या वर्षीच्या अंकांबद्दल, त्यातल्या भल्याबुऱ्या साहित्याबद्दल चर्चा करण्यासाठी, आवड निवड कळवण्यासाठी हा स्पेशल लेखन धागा.
मला सर्वात उल्लेखनीय वाटणारा दिवाळी अंक म्हणजे पहिल्यांदाच प्रकाशित होत असलेला तथाकथित (मंडळींचा) दिवाळी अंक. या अंकासाठी त्यांनी अनेकांना विविध फोटो 'प्रॉम्प्ट' म्हणून दिले आणि त्यावरून जे सुचेल ते एका फॉरमॅट मध्ये लिहायला लावले. हा एक प्रकारे मानवी सृजनशील बुद्धीला पुन्हा मानवी करण्यासाठी केलेला एक चांगला प्रयोग होता. यातले प्रॉम्ट म्हणजे नामांकित मराठी छायाचित्रकारांनी (इंद्रजित खांबे, कानविंदे) काढलेली छायाचित्रे होती. अर्थात यात अनेकांनी मेटा AI होऊन लेखन केले आहे का ते मलाही ठाऊक नाही. त्यामुळे ही जाहिरात तर आहेच पण एका चांगल्या प्रयोगाची दखल देखील आहे. या अंकात माझी 'चिरंतनाचा गंज' ही कथा आहे. (जी मी स्वतःच लिहिलेली आहे, शिवाय या अंकात मुलं लिहीत असल्याने ती टोन डाऊन करावी लागली) या अंकाच्या संपादक रुचिता भुजबळ असून त्यांनी अतिशय बारकाईने संपादन देखील केले आहे. (फर्स्ट हँड अनुभव) रुचिता भुजबळ जरी मुख्य संपादक असल्या तरी अंकाच्या मुखपृष्ठापासून ते साहित्याच्या निवडी - संपादनापर्यंत, हा एक कलेक्टिव एफर्ट आहे. अशा प्रकारचा ग्रुप ने केलेला प्रयत्न म्हणून देखील या अंकाची विशेष दखल घ्यावी लागेल. या ग्रुप चे नाव तथाकथित मंडळी असे आहे. रुचिता भुजबळ यांची स्टूडट फिल्म 'पंख' इथे पाहता येईल. तथाकथित मंडळींचे कार्यकारी मंडळ इतर अनेक उपक्रम देखील राबवत असते. त्यात उल्लेखनीय म्हणजे त्यांची दी लॅब्स नावाची संस्था. या संस्थेमार्फत लहान मुलांना AI ready करण्याचे काम केले जाते. AI रेडी म्हणजे AI वापरून चमकोगिरी करायचे प्रशिक्षण नव्हे बरं का. (म्हणजे मुलांना LLM वापरायचे प्राथमिक ज्ञान देऊन त्यांच्याकडून वयाहून मोठ्या असणाऱ्या चमको गोष्टी करून घेणे नव्हे)
AI चा एकूण व्यापार, वापर आणि वैज्ञानिक बैठक काय, त्यात येणारे येऊ शकणारे मानवी बायसेस काय, त्यापासून आपण स्वतःचे स्वत्व कसे सांभाळायचे, कुठपर्यंत वाहवत जायचे कुठे रोखायचे, त्याची तात्विक बैठक आणि व्यावहारीक इमॅप्क्ट यांचा ताळमेळ मुलांना समजून यावा, त्यांनी त्यांची सृजनशक्ती आणि अन्वयबुद्धी AI ला गहाण न टाकता त्याचा वापर करून त्यावर मांड ठोकावी आणि हे करत असतानाच स्वतः ला कोसळू न देता यावे अशा प्रकारचे शास्त्रशुद्ध कोर्सेस ते चालवतात.
त्यांच्या या पार्श्वभूमी वर त्यांना असा दिवाळी अंक काढणे समयोचितच आहे किंबहूना सृजन करणाऱ्यांना देखील मुळापासून या प्रश्नाकडे त्याच सृजनात्मक दृष्टीने सजगपणे पाहायला लावणाराही आहे.

.
.
.
अरे हाच धागा काढावा का विचार
अरे हाच धागा काढावा का विचार करत होतो.
आधीच काढलाय..
बोभाटाचा दिवाळी अंक सुद्धा AI ने काढलाय.
मी ऋतुरंग घेतला आहे यंदा. त्याचा हा "निसर्ग माझा सोबती" विशेषांक आहे. लहान लहान लेख , कथा आहेत.
