्य मरो हे चुकीचं आहे.
पुणेकर म्हणत होते कि संप मागे घेऊ नये. रस्ते मोकळे आहेत. वाहतुकीला शिस्त आहे.
रिक्षावाल्याला पोट आहे. रॅपिड आणि उबेर वाल्यांना परमिट घ्यावं लागत नाही. रिक्षावाल्यांना परमिट साठी कष्ट करावे लागतात. रिक्षा विकत घ्यावी लागते. वरून मेन्टेनन्सचा खर्च. सीएनजीचा खर्च. अशाने त्यांनी काय करायचं?
लोकमत लाईव्ह इथे आहे.
https://www.youtube.com/watch?v=oK1YwnkIeFI
तुम्हाला काय वाटतं?
आम्हाला बरेच काही वाटते . पण
आम्हाला बरेच काही वाटते . पण आमच्या ( पक्षी: सामान्य लोकांना) कोण विचारते ?
लेडीज प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? रिक्षावाल्यावर लोक विश्वास ठेवून रात्री बेरात्री महिलांना निर्धास्त पाठवू शकतार. बाईक टॅक्सी मधे परप्रांतीय येणार. मग गुन्हेगारी वाढणार. याला जबाबदार कोण?
>>>>> काहींच्या काही मुद्दा आहे . रिक्षावाले परप्रांतीय नाहीत काय?
पाऊस आला कि तुम्ही आमच्या रिक्षात येऊन बसणार. आणि पाऊस गेला कि लगेच बाईकवर बसून निघून जाणार. गरज सरो वैद्य मरो हे चुकीचं आहे.>>> lol हेच रिक्षावाले पाऊस असला की अव्वाच्या सव्वा भाड आकारतात, भाड तर सोडाच नियोजित स्थळी जायला पण नकार देतात रिटर्न भाड मिळत नाही एस कारण देऊन . तेव्हा कोणाच्या गरजेची काळजी नसते का ?
खरी तक्रार रिक्षा टैक्सीची मोनोपॉली मनमानी रॅपिडो मुळे कमी झाली याची आहे . जवळच्या अंतराला येण्यासाठी नकार देणारे आता रॅपिडो ला मिळणाऱ्या प्रतिसाद बघून धास्तवले आहेत म्हणून ही नाटक सुरू आहेत
मुंबईत रिक्षावाचून अडत नाही
मुंबईत रिक्षावाचून अडत नाही हा गैरसमज आहे. कोणी एकेकाळी जेव्हा बेस्ट नियमित आणि मोठ्या प्रमाणात धावत असे तेव्हा हे म्हणून शकत होतो. आता मात्र तसे नाही.
एकेकाळी रिक्षावाले कष्टकरी
एकेकाळी रिक्षावाले कष्टकरी म्हणून पोटतिडीकेने त्यांच्यासाठी भांडण केलेले आहे. पण आता नाही.
रिक्षावाले रस्त्यावर ज्या पद्धतीने रिक्षा चालवतात, टू व्हीलर, सायकल्स यांच्या जिवाशी खेळतात, हात न दाखवता यु टर्न घेतात, माफी न मागता हाणामारीवर उतरतात, मग्रुरी दाखवतात त्यामुळे सहानुभूती नष्ट झाली.
पण न्यायाची भूमिका यावर टिकत नाही. जर शासनाने त्यांना जाचक नियम बनवून परमिट घ्यायला लावले होते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत त्यांना खासगी व्यवसाय म्हणून मान्यता दिली होती तर त्या व्यवसायाची ग्यारण्टीही द्यायला हवी. रॅपिडो, उबेर, ओला हे कुठेही त्या कायद्याचा भाग नाहीत. त्यांना अशा जाचक अटी पार न पाडताच व्यवसायाची परवानगी मिळालेली आहे. काळ सोकावतो. तसं उद्या हे ही मनमानी करणारच. यापूर्वी उबेर आणि ओला का बंद पडले हा इतिहास विसरून चालणार नाही.
दुसरीकडे रिक्षावाल्यांच्या मुजोरीला चाप लावणे, त्यांना शिस्त लावणे हे त्याच शासनाचे काम आहे. लोकांच्या जिवाशी खेळण्याचे लायसेन्स त्यांना नाही. नियम पाळणे, सौजन्याने वागणे आणि स्वच्छता पाळणे हे त्यांच्याही हिताचेच आहे. दोन लाख रिक्षा एकट्या पुण्यात असतील तर साहजिकच ते जिथे धंदा जास्त असेल अशा ठिकाणीच उभे राहणार. मग गर्दीच्या ठिकाणी रिक्षांमुळे दाटीवाटी होणार, कुणालाच धंदा मिळणार नाही. हे मराठी पिक्चरसारखंच आहे.
रिक्षावाल्यांना एकत्र येऊन स्वतःचे अॅप का बनवता येऊ नये? सहकारी संस्था बनवून कुणालाही भाडे मिळू द्या. अॅपकडे जमा होईल आणि हॉटेल मधे टीप वाटून घेतात तसे सर्वांनी वाटून घेतले , किंवा त्या स्टँडच्या सदस्यात तिथले उत्पन्न वाटून टाकले तर सर्वांनाच मिळेल. असा वेगळा विचार केला नाही तर पर्याय नाही.
नाहीतर जुन्या रिक्षांची मुदत संपली कि तिचा परवानाही रद्द व्हावा. काही वर्षे नवे परवाने बंद ठेवा. काही वर्षे नव्या रिक्षांचे रजिस्ट्रेशन नको. असे केले तर धंदा मिळेल.
नवी मुंबईचे रिक्षावाले
नवी मुंबईचे रिक्षावाले बहुतांश चांगले आहेत.
पुण्याच्या रिक्षावाल्यांचे अनुभव चांगले नाहीत. पण ते जुने १५ वर्षांपूर्वीचे अनुभव आहेत. अजूनही तेच रिक्षावाले आहेत की आता जेन झी उतरले आहेत धंद्यात?
असो,
पण सांगायचा मुद्दा हा की माझ्या मनात रिक्षावाल्यांबद्दल सरसकट सॉफ्ट कॉर्नर किंवा कटुता दोन्ही नाही.
फक्त कोणाच्या पोटावर पाय यायला नको एवढीच इच्छा.
अॅड. योगेश पांडेhttps://www
अॅड. योगेश पांडे
https://www.youtube.com/watch?v=Y_U8mOugCgk