तीन पुस्तके शोधत आहे

Submitted by चीकू on 23 November, 2026 - 08:17

नमस्कार. गेली काही वर्षे मी खालील तीन पुस्तके शोधत आहे पण अजून त्यात यश मिळाले नाही. कोणास माहिती असेल काही तर प्लीज सांगू शकाल का?

१. गंगाधर गाडगीळ यांची 'कशी झाली गंमत' ही कथा. या कथेविषयी मी खूप वर्षांपूर्वी वाचले होते आणि ती वाचायची उत्सुकता होती. गाडगीळांचे बहुतेक कथासंग्रह माझ्याकडे आहेत पण त्यात ही कथा सापडली नाही. ही कदाचित बालकथाही असू शकेल पण मला आठवत नाही. कोणाला ही कथा कुठे मिळू शकेल याविषयी माहिती असेल तर कळवा.

२. भा रा भागवत यांनी केनीलवर्थ कादंबरीचा केलेला 'किल्ल्यातील कारस्थान' हा अनुवाद. हे पुस्तक कुठेही मिळत नाही. उत्कर्ष प्रकाशनात चौकशी केली पण त्यांना काही माहीत नव्हते. मूळ प्रकाशक गिरगावचे लाखाणी बुक डेपो. तिथेही चौकशी केली पण तेही काही सांगू शकले नाहीत.

३. आता या पुस्तकाचे नाव आणि लेखक मला आठवत नाहीत. पुराणातील व्यक्तिरेखांवर यात लेख आहेत. एक 'उत्तम मानव' हा ध्रुवाचा मोठा भाऊ उत्तम यावर आहे. एक वाली आणि सुग्रीवावर आहे. हे पुस्तक अनेक वर्षांपूर्वी वाचले होते आणि खूप आवडले होते. पण आता नाव आठवत नाही. दुर्गा भागवत, इरावती कर्वे यांचे असावे असे आधी वाटले पण त्यांचे नाहीये.

कोणाला काही माहिती असेल तर कळवा. धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कडू आणि गोड हा संग्रह होता माझ्याकडे पण त्यात ही कथा नाही. कदाचित आधीच्या आवृत्तीत असेल आणि मग वगळली असेल तर माहिती नाही.

तुम्हाला जर पंकज भोसले या लेखकाला संपर्क करता आला तर बघा. तो जुन्या मराठी पुस्तकांच्या शोधार सगळ्यात पुढे आहे. ती त्याची पॅशनच आहे.