ऐसी ... चा देखील अजून वाचायचा आहे
१. ऐसीच्या दिवाळी अंकाच्या
१. ऐसीच्या दिवाळी अंकाच्या संकल्पनाविषयक भागात माझा एक लेख आहे. टिकली ते टिकली: पॉलिटिकली https://aisiakshare.com/node/9744
२. मिसळपावच्या दिवाळी अंकात आलेली दीर्घ मिथो साय फाय कथा : बिसलसिदरायाची न्हाणी. https://www.misalpav.com/diwali/baisalasaidaraayaacai-nahaanai-54113
३. गवि यांच्या वाजे पाऊल या मस्त कथेचा सीक्वल देखील मी खाली लिहिला आहे तो ही वाचून कळवा :
https://www.misalpav.com/diwali/vaajae-paaula-54048
ऐसी अक्षरे चा अंक सुरेख झाला
ऐसी अक्षरे चा अंक सुरेख झाला आहे. ही वेबसाईट चालवणार्यांचे कौतुक आहे - दिवाळी अंक दरवर्षी अधिकाधिक दर्जेदार निर्मितात.
रॉय तुमचा लेखपण आवडला. थोडा विस्कळीत (अडगळ) झाला शेवटी असे वाटले. पुन्हा वाचून सविस्तर प्रतिसाद देईन.
टवणे सर, धन्यवाद. AI ने गोल
टवणे सर, धन्यवाद. AI ने त्याच डेटावर गोल गोल फिरवलेला मुद्देसूद माल वाचून वाचून एवढे संपृक्त काटेकोर झालो होतो की विचारू नका. म्हणून मुद्दाम सैलसर लिहिले आहे आणि सबगोलंकार न लिहिता पर्सनल अनुभवातूनच लिहिले आहे.
अक्षरच्या दिवाळी अंकात माझी
अक्षरच्या दिवाळी अंकात माझी रस्ता नावाची नवीन कथा आहे.
मुक्तशब्दच्या दिवाळी अंकात माझी एक कविता आहे.
गवि यांच्या वाजे पाऊल या मस्त
गवि यांच्या वाजे पाऊल या मस्त कथेचा सीक्वल देखील मी खाली लिहिला आहे तो ही वाचून कळवा :
>>>> वाचली. आवडली. एका संशयाने अश्रद्ध माणूस मनोरुग्ण होत गेला हे मस्त पकडलंय. वेगवान आणि खिळवून ठेवणारी कथा आहे.
दुसरी सायफाय पण सुरू केली आहे वाचायला.
माझ्या हाती दिवाळी अंक आलेले
माझ्या हाती दिवाळी अंक आलेले नाहीत, परंतु लेखकांनी आणि संपादकांनीच मला काही कथा, लेख वाचायला दिल्या. आणि ऑनलाइन जितके वाचता येईल त्यावरून -
आदूबाळ इज जीनियस :
आदूबाळ यांच्या इन्स्पेक्टर ब्रूइन सिरीज मधली पुढची उकलकथा वाचायला मिळाली. इन्स्पेक्टर ब्रूइन आणि टेसुला बन. ही नवलच्या दिवाळी अंकात आली आहे. आदूबाळ यांनी मराठी हिस्टोफिक्शन उंच पातळीवर नेऊन ठेवले आहे. माझ्या माहीतले कुणीही इतके चांगले हिस्टॉफिक्शन लिहीत नाही. इन्स्पेक्टर ब्रूइन हा एक खरा ब्रिटिश इन्स्पेक्टर होता मात्र त्याच्या वेगवेगळ्या चातुर्यकथा आदूबाळ लिहीत आहेत. इन्स्पेक्टर ब्रूइन आणि टेसुला बन या कथेत ब्रूइन पत्रातून खुनाची उकल करतो. whodunnit चा असा प्रयोग मराठीत प्रचंड दुर्मिळ आहे. त्यातल्या तळटिपांवरून आणि एकूण पकडलेल्या अतिशय बारीकसारीक 'राज' गोष्टींवरून तर हा अस्सल पत्रव्यवहाराचे भाषांतर वाटतो. (एक ज्येष्ठ स्नेही फसलेही). आदूबाळ यांची कथा अवश्य वाचावी नवल मधली. त्यांनी लिहिलेले ऐसी अक्षरे वरचे राशिभविष्य देखील धमाल आहे.
आदुबाळच्या कथांचे संकलन यायला
आदुबाळच्या कथांचे संकलन यायला पाहिजे लवकरच. रावजीची पावभाजी तर खासच होती.
पुढच्या महिन्यात येणार आहे.
पुढच्या महिन्यात येणार आहे.